शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

असे असतील भविष्यातील स्मार्टफोन । future smartphone introduction


 
प्रोजेक्ट गूगल अरा

भविष्यातील स्मार्टफोन

भविष्यातील स्मार्टफोन कसा असेल कधी केला आहे का विचार तुम्ही. मोबाईल किंवा स्मार्टफोन्स मध्ये नेहमी बद्दल होत आहेत. मागील 10 वर्षात मोबाईल ने केलेला ब्लॅक अँड व्हाइट ते टचस्क्रीन पर्यंत चा वेगवान प्रवास तर आपण बघितलेलंच आहे. साध्याची लाईफ स्टाईल आणि मोबाईल मध्ये सर्व काही हवे किंवा सर्व काही कॉम्प्युटर ची कामे करता यावी ही लोकांची मानसीकता बनत चालली आहे.
या मुळे स्मार्टफोन कंपनी नी देखील तसेच मोबाईल बाजारात आणायला सुरुवात केली. जसे अगोदर कॉम्प्युटर मध्ये 4 GB रॅम खूप वाटायचं पण सध्या 6 GB रॅम असलेले स्मार्टफोन बाजारात आले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आजच्या स्मार्टफोन मध्ये आपण जवळपास 106 वेगवेगळ्या यंत्रांची कामे करू शकतो जसे रेडिओ, टॉर्च, जीपीएस इत्यादी. या सोबत काही अशक्य वाटणारे टेक्नॉलॉजी ही आज बाजारात अली आहे जशी वायरलेस चार्जिंग ई.
अश्या या स्मार्टफोन जगतात पुढील 5 किंवा 10 वर्षात काय काय नवीन तंत्रज्ञान येईल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? या तर अश्याच काही भन्नाट कल्पना बघूया ज्या लवकरात लवकर तुमच्या स्मार्टफोन मध्ये येऊ शकतील.

4. मॉड्युलर स्मार्टफोन्स (modular smartphone)

भविष्यातील स्मार्टफोन मध्ये एक भन्नाट  कल्पना म्हणजे मॉड्युलर स्मार्टफोन्स होय. यात मोडुल असतील जे एक मेकांना जोडून स्मार्टफोन तयार होईल. आणि यातला कोणताही मॉड्युल आपल्याला सहज बदलता येईल. उदा. सध्याच्या काही मोबाईल मध्ये मॉड्युल म्हणून बॅटरी ला घेऊ शकतो जो आपण कोणत्याही तज्ञ प्रशिक्षणा शिवाय बदलू शकतो. तसेच भविष्यातल्या स्मार्टफोन्स मध्ये सर्व काही मॉड्युलर असेल जसे की कॅमेरा, डिस्प्ले, प्रोसेसर, रॅम इत्यादी.
प्रोजेक्ट गूगल अरा
या फोन चा प्रमुख फायदा म्हणजे, सध्या आपण जास्ती रॅमसाठी किंवा चांगल्या कॅमेऱ्या साठी सरळ नवीन फोनच घेतो. पण मॉड्युलर फोन्स आल्यानंतर आपण फक्त कॅमराचा किंवा रमचा मॉड्युल खरेदी करू. आणि जर फोन पडला आणि डिस्प्ले किंवा इतर काही महत्वाचा पार्ट डॅमेज झाला तर तेवढाच बदलू शकतो. आहे ना भारी कल्पना.
मॉड्युलर फोन ची कल्पना सत्यात येण्यासाठी अवकाश आहे असे  जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. Moto X नावाचा स्मार्टफोन अगोदरच बाजारात आला आहे. ज्यात तुम्ही उत्तम कॅमेरा, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टम इत्यादी मॉड्युल वरून लावू शकता.
मोटो x मॉड्युलर स्मार्टफोन
गुगल ने देखील प्रोजेक्ट Ara (आरा) नावाने मॉड्युलर फोन्स वर काम करत आहे. पण काही तांत्रिक त्रुटींमुळे याला 2017 ऐवजी 2018 मध्ये लॉन्च करायचे गूगल ने ठरवले आहे. हे सर्व बघता मॉड्युलर ही संकल्पना जास्ती दूर नाही हे नक्की.

3. Flexible screen and phone (फ्लेक्सिबल स्क्रीन किंवा आकार कमी जास्ती करता येणारा डिस्प्ले.)

सॅमसंग चा आकार कमीजास्ती करता येणार टॅबलेट
किती बर होईल जर मोठा स्मार्टफोन्स ला घडी करून किशात ठेवले. अगदी असाच काहीसे भविष्यातील स्मार्टफोन मध्ये येऊ शकतो. ज्याचा डिस्प्ले गरजे नुसार लहान किंवा मोठा करता येईल. या वर सॅमसंग सारख्या बड्या कंपनी नी काम करायला सुरुवात केली आहे. सॅमसंग हा रीसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये कोणत्या ही इतर कंपनी च्या तुलनेत अधिक पैसे खर्च करतो. ज्या मुळे आज आपण बघतो जे सॅमसंग ला जमते ते अगदी अप्पल ला देखील जमत नाही जसे गलेक्सी S7 मध्ये असलेला कर्वेड डिस्प्ले.
सॅमसंग चा फोल्डेबल स्मार्टफोन
सॅमसंग ने एक फोल्ड करता येणारा स्मार्टफोन बनवला देखील आहे. जे काही दिवसानी लाँच होणार आहे. आणखी बरेच कंपनी हे फोल्ड न करता स्क्रीन ला कमी जास्ती करता येईल अशा फोन वर काम करत आहेत. या फोनची खूप लोक वाट बघत असतील हे नक्की. करण सर्वाना मोठा डिस्प्ले आवडतो पण त्याला कुठही सोबत घेऊन जाणे खूप अवघड असते. म्हणून लोक लहान फोन वरच समाधान मानतात.

2. Projector smartphone प्रोजेक्टर स्मार्टफोन

ही कल्पना स्मार्टफोन ची व्याख्या बदलण्यास समर्थ आहे. यात एक लहान प्रोजेक्टर असेल जो मोबाईल फोन जे स्क्रीन प्रोजेक्ट म्हणजे दाखवेल अगदी कुठे पण भिंती वर, हाता वर, इतर ठोस ठिकाणी तुम्हाला तुमचा फोन वापरता येईल. हा फोन खूप लहान असेल. वापरण्यास एकदम सोप्पे.
या फोन ची संकल्पना प्रथम मांडली ती आपल्या भारताचा प्रणव मिस्त्री यांनी. प्रणव मिस्त्री यांची ही भन्नाट कल्पना तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.
असेच काही मनगटी घड्याळा सारखे पण स्मार्टफोन बनवण्यावर कंपनी चे भर आहे. कशी वाटली ही कल्पना ? ऐकायला  आणि बघायला चांगले वाटत असेल तरी यात आणखी खूप वेळ लागणार हेच सत्य आहे.
मनगटी प्रोजेक्टर स्मार्टफोन

1. Transparent smartphone पारदर्शक भविष्यातील स्मार्टफोन

दोनही बाजूनी टच करता येईल आणि काचे सारखा आरपार बघता येईल असा पारदर्शक स्मार्टफोन वर खूपच जोरात काम सुरू आहे. स्मार्टफोन चा महत्वाचा आणि सर्वात जास्ती व्यापक भाग हा स्क्रीन चा असतो.  तैवान च्या एक कंपनी ने हा भाग म्हणजे टच स्क्रीन हा  पूर्ण पणे पारदर्शक बनवलेला आहे. आणि ते बाकी सर्व लागणारे पार्टस जसे सिम कार्ड आणि मेमरी कार्ड इत्यादी देखील पारदर्शक बनवत आहेत.
तैवान च्या कंपनी ने बनवलेला पारदर्शक स्मार्टफोन
पण ही टेक्नॉलॉजी,  5g अस्तित्वात आल्यानंतर च शक्य आहे असे वाटत आहे. याचं कारण फोन पारदर्शक करण्याच्या नादात खूप महत्त्वाचे गोष्टी हे वगळल्या जाणार आहेत ते एकदम वेगवान इंटरनेट द्वारे त्यांची पूर्तता होईल म्हणूनच या भन्नाट टेक्नॉलॉजी साठी आणखी काही वेळ वाट बघावी लागणार आहे.



by - http://marathimotivation.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल