रविवार, ९ डिसेंबर, २०१८

तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची का आहे?....

तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची का आहे?


प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच आणि प्रत्येक गोष्टींमधून पैसा कमवला जाऊ शकतो, जोपर्यंत पैशाचे महत्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावण्यापेक्षा गमावण्यातजास्त मजा येते. आई वडील महिनाभराच्या खर्चासाठी जे पैसे देतात ते २–३ दिवसात संपून जातात कारण प्रत्येक गोष्टीची आपण पैश्यामध्ये किंमत करत असतो पणपैश्याची किंमत कशात मोजायची हे कोणी समजावून सांगितलेले नसते! त्यामुळे पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे आणि का खर्च करायचे असे प्रश्न कधीच मनातउद्भवत नाहीत, सर्वांचे पैश्याबद्दलचे मत असेच आहे, बऱ्याच मुलांना हे समजत नाही की त्यांच्या पालकांनी पैशासाठी किती कठोर परिश्रम केले आहेत. जोपर्यंतआईवडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळत असतात तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्व कळत नाही.

पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही, कोणत्याही गोष्टीचे महत्व समजण्यासाठी आपल्याला त्यागोष्टींमध्ये धक्के खावे लागतात, धक्के खाल्ल्याशिवाय आपल्या मेंदूला जाग येत नाही, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते म्हणजेच आपला मेंदूसारासार विचार करू शकत नाही.

पैसे काय आहेत आणि पैशांच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो, पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिकसाक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हि गोष्ट सुद्धा आर्थिक साक्षरतेमध्येच मोडते.

आर्थिक परिस्थिती नुसार आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का? आपण खर्च कमी करून पैसे कसे वाचवू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे का?? पैशांचीबचत कशी करावी? ह्या सर्व गोष्टी आर्थिक साक्षरतेचे ज्ञान प्राप्त केल्यावरच समजतात. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे जाणून घेणे आवश्यक आहे. पैशांचीगुंतवणूक कोठे करावी, विविध वित्तीय साधने, विविध मालमत्ता वर्ग इत्यादी बद्दलचे ज्ञान असल्यास आपण योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो.

आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याजवळ नसणे म्हणजे आर्थिक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. जे उच्चशिक्षित श्रीमंत लोक असतात ते सहसा आर्थिक साक्षरताह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, असे लोक सहसा आर्थिक समस्यांना टाळत असतात, पैसा आणि शिक्षण हे माणसाच्या आयुष्यातील 2 मोठे पैलू आहेत, परंतु ह्या दोन्ही पैलूंचा विचार केला तरी गरीब, श्रीमंत, तरुण किंवा वृद्ध, सर्वांनाच आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे ह्याची कारणे पुढील प्रमाणे –

1) प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण एक यादी बनवायला हवी ज्यामध्ये आपण पूर्ण महिन्याभरासाठी लागणार खर्च आणि महिनाभर आवश्यक असणाऱ्यागोष्टी लिहायला हव्यात. जसे की… महिनाभर आपल्याला अवश्य असणारी वीज, जेवण–खाण, घरभाडे, गाडीला लागणारा खर्च आणि इतर गोष्टींना लागणारे पैसे बाजूलाठेऊन बाकी पैसे बँकेत जमा करावेत जेणेकरुन आपला वायफळ खर्च होणार नाही आणि आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहतील.

2) तरुण पिढीला, कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना घरातून पॉकेटमनी मिळतो, अश्या मुलांनी पॉकेटमनी मधून पैसे वाचवायला शिकले पाहिजेत. लहान वयातचबचत करण्यास सुरुवात केली तर तरुण वयात बचत करण्याची सवय होऊन जाते. पालकांनी मुलांना पैसे देताना विचार करून पैसे द्यायला हवेत. पैश्याचे मूल्य काय आहेहे मुलांना पटवून द्यायला हवे. मुलांनी सुद्धा एका ठराविक वयानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरातून पॉकेटमनी घेणे बंद केले पाहिजे. स्वतःचा खर्च सुद्धा विचारकरूनच करायला हवा.

3) आजकाल पैश्यांची गुंतवणूक करण्यासाठी किंवा पैशांची बचत करण्यासाठी नवनवीन सुविधा निघाल्या आहेत. जसे की बँक, इन्शुरन्स कंपनी , मुच्युअल फंड्स , फ़ायनान्शिअल कंपन्या, क्रेडीट युनिअन्स, मालमत्ता असेट मॅनॅजमेन्ट कंपन्या इत्यादी आपल्याला आर्थिक साक्षरते बद्दल ज्ञान असेल तर आपणाला पटकन समजतेकि कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर आपला फायदा होईल.

आजकालच्या युवकांना किंवा तरुण पिढीला आर्थिक साक्षरतेचे महत्व समजावणे खूप महत्वाचे आहे. तरुण मुलांच्या हातात पैसे आले की त्यांना नको त्या गोष्टीसुचतात. सिनेमा, पार्टी इत्यादी गोष्टींमध्ये पैसे वाया जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोजकेच पैसे द्यावेत ज्यामध्ये मुलांच्या गरजा भागातील, त्याचबरोबर मुलांना आर्थिक साक्षरतेची शिकवण दिली तर पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा कंट्रोल मध्ये राहणार आहे.

तरुण मुले/मुली भारताचे भविष्य आहेत. भारताची आर्थिक परिस्थिती कणखर बनवायची असेल तर तरुण मुला/मुलींना आर्थिक साक्षरतेची शिकवण देणे गरजेचे आहे. मुलांना पॉकेट मनी च्या बदल्यात कामे सांगा, मग बघा मुलांना पैशाचे महत्व सुद्धा कळेल आणि मुलांना पालक जे काम सांगतील त्या कामांची आणि काम करण्याचीसवय सुद्धा होईल.

उद्याचा दिवस कसा असेल हे मुलांनी आजच ठरवायला हवे, मुलांनी आजच त्यांचं भविष्य लिहायला हवे, आजही जीवन आहे आणि उद्याही जीवन आहे ह्या गोष्टीचीजाणीव मुलांना झाली पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी मुलांना आर्थिक साक्षरता काय आहे हे समजणे महत्वाचे आहे.

















































by - http://www.icats.co.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल