बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

भूतकाळात अडकून पडू नका....

भूतकाळात अडकून पडू नका.... 
अमुक झालं असतं तर तमुक अशी परिस्थिती असती. असं केलं असतं तर तसं झालं असतं, हा असा वागला, तो तसा वागला. याने तसं केलं म्हणून आज असं झालं... या सगळ्या लफड्यांतून बाहेर या. जे झालं ते मागेच सोडून द्या. झालेल्या गोष्टींना उगाळत बसू नका. आपल्यातील ९०% लोकांना भूतकाळातील चुका उगाळण्यात स्वारस्य असतं, पण त्या नादात आपण वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो आणि भविष्य अंधारात ढकलत असतो. आज तुमच्या हातात जी परिस्थिती आहे त्यात भविष्य कसं घडवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळातून शिका, चुकांवर उत्तर शोधा, पण त्यात अडकून पडू नका... तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्यातून बोध घेऊन वर्तमानात योग्य काम करून भविष्य घडवू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल