शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

निसर्गोपचार - ‘आरोग्यम धनसंपदा’

 ‘आरोग्यम धनसंपदा’ असे म्हटले जाते आणि आरोग्य एकदा बिघडले की बेसुार धनसंपदा वाया जाते. इतर अनेक दुय्यम कारणांबरोबरच चुकीची आहार-विहार पद्धती हे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण असते. बदलत्या काळात विषाणू- जिवाणूुंळे पसरणार्‍या व्याधीही असतात हे मान्य केले तरी मुळात तुमची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असेल तर बाहेरचे हल्ले यशस्वीपणे परतून लावता येतात.

रोगप्रतिकारक शक्ती सबल, सक्षम असण्यालाही आहार महत्त्वाचा ठरतो. व्याधी जडल्यानंतर कोणत्याही पॅथीचा उपचार घ्यायचे ठरवले तरी शेवटी आपण कोणते तरी घटकद्रव्यच पोटात घेणार. निसर्गोपचार ही एक अशी उपचारपद्धती आहे ज्यामध्ये आहारावर अधिकाधिक नियंत्रण ठेवून शरीरातील व्याधी किंवा विषद्रव्ये बाहेर टाकण्यावर भर दिला जातो. नैसर्गिक अन्नघटक नैसर्गिक अवस्थेत सेवन करण्यावर भर दिला जातो.

हल्लीच्या जीवनपद्धतीत किंवा आहार पद्धतीतील महत्त्वाचा दोष म्हणजे चमचमीत, चवदार पदार्थांवर ताव मारणे. निसर्गोपचारातील आहार पद्धतीत अधिकतर कच्चे अन्नघटक खाण्यावर भर दिला जातो. काकडी, कोबी, मोडाचे मुग असे अन्नघटक कच्चे आणि चावून चावून खावेत. मध, लिंबू-पाणी, फळांचे रस किंवा फळे खाण्यावर भर दिला जातो. आहारात वरुन मीठ घेण्यास मनाई असते. जे अन्न पदार्थ या उपचारपद्धतीत सेवन करायला सांगितले जातात त्यात निसर्गत:च शरीराला आवश्यक तेवढ्या क्षारांचे प्रमाण असते. त्यामुळे मीठ वेगळे खाण्याची गरज पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे एखादा आजार किंवा व्याधी उघडकीस आल्यास औषधांचा भडीमार न करता पचनसंस्थेत झालेल्या बिघाडांचा तो संकेत आहे, असे मानून लंघन करण्यावर भर दिला जातो. याखेरीज शरीरास वाफ  देणे (बाष्पस्नान), सूर्यस्नान, संपूर्ण शरिरास किंवा दुखर्‍या भागास मातीचा लेप देणे असे पूर्णत: नैसर्गिक उपचार केले जातात. त्याच्या उपायाने माणूस अधिक सुदृढ, सशक्त बनतो. हे उपचार शिशुपासून वृद्धांपर्यंत कोणालाही घेता येतात.




नवशक्ती यांच्या सौजन्याने ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल