सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

या ठिकाणी मिळतात भारतातील सगळ्यात स्वस्त लॅपटॉप …. किलोवर विकले जातात लॅपटॉप ….

या ठिकाणी मिळतात भारतातील सगळ्यात स्वस्त लॅपटॉप …. किलोवर विकले जातात लॅपटॉप ….

लॅपटॉपची किंमत त्याच्या कॉन्फिग्रेशनवर अवलंबून असते. लॅपटॉपचे हार्डवेअर कसे आहे, त्यासोबतच कोणत्या कंपनीचा आहे, यावर त्याची साधारणत: किंमत ठरत असते. यानुसार एका लॅपटॉपची किंमत 30 ते 40 हजार रुपयांदरम्यान असायला हवी. मात्र, भारतातील या मार्केटमध्ये तुम्ही नगाने नव्हे, तर चक्क 5000 रुपये किलोप्रमाणे लॅपटॉप खरेदी करू शकता. अन्यथा एक लॅपटॉपसाठी तुम्हाला 7 हजार रुपये मोजावे लागतील. हे लॅपटॉप सेकंडहँड असतात…
– दिल्ली येथील नेहरू पॅलेसमध्ये भरणाऱ्या या मार्केटला आशियातील सर्वात स्वस्त मार्केट मानले जाते.
– याठिकाणी लॅपटॉप, स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही मिळतात.
– स्मार्टफोनला लागणाऱ्या अॅक्सेसरीजदेखील याठिकाणी मिळतात.
– नव्यासह जुने गॅजेट्सही याठिकाणी मिळतात. मात्र, तुम्हाला दोहोंतील फरक ओळखता यायला हवा.
हे ठेवा लक्षात
– याठिकाणी सेकंडहँडच्या खूप शॉप्स आहेत. त्यामुळे तुम्ही एखादी वस्तू खरेदी करीत असतांना बार्गेनिंग यायलाच हवी.
– तुमच्यासोबत गॅजेट्सची पारख असलेला व्यक्ती असल्यास सर्वोत्तम.
– या मार्केटमधून तुम्ही खरेदी करण्यापूर्वी वस्तू तपासून घ्या. त्याशिवाय गॅजेट्चे कॉन्फिग्रेशन तपासून बघा.
– लॅपटॉप घेण्यापूर्वी काही वेळ तो चालू करून पाहा.
– नव्या बॉक्समध्ये जुन्या वस्तू दिल्या जात नाही ना, याचीही खबरदारी जरूर घ्या.
– या मार्केटमधून एकाचवेळी अनेक वस्तू खरेदी केल्यास भरघोस डिस्काऊंटही मिळतो.

हे आहे भारतातील होलसेल कापड मार्केट...


हे आहे भारतातील होलसेल कापड मार्केट




येथे आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले आणि मोठ्यांचे कपडे खूप स्वस्त मिळतील.











स्पेशल डेस्क - येथे आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले आणि मोठ्यांचे कपडे खूप स्वस्त मिळतील. या होलसेल मार्केटमध्ये तुम्ही मनमुराद शॉपिंग करू शकता. हे दिल्लीच्या गांधीनगरचे मार्केट आहे. जे सीलमपूर मेट्रो स्टेशनजवळ येते, वेस्ट कांतिनगरच्या जवळ. येथे जीन्स असो वा टी-शर्ट वा शर्ट सर्वांचे 3 ते 12 पीस मिळतात. तुम्हाला असेच कपडे खरेदी करावे लागतील. सिंगल पीस तुम्ही खरेदी करू शकत नाहीत.





याबाबत आम्ही जेव्हा गांधीनगर मार्केटचे अध्यक्ष कंवल बाली यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, या मार्केटमध्ये मध्यमवर्गातील ग्राहकांना लक्षात ठेवून कपडे बनवले जातात. प्रत्येक जण ब्रँडेड कपडे घेऊ शकत नाही. यामुळे या मार्केटमध्ये येऊन ते आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करू शकतात. या मार्केटमध्ये कपडे बनवलेही जातात आणि इतर प्रसिद्ध जागेवरून कपडे मागवून विक्रीही केली जाते. येथे टी-शर्ट तिरपूरहून येतात आणि लेडीज टॉप व सूट्स लखनऊवरून मागवले जातात. येथे लहंगेही खूप स्वस्त मिळतात.




3 शर्ट मिळतील 140 रुपयांत


या मार्केटमध्ये तुम्ही 3 शर्टचा सेट 140 रुपयांत खरेदी करू शकतात. म्हणजेच एक शर्ट तुम्हाला केवळ 46 रुपयांच्या आसपास मिळेल. हे शर्ट 15 वर्षांच्या मुलासाठी उदाहरण म्हणून सांगितले. यासोबतच तुम्हाला लहान मुलांचे टी-शर्टही 120 रुपयांच्या आसपास मिळून जाईल. यातही 3 पीस येतील. टी-शर्ट तुम्हाला मोठ्यांसाठी मिळतील. स्मॉलपासून ते XL, XLL साइज टी-शर्टही येथून घेऊ शकतात. 30 रुपयांपासून याच्या किमती सुरू होतात.





जीन्स केवळ 140 रुपयांत


या मार्केटमध्ये तुम्हाला जीन्स 140 रुपयांत मिळेल. येथेही तुम्हाला 3 ते 4 पीस घ्यावे लागतील. सर्वात महाग जीन्स तुम्हाला 350 रुपयांत मिळेल. येथे तुम्हाला 22 पासून 40 च्या साइजचे जीन्स मिळतील. एका सेटमध्ये एका कलरचेच जीन्स तुम्हाला मिळतील.





महत्त्वाचे... येथे बार्गेनिंगही होते


या मार्केटमध्ये एवढ्या किमतीत सर्व कपडे असूनही बार्गेनिंगही खूप होते. तुम्ही जेव्हाही येथे जाल तेव्हा बार्गेनिंग जरूर करा. रेट आणखी कमी होऊ शकतात. मुलींसाठी टॉप आणि सूटही येथे कमी किमतीत सहज मिळतील. मुलांसाठी शॉर्टस आणि महिलावर्गासाठी साड्याही मिळतील. येथे सेकंडहँड कपडे नसतात. सर्व फ्रेश आयटम्सच येथे ठेवले जातात.































































by - दिव्य मराठी वेब टीम |

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

उद्योगारंभी जरूर अभ्यासावीत अशी काही पुस्तके..

ही चौदा पुस्तके आपण नियमित वाचली तर असे अनेक फायदे आपल्याला जाणवतील. जसे एखादे नवीन पुस्तक वाचायला घेतल्यावर त्याची ४-५ पानं वाचूनच आपल्याला कळेल की हे पुस्तक तीन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे आहे. की पुस्तके वाचताना दोन गोष्टींची मात्र काळजी घ्या. एक म्हणजे की ह्या पुस्तकांची डिजिटल प्रत जरी उपलब्ध आली तरी आपण ती मुद्रित स्वरूपातच वाचा आणि ही पुस्तके उत्तम आणि प्रसिद्ध असल्याने ह्यांचे अनेक भाषांत जरी अनुवाद केलेले आले तरी आपण ती पुस्तके इंग्रजीतूनच वाचा. ह्यांनी आपली इंग्रजी भाषा नुसतीच सुधारणार नाही तर आपण इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकाल. 



1. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल (How to win friends and influence people) लेखक : डेल कार्निगी या पुस्तकात सात अशा कल्पना ज्यांनी आपण लोकांना प्रभावित (impress) करू शकाल, सहा असे प्रकार ज्यांनी लोकांना आपण आवडू लागाल, बारा अशा पद्धती ज्यांनी आपण लोकांना आपले मुद्दे पटवून देऊ शकाल आणि सात अशा युक्त्या की ज्या आपण वापरलात तर लोक आपल्याला त्यांचा नेता (leader) मानतील. हे अतिशय उत्तम असे पुस्तक आहे आणि ते सर्वात पहिले वाचले पाहिजे. 


2. थिंक अँड ग्रो रिच (Think and grow rich) लेखक : नेपोलियन हिल हे पुस्तक लिहिणे तब्बल 20 वर्षे चालू होते, जे लिहिताना नेपोलियन हिल यांनी त्यांच्या काळातील पाचशे यशस्वी लोकांचा अभ्यास केला होता. ज्यात हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, अलेक्सान्डर ग्राहम बेल, जॉर्ज इस्टमन अशा अनेकांचा समावेश आहे. नेपोलियन हिल ह्या सगळ्यांना भेटले आणि प्रत्यक्षपणे त्यांना विचारले की इतके यशस्वी होण्यामागे नक्की काय रहस्य आहे, आपण कशाप्रकारे विचार केलेत, आपण कशा प्रकारे नियोजन केलेत इत्यादी आणि त्या मुलाखतींतून नेपोलियन हिल यांनी तेरा तत्त्वे लिहून काढली. ही तेरा तत्त्वे अशी आहेत जी कोणीही आचरणात आणली तरी तो नक्कीच यशस्वी होईल. आज जी कोणती स्वयं सहायक (self help) पुस्तके उपलब्ध आहेत ती याच तेरा तत्त्वांवर आधारलेली आहेत. त्याचसोबत या पुस्तकात तीस अशी कारणे दिलेली आहेत ज्यामुळे कोणताही मनुष्य अयशस्वी होतो आणि या पुस्तकातील वैशिष्ट्ये म्हणजे यात नेपोलियन हिल यांनी अशा सहा पायर्‍या दिल्या आहेत ज्या आपण आचरणात आणल्या तर आपण हवे तितके पैसे आपण कमवू शकतो. 


3. लॉज ऑफ सक्सेस (Laws of success) लेखक : नेपोलियन हिल नेपोलियन हिल हे जरी स्वयंप्रेरणा देणारी पुस्तके लिहिण्यात माहीर असले तरी त्यांचे गुरू, अँड्र्यू कार्नेगी जे एक उद्योजक होते त्यांनी नेपोलियन हिल यांना असे सांगितले की ‘थिंक अँड ग्रो रिच’ मधून आपण लोकांना श्रीमंत कसे व्हा हे तर सांगितलेत, परंतु खर्‍या जीवनात पैसे सोडता इतर आनंद कसा मिळवावा हे कुठे सांगितलेत? त्यावरून पुढे नेपोलियन हिल यांनी ‘लॉज ऑफ सक्सेस’ हे पुस्तक लिहिले. ज्यात असे लिहिले आहे की नुसतेच चांगले विचार करून कुणी यशस्वी होत नाही, तर त्यासाठी जबरदस्त चिकाटी आणि मेहनत करणे महत्त्वाचे असते. जसे नुसतेच चांगले विचार करून कुणी आय.ए.एस.ची परीक्षा काय तर दहावीसुद्धा पास करू शकणार नाही. तसेच आपल्याला अर्ध्या पाण्यानी भरलेल्या पेल्याची कथा बरेच जण सांगतात; पण जर आधी पेला पूर्ण भरलेला असेल आणि त्यातील अर्धे पाणी सांडले तर अर्धा पेला रिकामा आणि जर आधी पेला संपूर्ण रिकामा असेल आणि कष्टानी त्यात अर्धा पेला भरेल इतके पाणी जमवले तर अर्धा पेला भरलेला. अशा प्रकारचे विचार करायला लावेल असे हे पुस्तक. 


4. द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह टीन्स (The seven habits of highly effective teens) लेखक : शॉन कवी हे पुस्तक सीन कवी यांनी लिहिलेल्या ‘द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाची सोप्या शब्दांतील आवृत्ती आहे. यात अनेक उदाहरणे दिलेली आहेत तसेच या पुस्तकाचे वैशिष्ट्यम्हणजे या पुस्तकात अशाच गोष्टी दिल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकू. 


5. अ‍ॅज अ मॅन थिंकेथ (As a man thinketh) लेखक : जेम्स अ‍ॅलन यात असे सांगितले आहे की मनुष्य म्हणजे एक माळी आहे आणि त्याचा मेंदू म्हणजे एक बाग. आता आपण जशी एखाद्या बागेची पुरेपूर काळजी घेतली नाही तर आपोआपच त्यात खुरटी झाडे उगवतील. चांगले विचार म्हणजे नक्की काय आणि चांगले विचार करण्यासोबत वाईट विचार कसे कमीत कमी आपल्या मनात येतील याबद्दल स्वविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.


 6. सी यू अ‍ॅट द टॉप (See you at the top) लेखक : झिग झिग्लर या पुस्तकात झिग झिग्लर यांनी यशस्वी होण्यासाठी आधी काय करावे, त्यानंतर काय करावे असे पायर्‍यांच्या रूपात दिले आहे. तसेच चुकीच्या सवयी कशा सोडाव्यात आणि चांगल्या सवयी कशा आत्मसात कराव्यात हेसुद्धा दिले आहे. जर आपण पहिल्या वर्षात शिकत असू तर हे पुस्तक वाचण्याचा हा उत्तम काळ आहे. 


7. रिच डॅड पुअर डॅड (Rich dad poor dad) लेखक : रॉबर्ट कियोसाकी या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत कसे होत जातात आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब कसे होत जातात ह्याची कारणे सांगितली आहेत. तसेच आपल्याला हेसुद्धा समजेल की आपण कोणतेही काम जेव्हा करतो तेव्हा ते उगाच न करता काही तरी शिकायला मिळेल असा विचार करून करावे. तसेच आपल्याजवळ असलेल्या पैशांचा वापर कुठे आणि कसा करायला हवा हेसुद्धा या पुस्तकात सांगितले आहे. 


8. चिकन सूप फॉर द सोल (Chicken Soup for the soul) लेखक: जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हा २४० पुस्तकांचा एक सेट असून त्यात लोकांनी लिहिलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. जर आपण विद्यार्थी असाल तर आपण वाचू शकता ‘चिकन सूप फॉर स्टुडंट्स सोल.’ जर आपण तरुण असाल तर आपण वाचू शकता ‘चिकन सूप फॉर टिनेजर सोल.’, जर आपण शिक्षक असाल तर आपण वाचू शकता ‘चिकन सूप फॉर टीचर्स सोल’ इत्यादी. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये असे की त्यात छोट्या छोट्या गोष्टी असल्याने दहा-बारा मिनिटांत एक गोष्ट वाचूनही होते. ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांनी लिहिलेल्या असल्याने त्या सोप्या भाषेत आहेत तसेच दैनंदिन जीवनात आपण जसे इंग्रजी वापरतो त्याच भाषेत आहे. चायनामध्ये काही ठिकाणी इंग्रजी शिकवण्यासाठी या पुस्तकांचा वापर केला जातो. 


9. द ऐटीन ट्वेन्टी प्रिंसिपल (The 18/20 Principle) लेखक: रिचर्ड कॉख तुम्ही जगाच्या कोणत्याही ठिकाणी जा, ऐंशी-वीस हे सगळीकडे आहे. म्हणजेच जगातील ऐंशी टक्के लोकांकडे वीस टक्के संपत्ती आहे, तर जगातील वीस टक्के लोकांकडे उरलेली ऐंशी टक्के संपत्ती आहे किंवा आता प्रश्नपत्रिका बघा: ‘ऐंशी टक्के प्रश्‍न हे वीस टक्क्यांच्या अभ्यासक्रमातून येतात आणि वीस टक्के प्रश्न हे बाकी ऐशी टक्के अभ्यासक्रमातून येतात तसेच कोणत्याही कामासाठीच्या मुलाखती बघा, ऐंशी टक्के लोकांची काम मिळण्याची शक्यता ही वीस टक्के असते तर वीस टक्के लोकांची निवड होण्याची शक्यता ऐशी टक्के असते. म्हणजेच हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वीस टक्के केल्या तरी आपल्याला ऐंशी टक्के फायदा मिळतो! आणि म्हणून त्या वीस टक्के गोष्टींवर आपल्याला ऐंशीं टक्के लक्ष केंद्रित करायचे आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला आयुष्यात कधीच वेळेची कमतरता जाणवणार नाही. 


10. हाऊ टू गेट फ्रॉम व्हेअर यू आर, टू व्हेअर यू वॉन्ट टू बी (How to get from where you are, to where you want to be) लेखक : जॅक कॅनफिल्ड हे पुस्तक वाचण्याचा एक फायदा आणि एक तोटा आहे. तोटा म्हणजे असा की, हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला असे वाटेल की, ह्या पुस्तकात अशी कोणती गोष्ट होती जी आपल्याला आधी माहीत नव्हती आणि फायदा असा की आपण स्वतःलाच असे विचारू की, जर मला हे सर्व अगोदरच ठाऊक होतं तर मी ह्याचा वापर केला का नाही. 


11. द पावर ऑफ लेस (The Power of Less) लेखक : लिओ बाबाउता हे पुस्तक वाचून आपली क्षमता प्रचंड वाढेल. आपला वेळ आणि पैसा उत्तमरीत्या कसा वापरायचा याबद्दल उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे. आपला हल्लीच पगार झाला असेल तर हे पुस्तक आपण आजच वाचायला घेतले पाहिजे! 


12. ब्रेन रुल्स (Brain Rules) लेखक : जॉन मेडिना या पुस्तकात आपला मेंदू कसे काम करतो याचा उलगडा केला आहे. हे पुस्तक वाचून आपण आपल्याला किती झोप आणि किती व्यायाम गरजेचा आहे हे समजेल. आपली बुद्धी तर याने तल्लख होईलच शिवाय आपली स्मरणशक्तीसुद्धा वाढेल. 


13. 48 लॉज ऑफ पॉवर (48 Laws of power) लेखक : रॉबर्ट ग्रीन या जगात ऐंशी टक्के लोक हे खरंच चांगले आहेत; परंतु बाकी वीस टक्के लोक हे वाईट आहेत. आपलं नुकसान होऊन जरी त्यांना काही मिळणार नसेल तरी त्यांना आपलं सुख बघवत नसल्याने आपलं वाईट करायचं असतं आणि त्यात चिंतेची बाब अशी की, त्यांनी आपलं नुकसान करून झाल्यावर आपल्याला समजतं की कोण चांगलं आणि कोण वाईट. यातून आपल्याला वाचविणारे पुस्तक म्हणजे 48 लॉज ऑफ पॉवर. यात अनेक उदाहरणांतून शक्तीबद्दल काही नियम सांगितले आहेत. या पुस्तकाची भाषा मात्र समजायला जरा कठीण आहे. 




14. मास्टरी (Mastery) लेखक : रॉबर्ट ग्रीन हे पुस्तक वाचून आपल्याला कळेल की, आपण कोणत्या गोष्टीत सर्वोत्तम आहात. यात सहा तत्त्वे दिली आहेत आणि जर आपण त्यांचे तंतोतंत पालन केलेत तर आपले जीवन नक्कीच सफल होईल. भरपूर उदाहरणं दिली आहेत पुस्तकात, त्यातील इंग्रजी सोपे आहे, परंतु आपल्याकडे त्यासाठी शब्दसंग्रह मात्र हवा. त्यामुळे सर्वात शेवटी वाचावे हे पुस्तक. तर, आपण नक्कीच ही पुस्तके वाचा, ज्या क्रमात दिली आहेत त्या क्रमात वाचा आणि कमीत कमी आठ वेळा वाचा!















बिझनेस सुत्रे...

बिझनेस सुत्रे
‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव आहे. पैसा कुठून आणणार? असे एक ना अनेक प्रश्न/शंका उपस्थित केल्याजातात. या सर्वांना मी चुकीचे ग्रह समजतो. म्हणून ही उद्योगाची सुत्रे मी स्वानुभवावरून बनविली आहे.
1.व्यवसाय दुसऱ्यांच्या पैशावरच करावा.
हे सर्वात पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी जे नेहमी सांगतो की, ‘उद्योग करायला पैसे लागत नाहीत’ हे म्हणणे नीट समजले. उद्योगासाठी लागणारा पैसा बँकेकडून घ्यावा, गुंतवणूकदारांकडून घ्यावा किंवा ग्राहकांकडून घ्यावा. ते तीनही उत्तम मार्ग आहेत आणि उद्योग उभारणीसाठी पैसा पुरवणारे आहेत. यासाठी उद्योग कशाचा आहे, कुठे आहे, इत्यादी महत्त्वाचे नसून तो कोण करणार आहे, हे महत्त्वाचे आहे. वरील तीनही मार्ग हे माणसाभोवती फिरणारे आहेत. स्वत:च्या पैशावर जो उद्योग करतो तो जास्त काळ टिकू शकत नाही. लवकरच संपतो. परंतु दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करणारा प्रदीर्घ काळ टिकू शकतो व उद्योगाला मोठे स्वरूप देऊ शकतो. जे जे मोठे उद्योजक झाले त्यांनी हेच केले. म्हणून उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे सूत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. दुसरे सूत्र आहे प्रामाणिकपणाचे.
2.प्रामाणिकणे व्यवसाय करता येतो.
लबाड्या केल्याशिवाय कुणी उद्योग करूच शकत नाही, असा अनेकांचा समज असतो. तो चुकीचा आहे. प्रत्येक उद्योगात “Margin of Honerty” म्हणजे इमानी नफा असतोच. तोट्यात कुणी उद्योग करावा अशी जनभावना कधीच नसते. उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने दोन पैसे कमावले पाहिजेत, अशीच सर्वसाधारण धारणा असते. ही जनभावना अत्यंत महत्त्वाची आहे. ती समजून घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणावर आपला विश्र्वास असला पाहिजे. झटपट मोठे व्हावे असे कुणालाही वाटू शकते. त्यात गैर काहीच नाही. पण मेहनतीच्या व प्रामाणिकपणाच्या जोरावरच प्रगती होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. Short Cuts will cut you short. त्यामुळे Short Cuts ला थारा देणे धोक्याचे आहे. आणि प्रगतीचीही एक गती असते, हे समजले पाहिजे. Exponential Growth झाली की Exponential Fall ही होतो. तेव्हा चढ-उताराचे धक्के खाण्यापेक्षा एका झेपणाऱ्या गतीने उद्योग करणे हिताचे ठरते.
3.कमी नफा व जास्त उलाढाल.
नफा मिळवणे हा उद्योगाचा अपरिहार्य हेतू होय. नफा जास्त ठेवावा ही कमी ठेवावा, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. नफा जास्त असेल तर विक्री कमी होईल व नफा कमी असेल तर विक्री अधिक होईल. दोन्ही पर्यायात नफा मिळतोच. परंतु पहिल्या पर्यायात जास्त कमाई होते असे वाटते, पण ते तसे नसते. दुसऱ्या पर्यायातच जास्त नफा मिळतो. शिवाय ग्राहक संख्याही दुसऱ्या पर्यायातच अधिक असते. उद्योगामध्ये मनुष्यबळ अर्थात ग्राहक संख्या हे मोठे भांडवल समजले जाते व ग्राहकांशी चांगले संबंध हा नफा समजला जातो. तेव्हा कमी नफा व जास्त उलाढाल हे फायद्याचे सूत्र ठरते.
4.तुफान कर्तृत्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा.
महात्त्वाकांक्षा हे सर्वाम महत्त्वाचे सूत्र आहे, असे मला वाटते. ती नसेल किंवा कमजोर असेल तर आपण उद्योग करू शकणार नाही. ती सुद्धा साधीसुधी असून चालणार नाही, तर जिथे जाऊ तिथे टॉपवर राहू ही जिद्द असली पाहिजे. माणसाची क्षमता ही काही ठरलेली नसते. वजनासारखे गणित क्षमतेचे नाही. ती आव्हानानुसार बदलती असते. म्हणून मोठमोठी आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि तुफान कर्तृत्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा मनी बाळगली पाहिजे.
मला वाटते या बिझनेस सुत्रे च्या आधारे कुणीही उद्योग करू शकतो. तो यशस्वी होईल ही माझी खात्री आहे. अधिकाधिक तरूणांनी हे आव्हान स्वीकारावे.












प्रमोद देशमुख 
मॉडर्न मोटिव्हेशनल लीडरशिप ट्रेनर
(संभाषण चातुर्य व मराठीतून मॅनेजमेंट प्रशिक्षक, पर्सनल कोच व वक्ता.)
संपर्कः 9730264201
Email : deshmukhpramod3@gmail.com

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

भारतात श्रीमंत होण्याचे 21 जलद मार्ग !!

भारत अशा देशांमध्ये आहे जिथे लोक भारतीय रुपया आणि यूएस डॉलर दोन्हीमध्ये मिलियन बनतात. या प्रवृत्तीसाठी योगदानकर्ते लहान लोकसंख्या, संसाधनांचा योग्य शोषण, प्रारंभ-अप आणि मध्यस्थ आणि राज्य सरकारांनी स्वीकारलेल्या गुंतवणूकदार / व्यवसायाच्या अनुकूल धोरणास समर्थन देणारी जीवंत अर्थव्यवस्था आहे. श्रीमंत कुटुंबे, परदेशात स्थलांतर करणे, संपत्ती मिळवण्यासाठी गुन्हेगारी करणे किंवा इतर घृणास्पद उपाय केल्याबद्दल लाखो कोटींची करणे आवश्यक नाही. काही वित्त आणि व्यवसाय कौशल्य असलेल्या योग्य कौशल्यांचा संच भारतामध्ये समृद्ध होण्यासाठी पुरेसा आहे.
Money matters: It really does
भारतातील एखाद्या उपक्रमांकडे न्याहाळल्याने ते बरेच कठीण होऊ शकते. प्रमुख अडथळा एक उपक्रम निधी आहे. श्रीमंत बनण्याचे काही मार्ग गुंतवणूकीत गुंतलेले असतात, जर उद्योजक काम करत असेल किंवा नैसर्गिकरित्या श्रीमंत असेल तर ते शक्य आहे.
त्यांच्या स्वत: च्या पैशाची बचत करण्यास असमर्थ असलेल्या भारतीय सरकारच्या मुद्रा बँक योजनेमुळे कमी व्याजदरात निधी उपलब्ध होतो. अर्जदाराने निर्धारित निकष पूर्ण केल्यास, बहुतेक बँका आणि वित्त संस्थांनी वैयक्तिक कर्जे दिली आहेत. प्रारंभिक गुंतवणूकीची इतर पारंपारिक पद्धती ही गर्दी निधी, कौटुंबिक सिंडिकेशन आणि कम्युनिटी कर्जे आहेत. वैयक्तिक मालमत्ता किंवा मालमत्तेची विक्री करणे आणि सिक्युरिटीजमधून पैसे काढणे याचा सल्ला देण्यात येत नाही कारण भारतीय बाजारपेठेतील स्थिती जबरदस्तीने झुंजत असतात. कोणत्याही समृद्ध-द्रुत-त्वरित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
भारतात श्रीमंत कसे व्हावे यावर विचार
जर आपल्याला भारतात श्रीमंत व्हायचे असेल तर येथे 21 कल्पनांची एक सर्वोत्कृष्ट यादी आहे जी आपल्याला श्रीमंत कसे बनते हे दर्शवेल.
1. ब्लॉगिंग
जर कोणीतरी मला श्रीमंत होण्यासाठी सर्वोत्तम मार्ग विचारला तर माझा प्रत्युत्तर ब्लॉगिंगवरच असेल. ब्लॉगिंगने मला केवळ श्रीमंत केले नाही, यामुळे बरेच लोक श्रीमंत झाले. ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी आधी मला माहित असलेले बहुतेक लोक श्रीमंत नव्हते. बर्याच लोकांना अजूनही हे तांत्रिक व्यवसाय मानले जाते परंतु ते अधिक तांत्रिक नाही. जर आपल्याकडे वेब डिझाइनचे शून्य ज्ञान असेल आणि इंग्रजी चे ही ज्ञान नसेल तरीही आपण ब्लॉगिंग सुरू करू शकता आणि भरपूर पैसे कमावू शकता.
आपण हिंदी किंवा आपल्या मातृभाषेत ब्लॉग लिहू शकता. आपण आपल्या ब्लॉगद्वारे आपले ज्ञान आणि आपला स्वतःचा अनुभव सामायिक करू शकता. आपल्या ब्लॉगद्वारे पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग AdSense आणि संबद्ध जाहिराती आहे. आपल्याला फक्त एक गोष्ट डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता आहे. विनामूल्य ब्लॉगस्पॉट ब्लॉग तयार करू नका कारण अनेक मर्यादा आहेत आणि आपले डोमेन नाव “yourblogname.blogspot.com” सारखे दिसेल. मी goaddy, wordpress वर  जाण्याची शिफारस करतो कारण ते खूप स्वस्त आहे, ब्लॉग तयार करणे सोपे आहे, अनेक फायदे आहेत आणि आपण वार्षिक योजनेसह विनामूल्य डोमेन मिळवू शकता.
2- ट्रेन, बस, वायु आरक्षण:
बुकिंग ट्रेन, बस, एअरलाइन जागा यापूर्वी ट्रॅव्हल एजंट्सचा विशेषाधिकार होता. स्मार्ट फोन किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या संगणकासह सुसज्ज असलेले कोणीही आता ही सेवा देऊ शकतात. भारतीय रेल्वेद्वारा प्रदान केलेले अॅप्स, विविध राज्य मालकीचे रस्ते वाहतूक महामंडळे आणि एअरलाइन्स हे कुठूनही बुक करणे सोपे करतात. प्रवासी कार्यकर्ते, चक्राकार प्रवासी एजन्सी कार्यालयात प्रवेश करण्यास नकार देतात किंवा तिकिट आरक्षित करण्यासाठी लांब रांगेत प्रतीक्षा करतात, खात्रीपूर्वक सीटसाठी काही शंभर रुपये देतात. व्यवसायास घरातून किंवा आवश्यक असल्यास, पार्कसारख्या कोणत्याही स्थानावर हाताळले जाऊ शकते. आपल्याला आपल्या क्रेडिट / डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग सुविधेसह देय देणे आवश्यक आहे. असे बरेच ट्रेव्हल एजंट आहेत जे कधीही श्रीमंत झाले नाहीत तर आपण द्रुतगतीने श्रीमंत होऊ इच्छित असल्यास ते करू शकता.
3- टूर ऑपरेटर:
वॉकिंग टूर ही भारतातील एक संकल्पना आहे. विशिष्ट पर्यटन क्षेत्रात पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते परदेशी पर्यटकांचे एक गट घेऊन जातात. चालण्याचे टूर मजेशीर आहेत आणि सहसा परदेशी पर्यटकांचे संरक्षण करतात. अशा ट्रिपमुळे परदेशातील व्यक्तींना प्रथम स्थानाचा अनुभव मिळू शकतो, सौदा खरेदी करू शकता, क्षेत्रातील चव, दृष्टी आणि ध्वनी घेऊ शकता. वाहतूक टूर ट्रॅव्हल एजन्सीद्वारे किंवा मनोरंजन सेवा ऑफर करणार्या पोर्टलद्वारे बुक केलेले आहेत.
4- खाद्य ट्रक्सः
दोन वर्षापूर्वी भारतीय अन्नधान्याच्या संकल्पनेवर बळकट झाले असते. 200 वर्षांहून अधिक काळापासून अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या भारतीय खाद्यपदार्थांमध्ये तुलनेने लहान गुंतवणूक समाविष्ट आहे- रु. 500,000 ते रु. 800,000 ते प्रचंड नफा मध्ये काटा. अन्न ट्रक सहसा स्वयं-संचालित असतात. त्यांना विशिष्ट ठिकाणे जसे समुद्र किनारे, व्यवसाय जिल्हे, दिवसा आणि संध्याकाळी पार्क केले जाते. रेस्टॉरंट्सच्या तुलनेत फूड ट्रकला कमी परवाने आवश्यक आहेत. कायदेशीर अन्नपदार्थ चालविण्याकरिता स्थानिक प्राधिकरणाकडून परवाने आणि भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे. आपण हे प्रारंभ करू इच्छित असल्यास आपण या खाद्य ट्रक मार्गदर्शकाचे मनी कनेक्शनवर वाचू शकता.
5-टॅक्सी मालक:
भारतातील कॅब एग्रीगेटर्समध्ये वाढ झाल्यामुळे लोकांना कारची मालकी आणि टॅक्सिस म्हणून भाडेकरू मिळू शकेल. सर्व भारतीय महानगरांमध्ये प्रमुख ऑपरेटर टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी एक किंवा अधिक प्रवासी वाहन आणि चालक देऊ शकतात अशा लोकांच्या शोधासाठी आहेत. हे एग्रीगेटर्स प्रत्येक दिवशी एक निश्चित रक्कम आणि शेअर नफा देतात. कोणत्याही परिस्थितीत, आपल्या परताव्याची हमी दिली जाते. थेट वित्तपुरवठा समाविष्ट असल्याने वाहन वित्त खरेदी करणे तुलनेने सोपे आहे.
6- संग्रह एजंटः
भारतामध्ये श्रीमंत होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जवळजवळ प्रत्येक सेवा प्रदाता, बँक, कॉपोरेट हाऊस ग्राहकांना त्यांचे चेक आणि क्लायंट आणि व्यावसायिक सहकार्यांकडून देयके गोळा करण्यास पाहते. नोकरीमध्ये ग्राहक व कंपन्यांना बँक वाहिन्यांचे वेळेवर वितरण देखील समाविष्ट असते. टेलिकॉम सेवा पुरवठादार, युटिलिटी कंपन्या, वित्तीय संस्था आणि बँका याद्वारे ग्राहकांना ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे. या संस्थांसाठी संकलन एजंट म्हणून काम करणे आकर्षक आहे. हे काहीच मूल्यवान नाही की संग्रह एजंट कर्ज पुनर्प्राप्ती एजंटांपेक्षा वेगळे आहेत.
7- पत्ता सत्यापन सेवा:
दूरसंचार सेवा प्रदाता, क्रेडिट कार्ड जारीकर्ता आणि इतर अनेक कंपन्यांना ग्राहक किंवा व्यवसायाच्या सहयोगीच्या पत्त्याचे प्रत्यक्ष सत्यापन आवश्यक आहे. ते अतिरिक्त प्रयत्न करण्यासाठी इच्छुक व्यक्ती किंवा लघु उद्योगांना कामाचे आउटसोर्स करतात. या कार्यामध्ये व्यक्तीच्या पत्त्यावर भेट देणे किंवा शेजाऱ्यांशी विचार करणे समाविष्ट आहे की ती व्यक्ती त्या परिसरमधील राहते किंवा व्यवसाय करते.
8- निवास सेवा:
देशभरात आर्थिक वाढ झाल्याबद्दल भौगोलिक स्थानांतर भारतात वाढले आहे. हजारो ताज्या पदवीधर, अनुभवी व्यावसायिक, कुशल आणि अकुशल कामगार देशभरच्या विविध भागांमध्ये हिरवळ व पाळीव प्राण्यांच्या शोधात स्थलांतर करतात. एखाद्या अपार्टमेंट किंवा घराला एक मिनी हॉस्टेल किंवा श्रम कॅम्पमध्ये रूपांतरित करणे आपल्याला आकारमान, निश्चित मासिक कमाईची खात्री देते. भाडेकरूांकडून घेतलेल्या ठेवींचा व्याज कमवण्यासाठी बँकांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
9-मानसशास्त्रज्ञ सल्लागारः
भारतात मानसिक आजाराचा बॅकसीट चालू आहे. मनोचिकित्सकांना भेट देण्याऐवजी टाबुओस उच्च सत्ता चालवत आहेत. या स्वत: ची कल्पना असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी, मनोविज्ञानमधील पदवीधर विद्यार्थ्यांकडून वृद्धापर्यंत प्रत्येकास परामर्श सेवा देत आहेत. प्रति सत्र शुल्क आकारले जाते, जे सामान्यत: 30 मिनिटे ते एक तास चालते. ही सेवा घर, एक लहान कार्यालय किंवा वैद्यकीय क्लिनिक / हॉस्पिटलमधून देऊ शकते. कृपया लक्षात ठेवा की मानसशास्त्रीय सल्लागार मनोवैज्ञानिक सल्लागारापेक्षा वेगळे आहे. ज्या व्यक्तींनी मनोविज्ञानाने विज्ञान पदवी उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्तींनी हे केले पाहिजे. दुसरीकडे, मनोचिकित्सा ही एक अतिशय खास वैद्यकीय शाखा असून त्यासाठी डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) पदवी आवश्यक आहे.
10- हर्बल सौंदर्य उत्पादने:
अनिश्चितपणे, हा एक अतिशय स्पर्धात्मक क्षेत्र आहे, कॉर्पोरेट कंपन्यांचा बाजाराचा एक भाग म्हणून लढत आहे. बाजारपेठांचा मोठा भाग अद्याप उद्योजकांसाठी उपलब्ध आहे जे ताजे, घरगुती पारंपरिक पारंपारिक सौंदर्य उत्पादने देऊ शकतात. अशा हर्बल सौंदर्य उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक विपणनासाठी संग्रहित केले जाऊ शकत नाही. ते केवळ ऑर्डरवर आधारित तयार आणि वितरीत केले जातात.
11- टिफिन सेवाः
महिलांना श्रीमंत होण्यासाठी खासकरून हा चांगला पर्याय आहे. भारत सर्वात मोठा ग्राहक-संचालित अर्थव्यवस्था आहे. याचा अर्थ, लोक उत्साहाचे, प्रयत्न करतात आणि त्यांच्या जीवनकाळात उत्कृष्ट ग्राहक उत्पादने खरेदी करतात. जोडप्यांना चालना देण्याकरता जीवनावश्यक खर्च वाढवणे आवश्यक आहे. काम करणार्या पती-पत्नी आणि एकटा कामगार असलेल्या लहान कुटुंबांना क्वचितच जेवण तयार करण्यासाठी वेळ आणि मनःस्थिती असते. मोठ्या शहरांमध्ये सामान्यपणे ‘टिफिन सर्व्हि’ म्हणून ओळखल्या गेलेल्या ग्राहकांची सदस्यता घेतली जाते. घरगुती डिलिव्हरी सेवेसह पूर्ण, पॅक केलेले दुपारचे जेवण किंवा डिनर प्रदान करणे म्हणजे घरापासून किंवा लहान स्वयंपाकघरातून सुरू होणारी एक मोठी पैशाची स्पिनर आहे.
12- फोटो restoration :
भारतात उष्णकटिबंधीय वातावरण जुन्या चित्रांवर आणि मौल्यवान कलाकृतींवर मात करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कलात्मक कौशल्यासह एकत्रित केले जाते जे हवामानाच्या विकृतींना बळी पडलेल्या संस्मरणीय चित्रांना पुनर्संचयित करणे शक्य करते.
कृत्रिम वस्तू आणि कौटुंबिक वारंगल यांना पॉलिशिंगसारखी पुनर्संचयित करणे किंवा सुधारणे आवश्यक आहे. ही सेवा जरी उपलब्ध असली तरीही ती भारतामध्ये दुर्मिळ आहेत आणि सहजपणे दिली जाऊ शकते.
13- विदेशी मांस पुरवठादार:
मांसपेशी, गोमांस बंदी आणि पारंपारिक मांस आणि कुक्कुटपालन उत्पादनांच्या वाढत्या किंमतींविषयी असलेले टबूज भारतीय भारतीयांच्या नवीन संपत्तीसह चांगले जुळत नाहीत. मिळविलेले, मांस साठी शुद्ध केलेले चव बाजारावर देखील शासन करतात. शेतीसाठी वेळ आणि जागा असणार्या ज्यांच्यासाठी शहामृग, वन्य डुक्कर, क्वाईल, पार्ट्रिज आणि इतरसह विदेशी मांस पुरविणे आणि उत्कृष्ट उत्पादन करणे उत्कृष्ट आहे.
14- लोक संबंध संस्था:
नवीन व्यवसायातील वाढीमुळे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात ब्रेकनेक स्पर्धा वाढली आहे. कॉपीकॅट व्यवसाय मॉडेल भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण ठेवतात. कंपन्या त्यांचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी किंवा सार्वजनिक संबंधांच्या कंपन्यांसाठी ब्रँड स्वरुप एकत्रित करण्यासाठी इच्छुक आहेत. पीआर फर्म्सना मास मीडियामध्ये योग्य उपस्थिती तयार करणे, कंपनी किंवा त्याच्या ब्रॅण्डचे प्रचार करण्यासाठी इव्हेंट होस्ट करणे, पत्रकार आणि इतर भागधारकांशी संवाद साधणे यासारख्या कार्ये आहेत. सर्व व्यवसाय मोठ्या पीआर कंपन्या च्या सेवा घेऊ शकत नाही. ही सेवा लहान कंपन्यांकडे देऊ करणे घर किंवा लहान कार्यालयाकडून करता येते.
15- सरकारी संपर्क
भारतात रेड टेप कमी करण्याच्या सरकारच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतर नोकरशाही सर्वोच्च सत्ता गाजवत आहे. नवीन परवानग्या आणि परवानग्या मिळविणे किंवा विद्यमान नूतनीकरण करणे ऑनलाइन केले जाऊ शकते, परंतु केवळ मर्यादित एजन्सींसह. या परवान्यांची खरेदी आणि नूतनीकरण करण्यासाठी व्यवसायांना मदत करणे खूप फायदेशीर आहे. आपल्याला विभिन्न सरकारी विभागांमध्ये योग्य व्यक्तीसह संपर्क विकसित करण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक असतील.
16- अन्न प्रक्रिया
भारतातील बहुतेक कच्च्या हातातील पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सचा एकत्रित हिस्सा 40 टक्के कच्चा अन्न – धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश आहे – भारतात विरघळत आहे. भारतीय सरकारने अन्नपदार्थांसह अनेक उपक्रम सुरू केले आहेत ज्यात गुंतवणूकदार या प्रचंड वाया जाण्याच्या प्रक्रियेसाठी प्रक्रिया युनिट उघडू शकतात. अन्न प्रसंस्करण युनिट्स उघडण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना सरकारने आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य दिले आहे. कॅन केलेला, निर्जलीकृत आणि गोठलेले अन्न भारतातील एक वाढते बाजार आहे. या क्षेत्रामध्ये विस्तार करणे हा द्रुतगतीने श्रीमंत होण्याचा एक निश्चित मार्ग आहे.
17- स्क्रॅप रीसायक्लायर:
प्रत्येकजण सर्वव्यापी ‘कबाडी वाळा’ किंवा रॅग पिकर, कचरा पेटी आणि गटरच्या फेर्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, सॉफ्ट ड्रिंक कॅन आणि असंख्य स्क्रॅप गोळा करतो. 12 घंट्यांसाठी मुंबई रस्त्यावर चालणारी एक सामान्य रॅग पिकर दररोज रु. 600 ते रु. 800 पर्यंत कमावते. कारण: स्क्रॅपने भारताच्या पुनर्चक्रण उद्योगात उच्च मूल्य आणले आहे. काही कौशल्यांसह, स्क्रॅप रीसायकलिंग व्यवसाय उघडणे हा भारतातील श्रीमंत होण्यासाठी खूप फायदेशीर आणि निश्चित मार्ग आहे. पुनर्प्रक्रिया केलेले धातू, प्लॅस्टिक आणि कागदाचा वापर सामान्यपणे केला जातो आणि भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्त मागणी असते. शासकीय कर्जे, तांत्रिक ज्ञान आणि सबसिडीची पुनर्वापरकर्त्यांना ऑफर केली जाते.
18- अंत्यसंस्कार सेवा:
संभ्रमाच्या चिथावणी देण्याआधी, वास्तविकतेची तपासणी करणे आवश्यक आहे. मृत देवीच्या मृत अवस्थेत अंतिम संस्कार करावयाचे आहेत. अंतिम संस्कार करण्यासाठी आवश्यक असलेले शिंग, अंत्यसंस्तिष्ठा, फुले आणि इतर सामानाची व्यवस्था करणे, ज्यांचे प्रिय कुटुंब सदस्य गमावले आहेत त्यांच्यासाठी बर्याचदा तणावपूर्ण असतात.
विशिष्ट धार्मिक समुदायांद्वारे विस्तृत अंत्यसंस्कार सेवा ऑफर केली जातात परंतु हे शोकग्रस्त कुटुंबासाठी विनामुल्य असू शकते. श्वासोच्छवास, शस्त्रक्रिया, श्वासोच्छवास किंवा स्मशानभूमीवर व्यवस्था करणे, फुले आणि इतर आवश्यक वस्तू मिळविणे यासारख्या अंतिम संस्कार सेवेमध्ये समृद्ध आणि सामाजिक सेवा बनणे देखील चांगले व्यवसाय आहे.
1 9-क्रॉनिकलर:
विलक्षण भाषिक आणि लेखन क्षमता असलेल्या सर्जनशील लोकसाठी एक फायदेशीर उद्यम. कंपन्या, मोठे कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि इतर अनेक संस्था इतिहासकारांकडे पहात आहेत जे त्यांचे तपशीलवार इतिहास लिहिण्यास सक्षम आहेत. हे कार्य खूपच आकर्षक आहे आणि असाइनमेंट अनेक महिन्यांपर्यंत टिकू शकतात. यात संस्थेमध्ये किंवा कुटुंबाच्या इतिहासामध्ये खोदणे, मुळे शोधणे, विविध महत्त्वाच्या खुणा दाखविणे आणि रीडर फ्रेंडली, रुचीपूर्ण रीतीने प्रस्तुत करणे समाविष्ट आहे.
20- श्रम सेवा:
हे भर्ती एजन्सीसारखेच नाही ज्यासाठी परवाने मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. श्रमिक सेवा पुरविण्यामध्ये अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांना तात्पुरत्या किंवा पूर्ण-वेळेच्या आधारावर अत्यंत कमी सूचनेवर तीन तासांपेक्षा कमी-कमी व्यवसायातील कमी व्यवसायांचा समावेश असतो. अशा कंपन्यांमध्ये बांधकाम कंपन्या, सुरक्षा एजन्सी, रेस्टॉरंट्स, कीटक नियंत्रण प्रदात्या आणि मोटली इतरांचा समावेश आहे. प्रत्येक मजुराने दिलेल्या कमिशननुसार आपण एका दिवसाच्या मजुरीच्या समकक्ष पैसे भरले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरी मजुरांवर रोजच्या मजुरीसाठी रु. 600 मिळाल्याचा विचार करुन नफ्यात चांगली कल्पना केली जाऊ शकते.
21- स्टॉक आणि कमोडिटीज ट्रेडिंग:
भारतातील प्रत्येक सेक्टर वाढत आहे: उत्पादन, पायाभूत सुविधा, संरक्षण, दूरसंचार, वित्त आणि बरेच काही. कंपनी समभागांमध्ये व्यापार हा भारतातील श्रीमंत होण्यासाठी एक वैध आणि खात्रीचा मार्ग आहे. सोन्या, चांदी, क्रूडसारख्या कमोडिटीजमध्ये व्यापार देखील वेग मिळवत आहे. लघु, एक-दिवसीय अभ्यासक्रम जे स्टॉक आणि कमोडिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी प्रशिक्षण देतात ते भारतात उपलब्ध आहेत. आपण थेट किंवा प्रतिष्ठित ब्रोकरेज फर्मद्वारे स्टॉक आणि कमोडिटीजमध्ये व्यापार करू शकता.
प्रथम आपली चेक -लिस्ट मिळवा
कोणत्याही समृद्ध-श्रीमंत-लवकर उपक्रम सुरू करण्यापूर्वी, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींची एक चेक-सूची तयार करणे शिफारसीय आहे. यापैकी काही व्यवसायांना बँक खाते, कर आणि इतर नोंदणी आणि परवाने आवश्यक असू शकतात. याशिवाय, आपल्या एंटरप्राइजला कायदेशीर म्हटले जाऊ शकते आणि आपल्याला कठोर रोख दंड होऊ शकते. व्यवसायाच्या निरुपद्रवी प्रकृति असूनही कायद्याचे गंभीर उल्लंघन तुरुंगात बंद होऊ शकते. योग्य दस्तऐवजीकरण, मर्यादित संसाधने आणि उत्साहवर्धक उंचीसह, आपण देखील भारतामध्ये समृद्ध होवू शकता.



©Startup idea






by- https://marathaudyogpati.wordpress.com 

तुम्हाला श्रीमंत व्हायचंय?




श्रीमंत व्हावे असे सर्वाचेच स्वप्न असते, पण ते सत्यात उतरवण्यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे.




( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )



श्रीमंत व्हावे असे सर्वाचेच स्वप्न असते, पण ते सत्यात उतरवण्यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. ती पथ्ये काय आहेत आणि ती कशी पाळायची हे आपण या लेखात बघणार आहोत.

१. गुंतवणूक लवकरात लवकर करायला सुरुवात करणे (time value of money).

२. चक्रवाढ व्याजाच्या शक्तीचा फायदा घेणे (power of compounding).

गेल्याच आठवडय़ात मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिची मुलगी राणी हल्लीच सनदी लेखापाल (chartered Accountant) झाली होती आणि उत्तम पगारावर नोकरीला लागली होती. ती मला म्हणाली, ‘‘ अगं मी हिला सांगत होते की, तुला आता चांगली नोकरी लागली आहे तर तू थोडी तरी बचत/ गुंतवणूक करायला सुरुवात कर. पण हिला काही माझे म्हणणे पटत नाही, तर तूच तिला समजून सांग.’’

तर मी म्हटले की, जर तुला श्रीमंत व्हायचे असेल तर वर सांगितलेली दोन्ही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. चला उदाहरणाने समजून घेऊ या:

आपण तीन मित्रांचे उदाहरण घेऊ : अमित, सुमित आणि रोहित. तिघांनाही चांगली नोकरी आहे आणि तिघांनाही ६० व्या वर्षी रिटायर व्हायचे आहे. अमित तिघांमध्ये हुशार, तो सुरुवातीपासूनच म्हणजे २५ व्या वर्षीच गुंतवणुकीला सुरुवात करतो, महिना रु. ७०००/-. सुमितला जरा उशिरा जाग येते म्हणून तो ३० व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करतो. मग रोहितला वाटते की मीच मागे राहिलो म्हणून तोही गुंतवणुकीला सुरुवात करतो, पण ३५ व्या वर्षी.

मग आता बघूया की ६० व्या वर्षी त्यांना किती पैसे मिळतील. (वरील कोष्टक पाहा)

या उदाहरणावरून आपल्या हेच लक्षात येते की, अमितची गुंतवणूक मुद्दल रु. २९.४० लाखांचे झाले २.६५ कोटी, म्हणजे नऊ पट वाढले; सुमितचे रु. २५.२० लाखांचे झाले १.५८ कोटी, म्हणजे सहा पट वाढले; तर रोहितचे रु. १६.८० लाखांचे झाले ०.९२ कोटी म्हणजे चार पट वाढले.

हे कशामुळे घडले तर चक्रवाढ व्याजाच्या जादूमुळे. ज्याला जगातले आठवे आश्चर्य असेदेखील म्हटले जाते आणि अर्थातच गुंतवणुकीला लवकर सुरुवात केल्याने.

मग मी राणीला विचारले की, आता तरी तुला पटले का की लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर काय फायदा होईल? ती म्हणाली, ‘‘हे मला पटले, पण अजूनही हे कसे करायचे ते मला माहीत नाही.’’ मी तिला म्हटले मी सांगते, श्रीमंत होण्याचे स्वप्न साध्य करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे पैशाने पैसा वाढविणाऱ्या गुंतवणुकीचाच. त्यासाठी फक्त काही साध्या गोष्टींचे (खालील कोष्टक पाहावे) पालन करायचे इतकेच! आनंदाने गुंतवणूक करा. माझी खात्री आहे तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.



‘श्रीमंती’कडील सरळ वाट..

१. गुंतवणुकीस लवकर सुरुवात करा :

शक्य झाल्यास अगदी पहिल्या पगारापासूनच सुरुवात करा. तुम्हालाच नंतर आश्चर्य वाटेल की एवढी छोटी रक्कम एवढी कशी वाढली.

२. गुंतवणुकीची रक्कम महिन्याच्या बिलाच्या खर्चात धरा आणि तुमची गुंतवणुकीचे हप्ते आणि बिलांचाही नियमित भरणा करा :

जर तुम्ही नियमित गुंतवणूक केली नाहीत, तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा घेता येणार नाही आणि रिटायर होताना तुम्हाला भरपूर पैसे (large corpus) मिळणार नाहीत.पहिले गुंतवणूक करा आणि उरलेले पैसे खर्चासाठी वापरा.

३. गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करा :

पहिली गोष्ट ठरवलेली रक्कम नियमित गुंतवा आणि जर तुम्हाला जास्तीचे पैसे मिळाले – जसे बोनस, बक्षीस (prize) किंवा प्रोत्साहन (Incentive), पगारवाढ तर गुंतवणुकीची रक्कम वाढवायला विसरू नका.

४. खर्चासाठी अधीर होऊ नका. संयम पाळा, पुढे आयुष्यात त्याची तुम्हाला गरज पडणार ?आहे :

बरेच जण सगळ्यात मोठी चूक हीच करतात की, गुंतविलेले पैसे ते वापरतात/खर्च करतात. त्यामुळे त्यांना चक्रवाढ वाढीचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही पैसे काढले नाहीत, तर सुरुवातीला जरी कमी वाटले तरी, थोडय़ाच वर्षांत ते नक्कीच वाढतील. विश्वास ठेवा आणि वाट बघा- तुम्हाला चक्रवाढ व्याजाची जादू (power of compounding) बघायला नक्कीच ?मळेल.

५. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका :

कारण जरी तुम्हाला सिप (SIP) करायला पाहिजे हे माहीत असले, जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी ती कोणत्या मुच्युअल फंडात करायची? कधी करायची? हे सांगण्यासाठी जाणकार माणसाची गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता आहे.























by - loksatta 

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

हा होता सर्वात निर्दयी ड्रग माफिया, प्रत्येक वर्षी उंदीर खायचे अब्जावधी रुपये

मेक्सिकोचा प्रसिध्‍द अंमलीपदार्थांचा तस्कर अल चापोला शुक्रवारी तिस-यांदा तुरुंगातून पळून गेल्याची अफवा पसरली होती.

drug lord pablo escobar news marathi
कोलंबियाचा ड्रग लॉर्ड पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया.
मेक्सिकोचा प्रसिध्‍द अंमलीपदार्थांचा तस्कर अल चापोला शुक्रवारी तिस-यांदा तुरुंगातून पळून गेल्याची अफवा पसरली होती. मात्र हे खरे नव्हते. जवळजवळ दोन दशकापूर्वी जगभरात ड्रग लॉर्ड पाब्लो एमिलियो एस्कोबर गॅविरियाचे असेच नाव घेतले जात होते. तो जगातील सर्वात श्रीमंत व हिंसक ड्रम माफीया होता. त्याला 23 वर्षांपूर्वी एका चकमकीत मारण्‍यात आले होते. एका दिवसात करत होता 15 टन कोकिनची तस्करी...
- पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया एक कोलंबियन ड्रग माफीया होता. तो कोकिन या अंमलीपदार्थाचा व्यापार करत होता. 
- पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचे पुस्तक ' द अकाउंट्स स्टोरी' नुसार, तो एका दिवशी 15 टन कोकिनची तस्करी करत होता. 
- 1989 मध्‍ये फोर्ब्स पत्रिकाने एस्कोबारला जगातील 7 व्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्‍ये समावेश केला होता. 
- त्याची खासगी अंदाजित संपत्ती 30 अब्ज डॉलर होते. त्याच्याकडे अनेक लक्झरी बंगले व गाड्या होत्या.
उंदरांनी खाल्ल्या नोटा 
पाब्लोचे भाऊ रॉबर्टोनुसार, त्यावेळी पाब्लोचे वार्षिक नफा 1लार 26 हजार 988 कोटी रुपये होते. त्यावेळी गोदामात ठेवलेली या रक्कमेतील 10 टक्के भाग उंदरांनी खाल्ले होते. किंवा पाणी किंवा इतर कारणांमुळे ते कुजून जात होते. रॉबर्टोनुसार, तो एक लाख 67 हजार प्रत्येक महिन्याला नोटांचे बंडल बांधण्‍यासाठी रबर बँडवर खर्च करत होता; 1986 मध्‍ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात शिरकाव करण्‍याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने देशाला 5.4 अब्जांचे राष्‍ट्रीय कर्ज देण्‍याची इच्छा व्यक्त केली होती.
गरिबांचा तारणहार 
- 1976 मध्‍ये 26 व्या वर्षी पाब्लोने 15 वर्षांच्या मारिया व्हि‍क्टोरियाशी विवाह केला. त्यांना जुआन व मॅन्युएला असे दोन मुल झाली होती. 
- एस्कोबारने 5 हजार एकरात पसरलेले हैसियेंदा नॅपोलेस नावाचे एक आलिशान इस्टेट तयार केले होते. कुटुंब यात राहत होते. 
- यासोबतच त्याने ग्रीकपध्‍दतीचा एक किल्ला बांधण्‍याचा संकल्प केला होता. 
- किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले होते. मात्र त्याचे काम कधीच पूर्ण झाले नाही. 
- त्याची शेती, प्राणीसंग्रहालय आणि किल्ल्याला सरकारने आपल्या ताब्यात घेतले व 1990 मध्‍ये एक कायदा करुन सामान्य लोकांना राहण्‍यासाठी देऊन टाकले. 
- ही संपत्तीला एक थीम पार्कच्या रुपात बदलवण्‍यात आले आहे.











by - दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 11, 2016, 09:51 AM IST

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

इंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग...


इंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग


===

आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच एक अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे. आता इंटरनेट हे केवळ एक करमणुकीचे साधन राहिलेले नसून त्याद्वारे लाखो लोक आज पैसा कमवत आहेत. कित्येक बिसनेस या इंटरनेटच्या भरवश्यावर चालत आहेत. इंटरनेट हा पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. अनेक लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत. अशा लोकांसाठी तर ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

इंटरनेट आता एक ग्लोबल प्लॅटफॉर्म झालंय ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो-करोडो लोकांन्पर्यंत सहज पोहोचू शकता. यामुळे तुमच नेटवर्क मजबूत होतं आणि त्यामुळे तुमच्या बिझनेसला चालना मिळते. ऑनलाईन पैसा कमविण्याच्या सानेक पद्धती आहेत, त्यापैकी काही पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही देखील पैसे कमवू शकता.

१. ई-बुक लिहिणे :






ऑनलाईन पैसे कमविण्यात ई-बुक तुमची मदत करू शकते. आज जगातील कित्येक लेखक याच माध्यमातून पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला लिहिण्याच छंद असेल आणि तुम्हाला हे वटत असेल की ते इतरांना आवडेल तर तुम्हाला ई-बुक नक्की लिहायला हवी.

तुम्ही तुमची ई-बुक अॅमाझॉन किंडल आणि अॅपल आय-ट्युन्स कनेक्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ई-बुक लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्यसाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागत नाही, जो की एका पुस्तकावर होत असतो. तुम्हाला बस तुमची लिहिण्याच्या शैलीवर फोकस करायचा असतो आणि त्यानंतर तुमच्या बुकच्या मार्केटिंगवर. जर हे तुम्हाला जमल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि खूप पैसा कामवाल. सध्यातर लोकं जास्तकरून ई-बुक वाचण्यालाच प्राथमिकता देतात त्यामुळे तुम्हाला काही खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही.

२. ब्लॉगिंग :

 

हा इंटरनेटद्वारे पैसे कमविण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. आजच्या युगात दर दुसरी वव्यक्ती ही स्वतःला ब्लॉगर मानते, कारण त्यांचा इंटरनेटवर ब्लॉग असतो. पण नुसताच ब्लॉग असल्याने काही होत नसत, जर तुम्हाला हे कळाल असेल की त्या ब्लॉगच्या भरवश्यावर तुम्ही जगू शकता आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तरच तुम्ही एक ब्लॉगर आहात. केवळ स्वतःचा एक ब्लॉग असणे याने काहीही साध्य होत नाही, पण जर तुम्ही तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन पटवून दे असाल तरच तुम्ही अॅक्च्युअल ब्लॉगर आहात.

जर तुम्ही तुमच्या ब्लॉग्स मुळे तुमच्या वाचकांना स्वतःच्या ब्लॉगवर येण्याकरिता आकर्षित करू शकत असाल, जर तुम्ही त्यांच्या फायद्याच काही त्यांच्या समोर मांडू शकत असाल तर नक्कीच तुमच्या ब्लॉगद्वारे तुमच एक मोठं नेटवर्क तयार होऊ शकत. यामुळे जाहिरातदरही तुमच्या ब्लॉगवर त्यांच्या जाहिराती देण्यासाठी आकर्षित होतील आणि तुम्ही पैसे कमावू शकाल.

ब्लॉग बनविण्याआधी हे सुनिश्चित करा की तुम्ही तुमच्या ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना तुमच्या ब्लॉग वर रोज खिळवून ठेवू शकाल. कारण हे इंटरनेटच युग आहे इथे दर सेकंदाला वाचक बदलतात.

३. ई-मेल मार्केटिंग :

yoast.com

ई-मेल मार्केटिंग हा तर इंटरनेटवरील व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. ज्या लोकांना ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे, त्यांना ईमेलद्वारे मजबूत नेटवर्किंग उभारण्याचं ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. जर त्यांचे सबस्क्रायबर त्यांच्या व्यवसायात रस घेत असतील आणि ते सक्रियपणे सहभाग घेत असतील, तर त्यांना यशस्वी होण्यासून कोणीही थांबवू शकत नाही.

हो पण हे सुनिश्चित करून घ्याला की तुमचे सबस्क्रायबर डायरेक्टली तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर साईन इन करतील, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल.

४. ऑनलाईन ट्युटोरिअल :

niu.edu

ऑनलाईन ट्युटोरिअल हे घर बसल्या कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले असाल किंवा तुम्ही काही असं करू शकत असाल जे इतरांना शिकायला आवडेल तर तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करू शकता. यामध्ये शालेय अभ्यासक्रम, ब्युटी ट्युटोरिअल, डान्सिंग, फिटनेस आणि बरच काही तुम्ही शिकवू शकता.

५. यूट्युबर :




सध्याच्या पिढीला युट्युबचं जाम वेड लागलंय! प्रत्येकजण युट्युब चा चाहता झालाय…कधी गाणी, कधी फनी विडीओ आणि बरंच काही. त्यासोबतच तुम्ही तुमच्या बॉडीला परफेक्ट कसं बनवू शकता याच्या टिप्स, फिटनेस ट्युटोरिअल, जिम ट्युटोरिअल ज्यामध्ये ते स्वतःची आकर्षक बॉडी दाखवून तुम्ही देखील अशी बॉडी/पर्सनॅलिटी मिळवू शकता हे सांगतात आणि आपण मोठ्या इंटरेस्टने ते बघतो.

तुम्ही एक यूट्युबर बनून खूप पैसे कमवू शकता. बस त्यासाठी तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असण्याची गरज आहे. जर तुम्ही लोकांना काहीतरी इंटरेस्टींग, एन्टरटेनिंग आणि कधी कधी काहीही विचित्र देऊ शकत असाल तर लोकं तुम्हाला वेड्यासारखे फॉलो करतील. (याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’)   
६. अॅफिलीएट मार्केटिंग :






अॅफिलीएट मार्केटिंग ही वेबसाईट बिझनेससाठी देवाहून कमी नाही. एक अॅफिलीएट असणे हा सर्वात लोकप्रिय आणि सोप्या पद्धतीने इंटरनेटवर पैसे कमविण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही भटकायची, काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंटला आणि त्याच्या कामाला सोशली प्रमोट करायचं असतं. ह्या प्रमोशमध्ये वाचकाने किंवा तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्याने खरेदी केली किंवा असलेली कुठलीही कृती केली (कधी सब्स्क्रिप्शन, तर कधी अकाउंट क्रिएशन…काहीही असू शकतं) तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.

ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा एक सोपा, इंटरेस्टिंग आणि सर्वात उत्तम समजला जाणारा मार्ग आहे.



७. फ्रीलान्सर म्हणून काम करणे :

l
इंटरनेटवरून पैसे कमविण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. हे खूप सोप असत, म्हणजे जर तुम्ही एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा रिव्यू चांगल्याप्रकारे देत असाल तर कुठलीही ब्युटी कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्सचे रिव्यू देण्यासाठी विचारू शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे किंवा फ्री प्रोडक्ट्स मिळू शकतात. असच इतर गोष्टींच्या बाबतीतही असत, जर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर असाल तर तुमच्या फोटोसाठी देखील तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात, जर तुम्ही चांगले लेखक असाल तर तुम्हाला फ्रिलान्सर ब्लॉगर किंवा लेखक म्हणून काम करू शकता.

मग इंटरनेटवर उगाचच टाईमपास करण्यापेक्षा जर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर काय हरकत आहे…





















by - https://www.inmarathi.com ..

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

गुंतवणुक म्हणजे काय ? श्रीमंत कसे व्हावे ? पैसा कसा मिळवावा ?...






गुंतवणुक

गुंतवणुक – तुमच्या आजूबाजूला तुम्ही लोकांना श्रीमंत होताना पहिले आहे ? २ मिनिट पोस्ट वाचणे थांबवून त्या लोकांबद्दल तुम्ही विचार करा. ते लोक त्यांची परिस्थिती बदलण्याच्या १ वर्ष आधी काय करत होते ? २ , ३, ५, किंवा १० वर्ष अगोदर काय करत होते ? ते काय वेगळं करत होते ?






केला विचार ?

मला त्या लोकांमध्ये एक फरक दिसून आला. ते योग्य ठिकाणी गुंतवणुक करत होते, तर दुसरे तसं करत नव्हते. आता गुंतवणुक म्हणजे काय बुवा ? गुंतवणुक म्हणजे आज हातातील पैसा अशा जागी लावणे जो भविष्यात वाढून मिळेल. तुम्ही नोकरी, व्यवसाय अथवा नशिबाने श्रीमंत व्हा. पण जर तुम्ही गुंतवणुक नाही केली तर तुम्ही जास्त काळ श्रीमंत राहू शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला काम कराव लागेल.
गुंतवणुक म्हणजे काय ?
उदाहरण क्र.१-

समजा आज सकाळी तुम्हाला जुन्या पॅन्ट मध्ये एक १०० ची नोट सापडली. तुम्हाला आठवल कि अरे ! आपण तर हि नोट आईसक्रिम विकत घ्यायला ठेवली होती. तुम्ही ठरवल कि आज त्या नोटेपासून आईसक्रिम खाणार. तुम्ही दुकानात गेलात, १०० ची नोट दिली आणि आईसक्रिम मागितली. पण तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. कारण मागच्या वर्षी १०० ची असलेली आईसक्रिम आता १०६ ची झाली, महागाईमुळे. मग जर तुम्ही तुमचे पैसे अशा जागी नाही लावले जिथे ते १०० चे १०६ होतील तर तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. जेव्हा तुम्ही १०० चे १०६ होण्यासाठी जो प्रयत्न करता त्याला म्हणतात गुंतवणुक.
उदाहरण क्र. २

समजा एक शेतकरी आहे, त्याने उत्पादन केलेल्या धान्यापैकी काही धान्य त्याने स्वतःसाठी काढून ठेवले. आता हे धान्य गुंतवणुक झाली का ? जर त्याने ते धान्य पेरणी साठी वापरले तर, हो आणि जर त्याने हे धान्य घरी खाण्यासाठी वापरले तर नाही. जमा करणे म्हणजे झाली बचत, खाणे म्हणजे झाला खर्च आणि पेरणे म्हणजे झाली गुंतवणुक. जर तुमचा पैसा वाढत असेल तरच ती गुंतवणुक आहे. कपाटात पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणुक नाही.
आपण गुंतवणुक का करत नाही ?

१. अज्ञान

२. भीती

३. संयमाचा अभाव

या तिन्ही गोष्टी वर काम करण्याचा आपण इथे प्रयत्न करू.
१. अज्ञान
अज्ञान फक्त याचे नाही कि मी गुंतवणुक कशी करू, तर मी गुंतवणुक का करू ?



Source

वरिल तक्ता पाहून आपल्याला असा दिसून येईल कि १९९१ साली गुंतवलेले १०,००० रुपये, २०१५ साला मध्ये म्हणजेच २४ वर्षांनी विविध गुंतवणुकीमध्ये किती झाले.
सोन ७२०००
बँक fd ९९,५३०
पोस्टल td १.०७ लाख
सेन्सेक्स २.३८ लाख


यावरून आपल्याला दिसून येईल कि योग्य गुंतवणुकीचा किती फायदा होतो. गुंतवणुक कुठे करावी हे आपण सविस्तर पुढील येणाऱ्या लेखात पाहूच. आपण सध्या फक्त गुंतवणुकीचे फायदे पाहत आहे. १०,००० कपाटात ठेऊन फक्त १०,००० च राहिले असते आणि महागाईमुळे त्यांची किमत पण कमी झाली असती. पण ते गुंतवले असते तर पहा किती फायदा झाला असता.
२. भीती



भीती कि माझ्याकडे जे पैसे आहे ते पण मी गमवून बसेल. ज्ञान असेल तर भीती नाहीशी होते. भीती वाटत असेल तर गुंतवणुक करू नका आणि भीती वाटते म्हणून तसेच बसून पण राहू नका. ज्ञानार्जन करा. स्वतः शोधा तुम्हाला हि माहिती कुठे मिळेल? शाळेचा पहिला दिवस आठवा. जवळपास सर्वच रडतात, भीतीमुळे कि आपण कोणत्या ठिकाणी आलो ? इथे काय होईल ? आपल्याला काही दुखः मिळेल का इथे ? हे कोण लोक आहेत ? वगैरे वगैरे. म्हणजे पुढे काय होईल याची भीती वाटते. गुंतवणुक करताना पण हीच भीती वाटते. पुढे काय होईल माझ्या पैश्याचं ? पण जस जस आपण शाळेत जात जातो आपली हि भीती हळू हळू नाहीशी होत जाते. कोणी कॉलेज मध्ये जाऊन रडते का ? मग तसेच गुंतवणुक करता करता तुम्ही शिकू लागाल आणि तुमची भीती नाहीशी होईल. भीती वाटते म्हणून सुरूच करणार नाही हे सोडून द्या. लहान सुरवात करा. अश्या रक्कमेने सुरवात करा जी गमावली तरी तुम्हाला फरक पडणार नाही.
विभाजन करणे

आपण गावाला जाताना जसे सर्व पैसे एका bag मध्ये ठेवत नाही. थोडे थोडे पैसे सर्व bag मध्ये ठेवतो जेणेकरून जर bag चोरीला गेली तर फक्त काही पैसे चोरीला जातील. आपण तसच करायच, पैसे थोडे थोडे वेगवेगळ्या जागी गुंतवावे. म्हणजे सुरवातीला तुम्ही काही चूक केली तरी तुमच होणार नुकसान हे कमी असेल. विभाजन केल्यामुळे धोका कमी होतो. पण एवढेही जास्त विभाजन करू नका कि तुम्हाला येणारा परतवावा फार कमी होऊन जाईल.
३. संयमाचा अभाव


गुंतवणूक करणे साध आहे सोप नाही

– वारेन बफे

वारेन बफे यांनी असा का म्हटलं असेल ? कारण गुंतवणुकीचे फायदे आज नाही, अनेक वर्षांनी मिळतात. गुंतवणूक करायला माणसाला शिस्त लागते. आपल्याला शाळेत कधी श्रीमंत कसे व्हावे हा विषय शिकवला का ? मग शाळेतून बाहेर पडल्यावर आपण गुंतवणुकीबद्दल शिकायला काय मेहनत घेतली ? पैसे कसे कमवायचे यासाठी आपण बहुतेक लोक किमान १५ वर्ष तरी शिकलो. पण कमावलेले पैसे कसे गुंतवूण मोठे करावे, ह्याचा किती दिवसांचा अभ्यासक्रम आपण केलाय ?

ब्लॉग मध्ये मी योग्य गुंतवणुक कशी करावी हे शिकत असतानाचा माझा अनुभव सादर करत आहे. फक्त हा ब्लॉग वाचून तुम्ही श्रीमंत होणार नाही. गुंतवणूकदार व्हायला तुम्हाला स्वतःला, स्वतःवर काम कराव लागेल. स्वतः काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. काही चुकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील. ह्या गोष्टी सर्व लोक करू शकतात. पण करत नाही, त्यामुळेच फक्त थोडे लोक श्रीमंत आहेत.

समजा आज तुम्ही २०,००० चे जागी ३०,००० चा tv घेतला तर तुम्हाला वाटेल काय झाल ? फक्त १०,००० च जास्त गेले ना ? पण वारेन बफे असा विचार करत नाही तर ते असा विचार करतात कि, हे १०,००० भविष्यात किती झाले असते? माझ नुकसान तेवढ झाल आहे. म्हणजे आज गमावलेले १०,००० हे भविष्यातील सोन्यात गमावलेले ७२,०००, F.D मध्ये ०.९९ लाख, POST T.D मध्ये १.०७ लाख, तर सेन्सेक्स मध्ये २.३८ लाख आहेत. पैसे खर्च करताना जर का विचार केला कि हे पैसे गुंतवले तर किती मोठे होतील तर फालतू खर्च करणे बंद करणे सोपे होईल.


आपण नको असलेल्या गोष्टी घेतो, आपल्याकडे नसलेल्या पैश्यातून, आपल्याला नको असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी

– विल स्मिथ

हि गोष्ट आपल्याला जर थांबवायची असेल तर आपल्याला हाच विचार करावा लागेल कि आपण जो वायफळ खर्च करतोय त्याची गुंतवणुकीनंतर काय किमत होईल ? गुंतवणूक दारामध्ये काय गुण हवे ? त्यावरील लेख तुम्ही इथे वाचू शकता.
गुंतवणूक करणे आपण कसे शिकू शकतो?

आजच्या माहितीच्या जगात ह्या प्रश्न्याच उत्तर फार सोप आहे. आज सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, जास्त माहिती इंग्लिश मध्ये आहे. पण बरीच माहिती मराठी मध्ये पण आहे. इंग्लिश येत नाही म्हणून कोणी आपल्याला श्रीमंत बनवणार आहे का ? नवीन काय शिकण्याची तयारी असल्याशिवाय आपण श्रीमंत बनू शकत नाही. शिवाय आपल्याकडे शब्दकोश, इंटरनेट आहे. त्यांचा वापर करून आपण बरेच काही शिकू शकतो इच्छा पाहिजे ती स्वताला बदलण्याची. अशे लोक शोधा आजूबाजूला ज्यांना काही माहित आहे, हळू हळू ज्ञानात भर पडत जाईल. वेळ लागेल पण काम केले तर नक्कीच बदल घडून येईल. जेव्हा विद्यार्थी तयार होतो शिक्षक हाजीर होतो- झेन
गुंतवणूक म्हणजे विमा नाही.

गुंतवणूक आपण पैसा वाढवण्याकरिता करतो. विमा आपण काही वाईट झाल तर पैसे मिळावे याकरिता काढतो. अनेक लोक विमा पॉलीसी काढून दोन्ही गोष्टी एकत्र करू पाहतात. पण त्यामुळे ना चांगला विमा मिळतो, ना गुंतवणूक होते. म्हणून समजून घ्या विमा हा गुंतवणूक नाही, विम्याचे काम वाईट वेळी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. विमा काढणे पण आवश्यक आहे, गरज आहे ती, विमा आणि गुंतवणूक योग्य प्रमाणात करण्याची. त्याकरिता त्यांना वेगळ करणे ठीक राहील.
गुंतवणूक आणि जुगार.



दोन्ही गोष्टीमध्ये आपण पैसा लावतो, अधिक पैसा मिळवण्यासाठी. दोन्ही मध्ये पैसा गमावण्याचा धोका असतो, पण दोन्ही मध्ये फरक काय ? गुंतवणूक ज्ञानाच्या आधार केली जाते, जुगार नशिबाने खेलला जातो. गुंतवणुकीमध्ये अभ्यास केला जातो, मी हे केले तर काय होईल ? ते केले तर काय होईल ? किती फायदा होईल ? किती नुकसान होईल ? जेव्हा कमी धोक्या मध्ये जास्त फायदा होत असेल, तेव्हा गुंतवणूक करावी पण जुगार याउलट असतो. जुगारात जास्तीत जास्त धोका घेतला तरच फायदा होतो. जुगारात फक्त नशिबच असते.गुंतवणूक डोक्याने केली जाते, गणित करून. तर जुगार भावनेने खेळला जातो.
गुंतवणूक एक कला.

चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, रंग कोणता वापरायचा, कसा तयार करायचा शिकवतील. पण तुमच चित्र तुम्हालाच काढव लागत, तसेच गुंतवणुकीचे आहे. दुसरे तुम्हाला महत्वाच्या मुलभूत गोष्टी सांगू शकतात. पण गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. फसवणारे लोक तुम्हाला दाखवतात कि पैसा कमावणे फार सोपे , काही काम करायची गरज नाही, चिंता नाही, आरामात पैसा बनेल. पण तस नाही तुम्हाला शिकत रहाव लागेल. लक्ष्य ठेवाव लागेल तुमच्या गुंतवणुकीबद्दल काय सुरु आहे, काय नाही. दुसऱ्यान पैसे कमावले ते आपल्याला दिसते, त्याने काय मेहनत केली, ते पाहणे आवश्यक आहे.


गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यातील फरक.

संपत्ती (Asset) – म्हणजे अशी गोष्ट जेथे पैसा लावून तुमचा पैसा वाढेल.

दायित्व (Liability) – जेथे पैसा लावल्यावर कमी होत जाईल.



वरील चित्र पहा, यात तुम्हाला असे दिसून येईल गरीब जेवढे कमावतो. तेवढे खर्च करतो. काहीच बचत करत नाही. गुंतवणूक नाही.

मध्यमवर्गीय चा पहा, ते काही पैसे वाचवतात, त्यापासून ते दायित्व विकत घेतात. महाग कपडे, घड्याळ, मोबाईल, गाड्या अश्या गोष्टी ज्या पासून पैसा वाढत नाही.

आता श्रीमंतांचे पाहू, श्रीमंत माणूस काय करतो ? तो जागा विकत घेतो, stock घेतो, FD करतो, अश्या गोष्टी विकत घेतो ज्यापासून पैसा वाढत जातो. साहजिकच आहे कि, श्रीमंत पण खर्च करतात, पण त्यांचा खर्च, त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात इतरांशी तुलना करता कमी असतो. गुंतवणूक जास्त असते. असे नसेल तर ते पण काही काळाने गरीब होतील.

गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल ? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? त्यासाठी आज किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
लक्ष्य

प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मुख्य गोष्टी असतात ज्या त्याला कराव्या लागतात.

१. निवृत्ती ची सोय

२. मुलांच लग्न

३. मुलांचे शिक्षण

४. आजारपणाची सोय

५. घर

वरील गोष्टींसाठी तुम्हाला किती पैसे लागतील ते लिहा. हि झाली तुमची आर्थिक उद्दिष्टे. हि पूर्ण करायला तुमच्याकडे किती वेळ आहे ? त्यानुसार प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्ही एक गुंतवणूक केली पाहिजे. याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही या लेखात पाहू शकता.



यशस्वी गुंतवणुकीला वेळ. शिष्ट आणि धैर्य लागते. कोणी एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये.

आपण जेव्हा फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहतो तेव्हा आपण फार जास्त धोका घेतो. त्यामुळे गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. अश्या प्रकारे आपण एक दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत तयार करतो आणि धोका कमी करतो. आपल्या उत्पन्नाचा एक स्त्रीत काही दिवस बंद झाला तर दुसऱ्या स्त्रोताच्या साहाय्याने काही दिवस काढू शकतो. नौकरी करणाऱ्यांना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना नेहमी दबावाखाली जगाव लागेल कि मला कामावरून काढल जाऊ शकते.


गुंतवणुकीची सुरवात कधी करावी ?

जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीचे महत्व कळेल तेव्हापासून. मग तुमच वय काहीही असो. १० किंवा ६० जस जस विज्ञान प्रगती करत आहे, माणसाचा आयुष्य वाढत आहे. कोणालाच माहित नाही आपण किती वर्ष जगू. मग ६० वयाच्या माणसाने पण गुंतवणूक केली पाहिजे आणि १० वर्ष्याच्या पण. मग ह्या दोघानी सारखी गुंतवणूक केली पाहिजे का ? उत्तर आहे, नाही! १० वर्षाच्या मुलाकडे खूप वेळ आहे. तो जास्त धोका पत्करू शकतो, आणि ६० वर्षाचा माणूस कमी. म्हणून गुंतवणूक सर्वांनी करावी. पण आपल्या वयानुसार धोका पत्करून. समजा तुमचे वय x आहे तर तुम्ही (१००-x) एवढी गुंतवणूक equity मध्ये केली पाहिजे, equity म्हणजे काय, ते आपण पुढील येणाऱ्या लेखांमध्ये पाहूच. साध्या भाषेत म्हटलं तर अशी गुंतवणूक ज्यात इतरांपेक्षा जास्त धोका आहे.
गुंतवणूक ? छे ! मी तर तरुण आहे.

५ वर्ष उशिरा गुंतवणूक म्हणजे ५७ लाखांचं नुकसान.

२,००० दरमहा ३० वर्ष गुंतवणूक केली आणि १५% वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम आहे १ करोड १२ लाख.

२,००० दरमहा २५ वर्ष गुंतवणूक केली आणि १५ % वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम आहे ५५ लाख.

म्हणजे ५ वर्षांत ५७ लाखांचे नुकसान.

म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर माहिती हवी आहे ? आमचा हा लेख वाचा.

म्युच्युअल फंड बाजार जोखिमेच्या अधीन आहेत, योजनेसंबंधी सर्व दस्तावेज वाचून गुंतवणूक करावी.
महिला आणि गुंतवणूक

गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, दुरचा विचार करणे आणि संयम राखणे. ह्या दोन गोष्टी महिलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे त्या चांगल्या गुंतवणूकदार होवू शकतात. पण याउलट चित्र आपल्याला आपल्या समाजात दिसून येते. महिलांना गुंतवणूकीचे निर्णय घेताना जास्त प्राधान्य दिल्या जात नाही.


जर तुम्ही एका माणसाला शिकवलं तर तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, जर तुम्ही एका स्त्रीला शिकवला तर तुम्ही पूर्ण घराला शिकवता

– रुडी मानिकन


पैशांचे चांगले व्यवस्थापक कोण ?

स्त्री (42%, 45 Votes)

लिंगाचा फरक पडत नाही (35%, 38 Votes)

पुरुष (23%, 25 Votes)


Total Voters: 108

Fidelity च्या सर्वेक्षणानुसार, महिला पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पैशाचं व्यवस्थापन करतात. महिला उद्देशानुसार गुंतवणूक करतात. कमी धोका घेतात. संयम राखतात.
गुंतवणूकदाराच काम भविष्याला आज पाहणे आहे.

गुंतवणूक करताना तुम्हाल फार हुशार असायची गरज नाही. बस सामन्य ज्ञान असले, साधे गणित आले, व्यवसाय समजता आला झाले. सर्वात जास्त महत्त्वाची कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ? संयम . व्यापारात अनेक उतार चढाव येतात, म्हणून नुकसान हे अल्पकालीन आहे कि दीर्घकालीन ? हा विचार करावा, आणि त्या नुसार निर्णय घ्यावे. संयमाचा अर्थ काहीच करू नये असा नसून, संयमाचा अर्थ आहे कि फार कमी वेळा तुमचा निर्णय बदलणे.

बस ची मासिक पास काढली ना तुम्ही ? त्यात कस असते कि तुम्हाला ३० वेळा प्रवास करता येईल. तस समजा कि एक गुंतवणुकीचा पास भेटला आहे. त्याचावापर जीवनात तुम्ही फक्त २० वेळा वापरू शकता. तुम्ही जीवनात २० च गुंतवणूक करणार आहात. असे का ? तर यामुळे तुम्ही फार कमी निर्णय घ्याल. कमी निर्णय घ्याल तर तुम्हाला विचार करायला जास्त वेळ मिळेल. जास्त वेळ मिळाला तर, तुमचा तो निर्णय बरोबर असण्याची शक्यता फार जास्त असते. कारण तुम्ही वेळ देऊन, संशोधन करून निर्णय घेतला आहे.
नाही म्हणणे.

गुंतवणूकदाराला ‘हो’ पेक्षा ‘नाहीच’ जास्त वेळा बोलावं लागतं. कारण चांगल्या गुंतवणुकीच्या संधी फार कमी उपलब्ध असतात. महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील, तर महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणावेच लागेल. तुमचा वेळ हा कसा ? कुठे ? व्यतीत व्हावा हे तुम्ही ठरवल पाहिजे. तसेच तुमचा पैसा कुठे गुंतवला जाईल ? हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. नाही म्हणायला शिका. उधार द्यायला आणि घ्यायला पण, नाही म्हणायला शिका. उधार दिल्यामुळे पैसा आणि नाते कसे खराब होतात ? आणि द्यायचेच असल्यास आधी काय विचार करावा ? याचे वर्णन, खालील पुस्तकात केले आहे.



तुम्हाला नेहमी गर्दीच्या दूर राहावे लागेल. जे सर्वच करतात ते करून, पैसे बनत नाही. इतर करत आहेत त्यापेक्षा वेगळं केल नाही, तर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे बनवू शकणार नाही.

तुम्ही काय करताय ? हे जेव्हा तुम्हाला माहीत नसतं, तेव्हा ते धोकादायक असत. निवडक गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला तर धोका कमी करता येतो. लक्ष्य केंद्रित करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींना नाही म्हणावेच लागेल.


समजा तुम्हाला एक कार विकत घ्यायची आहे. जीवन भर तुम्हाला फक्त हीच कार चालवायची आहे.कोणत्या कंपनीची कार घ्यायची ? कोणत्या रंगाची? कोणते इंजिन? असे हजारो प्रश्न तुमच्या मनात येतील. तुम्ही त्या कार ची काळजी घ्याल. काळजी पूर्वक चालवणार. ऑईल देणार. आता आपल्या जीवनाकडे पहा आपल्याला फक्त एक शरीर आणि एक मन मिळाल आहे. तेेही पूर्ण जीवन भरासाठी एकच.

– वारेन बफे

सर्वात मोठी गुंतवणूक जी तुम्ही करू शकता ती स्वतःच्या ज्ञानातच.











गुंतवणुकीचे प्रकार कोणते असतात ? 

आपण कोणता निवडावा ? 

गुंतवणूक कुठे व कशी ?




गुंतवणुकीचे प्रकार बरेच आहेत. सध्या आपण त्यात मुख्य फरक काय ते पाहूया. प्रत्येक गुंतवणुकीबद्दल सविस्तर माहिती पुढील येणाऱ्या लेखात पाहू. म्युच्युअल फंड, शेयर मार्केट बद्दल मला इतर गुंतवणुकीच्या प्रकारांपेक्षा जास्त माहिती असल्यामुळे, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलेन.
पहिल्या लेखात गुंतवणूक म्हणजे काय ? ते पाहिले. दुसऱ्या लेखात गुंतवणूकदार म्हणजे काय ?  ते पाहिले. आता गुंतवणुकीचे प्रकार पाहूया. बहुतेक लोकांना माहित असलेले गुंतवणुकीचे प्रकार म्हणजे
गुंतवणुकीचे प्रकार

१. जमीन

२. सोन

३. व्यवसाय

४. FD (मुदत ठेव)

तर आपले काम आहे कि आपल्या उद्देशानुसार योग्य गुंतवणूक निवडणे. क्रिकेटचा संघ जसा निवडतांना वेगवेगळे खेळाडू त्यांच्या कौशल्यानुसार आपण निवडतो. तसे करताना आपण खेळपट्टी कश्या प्रकारची आहे, सामना कोणत्या संघाशी आहे ह्या गोष्टींचा विचार करतो. तसाच विचार गुंतवणूक करताना आपल्याला करावा लागतो. योग्य गुंतवणूक कशी करावी समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यामधील फरक आधी समजून घ्यावा लागेल.
अस्थिरता ( Volatility)

अस्थिरता म्हणजे काय ? ती का येते ?

गुंतवणुकीचे प्रकार समजण्यासाठी आधी अस्थिरता काय असते ते समजणे फारच आवश्यक आहे.

समजा तुम्ही जमीन विकत घेतली आहे, अशी बातमी आली कि तिथून आता फार मोठा राष्ट्रीय मार्ग तयार होणार आहे. आता जमिनीच्या किमती लगेच वाढू लागतील.

पण एक वर्षात सरकार बदलले. नवीन सरकार आले. त्या सरकारने ठरवले हा चुकीचा मार्ग आहे, राष्ट्रीय मार्ग दुसऱ्या गावाने जायला हवा, आता काय होईल ?

अस्थिरता

वरील चित्र पाहिले ? किमती मध्ये होणारा बदल, हि झाली अस्थिरता. अस्थिरता येणाचे कारण अपेक्षेविरुद्ध काही घडणे.

आता समजा तुम्ही A वर जमीन विकत घेतली. आज D वर, तुम्ही गुंतविलेल्या रक्कमेपेक्षा जमिनीची किमत जास्त आहे. कारण तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे. पण समजा तुम्ही गुंतवणूक B आणि C च्या मधे कुठे पण केली असती. तर आज तुम्हाला नुकसान पण होऊ शकले असते. साधारण लोक काय करतात ? सर्वाना बातमी माहिती झाल्यावर विकत घ्यायला सुरु करतात. पण तेव्हा उशीर झालेला असतो. बातमी सर्वांना कळल्यामुळे त्या गोष्टीची किंमत आता फार वाढली असते. दिर्घकाळाकरिता गुंतवणूक केली नाही तर अस्थिरतेच्या लाटे मध्ये आपण हरवू शकतो. C वर गुंतवणूक करून तुम्ही D येथे फार मोठे नुकसान सहन कराल. अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये हे शक्य आहे.

वरील चित्र हे फक्त उदाराहणं दाखल आहे. जमिनीचे भाव नेहमी एवढे बदलतात असे नाही. हो पण शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये ते नक्कीच एवढे बदलतात.

आपण शेयर मार्केट मध्ये किती अस्थिरता असते ते पाहूया.



१ दिवसाचा तक्ता



१ महिन्याचा तक्ता



१ वर्षाचा तक्ता



१० वर्षांचा तक्ता

FD मध्ये तुम्हाला इतकी अस्थिरता दिसून येणार नाही. याचा अर्थ हा आहे कि काही गुंतवणुकीचे प्रकार मध्ये अस्थिरता जास्त असते काही गुंतवणुकीचे प्रकार मध्ये अस्थिरता कमी. पण आपण जर दिर्घकालाकरिता गुंतवणूक केली तर आपण अस्थिरता फार कमी करू शकतो.

तर आपल्याला असे दिसून येईल कि आपण गुंतवणूक कधी करतो यावर आपला परतावा अवलंबून आहे. आणि आपल्याला असे दिसून येईल कि दिर्घकालामध्ये अस्थिरता हि फार कमी असते. मागचे जमिनीचे उदहरण पाहू. लघुअवधित जागेची किमत फार बदलली. पण येणाऱ्या १०-१५ वर्षात त्या जागेवर चांगला मार्ग हा होणारच. म्हणजे त्याची किंमत वाढेलच. म्हणून आपण दीर्घावधी चा विचार केला पाहिजे. तर आपल्या गुंतवणुकीमधील धोका कमी होऊन जाईल.

वरील तक्त्या प्रमाणे १० वर्षे गुंतवून राहणाऱ्याने पैसे बनवले आहे, पण फक्त १ वर्ष गुंतवून राहणारा पैसे बनवेल कि नाही हे सांगता येत नाही.

गुंतवणूक करताना मुख्य २ घटक विचारात घेतात :

१. धोका (Risk) आणि कालावधी (Time Period)

२. तरलता (Liquidity)
धोका आणि कालावधी

समजा तुमच्याकडे ३० हजार आहेत. आणखी २० हजार तुम्हाला ६ महिन्यांनी मिळणार आहेत. ते मिळाले की, ह्या पैशांनी तुम्ही नवीन गाडी विकत घेणार आहात.

तुम्ही म्हटलं, चला ही ३० हजारांची रक्कम ६ महिने कुठे तरी गुंतवूया. आता तुम्ही ही रक्कम जास्त अस्थिरता असणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये लावली तर ३० हजार कमी पण होऊ शकतात. अशावेळी शेयर मार्केट किंवा Equity म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य पर्याय नाही. अल्पवधीमध्ये FD किंवा डेब्ट म्युच्युअल फंड हा पर्याय योग्य राहील.

याउलट समजा, तुम्ही तारुण्यामध्येच स्वतःच्या निवृत्ती साठी गुंतवणूक करत आहात. आता तुमचा गुंतवणुकीचा कालावधी फार मोठा आहे. अशा वेळी तुम्ही जास्त अस्थिरता असलेल्या, म्हणजेच जास्त धोका असलेल्या गुंतवणुकी मध्ये पैसे लावू शकता. या परिस्थितीत FD किंवा डेब्ट म्युच्युअल फंड योग्य पर्याय असणार नाही. दिर्घवधीसाठी शेयर मार्केट किंवा equity म्युच्युअल फंड हा पर्याय योग्य राहील.

दिर्घअवधी मध्ये आपण जास्त अस्थिरता असलेल्या प्रकारांमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. कारण आपल्याकडे वेळ भरपूर असतो. त्यामुळे अल्पकालावधी मध्ये अस्थिरतेमुळे जर आपली रक्कम कमी जरी झाली, तरी आपण ती काढणार नसल्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. अशावेळी संयमाने आपण गुंतवून राहिल्यास अपल्याला चांगला परतावा मिळेल. FD मध्ये तुम्हाला जवळपास तेवढाच परतावा मिळेल जेवढी महागाई आहे. जास्त अस्थिरता असलेल्या गुंतवणूक मध्ये जास्त परतावा आणि जास्त धोका असतो.

पण बहुतेक लोकांना लवकरात लवकर पैसा हवा असतो. मग ते अस्थिर जागी अल्पकाळासाठी गुंतवणूक करतात. मग पैसा गमवून बसले का गुंतवणुकीला दोष देत राहतात. गुंतवणुकीला दोष देऊन काही फायदा नाही. चूक आपली आहे. आपण आपल्या उद्देशानुसार गुंतवणूक निवडली नाहीये. त्यामुळे नुकसान झाले.

१ दिवस ते अनंतकाळाकरिता गुंतवणुकीचे प्रकार उपलब्ध आहेत. आपली गरज ओळखून तो निवडावा.

अल्पकालावधी मध्ये पैसे टिकवणे आणि दिर्घकालावधी मध्ये पैसे वाढवणे हा उद्देश असला पाहिजे.

सोपे सूत्र –

अल्पावधी – अस्थिरता कमी – धोका कमी – परतावा कमी

दिर्घअवधी – अस्थिरता जास्त – धोका जास्त – परतावा जास्त
तरलता

तुम्ही १० लाखाचे घर घेतले. पण आजारपणामुळे तुम्हाला १ लाखाची गरज आहे. मग अश्या वेळी काय करणार ? आपल्या घराचा एक छोटा भाग तर आपण विकू शकत नाही ना ? त्याचे दरवाजे खिडक्या काढून विकू शकतो का ? आणि तुम्ही विकायला तयार जरी असाल तरी वेळेवर घेणारा तुम्हाला भेटेल कुठे ? म्हणून गुंतवणूक करताना तुम्हाला विचार करावा लागेल कि किती सहजपणे तुम्ही हि गुंतवणूक विकू शकता. समजा लवकरच तुमच्या घरी लग्न असेल, त्यासाठी असलेले पैसे तुम्ही घर, जमीन मध्ये गुंतवू शकत नाही. आणि तुम्हाला जर त्या पैश्याचे १५-२० वर्ष काम नसेल तर तुम्ही ते जमीन किंवा घर मध्ये गुंतवू शकता.

सर्वात तरल संपत्ती म्हणजे रोख रक्कम. त्याला विकण्याची गरज नाही. आपण सरळ त्याची देवाण घेवाण करू शकतो. त्यानंतर थोडी कमी तरलता असलेली गोष्ट म्हणजे FD. ती काढण्याकरिता तुम्हाला बँकेच्या वेळेत जावे लागेल किंवा तुम्हाला इंटरनेट बँकिंग आली तर लगेच FD तुमच्या खात्यात जमा होईल. त्याच समान पातळीवर असलेली दुसरी गुंतवणूक म्हणजे Liquid Mutual Fund. त्या मध्ये पण हि सुविधा आपल्याला मिळते. आणि जवळपास सारखाच धोका असतो.

घरातील सामान विकणे किंवा घर विकणे हे फार कठीण काम आहे. घर विकायला वेळ लागतो. त्यामुळे हि गुंतवणूक फारच कमी तरल आहे.
गुंतवणुकीचे प्रकार

गुंतवणूक कशात करावी, हे ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते आपण पहिले. आता गुंतवणुकीचे प्रकार पाहूया.
बाँड

जेव्हा एखादी कंपनी किंवा सरकार तुम्हाला म्हणते कि तुम्ही आम्हाला x रु द्या. त्या बदल्यात ठराविक कालावधीने आम्ही तुम्हाला x+y एवढी रक्कम देऊ त्याला म्हणतात बाँड. बाँड म्हणजे एका प्रकारे कंपनी किंवा सरकारला दिलेले कर्ज च होय. तुम्ही बाँड एका प्रकारची fd समजू शकता.

सरकारी बाँड मध्ये धोका कमी असतो. कारण त्यात सरकार पैश्यांची हमी घेते. कंपनी बाँड मध्ये धोका थोडा जास्त असतो.

बाँड मध्ये गुंतवण्याचा एक धोका असा असतो, कि तुम्ही फार दीर्घकाळासाठी आधीच किती व्याज मिळणार हे ठरवलं आहे. समजा तुम्ही २० वर्षांआधी ठरवल आहे कि तुम्हाला बाँड वर ७% ने परतावा मिळेल पण आजची परिस्थिती पाहता महागाई पण ६% आहे. तर अश्यावेळी तुम्हाला जी रक्कम २० वर्षांआधी फार मोठी वाटत होती ती आजच्या तुलनेत कमी वाटेल. याउलट पण होऊ शकते. जसे आजच्या परिस्थिती मध्ये लोकांना ६ % परतावा मिळतोय पण काही वर्षाआधी ज्यांनी बाँड १० % घेतला आहे त्यांना आज पण १०% नि व्याज मिळतोय.याचाच अर्थ असा कि बाँड मधील गुंतवणुकी मध्ये व्याज दराचा धोका असतो.
शेयर

शेयर म्हणजे व्यवसायाचा भागीदार होणे. जितके तुमच्याकडे जास्त शेयर, तेवढे मोठे तुम्ही कंपनीचे मालक.

आता तुम्ही शेयर घेता म्हणजे ते पैसे व्यवसायात लावता. व्यवसाय चालेल की नाही ? किती चालेल ? हे आपण निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला किती परतावा मिळेल हे पण निश्चित नसते. त्यामुळे शेयर घेणे फार धोकादायक आहे. मग शेयर का विकत घ्यावे ? कारण चांगल्या व्यवसायात आपल्या पैश्याला चांगला परतावा मिळतो. आज अनेक भारतीय कंपनी युरोप, अमेरिका येथील व्यवसाय विकत घेत आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की चांगल्या व्यवसायात किती वाढ होऊ शकते.

व्यवसायात अनेक गोष्टी पटापट बदलत असल्यामुळे आणि शेयर ची विक्री करणे फार सहज असल्यामुळे अस्थिरता जास्त असते.
म्युच्युअल फंड

अनेक लोकांकडून पैसा जमा करून तज्ञाकडून तो गुंतवणे, याला म्हणतात म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड बऱ्याच प्रकारचे असतात. आपल्याला उद्देशानुसार म्युच्युअल फंडनिवडणे आपले काम असते. हे आपण स्वतः करू शकतो किंवा वितरकाची मदत घेऊ शकतो, वितरकाची मदत हवी असल्यास येथे क्लीक करा.

जी कंपनी म्युच्युअल फंड चे काम सांभाळते तिने चुकीचे जागी गुंतवणूक केली तर नुकसान होवू शकते. त्याकरिता वेगवेगळ्या कंपनी मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते. पण शेवटी म्युच्युअल फंड गुंतवणूक कुठे करतोय यावर परतावा अवलंबून असतो. म्युच्युअल फंड मध्ये आपण जी गुंतवणूक केली आहे, यात मार्केट रिस्क असते. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळतील हे निश्चित नसून, त्या वेळी मार्केट मध्ये तुम्हाला किती मूल्य मिळते, यावर अवलंबून असते. म्युच्युअल फंड हे १ दिवस ते अनंतकाळ पर्यंत कालावधी साठी आपण वापरू शकतो. फक्त आपल्याला आपल्या गरजेनुसार योजना निवडणे आवश्यक आहे.

FD (मुदत ठेव)

बँकेत ठराविक कालावधी साठी आपण पैसे जमा करतो. आणि तेव्हाच आपल्याला माहित असत, कि आपल्याला किती परतावा मिळेल हा पर्याय सर्वाना परिचित आहे. बहुतेक लोक, हाच पर्याय निवडतात. कारण यात किती रक्कम निश्चित मिळेल याची हमी असते. जास्त अस्थिरता नसते. जेवढे ठरले तेवढेच पैसे मिळतात. ना कमी ना जास्त. गुंतवणूक या लेखात आपण आईस्क्रीम चे उदाहरण पाहिले होते. १०० ची आईस्क्रीम एक वर्षाने १०६ ची झाली. आपण fd केली तर ६% ने आपल्याला वाढलेली रक्कम मिळेल. पण आईस्क्रीम सोबत चॉकलेट घेता येईल का ? त्या साठी तुम्हाला १५% परतावा लागेल. म्हणजे fd फक्त तुम्हाला महागाई वाढतेय तेवढी तुमची संपत्ती वाढवायला मदत करेल. पण महागाईला हरवून संपत्ती वाढवण्यात अपयशी ठरेल. याचाच अर्थ हा कि fd मध्ये पैसे लावून तुम्ही फक्त तुमच्या पैश्याचं मूल्य कमी होण्यापासून वाचवू शकता. त्यापासून संपत्ती निर्माण करू शकत नाही. fd अल्पकालावधी च्या गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही ठराविक वेळेआधी fd मोडली तर तुम्हाला फक्त सेविंग बँक च्या व्याजदराने पैसे मिळतात, fd च्या नाही.

FD पूर्णपणे सुरक्षित आहे, हा एक भ्रम आहे.

DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) हि RBI ची उपकंपनी आहे. DICGC चे काम आहे सर्व बँक मध्ये जमा असलेल्या रक्कमेचा विमा काढणे. हि संस्था फक्त १ लाखापर्यंत विमा काढते. समजा तुमचे खात x बँक मध्ये आहे, त्यात तुमचे ५ लाख आहे. जर ती बँक दिवाळखोर झाली, तर तुम्हाला फक्त १ लाख मिळतील. पण समजा तुमचे २ बँकेत ५ -५ लाख आहेत. आणि दोन्ही बँका दिवाळखोर झाल्या तर तुम्हाला प्रत्येक बँकेचा १ लाख चा विमा मिळेल. असे तुम्हाला फक्त २ लाख मिळतील. तुमचे १० लाखाची fd असली तरीही. बँक दिवाळखोर होणे हि काही सोपी गोष्ट नाही. म्हणून आपण fd ला सुरक्षित गुंतवणुकीचे प्रकार समजतो. पण बँक दिवाळखोर होणारच नाही, हि शक्यता नाकारता येत नाही. इथे सांगण्याचा उद्देश फक्त हाच कि, प्रत्येक गुंतवणुकीमध्ये धोका असतो. फक्त तो कमी जास्त प्रमाणात असतो. पण धोका असतोच. सर्वच बँक DICGC अंतर्गत विमा केलेल्या नाहीत. तुमची आहे का ? तुम्ही येथे तपासू शकता.
कला, इतर संग्रहात्मक वस्तू

मुद्रांक, नाणी, चित्रकला, प्राचीन वस्तू यासारख्या गोष्टींमध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. फक्त आपल्याला त्यांची अचूक किंमत ओळखता आली पाहिजे. त्यांना अनेक वर्ष जपून ठेवता आले पाहिजे. अश्या गोष्टी चोरीला जाण्याची भीती असते. सोबतच नैसर्गिक आपदा वगेरे मध्ये अश्या गुंतवणूक आपण गमवू शकतो.
सोनं

आपल्याकडे अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. विशेष करून महिलांना. कारण सोने आभूषण म्हणून पण आपण वापरू शकतो.

भावनिकरीत्या विचार केला तर ते ठीक आहे. पण आपण मागील गुंतवणूक या लेखात पहिले आहे. सोन्यात गुंतवलेले १० हजार १५ वर्ष्यात ७२ हजार झाले. तर शेयर मार्केट ला तेच १० हजार २.३८ लाख झाले असते आणि म्युच्युअल फंड ला त्याहीपेक्षा जास्त. त्यामुळे शेयर मार्केट मध्ये सरळ किंवा म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक करणे दिर्घ कालावधी साठी सोन्यापेक्षा चांगले आहे.

शिवाय सोन्याचे दागिने बनवताना व विकताना आपल्याला मजुरी द्यावी लागते. त्यामुळे सोन्याची किमत अजून कमी होते. सोने चोरीला जाऊ शकते, त्यासाठी तुमच्या घरी दरोडा पडू शकतो. तुमच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.

जे सोन तुम्ही विकत घेता ते तुमच्या घरी कपाटात पडून राहते. त्याचा समाजाला काही जास्त फायदा होत नाही. पण व्यवसायात लावलेले पैसे अनेकांना रोजगार देतात. त्याचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशात सोने हे इतर राष्ट्रांकडून येत. त्यामुळे आपल्या देशाचा पैसा बाहेर जातो.
यावर उपाय काय ?

सोने घेताना आपण खालील पर्यायाचा विचार करू शकतो.

१. गोल्ड सोवेरिअन बॉंड ( Gold Sovereign Bond)

२. गोल्ड ETF

१. गोल्ड सोवेरिअन बाँड

भारत सरकारतर्फे गोल्ड बॉंड सुरु करण्यात आले आहे. त्यात तुम्हाला दरवर्षी २.५ % दराने व्याज मिळतो. तुम्ही सोन विकत न घेता त्याच प्रमाणपत्र घेता. ८ वर्ष्याने तुम्हाला तेव्हा असलेली सोन्याची रक्कम अधिक दरवर्षी २.५ % व्याज मिळेल. त्यामुळे तुम्हाला दागिने बनवताना, विकताना लागणारा खर्च येणार नाही. तुमच सोने चोरीला जाणार नाही. आणि तुमची सोन्यात गुंतवणूक होवून तुम्हाला अधिक दरवर्षी २.५ % व्याज पण मिळेल.

२. गोल्ड ETF (Exchange Traded Fund)

हे फंड stock exchange वर विकता येतात किंवा विकत घेता येतात. म्हणून त्यांना exchange traded fund म्हणतात. यात पण तुमहाला प्रमाणपत्र मिळते. खरे सोने ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे ते चोरीला जाने किंवा हलक्या दर्ज्याच सोन तुम्हाला मिळण्याचा धोका नाही. जेवढ सोन तुम्हाला घ्यायाचा तेवढे रुपये च गोल्ड etf युनिट तुम्ही घेऊ शकता.
जमीन

जमीन घेताना सर्वात मोठी समस्या हि आहे कि, आपल्याला गुंतवणूक करायला फार मोठी रक्कम लागते. बहुतेकजण जर पूर्ण जीवनात फक्त एकच घर किंवा जमीन घेऊ शकतात. म्युच्युअल फंड मध्ये आपण ५०० दरमहा पण गुंतवणूक करू शकतो. पण जमीन, घर घेताना तसे नाही. पण जमीन घेण्याचा फायदा हा आहे कि तुम्ही त्यात जास्त काळ गुंतवून राहता. जमिनीचे दर तुम्हाला रोज कळत नाही. तसेच जमीन विकणे सहज काम नाही. त्यामुळे तुम्ही भावनिक निर्णय घेत नाही. घर, जमीन यामध्ये दीर्घ कालीन गुंतवणूक केल्यामुळे त्यात फायदा होतो. पण जमीन घेताना पण तुम्हाला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. कुठेही जमीन घेतली तर त्याची रक्कम फार चांगली वाढेल असे नाही. कुठे जमीन घ्यावी हा पण सविस्तर अभ्यासाचा विषय आहे.
TAX (कर)

गुंतवणुकीचा पर्याय निवडताना ह्या घटकाचा देखील विचार केला पाहिजे. प्रत्येक गुंतवणुकीमध्ये वेगवेगळे कर असतात. वेगवेगळे lock in period असतात. lock in period म्हणजे असा कालावधी ज्यात तुम्ही पैसे काढू शकत नाही किंवा काढले तर तुम्हाला काही भुर्दंड भरावा लागेल. Tax मध्ये २ मुख्य प्रकार आहेत:

१. STCGT ( SHORT TERM CAPITAL GAIN TAX) अल्पकालावधीसाठी

२. LTCGT (LONG TERM CAPITAL GAIN TAX) दिर्घकालावधीसाठी

प्रत्येक गुंतवणुकीचे प्रकार मध्ये कालावधीची मर्यादा वेगवेगळी असते. आपण संपत्ती विकून जो नफा कमावतो, त्यावर हा कर लागतो. शेयर मार्केट मध्ये STCGT चा कालावधी एक वर्ष असतो, तर जमीन, घर साठी ३ वर्ष. तसेच तो किती प्रमाणात लागेल हे पण गुंतवणुकीचे पर्याय वर अवलंबून असते. शेयर मार्केट मध्ये १ वर्ष्यानंतर आणि घर,जमीन मध्ये ३ वर्षांनंतर LTCGT लागतो, शेयर मार्केट मध्ये याच प्रमाण ० % आहे. म्हणजे १ वर्षानंतर तुम्ही मिळवलेल्या नफ्यावार कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. याबद्दल सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील लेखांमध्ये पाहू.
INCOME TAX (उत्पन्न कर )

सरकारी अनेक योजना मध्ये आपल्याला उत्पन्नाच्या करत सूट मिळते. पण lock-in period गुंतवणुकीचे पर्याय साठी वेग वेगळा असतो.
गुंतवणुकीचे पर्याय LOCK-IN PERIOD
NSC, BANK FD ५ वर्षे
ELSS ३ वर्षे
NPS निवृत्ती
SCSV ५ वर्षे
INSURANCE पॉलिसी कालावधी
SUKANYA SY १८ वर्ष मुलीच वय
PPF १५ वर्षे



कालावधी गुंतवणुकीचे प्रकार
१-१५ दिवस ULTRA SHORT TERM DEBT FUND. LIQUID FUND, SAVING ACCOUNT
15 दिवस – 1 महिना SHORT TERM DEBT FUND, LIQUID FUND, FD
१ महिना – १ वर्ष DEBT FUND , FD
१ – ३ वर्ष BALANCED FUND, FD
३-७ वर्ष DIVERSIFIED EQUITY FUND
७ वर्ष पुढे EQUITY FUND, जमीन व्यवसाय


जीवनात आपल्याला फक्त गुंतवणुकीचा एकच प्रकार वापरून काम होत नाही. वेगवेगळे प्रकार आपल्याला जीवनात आवशक्यतेनुसार वापरावे लागतात. निवड करताना नीट विचार करून निर्णय घ्या.















by - http://www.guntavnuk.com/

माझ्याबद्दल