बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

गुगलची नोकरी सोडून हा तरुण विकतोय समोसे, कारण याने पाहिले गुगलपेक्षाही मोठे स्वप्न!


-जगातल्या टॉप कंपन्यांत नाव असलेल्या गुगलमध्ये नोकरीचे लाखो तरुणांचे स्वप्न आहे. परंतु असेही काही जण आहेत ज्यांची स्वप्ने गुगलपेक्षाही मोठी असतात. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर गुगलमधील नोकरी या तरुणाला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यापासून थांबवू शकली नाही.
- हा काही सामान्य समोसा नाहीये. यामुळे जिद्दी मुनाफला फोर्ब्जच्या यादीत स्थान मिळाले आहे.


आईला व्यग्र ठेवू इच्छित होता.
-गुगलमध्ये नोकरी करणाऱ्या MBA मुनाफ कपाडिया दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत होता. यादरम्यान त्याची आई नफिसा यांचा बराचसा वेळ टीव्ही पाहण्यात जात होता. आपल्या आईला इतर कशात तरी गुंतवायचे त्याच्या मनाने घेतले आणि या बोहरी किचनचा पाया घातला गेला.
-बोहरी समुदायातील काही व्यंजने खूप रुचकर असतात. उदा. मटण समोसा, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, कढीभात वगैराट इ. आई नफिसा यांच्या हाताची चव माहिती असल्याने मुनाफने येथूनच आपल्या कामाची सुरुवात केली.

अगोदर पारखून घेतली कल्पना...
मुनाफ एमबीए असल्याने त्याने या व्यावसायिक कल्पनेच्या क्षमतेला पारखण्याचा निर्णय घेतला. त्याने ई-मेल, फोन कॉल आणि स्वत: भेटी घेऊन मुलींच्या एका ग्रुपला त्याच्या घरी येण्यासाठी राजी केले. त्यांच्या प्रतिक्रियांवरच मायलेकाने त्यांच्या व्यवसायाचा निर्णय घेतला.

आणि सोडून दिली नोकरी...
- दोघांनी मिळून याचे नाव ठेवले - बोहरी किचन. इकडे नफिसा यांच्या हातच्या जेवणाची कमाल, तर तिकडे मुनाफही प्रचारात सर्वशक्तिनिशी उतरला. एक वेळ अशी आली की मुनाफने गुगलची नोकरी सोडून आपल्या किचनवरच पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

 कोटींचे आहे लक्ष्य
त्याच्या जिद्दीची ही कहाणी इतकी प्रसिद्ध झाली की फोर्ब्स मासिकाने त्याला अंडर 30 अचीव्हर्सच्या यादीत समाविष्ट केले. नफिसा यांच्या पाककृती लोकांच्या खूप पसंतीस उरतल्या आहेत. गतवर्षात त्याने 50 लाखांची उलाढाल केली होती. आणि पुढच्या वर्षात 3 कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. त्याने एका सेंट्रल किचनची योजना बनवली आहे. येथून लोकांना समोसे आणि इतर पाककृती पाठवल्या जातील. इतकेच नव्हे तर मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि कदाचित न्यूयॉर्कमध्येही रेस्तराँ उघडण्याची त्याची योजना आहे.


बाहेर देशातही व्यवसाय विस्ताराची त्याची योजना आहे.







पूर्ण विचाराअंती मुनाफने गुगलची नोकरी सोडली.

मुनाफचे नाव फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

मुनाफ आई नफिसासमवेत.





मुनाफने आईला व्यग्र ठेवण्यासाठी व्यवसाय सुरू केला होता.



मुनाफचे नाव फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

























by - Divya Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल