बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

#Top_Indian_Companies

#Mahindra & Mahindra...
देशातील एक अग्रगण्य प्रवासी व कमर्शियल वाहने उत्पादक तसेच जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी. आनंद महिंद्रा आणि पवनकुमार गोएन्का यांच्या नेतृत्वाखाली कंपनी मार्गक्रमण करत आहे. ९८,००० कोटींचे मार्केट कॅपिटल आणि ४०,००० जणांना रोजगार देणारी हि कंपनी आहे. सोबतच लाखभर अप्रत्यक्ष रोजगार सुद्धा कंपनी निर्माण करते. ऑटोमोबाईल कंपनी प्रत्यक्ष पेक्षा अप्रत्यक्ष रोजगार जास्त निर्माण करते. अप्रत्यक्ष म्हणजे व्हेंडर कर्मचारी, काँट्रॅक्टर्स चे कर्मचारी, स्थानिक रोजगार इत्यादी.
कंपनीची सुरुवात J.C. महिंद्रा, K.C. आमो मलिक गुलाम मोहम्मद या तिघांनी १९४५ साली लुधियाना येथे केली होती. सुरुवातीला कंपनीचे नाव Mohammad & Mahindra असे होते. कालांतराने १९४७ च्या फाळणीमधे मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तानात निघून गेले आणि पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री झाले. यानंतर १९४८ मधे कंपनीने नावात बदल करून Mahindra & Mahindra असे नाव केले.
देशातील SUV वाहनांच्या मार्केट मधे महिन्द्राचा दबदबा आहे, तर ट्रॅक्टर क्षेत्रात कंपनी अव्वल आहे. सोबतच कमर्शियल वाहनांच्या निर्मितीतही कंपनी काम करते. २०११ च्या Fortune India 500 यादीमधे कंपनीचा २१ वा क्रमांक होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल