गुंतवणुकीमध्ये, संयमाच महत्व काय ? हे जाणण्यासाठी हा लेख वाचा.
श्रीमंत किती वर्षांत ? तुम्हाला किती वर्षांत श्रीमंत व्हायचं आहे ?
आपण खाली एक सर्वेक्षण करूया.
आपण केलेल्या गुंतवणुकीचे चांगले फळ मिळण्याकरिता, साधारणतः आपण, १० वर्ष तरी वाट पाहावी. अनेक लोकांना फटाफट श्रीमंत व्हायच असतं. पण
फटाफट श्रीमंत होण्याकरिता आपल्याला फार जास्त परतावा हवा असतो. तो मिळवण्याकरिता, आपण फार जास्त धोका पत्करतो. त्यामूळे श्रीमंत होणे तर दूर, पण गरीब होण्याची जास्त शक्यता असते. १० वर्ष वाट पाहण्याची फार कमी लोकांची तयारी असते. १० वर्ष, स्वतःवर ताबा ठेवणे, शिस्त ठेवणे सर्वाना जमत नाही.
घर, प्लॉट घेताना त्याची रोज बदलणारी किंमत दिसत नाही. त्यामुळे त्यात १० वर्ष गुंतवून राहणे सोपे असते. तसेच घर, प्लॉट विकणे सहज नाही. त्यामुळेही लोक त्यात जास्त वेळ गुंतवून राहतात.
म्युच्युअल फंड आणि शेयर मध्ये, आपण अनेक वर्षे चांगल्या कंपनी मध्ये गुंतवून राहिलो, तर ते आपल्याला श्रीमंत बनवून जातात. याचे उदाहरण आपण येथे पाहू शकता. एक आजोबांनी आपल्या नातवाला MRF चे २०,००० शेयर गिफ्ट दिले त्यांची किंमत आज जवळपास १३० करोड आहे.
म्युच्युअल फंड आणि शेयर्स मध्ये तुम्हाला वेळोवेळी त्यांच्या कामगिरीची तपासणी करावी लागतेच. पण संयम ठेऊन.
http://www.guntavnuk.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा