बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

दुबईतला मराठमोळा पेशवा

मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही हे विधान अनेक उद्योजकांनी खोटं पाडलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे दुबईतील श्रीया जोशी. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना स्वबळावर त्यांनी दुबईत ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू केलं आणि त्याचा डंका जगभरात वाजवलाही. इथेच न थांबता त्यांनी शारजामध्ये दुसरं ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू केलं. केवळ हॉटेल व्यावसाया पुरतंच आपलं कर्तृत्व मर्यादित न राखता दुबईत किराणा व्यापार व हिंदुस्थानी मसाल्यांची निर्यातही त्या करतात. याबरोबरच ‘निवांत’ नावाचा ‘स्पा’ही त्यांनी सुरू केला आहे. इतकं सगळं उभं करताना डबेवाली जोशीकाकू ही ओळख मात्र त्यांना बरंच काही देऊन जाते. कारण उद्योगाचं हे साम्राज्य उभं करण्यासाठी तेच निमित्त ठरलं. ‘डबेवाली ते ‘पेशवा’च्या ‘मालकीण’ हा प्रवास करताना मराठी माणूस ही ओळख त्यांनी कायम ठेवली आहे.
पुण्यात वाढलेल्या श्रीया लग्नानंतर पती सचिन जोशी यांच्या नोकरीनिमित दुबईजकळच्या अजमान नाकाच्या छोटय़ाशा इमिरेट्समध्ये आल्या. या काळात आपणही काहीतरी असं त्यांना वाटायचं. यातूनच कोणीतरी जेवण आवडलं म्हणून डबा देण्याचा आग्रह केला आणि इथेच श्रीया यांच्या व्यावसायाचा श्री गणेशा झाला. त्यांच्या हातच्या चवीमुळे हळूहळू जेवणाच्या डब्याची संख्या वाढली आणि तब्बल १३५ डब्ब्यांची ऑर्डर श्रीया पूर्ण करू लागल्या. सुरूवातीला डबे बनवतानाची मेहनत येणाऱया तीन वर्षे सातत्याने त्यांनी हा व्यवसाय केला. त्यावेळी तरुण श्रीयाताईंना सभोववतालचा माणसं डबेकाल्या जोशी काकू म्हणून हिणकायचे पण त्यांनी काम बंद केले नाही.
याचवेळी त्यांचे पती सचिन यांना नोकरी निमित्त शारजामध्ये जावे लागले. तिथून डबे करणे शक्य नसल्याने त्यांचे डबे करणे बंद झाले व त्यांनी इतर छोटीमोठी कामं करण्यास सुरुवात केली. याचवेळी त्यांनी एका ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मधून मार्केटिंग करण्याविषयी किचारले. यातून श्रीया यांची चांगली कमाईही होऊ लागली. डबेवाली जोशीबाई ते सेल्सवुमन असा त्यांचा हा प्रवास झाला. डबेवाली, रिसेप्शनिस्ट, सेल्स कुमन अशी निरनिराळी कामं श्रीया यांनी केली. भरपूर अनुभव गाठीशी होता.
श्रीया यांनी अशी अनेक कामं केली पण त्यांच्या मनात स्कयंपाकाची हौस कायम होती. आपण एखादं रेस्टॉरन्ट सुरू करावे असं त्यांना सारखं वाटत होंतं. इच्छाशक्ती तीव्र असली की तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी  स्वत:हून चालत येतात असा अनुभव त्यांना आला. त्यांचे स्नेही आनंद जोग यांनी याबाबत पुण्याच्या डेक्कन जिमखान्याकरील जनसेवा भोजनालयाचे सचिन देवधर यांचं नाव सुचवलं. सचिन देकधर यांच्या आईने हे भोजनालय सुरू केलं होतं. रेस्टॉरंट चालवण्याचा अनुभव असलेले सचिन देकधर, आनंद जोग आणि श्रीया जोशी या तिघांनी मिळून रेस्टॉरन्ट सुरू केलं  आणि ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचा जन्म झाला.
श्रीया जोशींचं ‘पेशवा’ रेस्टॉरण्ट नावाप्रमाणेच मराठी बाज जपणारं आहे. अस्सल मराठी संस्कृतीचं, परंपरेचं ते प्रतीक आहे. पेशवेकालीन काताकरण, मराठी संगीत आणि मराठी परंपरेनुसार पंगतीनुसार केलेल वाढप इथल्या अमराठी लोकांनासुद्धा भावते. इथे सर्वच सणवार मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. गुढीपाडक्यापासून दिकाळीपर्यंत सर्वच सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. त्यामुळे दुबईत राहणाऱया आपल्या मराठीजणांनाही  कुटुंबीयांपासून दूर असूनही  ‘पेशवा’मध्ये आपल्या सणांचा आनंद घेता येतो. इथे सणवार साजरे होतातच पण त्याचबरोबर श्री सत्यनारायण पूजा, गणपती पूजा अशा पूजांसाठी प्रसादाच्या ऑर्डर घेतल्या जातात. विशेष म्हणजे इथे महाशिवरात्रीला उपवासाची थाळी मिळते तर पूजेचा स्वयंपाकही केला जातो.
इथे रेस्टॉरंट चालवताना वेगवेगळे नियम पाळावे लागतात. याबाबत श्रीया सांगतात की, ‘दुबईत प्रशासनाचे नियम अतिशय कडक आहेत. इथे व्हेज-नॉनव्हेज बनवण्यासाठी काऊंटर्स वेगळे असतात. शाकाहारी पदार्थांना केगळे आणि मांसाहारीला वेगळे, तर माशांसाठी आणखी वेगळे. भांडी, सुऱया, काटे, चमचे, इतकेच काय पण बेसिनसुद्धा वेगळी असतात. किचनमधील सर्व टाइल्स चांगल्या असल्या तरी दोन वर्षांनी बदलाव्या लागतात. ड्रेनेज सिस्टीम, गार्बेज व्यवस्था याबाबतीत अतिशय कडक नियम आहेत. हे नियम पाळावेच लागतात नाहीतर खूप मोठा दंड बसतो किंवा रेस्टॉरंट बंदसुद्धा ठेवावं लागतं.’
‘पेशवा’ रेस्टॉरन्ट अतिशय आता उत्तमप्रकारे सुरू आहे. दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येमध्ये भरच होते आहे. ‘पेशवा’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शारजामध्येही त्याची दुसरी शाखा उघडली आहे. रेस्टॉरन्ट क्यतिरिक्त आणखी काहीतरी करावं असा विचार मनात घोळत असताना एक छानसा योग जुळून आला आणि आम्ही ‘निवांत’ या नावाने ‘स्पा’ सुरू केला.’’ श्रीया सांगतात.
श्रीया आप्रिका व इराणला हिंदुस्थानी मसाले, इतर पदार्थ निर्यात करतात. दुबईत त्यांनी सुपर मार्केटही सुरू केलं आहे.  समोरून चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा, भरपूर मेहनत करायची आणि सातत्याने काम करत राहायचं हेच आमच्या पती-पत्नीच्या यशस्वी जीवनाचं सूत्र आहे असं श्रीया सांगतात.
यूएईमध्ये राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱया मराठी माणसाला दरवर्षी पेशवातर्फे ‘पेशवा सन्मान पुरस्कार’ दिला जातो. हिंदुस्थानातून आलेल्या प्रतिष्ठत व्यक्तींच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
२०१३ रेस्टॉरन्टचं श्रेय हे माझा नवरा सचिन आणि माझं एकत्रित आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याकर त्याने मला जी साथ दिली त्यामुळेच मी हा पल्ला गाठू शकले’.






By - Daily Saamana

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल