सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

अभिनेत्री ते मुख्यमंत्री:असा घडला मुख्यमंत्री जयललिता यांचा जीवनप्रवास



Tuesday, December 06th, 2016
jayalalithaa-actress-cm
सामना ऑनलाईन । चेन्नई
केवळ दक्षिणेकडेच नाही तर एकूणच भारतीय राजकारणात प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून मुख्यमंत्री जयललिता यांची ओळख आहे. त्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळ्हघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. ताप आणि डायरियाने गेले महिनाभर आजारी असलेल्या त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  ५ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता त्यांचं निधन झालं.
जयललिता यांचा आजवरचा जीवनप्रवास नाट्यमय राहिला आहे. त्याविषयी ही खास माहिती.
>> त्यांचे पूर्ण नाव जयललिता जयराम अय्यर. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ला तत्कालिन म्हैसूर राज्यात मेलूरकोट, ता. पांडवपुरा येथे एका अय्यर परिवारात झाला. त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घेऊन बंगळुरू गाठले. तेथे त्यांच्या आईने ‘संध्या’ या नावाने चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केली. नंतर जयललिता यांनाही चित्रपटात काम करण्यासाठी आईने राजी केले.
> जयललिता यांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री हा प्रवास तसा संघर्षाचाच म्हणावा लागेल. आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. अण्णाद्रमुकचे संस्थापक नेते एम.जी. रामचंद्रन यांच्या त्या जवळच्या समजल्या जात.
>> जयललिता यांनी वयाच्या १५ व्या वर्षी चित्रपट अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थीदशेत शिक्षणाची त्यांना विशेष आवड होती.
> त्यांनी एमजीआर यांच्यासोबत २८ चित्रपटांत काम केले. एमजीआर तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार म्हणून ओळखले जात. तसेच ते प्रभावी राजकीय व्यक्तीमत्वही होते. त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केलेला आहे.
>> त्यानंतर चित्रपटसृष्टीला राम राम करून जयललितांनी राजकारणाच्या जगात प्रवेश केला. १९८३ मध्ये एम. करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाशी फारकत घेतल्यानंतर एमजीआर यांनी अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. त्यावेळेस जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यसभेसाठीही त्यांचे नामांकन करण्यात आले.
>> त्याच दरम्यान जयललिता यांचे एमजीआर यांच्याशी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु १९८४ च्या पक्ष प्रचार अभियानाचे जयललिता यांनी नेतृत्व केले होते.
>> जयललितांचा राजकारणात संपूर्ण उदय झाला, तो १९८७ ला. एमजीआर यांचे निधन झाल्यानंतर. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेत त्यांची पत्नी आणि समर्थकांनी जयललिता यांच्यासोबत कथित गैरव्यवहार केल्याचे सांगितले गेले. त्यातून या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.
>> मात्र त्यानंतर राजकारणात ठाम राहिल्याने आणि जनतेच्या मनातील राजकीय पकड घट्ट केल्यामुळे जयललिता १९९१ मध्ये पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. नंतर झालेल्या ९६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवला सामोरे जावे लागले. पण तोपर्यंत राजकारणातील ‘जानी मानी हस्थी’ म्हणून त्यांचे नाव झाले होते.
>> २००१ मध्ये त्या पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांना हे पद सोडावे लागले.
>> पुढे २०११ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या त्यानंतर आतापर्यंत त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमान आहेत. २०१६ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या.
>> उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर दोषारोपपत्र सिद्ध झाले. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१४ मध्ये बंगळूरुच्या एका कोर्टाने त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती.
>> त्यांना शिक्षा झाल्यानंतर तामिळनाडूत भयानक हिंसा आणि अशांतता पसरली होती.
>> मध्यंतरी जयललिता यांच्या अनुपस्थितीत पनीर सेल्वम यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून काम पाहिले. पण ते जयललिता यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की त्यांनी त्यांचे कार्यालय किंवा विधानसभेतील खूर्चीचा कधीही वापर केला नाही





- See more at: http://www.saamana.com/desh-videsh/jayalalithaa-an-actress-to-cm-life-journey#sthash.mcY2Z23m.dpuf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल