- रोज सकाळी जीवनसत्व घ्या.
- विविध अभ्यासपाहणीतून असे सिध्द झाले आहे की, नियमित जीवनसत्वाचा पुरवठा झाल्याने शरीराला कर्करोगाच्या विरोधातील अधिकच संरक्षण मिळते.
- नाष्ठ्याच्या वेळेस दुधात कॉफी टाका, कॉफीत दूध नको.
- शरीराची दैनदिन ‘डी’ जीवनसत्वाची गरज भागविण्यासाठी रोज सकाळी कपभर दूध घ्या. चहा व कॉफीतील दूधामुळे २५ टक्की ‘ डी ’ जीवनसत्व मिळते.
- प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी घ्या.
- यातून दोन गोष्टी होतात, एक म्हणजे शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता. दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते. व अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते.
- प्रत्येक खाण्यानंतर कांदा खा.
- कांद्यात हृदयरोगप्रतिबंधक घटक असतात, ज्याला ‘फ्लॅवोनाइड्स’ असे म्हटले जाते. म्हणून कांदा खाण्यास हरकत नाही. फक्त त्यानंतर ब्रश करण्यास विसरू नका.
- पिझ्झा नेहमी जास्त टोमॅटो सॉस व कमी चीज याच्याबरोबर असावा.
- जेव्हा तुम्ही फास्टफूड घ्याल, त्यानंतर दोन ग्लास पाणी घ्या.
- बर्गर, चीप्स, पिझ्झा, चिवडा इं. पदार्थ चरबीयुक्त असतात जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात. भरपूर पाणी पिऊन अतिरिक्त क्षार बाजूला सारा.
- दर मंगळवारी मासे खा.
- बुधवार किंवा रविवारीही काही फरक पडत नाही. आठवड्यातून एकदा मासा खाणे चांगले. त्यात चरबी असते व ओमेगा ३ नावाचे जे द्रव असते त्यामुळे ह्रदयचे कार्य सुरळीत पार पडते. नियमित मासे खाणार्यांत हृदयरोगाचे झटके येण्याचे प्रमाण खूप कमी आढळते.
- नियमित गोड पदार्थ खा. असे का ? तर गोड बिस्किटात चरबीयुक्त घटक कमी असतात जेवणाच्या शेवटी खाल्लेले गोड दही, मेंदुकदे जेवण संपल्याचा गोड संदेश पोहचवते. अशा जेवणानंतर शांत झोप लागेल.
सौजन्य - आरोग्य.कॉम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा