मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

असे घडले शरद पवार....

पुणे - सध्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मराठा मोर्चांना होणारी गर्दी सर्वांनाच पडलेले कोडे आहे. या मोर्चांमागे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी नव्याने नेतृत्व समोर येताना दिसत आहे. मराठा समाजातील वकील, डॉक्टर, उद्योजक हे या मोर्चांचे ब्रेन असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे, तर काही ठिकाणी या मोर्चांमागाचा 'जाणता राजा' कोण आहे ? हे सर्व जाणतात, असेही बोलले जात आहे. या मोर्चांच्या निमीत्ताने मराठा समाजाचे प्रमुख नेते शरद पवार यांचा नेतृत्वापर्यंतचा प्रवास कसा झाला याचा धावता आढावा divyamarathi.com ने घेतला आहे. त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से....

विद्यार्थी चळवळीतून झाने लोकनेते
शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. ते महानगरात किंवा मोठ्या शहरातही जन्‍मलेले नाही. सामान्‍य शेतकरी कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांच्‍याकडे त्‍यांचे समकालीन नेते बाळासाहेब ठाकरेंसारखे वक्तृत्व नव्‍हते. सभेलाही फारशी गर्दी होत नव्‍हती. जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्तेही नव्‍हते. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तव्‍याने कधी कुठे दंगा झाला नाही किंवा कुणाच्‍या भावना भडल्‍या नाहीत. ते कधीही कोणता आदेश देत नाहीत. पण, केवळ आपली दूरदृष्‍टी शांत, संयमी स्‍वभाव याच्‍या बळावरचकेवळ महाराष्‍ट्राच्‍याच नाही तर देशाच्‍या राजकारणात मैलाचा दगड ठरलेत. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेले त्‍यांचे राजकारण आज एका राष्‍ट्रीय पक्षाच्‍या संस्‍थापकापर्यंत येऊन ठेपले आहे.
प्रतिभाताईंशी झाले शरद पवार पवारांचे लग्‍न
1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती येथे शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला. प्रतिभा या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीला 'सुप्रिया' नावाचे एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुप्रिया पवार-सुळे यांनी देखील स्वकर्तुत्त्वाचा ठसा उमटवला. सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत. पवार साहेब आणि प्रतिभा या गेली पाच दशकांपासून सोबत आहे.

कसे जुळले शरद पवारांचे लग्न ?
'एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बीकॉम झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.' असे स्वत: पवार साहेबांच्या ज्येष्ठ बंधू बापूसाहेब यांनी प्रतिभाताईंचे वडील सदू शिंदे यांना सांगितले.
सदू शिंदे यांची ज्येष्‍ठ कन्या जिजा, म्हणजेच प्रतिभा हिला पाहाण्याचा कार्यक्रम ठरला. परंतु, मुलगा शिकलेला असून, काहीच करत नाही, हे ऐकताच बिन कामाचे स्थळ, म्हणत सदू शिंदे यांच्या वडिलांना पसंत पडणे शक्यच नव्हते. पण हे 'स्थळ' म्हणजे साक्षात बापूसाहेबांचा धाकटा भाऊ शरद आहे, हे कळल्यावर प्रश्नच मिटला

 असे घडले मराठा समाजाचे नेते शरद पवार, लग्नावेळी मोठे बंधू म्‍हणाले- माझा भाऊ रिकामटेकडा

असा झाला मुलगी पाहण्‍याचा कार्यक्रम
शरदराव प्रतिभाताईंना पाहायला पुण्यात आले. पवारसाहेबांनी खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट परिधान केली होती. शेजारचे वर्तमानपत्र उघडून चाळत होते. आजोबांनी मुलगा पाहिला. पवारसाहेबांचामधील वक्तशीरपणा त्यांना एका क्षणात ओळखला आणि चटकण होकारही दिला.

शरद पवारांच्या विवाहाच्या दिवशी प्रचंड पाऊस

शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.

जमीन-अस्मानचा फरक...
बारामतीतील पवारांचे घर आणि पुण्यातील शिंदेंचे घर यात जमीन- अस्मानाचा फरक होता. राणेंचे घर लष्करी शिस्तीत घड्याळाच्या तालावर चालणारे. ठरलेल्या वेळी उठायचे, ठरलेल्या वेळी जेवायचे आणि कामाला जायचे.
बारामतीचे घर म्हणजे शेतकरी कुटुंब. बारदाना खूप मोठा. माणसांची ये-जाही कायम आणि प्रचंड. एवढे मोठे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचे कसब शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाईंच्या ठायी होते. प्रतिभाबाईंनी ते अचूक वेधले आणि चटकण आत्मसात करून घेतले होते। पवारांच्या घरातील व्यवहारचातुर्य आणि शिंदेंच्या घरातील शिस्त. पवारांचे आदरातिथ्य आणि शिंदेंची स्वच्छता व टापटीप. प्रतिभाबाईंनी सासर आणि माहेर या दोन्ही घरातल्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उचलल्या आणि त्यांची सांगड घालून एक वेगळीच घडी बसवली.

शरद- प्रतिभा एकरूप झालेले जोडपे..

शरद आणि प्रतिभा हे एक पूर्णपणे एकरूप झालेले जोडपे आहे. एकाच्या मनात जे सुरु आहे, तेच दुसर्‍यार्‍या सजमजाय वेळ लागत नाही. एकाने हात पुढे केला, तर त्याला काय हवे आहे ते दुसर्‍याला न सांगताच समजते. तसे काहीसे शरदराव आणि प्रतिभाबाईचे झाले.

सौजन्य : दै.दिव्य मराठी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल