बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

नोकरी सोडून बिझनेस करायचाय ? मग हे लक्षात ठेवाच...

कोणत्याच नोकरीमध्ये शाश्वती राहिली नाही अशी नोकरदार वर्गाची ओरड असते.
आपल्यावर कोणी बॉसगिरी करु नये, आपल्या मनासारख आपण काम कराव अस प्रत्येकाला वाटत असत. मग यातील काहीजण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळतात.
पण व्यावसायिक होणही इतक सोपं नाहीए. त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला अंगवळणी पाडाव्या लागतील.
आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला व्यवसाय करताना नक्की होईल.

तीन वर्षाचे बजेट

तुम्ही व्यवसायात उतरताय तर तुमच्याकडे कमीतकमी ३ वर्षाचे प्लानिंग हवयं. यामध्ये आपले घर, खाणेपिणे, कपडे, प्रवास अशा गरजांचे मुल्यांकन प्रामाणिकपणे करायला हवे.

कमी करा खर्च

व्यवसायाच्या सुरुवातीला आपली कमाईही कमी असते त्यावेळी आपले खर्चही कमी करायला हवेत. जर तुम्ही लोन घेतले असाल तर त्याचा ईएमआय आणि व्याजदर कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. छोटे घर, दोघात एका गाडीचा उपयोग, शेअर टॅक्सी, हॉटेलमधील वायफळ खर्च टाळणे याकडे लक्ष राहिले पाहिजे. आपल्या खर्चाच्या देखरेखीसाठी मॅनेजमेंट अॅपचा उपयोग करु शकता. पण हे करताना खूपच छोट्या छोट्या खर्चांचा दबावही घेऊ नका. 

विमा घ्या

नोकरी करताना तुम्हाला विम्याची गरज आहे असेही कदाचित वाटेल. किंवा आपल्या पगारातून आपल्या विम्याचे पैसे जात असतील. पण व्यवसायात उतरताना विमा पॉलिसी घ्यायलाच हवी. किमान १-२ कोटी रुपयांचा लाईफ कव्हर घ्यायला हवा. फॅमिली हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीही गरजेची आहे. 

सध्याची इन्व्हेस्टमेंट राखून ठेवा

जर तुमच्याकडे आधीच कोणती म्युच्युअल फंड किंवा स्टॉक इन्व्हेस्टमेट असेल तर ती राखून ठेवा. तुमची 'एसआयपी' पॉलीसी असेल तर ती तोडू नका. कारण लॉंग टर्म गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. 

टॅक्स ची सुद्धा हवी प्लानिंग

तुम्ही नोकरी सोडली असेल तर आता तुमच्याकडे ईपीएफ नसेल. त्यामुळे तुम्हाला आता टॅक्स बचतीचे प्लानिंगही करावे लागणार आहे. आपल्या महिन्याच्या गुंतवणुकीला ब्रोकरद्वारे थेट प्लान्समध्ये गुंतवू शकता. यातून तुम्ही १.५ टक्के वाचवू शकता. 




by - Z 24 Taas

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल