गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

रॉबर्ट कियोस्की यांचे रिच डॅड पूअर डॅड...

Poor people don’t buy anything, rich people buy assets and middle class people buy liabilities and think that they’re assets. (पूअर पीपल डोंट बाय एनिथिंग, रिच पीपल बाय अॅtसेट्स अँड मिडल क्लास पीपल बाय लायबिलिटिज अँड थिंक दॅट दे आर असेट्स.) हे वाक्य रॉबर्ट कियोस्की आपल्या ‘रिच डॅड पूअर डॅड’ या पुस्तकात प्रभावीपणे सांगतात….


 १ एप्रिल २००० ला प्रकाशित झालेले ‘रिच डॅड पूअर डॅड’ हे पुस्तक फायनान्शिअल लिटरसी अर्थात आर्थिक ज्ञान याचे आजच्या काळातील महत्त्व सांगते. आपल्याकडे पैसे येतील तेव्हा मोठी गाडी घेऊ, आपले स्वतःचे घर घ्यायला हवे म्हणजे एक मोठी इन्व्हेस्टमेंट होईल, असे बर्यााच जणांना वाटले.

 रॉबर्ट यांच्या मते कोणत्याही प्रश्नाटचे उत्तर हे पैसे नसते तर आपले बुद्धिकौशल्य असते. त्यामुळे आपले पैसे नेमके कुठे गुंतविले पाहिजेत ज्याने ते वाढत जातील हे रॉबर्ट या पुस्तकात सांगतात. आपल्यातल्या बऱ्याच जणांना असेही वाटते की, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला येतो यावर आपण गरीब किंवा श्रीमंत मानले जातो. इतर बाबतीत हे खोटेही असेल; परंतु जेव्हा पैशांच्या बाबतीत बोलले जाते तेव्हा काही अंशी हे खरेच आहे, कारण श्रीमंत वडील आपल्या मुलांना जे शिकवतात ते गरीब वडिलांना माहीतच नसते; त्यामुळे ते आपल्या मुलांना त्यांना जितकं माहीत आहे तितकंच शिकवू शकतात. 

या पुस्तकात रॉबर्ट कियोस्की यांनी त्यांच्या लहानपणच्या अनुभवावरून आता, जेव्हा ते एक करोडपती झाले आहेत तेव्हापर्यंतचे विविध अनुभव वाचकांना सांगितले आहेत. त्यांच्या पूअर डॅडकडून ते कोणकोणत्या गोष्टी शिकले हे तर त्यांनी सांगितले आहेच त्याशिवाय त्यांच्या रिच डॅडनी त्यांना श्रीमंत होण्याची जी रहस्ये सांगितली तीसुद्धा वाचकांना त्यांनी उदाहरणांचा आणि अनुभवांच्या माध्यमांतून सांगितली आहेत. (हेच श्रीमंत वडील आपल्या मुलांना शिकवतात.) श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत कसे होत जातात आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब कसे होत जातात हे आपल्याला या पुस्तकातून समजते, कारण श्रीमंतीचे आणि गरिबीचे मूळ कारण ते म्हणजे ‘पैसे’ हे श्रीमंत लोक कसे वापरतात आणि गरीब लोक कसे वापरतात हे रॉबर्ट यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे. पुस्तकाच्या शेवटी रॉबर्ट काही पायर्याक आपल्याला सांगतात ज्याद्वारे आपण आतापासूनच श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतो! – शैवाली बर्वे 

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2nf












https://udyojak.org/rich-dad-poor-dad-by-robert-kiyoski/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल