बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

उद्योजक व्हा !...

२० वर्षांपूर्वी हा व्यक्ती आपल्याप्रमाणेच एक सामान्य उद्योजक होता... त्यामुळे हे आपल्याच्याने शक्य नाही असं वाटायचं काहीच कारण नाही. एक चांगली संकल्पना, धाडस आणि नियोजन असेल तर आपणही २० वर्षात स्वप्नवत यश मिळवू शकतो. जेफ बेझोस यांची संपत्ती आता १५० अब्ज डॉलर्स च्या पुढे गेली आहे. त्यांची संपत्ती प्रति सेकंद रु. ७५,०००/- या वेगाने वाढत आहे. 

संपत्ती आणि रोख रक्कम यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्ष्यात घ्या बरका.. बेझोस यांचे रोख उत्पन्न कदाचित जास्त वाढले नसेल पण त्यांची संपत्ती सेकंदाला जवळपास लाखाच्या वेगाने वाढत आहे. म्हणून महिना किती उत्पन्न मिळेल असले प्रश्न विचारण्यापेक्षा निवडलेला व्यवसाय जास्तीत जास्त मोठा कसा होईल याकडे लक्ष द्या. व्यवसाय मोठा झाला कि पैसा आपोआपच वाढतो.
आता बेझोस सेकंदाला ७५,०००/- रुपये कमावत असेल तर आपण सेकंदाला किमान १ रुपया कमवायचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवायला काहीच हरकत नाही... नाही का? आणि तुमचे हे उद्दिष्ट पूर्ण झाले असेल तर पुढचा टप्पा आत्ताच्या उत्पन्नापेक्षा किमान दुप्पट असायला हवा...
आणि महत्वाचे म्हणजे हे उद्दिष्ट गाठण्याची क्षमता फक्त उद्योजकांमध्येच असते. म्हणूनच ते जगातील एकूण लोकसंख्येच्या फक्त ५% असतात.
उद्योजक व्हा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल