गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कसं कराल आर्थिक नियोजन?


रिटायर्डमेंटचा हा सुखद आनंद घेण्यासाठी गरज आहे ती पैशाची योग्य ती बचत आणि योग्य ते आर्थिक नियोजन.


सगळं आयुष्य तर पैसे कमवण्यात आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात जातं. पण यानंतर हवहवसं वाटतं ते म्हणजे आरामदायक निवृत्तीचं आयुष्य, परंतु रिटायर्डमेंटचा हा सुखद आनंद घेण्यासाठी गरज आहे ती पैशाची योग्य ती बचत आणि योग्य ते आर्थिक नियोजन.
पीपीएफ (Public Provident Fund): हा पैसे वाचवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये फक्त पैसे भरायचे आणि त्याचं व्याज घ्यायचं. सगळ्यात फायदेशीर म्हणजे यात व्याजही मिळतं आणि त्याला टॅक्सही लागत नाही. तुम्ही बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून हे पीपीएफ उघडू शकता. पीपीएफ हे एक सुरक्षित गुंतवणुकीचं स्रोत आहे.
एनपीएस (National Pension Scheme): न्यू पेंशन स्कीमच्या कलम 80च्या कायद्याअंतर्गत यातून आपण 10 टक्के टॅक्सची बचत करू शकतो. यामध्ये 6 वेगवेगळे फंड आहेत ज्यात गुंतवणुकीच्या सुविधा आहेत. यात किमान 6000 रुपये अशी वार्षिक गुंतवणूक आपण करू शकतो. 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये आल्यास एनपीएफमधून आपल्याला 15000 रुपये इतका फायदा होऊ शकतो. ही गुंतवणूक वय वर्ष 18 ते 55 या वयोगटातले लोक करू शकतात.
विमा (Insurance): युलिप, विमा योजना आणि पारंपरिक योजनांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता.  युलिपमध्ये आपण दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतो. 58 वर्षांच्या आधी जर कोणत्याही विमा योजनांमधून पैसे काढले तर विमा बंद करताना आर्थिक ताण जाणवतो. पण त्याला पर्याय म्हणून पेंशन योजना, रिटायर्डमेंट योजना यांसारखे अनेक विमा पर्याय निवडू शकता.
ईपीएफ (employee provident fund): आपल्या पगारापैकी 12 टक्के पगार हा ईपीएफमध्ये जातो. यात आपले पैसे सुरक्षितही राहतात आणि व्याजदरही चांगला मिळतो. आपल्यासाठी तर ही एक उत्तम निवृत्ती बचत योजना आहे. परंतु पगार घेणारा कामगार वर्गच याचा फायदा घेऊ शकतो.
म्युच्युअल फंड:  आपला जर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तो म्युच्युअल फंडच्या एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये करा. यात तुम्हाला दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुतवणूक करा नाहीतर थेट इक्वटीमध्ये गुंतवणूक करा.
इक्विटी (equity funds): दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून सर्वोत्तम फंडसाठी इक्विटी उपयोगाचं आहे. हो,  आता यात जरा धोका आहे आणि आपल्याला व्यवहारावर लक्षही ठेवावं लागतं. दीर्घकाळाच्या गुंतवणूकीमुळे आपल्या यातून खूप चांगले पैसे मिळतात.
टॅक्स फ्री बॉन्डस् (tax free bonds): जेव्हा तुमच्या रिटायर्डमेंटसाठी 1-2 वर्ष उरतील आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर तुम्ही टॅक्स फ्री बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. यात 10-20 वर्षांसाठी आपले पैसे लॉक होतात आणि ते सुरक्षितही असतात. याचा आणखी फायदा म्हणजे यात व्याजावर कोणताही टॅक्स लागत नाही.
लॉन्ग टर्म डिपॉजिट (long term deposit): जर तुम्ही कमी टॅक्स स्लॅबमध्ये मोडत असाल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. यात व्याजावर 11-12 टक्के आपल्याला मिळू शकतात. निवृत्तीनंतर यातून तुम्हाला नियमित रक्कम मिळण्याची सुविधा आहे.




by - IBN Lokmat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल