गुंतवणुकीचा विचार करताना बहुतेकवेळा पारंपरिक पर्यायांचाच विचार केला जातो. त्यामागील असणारे फायदे आणि त्याचबरोबर येणारे तोटे हेदेखील नजरेआड केले जातात. असे केल्याने मग दहा-वीस वर्षांनी परतावा मिळण्याची वेळ येते त्यावेळी वाढलेल्या महागाईच्या मानाने अगदीच किरळोक परतावा स्वीकारावा लागतो. हे टाळायचे असेल तर गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अगदी खोलवर जाऊन विचार केला पाहिजे आणि मगच गुंतवणुकीचे चोख नियोजन करणे फायदेशीर ठरते.
नवे पर्याय आणि उपलब्ध संधी
म्युच्युअल फंड
शेअरबाजार आणि रोखे बाजार यांच्याशी संबंधित असूनही सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारा हा पर्याय अशीच ओळख म्युच्युअल फंडाची होऊ शकतो. तरुण आणि मध्यमवयीन गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घ मुदतीच्या म्हणजेच पाच ते पंधरा-वीस वर्षांच्या कालावधीतील गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. आज भारतात म्यच्युअल फंडाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुमचे वय, आर्थिक स्थिती, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, गुंतवणुकीतील परतावा अशा अनेक विषयांचा विचार करून आणि आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून योग्य योजनांची निवड करणे आवश्यक आहे. शेअरबाजारातील चढउतार गृहीत धरले तरी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा हा बॅंकेतील मुदतठेवींच्या व्याजापेक्षा कित्येक पटीने अधिक असतो.
शेअरबाजार
शेअरबाजारातील वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करून आर्थिक सल्लागाराच्या मदतीने शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो. शेअरमध्ये म्युच्युअल फंडाच्या तुलनेने अधिक धोका (रिस्क) आहे. आज जगातील सर्वांत मोठ्या दहा शेअरबाजारात भारतीय शेअरबाजाराची गणना होते. याचवेळेस भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि सक्षमतेच्या दिशेने जाणारी मानली जाते. आज 2.5 ट्रिलियन डॉलरची आपली अर्थव्यवस्था 2030 मध्ये 8 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे. हे होत असताना देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, उद्योगधंदे आणि रोजगारांची निर्मिती होणार असल्याने त्याचे पडसाद शेअरबाजारावरही होणार आहेत.
जमिनीतील गुंतवणूक
घर आणि जमीन खरेदीतील गुंतवणूक हा नेहमीच उत्तम परतावा देणारा पर्याय समजला जातो. तरी देशातील बदलती परिस्थिती लक्षात घेता गुंतवणुकीच्या या पर्यायायकडे अत्यंत सखोलपणे पाहण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकूणच सरकारच्या धोरणांमुळे रोख व्यवहारांच्यावर आलेल्या बंधनांचा विपरीत परिणाम या पर्यायातील परताव्यावर झाला आहे. या क्षेत्रातील मंदीच्या सावटामुळे हजारो नवीन घरे आजही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करणारे फायदे जर मिळत असतील तरच या पर्यायाचा गुंतवणूक म्हणून विचार करायला हवा.

चक्रवाढ परतावा
परिलायन्स ग्रोथ या फंडामध्ये ऑक्टोबर 1995 मध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य आज 2017 मध्ये 96 लाख रुपये आहे. याचा अर्थ वार्षिक 44 टक्के दराने (बॅंकेतील मुदतठेवीपेक्षा कैकपटीने) 23 वर्षात 96 पट टॅक्स फ्री परतावा मिळाला आहे.
पफ्रॅंकलिन प्रायमा या फंडामध्ये नोव्हेंबर 1993 मध्ये गुंतवलेल्या एक लाख रूपयांचे मूल्य आज 2017 मध्ये आज 85 लाखांवर पोचले आहे.

सोने व चांदी
कोणतीही विवाहित स्त्री केवळ 500 ग्रॅम सोने जवळ बाळगू शकते आणि पुरुष 100 ग्रॅम सोने बाळगू शकतो या केंद्रातील अर्थमंत्रालयाच्या अलीकडच्या निर्णयाने पुन्हा एकदा देशभर खळबळ उडवून दिली. तरी हा निर्णय म्हणजे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसतर्फे कित्येक दशकांपूर्वी आखण्यात आलेल्या नियमावलीतील एक नियम आहे. याचा गुंतवणुकीच्या दृष्टीने काढावयाचा अर्थ म्हणजे सोन्यातील गुंतवणूक एकूण संपत्तीच्या दहा ते पंधरा टक्कयांपेक्षा जास्त असू नये. याचे कारण म्हणजे दीर्घ मुदतीसाठी सोन्यात गुंतवणूक केली तरीही मिळणारा परतावा हा सहा ते सात टक्क्यांपेक्षा अधिक नसतो.
त्यामुळेच म्युच्युअल फंड आणि शेअरबाजारातील गुंतवणूक हेच खरे सोने याचा प्रत्यय ज्या दिवशी गुंतवणूकदाराला होईल, तोच खरा सोनियाचा दिवस.
म्युच्युअल फंडातील दीर्घकालिन

– संदीप भूशेट्टी
गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार
गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार
by - Dainik Prabhat
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा