उद्योगारंभी जरूर अभ्यासावीत अशी काही पुस्तके

ही पुस्तके आपल्याला असे ज्ञान एकत्रित करून देते जे काळाच्या ओघात आपण हळूहळू शिकतच असतो; पण काळ जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकवतो तेव्हा ती चांगल्याच प्रसंगातून शिकायला मिळते असे नाही. पुस्तकांबद्दल बोलायला गेले तर पुस्तके ही तीन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची पुस्तके एखादा विषय आठवला म्हणून उगाच लिहिलेली असतात, ज्यांची शेकोटी करणेच उत्तम! दुसर्या प्रकारच्या पुस्तकांचे विषय चांगले असतात, पण त्यात फाफटपसारा खूप असतो. त्यामुळे अशा पुस्तकांचा सारांश वाचणेच उत्तम आणि तिसर्या प्रकारची पुस्तके जी सर्वात कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यात विषयही उत्तम निवडलेले असतात. हि तिसर्या प्रकारची पुस्तके आपण एकदा वाचून सोडून न देता पुन: पुन्हा वाचायची असतात. एखादे उत्तम पुस्तक आपण एकदा वाचणे म्हणजे ते न वाचल्यागतच असते. अशी उत्तम पुस्तके किमान आठ वेळा तरी वाचली पाहिजेत म्हणजे त्या पुस्तकातील ज्ञान आपल्या रक्तात भिनून जाते. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी ते आठवायला नाही लागत, आपले विचारच तसे वळण घेऊ लागतात.
आपल्या आयुष्यात आपली किमान एकदा तरी मुलाखत घेतली जातेच. प्रत्येक मुलाखतीत चार मुख्य भाग असतात. पहिला भाग म्हणजे ओळख, दुसरा छंद ( Hobbies), तिसरा भाग म्हणजे आपल्यातील गुण आणि चौथा भाग म्हणजे आपल्यातील कमतरता. जेव्हा एखादा मुलाखतकार आपले छंद विचारतो तेव्हा लोक प्रामुख्याने गाणी ऐकणे आणि वाचन करणे हे उत्तर देतात आणि जेव्हा मुलाखतकार विचारतो, अच्छा, आपण कोणकोणती पुस्तके वाचल्येत सांगा, तेव्हा जास्त करून लोक तीन, चार किंवा पाचच पुस्तकांची नावे सांगू शकतात, कारण जास्त तर लोक त्यांच्या विषयाबाहेरील फार कोणती पुस्तके वाचतच नाहीत.
त्यापुढे मुलाखतकाराची प्रतिक्रिया साहजिकच अशी असते की ह्यांचा छंद वाचन आहे आणि ह्यांनी फक्त चारच पुस्तकं वाचलीत! म्हणजे गाणी तरी किती ऐकली असतील. काही काही लोक त्यांच्या विषयाबाहेरील पुस्तकांची नावं तर सांगतात, पण ती पुस्तकं कथांची असतात; पण त्यानेसुद्धा मुलाखतकार खूश नसतो. आपल्या पुस्तकांची यादी अशी असली पाहिजे की ज्याने मुलाखतकाराला वाटेल की आपण खरोखर स्वतःचा विकास करण्यासाठी धडपड करत आहोत. पुढील चौदा पुस्तके जर आपण व्यवस्थित वाचलीत आणि मुलाखतीवेळी या पुस्तकांची नावे घेतलीत तर मुलाखतकार नक्कीच प्रभावित होईल. हा झाला एक फायदा.
ही चौदा पुस्तके आपण नियमित वाचली तर असे अनेक फायदे आपल्याला जाणवतील. जसे एखादे नवीन पुस्तक वाचायला घेतल्यावर त्याची ४-५ पानं वाचूनच आपल्याला कळेल की हे पुस्तक तीन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे आहे. की पुस्तके वाचताना दोन गोष्टींची मात्र काळजी घ्या. एक म्हणजे की ह्या पुस्तकांची डिजिटल प्रत जरी उपलब्ध आली तरी आपण ती मुद्रित स्वरूपातच वाचा आणि ही पुस्तके उत्तम आणि प्रसिद्ध असल्याने ह्यांचे अनेक भाषांत जरी अनुवाद केलेले आले तरी आपण ती पुस्तके इंग्रजीतूनच वाचा. ह्यांनी आपली इंग्रजी भाषा नुसतीच सुधारणार नाही तर आपण इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकाल.
Subscription
लेखक : डेल कार्निगी
या पुस्तकात सात अशा कल्पना ज्यांनी आपण लोकांना प्रभावित (impress) करू शकाल, सहा असे प्रकार ज्यांनी लोकांना आपण आवडू लागाल, बारा अशा पद्धती ज्यांनी आपण लोकांना आपले मुद्दे पटवून देऊ शकाल आणि सात अशा युक्त्या की ज्या आपण वापरलात तर लोक आपल्याला त्यांचा नेता (leader) मानतील. हे अतिशय उत्तम असे पुस्तक आहे आणि ते सर्वात पहिले वाचले पाहिजे.
2. थिंक अँड ग्रो रिच (Think and grow rich)
लेखक : नेपोलियन हिल
3. लॉज ऑफ सक्सेस (Laws of success)
लेखक : नेपोलियन हिल
लेखक : शॉन कवी
हे पुस्तक सीन कवी यांनी लिहिलेल्या 'द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल' या पुस्तकाची सोप्या शब्दांतील आवृत्ती आहे. यात अनेक उदाहरणे दिलेली आहेत तसेच या पुस्तकाचे वैशिष्ट्यम्हणजे या पुस्तकात अशाच गोष्टी दिल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकू.
लेखक : जेम्स अॅलन
यात असे सांगितले आहे की मनुष्य म्हणजे एक माळी आहे आणि त्याचा मेंदू म्हणजे एक बाग. आता आपण जशी एखाद्या बागेची पुरेपूर काळजी घेतली नाही तर आपोआपच त्यात खुरटी झाडे उगवतील. चांगले विचार म्हणजे नक्की काय आणि चांगले विचार करण्यासोबत वाईट विचार कसे कमीत कमी आपल्या मनात येतील याबद्दल स्वविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.
लेखक : झिग झिग्लर
या पुस्तकात झिग झिग्लर यांनी यशस्वी होण्यासाठी आधी काय करावे, त्यानंतर काय करावे असे पायर्यांच्या रूपात दिले आहे. तसेच चुकीच्या सवयी कशा सोडाव्यात आणि चांगल्या सवयी कशा आत्मसात कराव्यात हेसुद्धा दिले आहे. जर आपण पहिल्या वर्षात शिकत असू तर हे पुस्तक वाचण्याचा हा उत्तम काळ आहे.
लेखक : रॉबर्ट कियोसाकी
या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत कसे होत जातात आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब कसे होत जातात ह्याची कारणे सांगितली आहेत. तसेच आपल्याला हेसुद्धा समजेल की आपण कोणतेही काम जेव्हा करतो तेव्हा ते उगाच न करता काही तरी शिकायला मिळेल असा विचार करून करावे. तसेच आपल्याजवळ असलेल्या पैशांचा वापर कुठे आणि कसा करायला हवा हेसुद्धा या पुस्तकात सांगितले आहे.
लेखक: जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन
हा २४० पुस्तकांचा एक सेट असून त्यात लोकांनी लिहिलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. जर आपण विद्यार्थी असाल तर आपण वाचू शकता 'चिकन सूप फॉर स्टुडंट्स सोल.' जर आपण तरुण असाल तर आपण वाचू शकता 'चिकन सूप फॉर टिनेजर सोल.', जर आपण शिक्षक असाल तर आपण वाचू शकता 'चिकन सूप फॉर टीचर्स सोल' इत्यादी. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये असे की त्यात छोट्या छोट्या गोष्टी असल्याने दहा-बारा मिनिटांत एक गोष्ट वाचूनही होते. ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांनी लिहिलेल्या असल्याने त्या सोप्या भाषेत आहेत तसेच दैनंदिन जीवनात आपण जसे इंग्रजी वापरतो त्याच भाषेत आहे. चायनामध्ये काही ठिकाणी इंग्रजी शिकवण्यासाठी या पुस्तकांचा वापर केला जातो.
9. द ऐटीन ट्वेन्टी प्रिंसिपल (The 18/20 Principle)
लेखक: रिचर्ड कॉख
तुम्ही जगाच्या कोणत्याही ठिकाणी जा, ऐंशी-वीस हे सगळीकडे आहे. म्हणजेच जगातील ऐंशी टक्के लोकांकडे वीस टक्के संपत्ती आहे, तर जगातील वीस टक्के लोकांकडे उरलेली ऐंशी टक्के संपत्ती आहे किंवा आता प्रश्नपत्रिका बघा: 'ऐंशी टक्के प्रश्न हे वीस टक्क्यांच्या अभ्यासक्रमातून येतात आणि वीस टक्के प्रश्न हे बाकी ऐशी टक्के अभ्यासक्रमातून येतात तसेच कोणत्याही कामासाठीच्या मुलाखती बघा, ऐंशी टक्के लोकांची काम मिळण्याची शक्यता ही वीस टक्के असते तर वीस टक्के लोकांची निवड होण्याची शक्यता ऐशी टक्के असते. म्हणजेच हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वीस टक्के केल्या तरी आपल्याला ऐंशी टक्के फायदा मिळतो! आणि म्हणून त्या वीस टक्के गोष्टींवर आपल्याला ऐंशीं टक्के लक्ष केंद्रित करायचे आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला आयुष्यात कधीच वेळेची कमतरता जाणवणार नाही.
10. हाऊ टू गेट फ्रॉम व्हेअर यू आर, टू व्हेअर यू वॉन्ट टू बी (How to get from where you are, to where you want to be)
लेखक : जॅक कॅनफिल्ड
हे पुस्तक वाचण्याचा एक फायदा आणि एक तोटा आहे. तोटा म्हणजे असा की, हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला असे वाटेल की, ह्या पुस्तकात अशी कोणती गोष्ट होती जी आपल्याला आधी माहीत नव्हती आणि फायदा असा की आपण स्वतःलाच असे विचारू की, जर मला हे सर्व अगोदरच ठाऊक होतं तर मी ह्याचा वापर केला का नाही.
11. द पावर ऑफ लेस (The Power of Less)
लेखक : लिओ बाबाउता
हे पुस्तक वाचून आपली क्षमता प्रचंड वाढेल. आपला वेळ आणि पैसा उत्तमरीत्या कसा वापरायचा याबद्दल उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे. आपला हल्लीच पगार झाला असेल तर हे पुस्तक आपण आजच वाचायला घेतले पाहिजे!
लेखक : जॉन मेडिना
या पुस्तकात आपला मेंदू कसे काम करतो याचा उलगडा केला आहे. हे पुस्तक वाचून आपण आपल्याला किती झोप आणि किती व्यायाम गरजेचा आहे हे समजेल. आपली बुद्धी तर याने तल्लख होईलच शिवाय आपली स्मरणशक्तीसुद्धा वाढेल.
लेखक : रॉबर्ट ग्रीन
या जगात ऐंशी टक्के लोक हे खरंच चांगले आहेत; परंतु बाकी वीस टक्के लोक हे वाईट आहेत. आपलं नुकसान होऊन जरी त्यांना काही मिळणार नसेल तरी त्यांना आपलं सुख बघवत नसल्याने आपलं वाईट करायचं असतं आणि त्यात चिंतेची बाब अशी की, त्यांनी आपलं नुकसान करून झाल्यावर आपल्याला समजतं की कोण चांगलं आणि कोण वाईट. यातून आपल्याला वाचविणारे पुस्तक म्हणजे 48 लॉज ऑफ पॉवर. यात अनेक उदाहरणांतून शक्तीबद्दल काही नियम सांगितले आहेत. या पुस्तकाची भाषा मात्र समजायला जरा कठीण आहे.
14. मास्टरी (Mastery)
लेखक : रॉबर्ट ग्रीन
हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल की, आपण कोणत्या गोष्टीत सर्वोत्तम आहात. यात सहा तत्त्वे दिली आहेत आणि जर आपण त्यांचे तंतोतंत पालन केलेत तर आपले जीवन नक्कीच सफल होईल. भरपूर उदाहरणं दिली आहेत पुस्तकात, त्यातील इंग्रजी सोपे आहे, परंतु आपल्याकडे त्यासाठी शब्दसंग्रह मात्र हवा. त्यामुळे सर्वात शेवटी वाचावे हे पुस्तक.
तर, आपण नक्कीच ही पुस्तके वाचा, ज्या क्रमात दिली आहेत त्या क्रमात वाचा आणि कमीत कमी आठ वेळा वाचा!
- टीम स्मार्ट उद्योजक
लेखक : रॉबर्ट ग्रीन
हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल की, आपण कोणत्या गोष्टीत सर्वोत्तम आहात. यात सहा तत्त्वे दिली आहेत आणि जर आपण त्यांचे तंतोतंत पालन केलेत तर आपले जीवन नक्कीच सफल होईल. भरपूर उदाहरणं दिली आहेत पुस्तकात, त्यातील इंग्रजी सोपे आहे, परंतु आपल्याकडे त्यासाठी शब्दसंग्रह मात्र हवा. त्यामुळे सर्वात शेवटी वाचावे हे पुस्तक.
तर, आपण नक्कीच ही पुस्तके वाचा, ज्या क्रमात दिली आहेत त्या क्रमात वाचा आणि कमीत कमी आठ वेळा वाचा!
- टीम स्मार्ट उद्योजक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा