गुरुवार, १० एप्रिल, २०१४

निसर्गोपचार...

नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती.
  1. माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे.
  2. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे
  3. फक्त थेरेपीचा वापर घेत असे त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे.
नॅचरोपॅथीचे डॉ. रोग्याचे जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजार मध्ये लक्षात घेतले जात असत.

नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, स्पायनल मॅनिप्यूकेशन, न्युट्रिशन, हायड्रोथेरेपी, मसाज आणि व्यायाम.

नॅचरोपॅथी चे डॉक्टर अधिकृत नॅचरापॉथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले २ वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या २ वर्षात नॅचरल हिलींग टेक्निकवर शिक्षण दिले जाते

निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते.

‘पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणारया धोक्यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो.’

तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत.’ ‘औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्यांचे जे इतर परिणाम होतात, ते शरीराला हानिकारक असतात. सामान्य जनतासुध्दा आता या मुद्यावर सावधपणे विचार करत आहे. निसर्गौपचार पध्द्ती ही सर्वश्रेष्ट विनाऔषध उपचार पध्द्ती आहे हे आता ते मान्य करु लागले आहेत. या उपचार पध्दती बरोबर पातांजली योगसूत्रांचा वापर केला पाहिजे. ती योगसूत्रे या प्रमाणे - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यामुळे तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल. आत्मविश्वास संपादन करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी यांचा उपयोग होईल."

सौजन्य - आरोग्य.कॉम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल