बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

#मारवाडी समाज आणि #धंदा..

#मारवाडी समाज आणि #धंदा
व्यवसाय धंदा म्हटल कि #मारवाडी हा शब्द किंवा समाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो - आणि लगेच आपसूक वाक्य बाहेर पडतं, "" धंदा करायचं आपल काम नाही, धंदा करावा फक्त मारवाड्यानीचं "". अस का म्हणतो आपण किंवा अस काय आहे की ज्यामुळे #धंदा आणि मारवाडी हे सूत्र सहज जुळत ????
मित्रांनो, आपण मारवाडी समाजाची श्रीमती पाहतो - पण त्यामागचे त्यांचे कष्ट पाहतो का ?? त्यामागचा त्यांचा त्याग पाहतो का - एवढी श्रीमंती येण्यासाठी त्यांना कितीतरी अडचणीना सामोरे जावं लागत पण त्याही पलीकडे मारवाडी लोक हे कोणताही व्यवसाय करण्या अगोदर तो व्यवसाय ते लोक जगतात अर्थात त्या व्यवसायात काम करतात - म्हणजे त्यांना त्या व्यवसायातील पूर्ण माहिती मिळते मग शक्यतो त्यातून नफा जरी लवकर मिळाला नाही तरी तोटा मात्र कमी होतो किंबहुना होतंच नाही .... त्यांना कोणताही व्यवसाय करायची अजिबात लाज वाटत नाही - दुकानात असल्यावर ते एकदम साधे simple राहतात- कोणताही गिऱ्हाइक तुटणार नाही याची नेहमी काळजी घेतात - त्यांच्या बहुतेक कुटुंबातील सगळी लोक एकमेकाना समजून घेत व्यवसायात एकमेकांना मदत करतात -
नवीन कोणी व्यवसाय करत असेल तर एक समाज म्हणुन त्याला सर्वजण सांभाळून घेतात - आर्थिक बाजून तर घेतातच परंतू त्याला प्रोत्साहन देतात- मानसीक आधार देतात- त्यामुळे उद्योजकतेची मानसीकता आणि त्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या समाजात कायम नेहमी दिसून येतो....
अजून एक मुद्दा आवर्जून सांगावा लागेल तो म्हणजे, मारवाडी समाजातील तरून पोरांकडे नम्रपणा खूप असतो - थोर मोठ्याशी ते अगदी अदबीने बोलतात त्यांचा आदर करतात - त्यांच्या दुकानात तुम्हांला म्हातारी वृद्ध मंडळी गल्ल्यावर बसलेली शंभर टक्के दिसणार- त्यामुळे वयस्कर माणसांच्या अनुभवाचा फायदा धंद्यात सहज होऊन जातो - दुसऱ्या बाजूला या समाजामध्ये व्यसनाधीनता फार कमी आहे - शक्यतो दारुडा रस्त्यावर पडलेलाा व्यक्ती किंवा तरुण मारवाडी नसतोच - तुम्हांला शाळा कॉलेज मध्ये फालतू टुकारगीरी करताना- कट्ट्यावर- बाईकवर मोक्कार बोंबलत फिरताना - बापाच्या पैशावर पार्टी करताना - मित्रांना दारू पाजताना मारवाडी पोरगा विरळच दिसेल -
चिकट समाज म्हणून त्यांना सातत्याने हिनंवल जात- पण जरा माहिती काढा भारतात सर्वात जास्त दान धर्म करणारा हाच समाज आहे -शाळा - संस्था- हॉस्पिटल- अन्नदान -रक्तदान -वृद्धाश्रम- अनाथालय - वसतिगृह - अपंगाना- अश्या गरजेच्या ठिकाणी सर्वात जास्त यांचीच मदत असते - मात्र हि मंडळी योग्य ठिकाणी - योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनेच मदत करतात - आणि दान करतात म्हणूनच हे लोक धनवान आहेत -
मारवाड्याकडे श्रीमंती असते यापेक्षा त्यांना श्रीमती टिकवता येते कारण श्रीमती टिकवण्याचे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा मोठा धनदांडगा वारसा या समाजाला नव्हता- स्वतःच्या हजारो एकर जमीनीही नव्हत्या- परंतू मिळेल त्या ठिकाणी असेल त्या अवस्थेत - आहे त्या परिस्थितीमध्ये लाज न बाळगता - शांत-संयमी आणि नम्र राहून आपल्या मारवाडी बांधवांनी #जिद्द चिकाटी-सचोटी-एकजूट- जागरूकता- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नम्रता ह्या या उपयुक्त गुणांच्या जोरावर व्यापारी क्षेत्रात स्वतःची ताकद उभी केली आहे-
शेवटी काय एक #उद्योजक म्हणून तुम्ही नेहमी सकारात्मक राहून आसपास ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मसात केल्या पाहिजेत - आणि मारवाडी समाजाचा द्वेष न करता त्यांच्याकडून खूप खाही शिका- फायदा होईल.....।।




-9850504505

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल