टप्प्याटप्याने गुंतवणूक करून आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 'सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग' अर्थात 'एसआयपी'चा पर्याय सर्वांत सुरक्षित समजला जातो. शेअर बाजारातील चढ-उतरणीचा कोणताही परिणाम न होणाऱ्या या गुंतवणूक पर्यायाचा हा सविस्तर आढावा...
जर तुम्ही कोणत्याही फायनान्शियल प्लॅनरकडे जाऊन दीर्घकाळ गुंतवणुकीबाबत सल्ला मागितला, तर ते स्वतःची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन, विचार करून निवडक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये नियमित गुंतवणूक करण्यास सांगतील. त्यांच्या मते कोणत्याही चांगल्या म्युच्युअल फंडाचा 'एसआयपी' अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग'मधील गुंतवणूक दीर्घकाळानंतरच्या चांगल्या परताव्यासाठी उपयुक्त असते. चांगल्या परताव्यासाठी 'एसआयपी' दीर्घकालीन असण्याची अजिबात आवश्यकता नाही. कदाचित तुम्हाला 'एसआयपी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर पंधरा महिन्यांनी घराच्या डाउनपेमेंटसाठी पैसे लागतील किंवा तीनच वर्षांनी मुलांची फी भरण्यासाठी पैशांची गरज भासेल. अशा परिस्थितीत 'एसआयपी'च्या माध्यमातून गुंतवणूक करणे शक्य आहे.
फंड्सइंडिया डॉट कॉमच्या रिसर्च विभागाच्या प्रमुख विद्या बाला यांच्या मते, 'कोणतेही आर्थिक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. गुंतवणूक करण्यासाठी हा आदर्श पर्याय समजला जातो. या पर्यायामुळे गुंतवणूकदारांना भविष्यातील आर्थिक नियोजनाची संधी मिळते. या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीमुळे कोणताही भावनिक पेचप्रसंग निर्माण होत नाही. तसेच, शेअरबाजारातील कोणत्याही चढ-उतारणीचा फटका गुंतवणूकदाराला बसत नाही. सामान्य गुंतवणूकदाराला बाजारात उतरण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याचीही गरज उरत नाही. एसआयपीच्या माध्यमातून प्रतिमहिना एका विशिष्ट तारखेला आपोआपच गुंतवणूक होण्याची प्रक्रिया सुरू होते.'
गुंतवणुकीशिवाय 'एसआयपी'चे अनेक फायदे आहेत. यामुळे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरना अॅसेट अॅलोकेशनमध्ये डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळू शकतो. करण्यात आलेल्या गुंतवणुकीला दीर्घ कालावधीमध्ये विभागल्यास गुंतवणूकदाराला कॉस्ट अॅवरेजिंगमध्ये मदत मिळू शकते. जे गुंतवणूकदार टप्प्याटप्याने गुंतवणूक करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. मात्र दुर्दैवाने फारच थोडे गुंतवणूकदार 'एसआयपी'मुळे मिळणारा फायदा पदरात पाडून घेण्यास उत्सूक असतात. ज्यावेळी बाजारामध्ये मंदीचे वातावरण असते, त्यावेळी हे गुंतवणूकदार 'एसआयपी'मधील गुंतवणूक काढून तरी घेतात अथवा बंद तरी करून टाकतात. या प्रकारांमुळे 'एसआयपी'च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. मंदी आल्यानंतर 'एसआयपी'तील गुंतवणूक बंद झाल्या अथवा केल्यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्त दरांमध्ये अधिकाधिक युनिट्स खरेदी करण्याची संधी मिळत नाही. त्यानंतर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाल्यास परिणामी युनिटचा भावही त्याप्रमाणात वाढत जातो.
'एसआयपी'चा आढावा कधी घ्यावा?
बऱ्याचदा गुंतवणुकीच्या चांगल्या योजना काम करीत नाहीत. 'एसआयपी'च्या बाबतीतही ही गोष्ट लागू पडू शकते. समजा, तुम्ही चांगल्या फंडामध्ये गुंतवणूक केली आहे. तरीदेखील नजीकच्या भविष्यात तो फंड चांगली कामगिरी करेल, याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. अशाप्रकारे आर्थिक गणिते बिघडल्यामुळे संकटं येऊ शकतात. 'जर तुम्ही दरवर्षी पोर्टफोलिओचा आढावा घेतला, तर गुंतवणूकीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करता येऊ शकतात. या दरम्यान, तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मोजमाप करता येते आणि पुढील उद्दिष्टे पुन्हा नव्याने ठरवता येऊ शकतात. गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतरचा आणि आताचा पोर्टफोलिओ पुन्हा तपासून पाहा. पोर्टफोलिओ कुणा एका अॅसेट क्लासकडे झुकला असेल, तर त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी तुमच्याकडे जमा झालेल्या गुंतवणुकीची माहिती घ्या. त्यामुळे आपण योग्य मार्गावर आहोत अथवा नाही, याची चाचपणी होते. त्यानंतर आपण ज्या फंडांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्या आणि अन्य फंडांच्या कामगिरीची तुलना करा. सुरुवातीला तुम्ही जितकी अपेक्षा केली होती, ती आणि सध्याची कामगिरी यांची तुलना करा. ज्या फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे, त्यातून कमी परतावा मिळत असल्यास तुम्ही आर्थिक उद्दिष्टांपासून दूर जाल. त्याचवेळी बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर तुमची गुंतवणूक असणारे फंड खराब कामगिरी करत असतील, तर पोर्टफोलिओ संतुलित करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर व्यवस्थापनाच्या चुकीमुळे फंडाची कामगिरी खराब होत असेल, तर त्वरित चांगल्या फंडामध्ये गुंतवणूक हस्तांतरीत करण्याची आवश्यकता आहे.
'एसआयपी' सुरू करणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्याची मुदत संपल्यानंतर बंद करणेही महत्वाचे आहे. जर तुमच्या मनात ठराविक आर्थिक उद्दिष्ट असेल, तर त्याच्या जवळपास आल्यानंतर 'एसआयपी' बंद करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. वेळेच्या आधीच जर तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य झाले, तर तुम्ही स्टेबल ऑप्शनमध्ये पैसे गुंतवू शकता. अशावेळी स्वतःच्या गुंतवणुकीला बाजाराच्या भरवशाने सोडून देणे योग्य होणार नाही. 'जर तुम्ही मुलाच्या लग्नासाठी गुंतवणूक करीत असाल आणि त्यापूर्वीच तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य झाले, तर अशावेळी गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी हस्तांतरीत केली पाहिजे,' असा सल्ला लँडरअप वेल्थ मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक राघवेंद्र नाथ देतात.
'एसआयपी'ला उद्दिष्टाशी जोडा
कोणतीही गुंतवणूक उद्दिष्टाशी जोडण्यात आली पाहिजे. प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असू शकते. कोणी निवृत्तीसाठी, कुणी मुलांच्या लग्नासाठी, कुणी विदेश दौऱ्यासाठी, तर कुणी भविष्यातील योजनांसाठी गुंतवणुकीचा मार्ग अवलंबते. फायनान्शियल प्लॅनरच्या म्हणण्यानुसार 'एसआयपी' सुरू करण्यापूर्वी काही विशेष उद्दिष्ट निर्धारीत करण्याची आवश्यकता आहे. उद्दिष्ट निर्धारीत न ठेवल्यास गुंतवणुकीचे भान राहात नाही. दरमहिना गुंतवणुकीची रक्कम वेगळी काढण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ..पुढील दोन वर्षांमधे घराच्या डाउन पेमेंटसाठी दहा लाख रुपये हवे असतील, तर प्रति महिना १५,००० ते २०,००० रुपयांचे 'एसआयपी' अपुरे पडतील. फायनान्शियल मॉलचे सीईओ नीरज चौहान यांच्या मते योग्य पावले न उचलल्यास टार्गेट चुकण्याचा धोका संभवतो. एखादे उद्दिष्ट साधण्यासाठी तुमच्याकडे दहा किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी असल्यास अॅसेट मिक्स इक्विटीकडे झुकलेला (७०:३०) असण्याची गरज आहे. तुमचे उद्दिष्ट कमी कालावधीचे अर्थात पाच वर्षांचे असल्यास पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा डेट मध्ये गुंतविण्याची आवश्यकता आहे. या सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी गुंतवणूकदाराने आधी स्वतःची ध्येयधोरणे निश्चित करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर कालमर्यादा ठरवून घ्यावी. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १० लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली असेल, तर पुढील १५ वर्षांमध्ये ८ टक्के महागाईचा दर त्या रकमेला ३१ लाखांच्या घरात पोहोचवेल.
दरवर्षी 'एसआयपी'ची रक्कम वाढवा
'एसआयपी'मुळे दरवर्षी तुम्हाला नियमित स्वरुपात गुंतवणुकीची संधी मिळते. याचा अर्थ असा नाही की, पूर्ण कालावधीसाठी गुंतवणुकीची एकच रक्कम मर्यादित ठेवणे. जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाते, तसतशी गुंतवणुकीची रक्कम वाढली पाहिजे. पगारी अथवा नोकरदारांचे उत्पन्न दरवर्षी विशिष्ट वेगाने वाढत जाते. त्यानुसार गुंतवणुकीमध्येही वाढ दिसून आली पाहिजे. तुम्हाला वेतनात २५ टक्क्यांची वाढ मिळाल्यास त्याप्रमाणात गुंतवणूकही वाढली पाहिजे. जर तुम्हाला दहा वर्षांनंतर १२ टक्के व्याजदराने २५ लाख रुपये हवे असतील, तर तुम्ही आतापासूनच दरमहिना ११,००० रुपये गुंतविण्याची आवश्यकता आहे. मात्र तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढवणार असाल, तर वार्षिक किमान ८,००० रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे 'एसआयपी'मध्ये होणारी वाढ दीर्घकालीन बचतीवर मोठा परिणाम करू शकते. काही विशिष्ट आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तुम्ही इक्विटी फंडांमध्ये वेगळी गुंतवणूक करू शकता. एकाचवेळी चार ते पाच आर्थिक उद्दिष्टे निर्धारीत केली असतील, तर इक्विटी फंडांचेही नियोजन करता येऊ शकते. फ्रीडम फायनान्शियल प्लॅनर्सचे सीईओ सुमीत वैद यांच्या मते कमीत कमी फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे. अनेक फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एकाच फंडामध्ये गुंतवणूक करावी

- संकेत धानोरकर
by - Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा