गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

मि‍स वर्ल्ड’मुळे अमिताभ बच्चन रस्त्यावर येण्याची चिन्हं होती!


amitabh 2बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमुळे फार मोठ नुकसान झालं होतं. इतकंच काय तर त्यांचं नाव डिफॉल्टरच्या यादीतही सामील झालं होतं. बिग बी यांच्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) कंपनीचा सुरुवातीचा बिझनेस अतिशय चांगला सुरु होता. हे यश पाहून बच्चन टीव्ही आणि इतर क्षेत्रात उतरले. यानंतर तर त्यांच्या कंपनीने बंगळुरुमध्ये मिस वर्ल्ड कॉन्टेस्टचं आयोजनही केलं होतं. पण तो सर्वात मोठा फ्लॉप शो ठरला.

मिस वर्ल्डमुळे ABCL च्या घसरणीला सुरुवात
ABCL ने मिस वर्ल्ड कॉन्टेस्टचं आयोजन करणं हे अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील चुकीच्या निर्णयापैकी एक होता. हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. इथे काम केल्याचे पैसे मिळाले नाही, असा आरोपही काही जणांनी केला होता. कंपनीचे पैसे संपत होते. अशा परिस्थितीत ABCL ने पुन्हा एकदा बँकांकडून अतिरिक्त फंडाची मागणी केली.
बिग बींनी ब्लॉगमध्ये काय लिहिलं?
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, “2000 मध्ये संपूर्ण जग नव्या शतकात प्रवेश केल्याचा आनंदोत्सव साजरा करत होतं, तेव्हा अमिताभ 90 कोटी रुपयांच्या कर्जामुळे कायदेशीर प्रकरणांचा सामना करत होते. त्याचवेळी मला कौन बनेगा करोडपती होस्ट करण्याची ऑफर मिळाली आणि मी तातडीने होकार दिला.”

कंपनी दिवाळखोरीत
जानेवारी 1996 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने कॅनरा बँकेकडे 14 कोटी रुपयांचं कर्ज मागितलं. याशिवाय कंपनीने अलाहाबाद बँकेतून 8 रोटी रुपयांचं कर्ज मागितलं होतं, जेणेकरुन बिझनेस वाढवता येईल.

पण 2000 हे वर्ष येईपर्यंत बँकांनी कंपनीला ABCL ला डिफॉल्टर लिस्टमध्ये सामील केलं. कंपनीना 70.82 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. त्यावेळी कंपनी बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अॅण्ड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शनकडे (BIFR) पोहोचलं होतं.

ABCL ला कर्ज देण्याच्या मोबदल्यात बँकांकडे सेफ्ट इन्स्ट्रूमेंटचे दोन सेट होते

जुहूमध्ये दोन फ्लॅट – दोन्ही फ्लॅटची किंमत 1994 मध्ये 40 लाख रुपये होती
मार्च 1994 च्या हिशेबानुसार बच्चन यांची पर्सनल गॅरंटी – 63.98 लाख रुपये, वार्षिक उत्पन्न : 34.53 लाख रुपये


बिग बींच्या घरावर बँकांची नजर
कंपनीने कर्ज न फेडल्याने बँकांची नजर बिग बी यांच्या प्रतीक्षा या बंगल्यावर होती. मुंबई उच्च न्यायालयाने बँकांना अमिताभ बच्चन यांचे दोन्ही फ्लॅट जप्त करण्याची मंजुरी दिली होती. जानेवारी 1998 मध्ये बँकांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली. पण कंपनी बीआयएफआरकडे कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी गेली. यावेळी बँकांची नजर प्रतीक्षा बंगल्यावर गेली.


अमिताभ बच्चन यांचे फ्लॉप शो
मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट – हा कार्यक्रम वादात अडकलाच पण कंपनीला त्याच्यासाठी पैसेही गोळा करता आले नाही.

मृत्युदाता – हा सिनेमा बिग बी यांचा कमबॅक होतं. पण चित्रपट सपशेल आपटला

सात रंग के सपने – हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला

मेजर साहब – मृत्युदासापेक्षा हा सिनेमा चांगला होता, परंतु या चित्रपटामुळे बच्चन आणि ABCL चं नशिब मात्र बदललं नाही.

ए बेबी, म्युझिक अल्बम – हा म्युझिक अल्बम अतिशय लोकप्रिय झाला, पण त्यामुळे पैशांची चणचम भरुन निघाली नाही.











BY - http://maharashtranews24live.blogspot.in/2016/03/blog-post_11.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल