सोमवार, १० डिसेंबर, २०१८

यशाचं secret!...


यशाचं secret!
===
यशाचं सूत्र एकदम सोपं आहेतुमच्या दृष्टीने यशस्वी असलेल्या लोकांची copy करा! अर्थात हे बोलायला सोपं आहे. पण नेमकं काय copy करायचंय हे माहीत असणं हीच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे! यशस्वी लोकांच्या काही एक-सारख्या सवयी आहेत. त्या follow केल्या तर आपले यशस्वी होण्याचे chances वाढतात.
यशस्वी लोकांच्या अश्याच खास सवयी
·       स्वतःशी संवाद साधा

तुम्हाला काय हवंय, कसं हवंय, कधीपर्यंत हवंयह्या basic प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्हालाच माहिती असू शकतात. तुमच्या रोजच्या जीवनात, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाताय की भरकटत आहातहेही तुम्हीच सांगू शकता.

म्हणूनथोडासा वेळ स्वतःसाठीरोज किमान अर्धा तासथोडंसं meditation आणि स्वतःशी गप्पा. बघा कसा magical परिणाम होतो ते!
·       ) Be health consciousness – फिट रहा
होसर्व यशस्वी लोक स्वतःची काळजी घेतात.

रोज gymला जाणं किंवा प्राणायाम करणं जरा अवघड वाटत असेल तर – lift टाळून पायऱ्यांचा वापर करणं, शक्य तेवढं शारिरीक काम करणं, bike/car टाळणं, वेळच्यावेळी सकस अन्न जेवणंअश्या छोट्या, सोप्या गोष्टींनी सुरुवात कराह्या सवयी लागल्या की slowly, स्वतःला थोडं अजून push करा. व्यायाम सुरु करा, jogging करा. असं थोडं थोडं – one step at a time – पुढे जा.
म्हणतात नानिरोगी शरीरातच निरोगी मन रहातं!



·       ) वाचत रहा!
केवळ newspaper अन इंटरनेटवरची articles म्हणजे वाचन नव्हे. कादंबऱ्या, वैज्ञानिक माहितीपर ग्रंथ किंवा रहस्य कथा, ऐतिहासिक ग्रंथ किंवा अर्थ विश्व उलगडणारं पुस्तकरोज काहीतरी खास वाचा.
वाचनाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, विविध क्षेत्रातील रोचक माहिती आपल्या जीवनातील भव्यता वाढवते. Life अधिक interesting करते. ज्याने रोजच्या लढाईत energy मिळते.

·       ) “नाहीम्हणायला शिका

यशाचं रहस्य जितकं ‘positive’ विचारात आहे, तितकंचनाहीम्हणता येण्याच्या skill मध्ये आहे.Officeमध्ये एखादं काम अंगावर आलंय पण ते deadline मध्ये होऊ शकत नाही हे तुम्हाला पक्कं माहितीये तर शांतपणे पण ठामपणे ते सांगता आलं पाहिजे. Family tour प्लॅन केलीये आणि दूरच्या नातेवाईकांचं कुठलंसं function आहे – priority तुमच्या कुटुंबाला देता आली पाहिजे.
नको असलेल्या, त्रासदायक गोष्टींनानकोम्हणताना जरा वेळ त्रास होतो पण त्याने तुमचा (आणि कधीकधी समोरच्याचासुद्धा) कितीतरी जास्त वेळ आणि मानसिक त्रास वाचतो.

·       ) Plan B तयार ठेवा
साध्य – तुमचं goal, ध्येय – आणि साधन – ते goal मिळवण्याचा मार्ग — ह्यात confuse होऊ नका. बऱ्याचदा आपण जो रस्ता निवडतो तो चुकला असल्याचं थोडंसं पुढे गेल्यावर लक्षात येतंहे रस्ता चुकणं ठीके, that’s fine…पणरस्ता चुकलायहे लक्षात आल्यावर तुम्ही चटकन रस्ता दुरूस्त करता का? की कुठल्यातरी भावनिक weaknessमुळे जुन्याच रस्त्यावर धावत जाता ह्यावर तुमच्या प्रवासाचं यश ठरतं.

आपली चूक होतीये हे कळाल्यावर गोंधळून जाऊ नये ह्यासाठी Plan B नेहेमी तयार ठेवा. “जर हा रस्ता चुकला तर…” ह्या dilemmaमध्ये अडकून पडू नका.

यशस्वी माणसं कळत नकळत वरील गोष्टी follow करत असतात. To become successful, तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि follow करा.












by- inmarathi.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल