आयुर्वेद
सर्वात प्राचीन व्याधी बरी करणारे शास्त्र म्हणून आयुर्वेद आळखले जाते. हे
एक जीवनाचे जगण्याचे शास्त्र आहे. या शास्त्राचा उगम भारतात ५००० वर्षा
पुर्वी झाला.कित्येक शतके पारंपारिक मौखिक पध्दतीने वेगवेगळ्या ऋषी/मुनीनी आपल्या शिष्यांना हे शास्त्र लिहून छापुन ठेवण्यात आले पण बराचसा भाग आज उपलब्ध नाही. परदेशात आढळणाऱ्या नैसर्गिक उपचारांचे मुळ आयुर्वेदातच आहे. हे पहिले शास्त्र आहे की ज्यामध्ये शरीर व आत्मा यांच्या सहाय्याने व्याधी बऱ्या केल्या जातात. आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे जे वेद आणि विद्वान, योगी आणि गुरू, यांनी सांभाळून ठेवले आहे. हे शास्त्र वनस्पती वर्ग, प्राणीवर्ग आणि पर्यावरणावर आधारलेले आहे आणि ५००० वर्षाच्या इतिहासात टिकून आहे. शहरी भाग सोडून देशातील जास्त भागात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला जातो.
आयुर्वेद - खरा अर्थ
व्युत्पत्ती शास्त्रानुसार आयुर्वेद हा शब्द दोन मूलभूत कल्पनातून तयार झाला आहे. आयु आणि वेद. आयु म्हणजे आयुष्य व वेद म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र. आयुर्वेदाचा भर हा आजार/रोग होण्यापासुन वाचविणे व योग्य व चांगल्या वनौषधी वापरणे. हे शास्त्र आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार जीवन म्हणजे ज्ञान, मन शरीर व आत्मा यांचे एकत्रीकरण आहे. यावरून असे सिध्द होते की, आयुर्वेद हे फक्त शरीर किंवा शरीर लक्षणांपुरते मर्यादित नसून अध्यात्मिक, मानसिक व सामाजिक पैलु असणारे शास्त्र आहे व ज्यामुळे तंदुरूस्त व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा हा एक सर्वांगसुंदर मार्ग आहे.
आयुर्वेद
आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ही एक नैसर्गिक आरोग्य
रक्षण करणारी पध्दती आहे. हे शास्त्र शारीरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य
निसर्गाच्या सहाय्याने टिकविण्यास मदत करते. हे एक परिपुर्ण शास्त्र आहे
की, जे फक्त आजारी लोकांना मार्गदर्शन करते असे नव्हे तर सुदृढ लोकांना
सुध्दा उपयुक्त आहे. यामध्ये विविध शास्त्रांचा उपयोग होतो. उदा.
औषधोपचार, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, शरीरशास्त्र, नाक कान घसा,
दंतशास्त्र, वनौषधी, आयुर्वेदिक आहार व पोषक पदार्थ आणि तारूण्य टिकविणारी
औषधे, आधुनिक वैद्यक शास्त्र हे जसे आजारांच्या लक्षणावरच भर देते तसे
आयुर्वेद हे त्या आजाराच्या मुळाशी नैसर्गिक उपचारांच्या मदतीने जाते व
आजाराचे मुळ नष्ट करून रूग्णाची प्रतिकार शक्ती वाढविते.आयुर्वेदात प्रत्येकाच्या प्रकृती नुसार उपचार केले जातात. ज्यावेळी शरीर थोडया प्रमाणात तणाव आणि उर्जास्त्रोताने संतुलित असतो त्यावेळी शरीराची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था ही बळकट असते आणि सहजतेने ती रोग प्रतीकार करू शकते. यामध्ये नैसर्गिक वनौषधी व खनिज पदार्थ रीफांइड स्वरूपात वापरले जातात. या कारणांमुळे यात कोणताही धोका नाही व साइड इफेक्टस् नाहीत. बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की आयुर्वेद हे अतीप्राचीन व अतिप्रगत नैसर्गिक शास्त्र आहे
सौजन्य - आरोग्य.कॉम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा