श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या आठ सवयी
तुम्ही म्हणजे तुमच्या सवयी आहात, तुम्ही तसेच व्यक्तिमत्व बनत जाता, जशा तुमच्या रोजच्या सवयी असतील. श्रीमंत लोक स्वतःला काही विशिष्ट सवयी लावुन घेतात म्हणुन ते अजुन श्रीमंत आणि यशस्वी बनत जातात.
आपल्या समाजात श्रीमंत लोकांकडे फार आदराने पाहीलं जात नाही, समोर असताना मान दिला जात असला तरी पाठ वळताच “पैशेवाला आहे म्हणजे लुच्चा असला पाहीजे, “दोन नंबरचे धंदे न करता इतका पैसा येतोच कसा?” असे म्हणुन कधी खोटारडे, नाटकी, कधी गर्विष्ठ आणि बढाईखोर म्हणुन त्यांची हेटाळणी आणि द्वेष केला जातो.
काही श्रीमंत लोक असे असतीलही, पण बरेचशे श्रीमंत लोक स्वतःच्या कष्टाने, परीश्रमाने आणि स्वतःचं डोकं वापरुन श्रीमंत झालेले पहायला मिळतील. आजुबाजुला डोकावुन पाहीलं तर असे मोजके काही ‘सेल्फ मेड करोडपती’ लोक तुम्हाला निश्चितच दिसतील. त्यांच्या जीवनात खालील आठ सवयी त्यांनी स्वतःला लावुन घेतलेल्या तुम्हाला दिसतील.
१)‘वास्तविक’ पणे ‘सकरात्मक’ असणं –
काही लोक स्वप्नाळु असतात, मग कुठल्याशा क्षुल्लक कारणाने स्वप्न मोडली की पुन्हा भरारी घेणं, त्यांना अवघड जातं, काही लोक वास्तववादी, अतिशय प्रॅक्टीकल असतात, त्यांना कल्पनात रममाण होणं आवडत नाही, म्हणुन त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही, ते तिथल्या तिथं रेंगाळत राहतात, काही लोक कुठल्याही स्थितीत अति सकारात्मक असतात, ते प्रॅक्टीकल नसल्यानं कधी कधी तोंडावर आपटतात. श्रीमंत लोक मोठी स्वप्ने बघतात, ते प्रत्यक्षात कसं येईल, त्याचं बारकाईनं नियोजन सुद्धा करतात, आणि एवढं करुनही अपयश आलंच तर निराश अजिबात होत नाहीत, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.
जर तुम्ही शुन्यातुन सुरुवात करताय तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मेहनत करायची आहे, त्यासाठी लागणारी प्रचंड उर्जा तुम्हाला तुमच्या सकारात्मक विचारांमधुन मिळेल.
२) उच्च आत्म-विश्वास –
श्रीमंत व्यक्तीमध्ये एक उच्च प्रतिचा आत्मविश्वास असतो. जेव्हा तुम्ही साधारण परिस्थीतीत असता, जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, त्यांना वाटेल तुम्ही अपयशी आहात, तेव्हा भविष्यात श्रीमंत होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं, अत्यावश्यक असतं. अशा वेळी रोज स्वतःशी बोलण्याची सवय लावुन घ्यायला पाहीजे.
आत्मविश्वास असणारा व्यक्ती स्वतःवरच्या टिकेला आणि निंदेला सहज सामोरा जातो, तो अशा गोष्टी फार जास्त मनाला लावुन घेत नाही. याउलट तो स्वतःमध्ये अजुन काय सुधारणा करता येतील, याकडे लक्ष देतो. आत्मविश्वास नसणारे लोक, अपमान झाला म्हणुन रडत बसतात. कामावरचा फोकस हरवुन बसतात. ते कधी फार श्रीमंत होवु शकत नाहीत. आत्मविश्वास तुम्हाला संकटासमोर झुकण्यापासुन, पळुन जाण्यापासुन रोखतो.
आत्मविश्वास असणारा व्यक्ती स्वतःवरच्या टिकेला आणि निंदेला सहज सामोरा जातो, तो अशा गोष्टी फार जास्त मनाला लावुन घेत नाही. याउलट तो स्वतःमध्ये अजुन काय सुधारणा करता येतील, याकडे लक्ष देतो. आत्मविश्वास नसणारे लोक, अपमान झाला म्हणुन रडत बसतात. कामावरचा फोकस हरवुन बसतात. ते कधी फार श्रीमंत होवु शकत नाहीत. आत्मविश्वास तुम्हाला संकटासमोर झुकण्यापासुन, पळुन जाण्यापासुन रोखतो.
३) आरामदायक कोषातुन बाहेर पडणं –
जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील जे करणं आरामदायक नक्कीच नसेल. स्वप्नातलं आयुष्य जगण्यासाठी आळस कमी करावा लागेल, रोजच्या दिवसाचं काटेकोर नियोजन करावं लागेल, झपाटुन काम करावं लागेल, लोकांशी मैत्री जोपासावी लागेल, त्यांच्यावर निःस्वार्थ प्रेम करावं लागेल, त्यांच्या सुख दुःखात समरस व्हावं लागेल. श्रीमंत लोक स्वतःला नेहमी ‘पुश’ करत असतात, ते आपल्या कंफर्ट झोन मधुन बाहेर येऊन कृती करतात. म्हणुन ते अजुन श्रीमंत होत जातात. आपल्याला एका रुटीन आयुष्याची सवय झाल्यास आतली काहीतरी करुन दाखवण्याची, स्वतःला जगापुढे सिद्ध करण्याची आग विझुन जाते.
४) सहज हार न मानन्याची वृत्ती –
श्रीमंत लोक परिस्थीतीशी झुंजारपणे लढतात. एखाद्या गोष्टीवर जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत न थकता, पुन्हा पुन्हा ते त्या गोष्टीचा विचार करत राहतात. दुसरे लोक आपल्याविषयी काय बोलतात, ह्याने त्यांना फरक पडत नाही, ते लोकांच्या टिकेला भिक घालत नाहीत, ते फक्त समोरच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तन मन धन लावुन जगतात. त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सतत चाललेली असते, “मी स्वतःला कसं सुधारु?”, “मी ह्या कामाला अजुन चांगल्या पद्धतीने कसं करु शकतो?” त्यांना यशाची भुक असते म्हणुन ते आपल्या वार्षिक ‘ग्रोथ’ला नियमितपणे कायम ठेवु शकतात.
५) कष्ट आणि मेहनत –
बर्याच लोकांचा गैरसमज असतो की श्रीमंत लोक कष्ट आणि मेहनत करत नाहीत, काम करत नाहीत, फक्त मजा करतात, हे खरं आहे की त्यांच्याकडे पाहील्यावर ते फ्रेश दिसतात व त्यांच्या चेहर्यावर कामाचा शीण, थकवटा दिसत नाही पण बहुतांश श्रीमंत लोक मेहनत आणि कष्ट करतच असतात. ते आपलं काम बाकी सर्वांपेक्षा जास्त आवडीने, उत्साहाने करतात.
आपल्या लेखी नशीब किंवा प्रतिभा असलेले श्रीमंत लोक आवश्यकता होती तेव्हा अठरा वीस तास घाम गाळत होते. उदा. सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडु भारतात असतीलही, पण त्याच्या एवढी ग्राऊंडवरची जीव-तोड मेहनत त्यांनी केली नाही, आणि सचिनने ती केली म्हणुन तो क्रिकेटचा ‘देव’ बनला.
दहा ते पाच काम करण्याची मानसिकता असणारे, घड्याळाकडे बघुन वेळ ढकलणारे, मोजुन मापुन काम करणारे आणि कधी जादा काम केलचं तर दुसर्यावर उपकार करतो असं समजणारे लोक श्रीमंत कसे काय बनु शकतील?
तुम्ही जेव्हा पाच वाजता घरी जाऊन टी. व्ही. पाहत असाल तेव्हा कुठल्यातरी कोपर्यात एखादा युवक रात्री दहापर्यंत अंग मोडुन काम करत असेल, ज्याला उद्या तुम्ही टक्कर देऊ शकणार नाही. तुम्ही कसे दिसता?, तुम्ही किती बुद्धीमान आहात? ह्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही, पण तुम्ही किती मेहनत करता? यावर तुमचं नक्कीच नियंत्रण आहे. त्यामुळे श्रीमंत बनण्याची ही गुरुकिल्ली आपल्या सार्यांच्या ताब्यात आहे.
६) आपल्या बलस्थानांवर लक्ष्य केंद्रीत करा –
श्रीमंत लोकांना आपली बलस्थाने आणि आपले कच्चे दुवे चांगलेच माहीत असतात, ते आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करतात, एखाद्या कामात ते इतके निपुण होतात की जगात त्या तोडीचं काम मोजकेच लोक करु शकतील. उदा. स्टीव्ह जॉब्ज – गॅझेट गुरु, एम एस धोनी – धुंवाधार बॅटींग आणि चपळ किपींग, झाकीर हुसेन – तबला, मायकेल जॅक्सन – गायन/नृत्य, डोनाल्ड ट्रंप – बिल्डरशीप, ओपेरा विन्फ्रे – टॉक शो.
हे सारे आपापल्या क्षेत्रात मास्टर झाले. त्यांनी आपली आवड, आपली बलस्थाने शोधुन काढली, वर्षानुवर्ष त्यावर मेहनत घेतली, त्या एका गोष्टीत चित्त एकाग्र केलं, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला, आणि धो धो पैसा कमवला, सोबत जगावर एकहाती राज्य केलं, चाहत्यांची मनं जिंकली.
हे सारे आपापल्या क्षेत्रात मास्टर झाले. त्यांनी आपली आवड, आपली बलस्थाने शोधुन काढली, वर्षानुवर्ष त्यावर मेहनत घेतली, त्या एका गोष्टीत चित्त एकाग्र केलं, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला, आणि धो धो पैसा कमवला, सोबत जगावर एकहाती राज्य केलं, चाहत्यांची मनं जिंकली.
७) नियमित शिकत रहा –
वॉरेन बुफे, बिल गेटस, मार्क झुकरबर्ग इतके श्रीमंत, इतके हुशार का आहेत? कारण ते सतत नवीन काहीतरी शिकत राहतात, नवनवी पुस्तके वाचतात, भविष्यातील होणार्या बदलांचा अंदाज घेतात, स्वतःला अपडेट ठेवतात म्हणुन ते काळाच्या एक पाऊल पुढे असतात.
बरेच लोक शाळा-कॉलेज नंतर नवीन काही शिकणं जवळ जवळ सोडुनच देतात.
“मला सगळं माहीतीये” ह्या वृत्तीची माणसं फार श्रीमंत होवु शकत नाहीत. त्यांचा अहंकार त्यांच्यात आणि संपत्तीमध्ये आडवा येतो. जितकं तुम्ही शिकता, तितकं जास्त तुम्ही कमवता, हे सुत्र त्यांच्या लक्षात येत नाही.
बरेच लोक शाळा-कॉलेज नंतर नवीन काही शिकणं जवळ जवळ सोडुनच देतात.
“मला सगळं माहीतीये” ह्या वृत्तीची माणसं फार श्रीमंत होवु शकत नाहीत. त्यांचा अहंकार त्यांच्यात आणि संपत्तीमध्ये आडवा येतो. जितकं तुम्ही शिकता, तितकं जास्त तुम्ही कमवता, हे सुत्र त्यांच्या लक्षात येत नाही.
८) नियमितता –
कुठलंही काम एकदा केलं आणि सोडुन दिलं तर त्यात यश मिळेल का? ते हातखंडा बनेपर्यंत रोज रोज करावे लागेल. चांगलं शरीर कमवायचं असेल तर रोज व्यायाम करावा लागतो तसं श्रीमंत बनण्यासाठी वर दिलेल्या सवयी रक्तात भिनवाव्या लागतील, मगच त्याची फळे दिसतील.
वाचण्यासारखे आणखी काही…..
by - https://www.manachetalks.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा