सूर्यमंत्र - ऊँ सूर्याय नमः | या मंत्राचा जप केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, बाल व तेजाची प्राप्ती होते. या मंत्राने शरीर व डोळ्यांचे सर्व रोग दूर होतात. याच्या जपामुळे शत्रू कोणतीही हानी करू शकत नाही.


सरस्वती मंत्र - ऊँ श्री सरस्वत्यै नमः | या मंत्राचा जप केल्याने ज्ञान व प्रखर बुद्धी प्राप्त होते.


लक्ष्मीमंत्र - ऊँ श्री महालक्ष्म्यै नमः| या मंत्राच्या जपाने धनसंपत्ती लाभते आणि दारिद्र्याचे निवारण होते.


श्री हनुमानमंत्र - ऊँ श्री हनुमते नमः | या मंत्राच्या जपाने बल व यशप्राप्ती होते.


गणेशमंत्र -(१) ऊँ श्री गणेशाय नमः | (२) ऊँ श्री महागणपतये नमः | (३) ऊँ गं गणपतये नमः | या मंत्राचा जप केल्याने कोणत्याही कार्याच्या संपादनातील बाधेचे निवारण होते.


मोक्षमंत्र -(१) ऊँ (२) ऊँ सोहम (३) शिवोहम (४) अहं ब्रह्मास्मि | हे मोक्षमंत्र आहेत. हे आत्मसाक्षात्कारात मदत करतात.

सुब्रह्मण्य मंत्र - ऊँ श्री शरणभवाय नमः| या मंत्राचा जप केल्याने कार्यामध्ये यश मिळते. हा मंत्र प्रेतात्म्यांच्या कुप्रभावालाही दूर करतो.

सगुण मंत्र -(१) ऊँ श्री रामाय नमः | (२) ऊँ नमो भगवते वासुदेवाय | (३) ऊँ नमः शिवाय | हे सगुण मंत्र आहेत.जे प्रथम सगुण साक्षात्कार प्रदान करतात आणि शेवटी निर्गुण साक्षात्कार.