24Aug
'स्नेहलनीती'तर्फे आयोजित केलेल्या मराठी उद्योजकांच्या सेमिनार आणि सेशन्समध्ये बिझनेस कोच स्नेहल कांबळे नेहमी सांगत असतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचयं किंवा श्रीमंत व्हायचयं तर नेहमी शिकत रहा. जर नेहमी नवनवीन शिकायचं असेल तर त्याला पुस्तकाशिवाय दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. कोणतेही पुस्तक वाचल्याने आपल्याला नवनवीन गोष्टी समजतात, आपला जीवनातील दृष्टीकोण कमालीचा बदलतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी मराठी पुस्तकांची माहिती घेऊयात जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी किंवा श्रीमंत व्हायला मदत करतील...
विचार करा आणि श्रीमंत व्हा - लेखक नेपोलियन हिल... लेखकाने जगातील सर्वोत्तम यशस्वी लोकांचा २० वर्षे अभ्यास केला. ते कसे यशस्वी झाले, त्यांनी मेहनत कशी केली यावर या पुस्तकात मांडणी केली आहे. तसेच लेखकाने हे पुस्तक १२ प्रकरणांमध्ये लिहिले आहे. ज्याद्वारे आपल्याला आयुष्यात यश आणि श्रीमंत होण्यास मदत होईल.
रिच डॅड पूअर डॅड - रॉबर्ट किओसाकी... मनुष्याच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भाष्य केलेले हे सर्वात लोकप्रिय पुस्तक आहे. तुम्ही तुमचे पैसे प्रभावीपणे अणि सुज्ञपणे कसे वापरावे, हे या पुस्तकात मांडले आहे. जास्तीत जास्त पैसे कमवणे म्हणजे श्रीमंती नव्हे, त्या पैशांचा विनियोग कसा करावा, हेही समजणे गरजेचे आहे.
सीक्रेट्स ऑफ दी मिलेयनेअर माईंड - टी. हार्व इकेर... काही लोक क्षणात श्रीमंत होतात तर काही लोकं आपले संपूर्ण आयुष्य आर्थिक चणचणीत घालवतात? लेखक लिहितात, सर्वांकडे यश आणि पैसे कमविण्याची ब्ल्यूप्रिंट आहे. जर तुम्ही आर्थिक तणावात आहात तर तुम्ही त्याचा योग्यप्रकारे उपयोग करीत नसाल.
श्रीमंत होण्याची तुमची असीम शक्ती - जोसेफ मर्फी... या प्रेरणादायी पुस्तकात तुम्ही कशाप्रकारे श्रीमंत आणि समृद्ध व्हाल, यावर भाष्य केले आहे. तुमच्यामध्ये सर्वोत्तम देण्याची क्षमता आहे, तुम्ही तयार केलेल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या आणि जग जिंका, असेही या पुस्तकात मांडले आहे.
दी मॅजिक ऑफ थिंकींग बिग - डेव्हिड स्क्वार्ट्झ... या पुस्तकात डेव्हिड सांगतात, जर तुम्ही संकुचित, छोटा विचार करीत राहिलात तर तुम्ही मोठं काम कधीच करू शकणार नाही. जास्तीत यश आणि संपत्ती कमविण्यापूर्वी आपली मनाची तयारी करणे गरजेचे आहे. या पुस्तकाद्वारे तुम्ही तुमच्या मनाची तयारी कशी करावी, हे शिकू शकाल.
स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा