सर्वप्रकारच्या गुंतवणूक गरजांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. वर्तमानकाळातील उत्पन्नाच्या आधारे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बहुतांश गुंतवणूकदार फंडांची निवड करतात. सुरक्षित गुंतवणूक आणि कमी धोका ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. सध्या बाजारात अनेक फंडांचे पर्याय उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गरजेनुसार योग्य त्या फंडाची निवड नेमकी कशी करावी त्याविषयी...
..
बाबर झैदी
..
नेमकी कोणत्या साधनांत गुंतवणूक करावी, याविषयी नेहमी मिळणारा सल्ला प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असतो. बऱ्याचदा गुंतवणूकदार वित्तीय सल्लागारांच्या माध्यमातून साजेशा साधनात गुंतवणूक करतात. माझ्या मते सर्वप्रकारच्या गुंतवणूकविषयक गरजा भागविण्यासाठी म्युच्युअल फंड हा सद्य स्थितीतील चांगला पर्याय आहे. एखादी चारचाकी घेण्यासाठी, पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी उपलब्ध निधी जमविण्यासाठी, करबचत करण्यासाठी किंवा निवृत्त झाल्यानंतर खर्चाची तरतूद करण्यासाठी गुंतवणुकीच्या साधनांची निवड केली जाते. अशा प्रकारच्या अनेक आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी म्युच्युअल फंड अतिशय चांगला पर्याय आहे. सामान्य गुंतवणूकदाराला अपेक्षित असणाऱ्या सर्वप्रकारच्या सुविधा म्युच्युअल फंडाकडून दिल्या जातात. उदाहरणार्थ...किमान शुल्क, सहजतेने गुंतवणूक करता येणे, गुंतवलेली रक्कम पाहिजे तेव्हा काढून घेता येणे, डायव्हर्सिफिकेशन, किमान कर, गुंतवणुकीतील पारदर्शकता आणि गुंतवणुकीविषयक क्लिष्ट नियमांतून सुटका...आदी माध्यमातून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना सहाय्यभूत ठरतात.
आजच्या या लेखात विविध प्रकारच्या दहा म्युच्युअल फंडांचा विचार करण्यात आला आहे. या विविध प्रकारच्या गुंतवणूक साधनांतून सामान्य गुंतवणूकदार आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. फंडांची विभागणी प्रामुख्याने तीन प्रकारच्या कालावधीवजा उद्दिष्टांवर करण्यात येते.
..
बाबर झैदी
..
नेमकी कोणत्या साधनांत गुंतवणूक करावी, याविषयी नेहमी मिळणारा सल्ला प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असतो. बऱ्याचदा गुंतवणूकदार वित्तीय सल्लागारांच्या माध्यमातून साजेशा साधनात गुंतवणूक करतात. माझ्या मते सर्वप्रकारच्या गुंतवणूकविषयक गरजा भागविण्यासाठी म्युच्युअल फंड हा सद्य स्थितीतील चांगला पर्याय आहे. एखादी चारचाकी घेण्यासाठी, पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी उपलब्ध निधी जमविण्यासाठी, करबचत करण्यासाठी किंवा निवृत्त झाल्यानंतर खर्चाची तरतूद करण्यासाठी गुंतवणुकीच्या साधनांची निवड केली जाते. अशा प्रकारच्या अनेक आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी म्युच्युअल फंड अतिशय चांगला पर्याय आहे. सामान्य गुंतवणूकदाराला अपेक्षित असणाऱ्या सर्वप्रकारच्या सुविधा म्युच्युअल फंडाकडून दिल्या जातात. उदाहरणार्थ...किमान शुल्क, सहजतेने गुंतवणूक करता येणे, गुंतवलेली रक्कम पाहिजे तेव्हा काढून घेता येणे, डायव्हर्सिफिकेशन, किमान कर, गुंतवणुकीतील पारदर्शकता आणि गुंतवणुकीविषयक क्लिष्ट नियमांतून सुटका...आदी माध्यमातून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना सहाय्यभूत ठरतात.
आजच्या या लेखात विविध प्रकारच्या दहा म्युच्युअल फंडांचा विचार करण्यात आला आहे. या विविध प्रकारच्या गुंतवणूक साधनांतून सामान्य गुंतवणूकदार आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. फंडांची विभागणी प्रामुख्याने तीन प्रकारच्या कालावधीवजा उद्दिष्टांवर करण्यात येते.
१) कमी मुदतीची उद्दिष्टे (शॉर्ट टर्म गोल्स) : किमान १ ते३ वर्षे
२) मध्यम मुदतीची उद्दिष्टे (मीडियम टर्म गोल्स) : किमान ४ ते ६ वर्षे
३) दीर्घ मुदतीची उद्दिष्टे (लाँग टर्म गोल्स) : सात वर्षांपेक्षा अधिक
३) दीर्घ मुदतीची उद्दिष्टे (लाँग टर्म गोल्स) : सात वर्षांपेक्षा अधिक
सध्या उपलब्ध असणारी माध्यमे आणि गुंतवणुकीविषयी निर्माण झालेली जागरूकता यांमुळे देशातील मोठा वर्ग नित्यनियमाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत आहे, हे जरी खरे असले तरी अनेक गैरसमजांपोटी अद्याप अनेकजण त्यापासून दूरच आहेत. त्यातील बऱ्याच जणांना नेमका कोणता म्युच्युअल
फंड निवडावा, हे समजत नाही. भविष्यातील आर्थिक गरजा समजून घेऊन योग्य त्या म्युच्युअल फंडाची निवड करण्यासाठी बरीच आकडेमोड (पेपरवर्क) करण्याची आवश्यकता असते. गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती मिळावी आणि गुंतवणूक करणे सुकर व्हावे यासाठी बऱ्याच फंड हाउसेसनी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अत्यावश्यक असणारी 'केवायसी' प्रक्रियाही सुलभ केली आहे. 'ई-केवायसी प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे अतिशय सोपे झाले आहे,' अशी माहिती एसबीआय म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक डी. पी. सिंग यांनी दिली.
..
कमी मुदतीसाठी सर्वोत्तम फंड : या फंडांची कामगिरी बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा चांगली असू शकते. या फंडांच्या माध्यमातून मिळणारा परतावा शेअर बाजाराशी निगडीत असतो. शॉर्ट टर्म डेट फंडातील गुंतवणूक बहुतांशवेळा अधिक स्थिर आणि एक ते तीन वर्षांसाठी उपयुक्त समजली जाते. मुदत ठेवींच्या तुलनेत ती अधिक सक्षम आणि उत्तम परतावा देणारी समजली जाते.
..
गुंतवणूकदारांच्या अपेक्षा काय?
- भांडवलाची सुरक्षितता
- गुंतवणुकीत सातत्याने वाढ
- गुंतवणूक काढून घेण्याची सुलभता
- करसवलतीमध्ये फायदा मिळावा
कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी बँकांच्या ठेवी हा आजपर्यंतचा सर्वोत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो. मात्र, आता त्याला पर्याय म्हणून डेट म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. या पर्यायात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा तर मिळतोच पण, त्या शिवाय गुंतवणूकदाराला करामध्ये सवलतही मिळते. बहुतांश गुंतवणूकदार चारचाकी खरेदीसाठी, पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा परदेश प्रवासासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत आहेत. एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया...बेंगळुरूच्या वामन प्रभू यांना आगामी तीन वर्षांत स्वतःची चारचाकी खरेदी करायची आहे. या कमी कालावधीच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी शॉर्ट टर्म डेट फंड त्यांना उपयुक्त ठरू शकतो. या फंडाच्या माध्यमातून त्यांना आपल्या गुंतवणुकीवर बँकेतील मुदत ठेवीच्या तुलनेत चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी प्रभू यांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून दरमहा गुंतवणुकीचा पर्याय निवडला. दरमहा गुंतवणुकीसोबतच गुंतवणूकदार एकरकमीही गुंतवणूक करू शकतात. जेनी डिसुझा यांनी मुलीच्या परदेशी शिक्षणासाठी सात लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, मुलीला परदेशी जाण्यासाठी अद्याप १६ ते १८ महिन्यांचा कालावधी होता. त्यांनी ही रक्कम शॉर्ट टर्म डेट फंडात गुंतविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना ठरावीक मुदतीसाठी चांगला, निश्चित परतावा प्राप्त झाला आणि गुंतवणुकीचे चीजही झाले.
..
डेट फंड सुरक्षित आहेत का?
डेट फंडात गुंतविलेली रक्कम कधीच बुडत नाही, हा गुंतवणूकदारांमध्ये पसरलेला एक गैरसमज आहे. या फंडात गुंतवलेल्या रकमेवरील परतावा व्याजदराशी जोडलेला असतो. ज्यावेळी व्याजदर कमी होतात, त्यावेळी म्युच्युअल फंडाने खरेदी केलेल्या बाँडच्या किमती वर चढतात. उलटपक्षीही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांत व्याजदरांत घट झाल्याने दीर्घ मुदतीचे बाँड खरेदी करण्याचे प्रमाण वाढले. या उलट व्याजदरांतील चढउतारांचा कमी मुदतीच्या अर्थात एक किंवा दोन वर्षांच्या बाँडवर काहीच परिणाम होण्याची शक्यता नसल्याने त्यांना फारशी मागणी असल्याचे दिसून आले नाही. वित्तक्षेत्रातील विश्लेषकांच्या मते येत्या काही महिन्यांमध्ये अशाप्रकारच्या बाँडना अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. 'या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत एक किंवा अधिकवेळा व्याजदरात घट झाल्यास कमी मुदतीच्या बाँडची कामगिरी सर्वोत्तम ठरण्याची शक्यता आहे,' अशी माहिती अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख आर. शिवकुमार यांनी दिली. 'गेल्या वर्षभरात शॉर्ट टर्म डेट फंडांच्या अंतर्गत असणाऱ्या मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी करसवलतीसाठी उत्तम पर्याय आणि बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय म्हणून शॉर्ट टर्म डेट फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले,' असे आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सीईओ कल्पेन पारेख यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे इन्कम फंडांची मुदत किमान चार ते पाच वर्षांची असते. भविष्यात जर व्याजदरांमध्ये घट झाली, तर या फंडांची कामगिरी आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजदरांत घट करेल, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. जर व्याजदरांमध्ये घट झाली नाही, तर या फंडांची कामगिरी गुंतवणूकदारांना निरुत्साही करण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या फंडांच्या माध्यमातून ३० टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे. ज्यावेळी बाँडचे यिल्ड कमी प्रमाणात असते, त्यावेळी दीर्घ मुदतीच्या डेट फंडांकडून अतिशय कमी परतावा मिळण्याची भीती असते. जर तुमची चार ते पाच वर्षे थांबण्याची तयारी असेल, तरच या फंडामध्ये गुंतवणूक करा.
डेट फंडामध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे फंडात केलेली गुंतवणूक किमान मुदतीच्या आत परत काढून घेताना त्यावर एक्झिट लोड (०.२५ ते ०.५० टक्के) आकारण्यात येतो. हा किमान गुंतवणूक कालावधी ६ ते १२ महिन्यांचा असू शकतो. काही विशिष्ट परिस्थितीत हा कालावधी १२ ते १८ महिन्यांचाही असू शकतो. दरमहा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. दरमहा करण्यात येणारी गुंतवणूक दर वेळी वेगळी गुंतवणूक म्हणून समजण्यात येते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास त्यावर एक्झिट लोड आकारण्यात येतो. समजा एकाने सप्टेंबर २०१६मध्ये वर्षभराच्या मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर २०१७मध्ये त्याने गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढून घेण्याचा निर्णय घेतल्यास पहिल्या सहा महिन्यांच्या एसआयपीच्या रकमेवरच एक्झिट लोड लागू होईल.
..
वामन प्रभू (वय ३३ वर्षे, बेंगळुरू)
..
नेमके काय करावे?
येत्या दोन ते तीन वर्षांत प्रभू यांना कार खरेदी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी शॉर्ट टर्म डेट फंडामध्ये सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे.
..
कारखरेदी करण्यासाठी कर्ज काढण्यापेक्षा एसआयपीच्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक करून डाउन पेमेंटसाठी किमान रक्कम उभारण्याचा माझा प्रयत्न असेल.
वामन प्रभू
- by : Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा