ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती असतानाच हा फोटो आहे. व्हाईट हाऊस मधे बरेच वर्ष काम करणारे एक कृष्णवर्णीय कर्मचारी काही कारणाने आपले पद सोडून चालले होते. त्यांनी ओबामांसोबत आपल्या कुटुंबाचा फोटो घेण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ओबामा त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी आले. या वेळी तिथे त्या कर्मचाऱ्याचा लहान मुलगाही होता. ओबामांना पाहताच तो मुलगा सहज बोलून गेला; तुम्ही माझ्यासारखेच दिसता, तुमचे केस माझ्यासारखेच आहेत... आणि ओबामांनी त्याला प्रतिसाद देताना अगदी सहजपणे म्हणले, हो आपले दोघांचेही केस अगदी एकसारखेच आहेत, हात लावून बघ... इतकं म्हणून ओबामा त्या मुलासमोर झुकले. त्या मुलाने आपले हात ओबामांच्या डोक्याला लावले आणि आपल्यासारखेच केस आहेत याचा त्याला खूप आनंद झाला. ओबामांसोबत असलेल्या फोटोग्राफर ने हा क्षण क्षणार्धात आपल्या कॅमेरॅत टिपला.
व्हाईट हाऊस च्या इतिहासातील निवडक अजरामर फोटोंमधे हा फोटो गणला जातो.
व्हाईट हाऊस च्या इतिहासातील निवडक अजरामर फोटोंमधे हा फोटो गणला जातो.
एक राष्ट्राध्यक्ष एका लहान मुलासमोर सहजपणे झुकलेले पाहणे हा अमेरिकावासीयांसाठी आणि जगालाही खूप काही शिकवून जाणारा प्रसंग होता. तुमची महानता तुमच्या श्रीमंतीवर, यशावर किंवा पदावर कधीही ठरत नाही. तुम्ही कर्तृत्त्वाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही इतरांशी कसे वागता यावर तुमच्या महानतेचे मूल्यमापन होत असते... ओबामा याच निकषावर अमेरिकेच्या इतिहासात महान राष्ट्रपतींच्या रांगेत विराजमान आहेत.
नजीकच्या काळातील ट्रम्प आणि ओबामा यांच्यात म्हणूनच कधीही तुलना होऊ शकत नाही. उद्योजकांमधेही आपलं नकळतपणे टाटा, बफे, गेट्स यांच्यावरंच प्रेम जडलेलं असत, ते त्यांच्या या सर्वोच्च स्थानी विराजमान असूनही जमिनीशी जोडलेल्या नात्यामुळेच...
_
_
उद्योजक मित्र
Image, content & Article are subjected to copyright. Violation of the same will result into legal action.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा