स्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत
ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा
बहुतांशी अभावच आढळतो, म्हणून या नेहमीच्या वाटणार्या परंतु अत्यंत
महत्वाच्या अशा गोष्टीसंबंधीची माहीती
आहाराची आवश्यकता - मानवाला काम करण्यासाठी उर्जा लागते. ही उर्जा किंवा कॅलरीज अन्नातून मिळतात म्हणून अन्नाची किंवा आहाराची आवश्यकता असते. माणसाला वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, भाज्या दूध, वगैरे पदार्थापासून उर्जा मिळत असते. किंबहूना आहारात जेवढे वैविध्य असेल तेवढा समतोल अधिक आणि अर्थातच तुमची आरोग्याची गाडी सदैव रूळावरच! अखेर जीवन म्हणजे तरी काय हो?
शरीरेंद्रिय - सत्वात्मसंयोग: आयु उच्चते
शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांच्या संयुक्तीकरणाने जीवन बनते. शरीरधारा व चित्तधारा यांच्या मिलाफाने जीवनधारा यशस्वी होत असते.
आहाराचे महत्व
आहार हा केवळ पोटाची खळगी भरून ढेकर देण्यासाठी नाही तर पुढील गोष्टीसाठी आहाराची आवश्यकता आहे,
१. दैनंदिन उर्जा निर्माण करणे.
२. शरीराची वाढ करणे.
३. नवीन पेशींची निर्मिती करणे.
४. रोग प्रतिबंधक शक्तीची निर्मिती व संवर्धन करणे.
५. विद्युत चुंबकीय लहरींची निर्मिती व (PH) चे रक्षण करणे.
६. उत्सर्जन क्रिया सुलभ करणे.
७. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास मदत करणे.
इतक्या महत्वाच्या गोष्टींशी आहाराचा, पर्यायाने आरोग्याचा आणि अस्तित्वाचा किंवा जीवनाचा निकटचा संबंध आहे म्हणुन त्याकडे दुर्लक्ष करू नका.
आहाराचे स्वरूप आणि प्रकार
हवा आणि पाणी यांना रोम आहार असे म्हणतात आणि घन स्वरूपात घेतल्या जाणार्या आहाराला कवल आहार असे म्हणतात.
अ) हवा, पाणी आणि सुर्य प्रकाश हे देखील अन्नच पण याची जाणीव फार थोड्यांना आहे. खरे तर हवेला सर्व अन्नामध्ये अधिक महत्व आहे. खायला नसेल तर उपाशी पोटी का होईना, पण काही काळ (महिने) मनुष्य जगी शकतो. पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. पण हवेशिवाय काही मिनिटे देखील जिंवत राहू शकत नाही. म्हणून हवेला परम अन्न असे संबोधिले जाते.
आपल्या शरीराचा ६३ टक्के भाग हा पाण्याने बनला आहे. शरीरातील निरनिराळ्या पेशिंना जे अन्न पोचवले जाते ते रक्तामधून आणि रक्ताची द्रवता ही पाण्यामुळे टिकून राहते.
ब) कवल आहार - आपण दैनंदिन जीवनात भात, भाजी, फळे या स्वरूपात जो आहार घेतो तो आहार म्हणजे कवल आहार होय. या कवल आहाराची निर्मिती ही दोन प्रकारात असते.
१. शाक किंवा वनस्पतीजन्य आहार (फळे, धान्य इ.)
२. मांस किंवा पशुजन्य आहार (अंडी, मांस, मासे इ.)
सौजन्य - आरोग्य.कॉम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा