शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

मिठाचे दुष्परिणाम

आहाराच्या सहा चवींपैकी मिठाची खारट चव ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आहारामध्ये अजिबात खारट चव नसेल तर असा अळणी आहार खाल्ला जात नाही. मीठ हा तसा व्यवहारातही परवलीचा असा विषय आहे. ‘खाल्ल्या मिठाला जागावे’, गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह, सध्याचे लहान मुलांचे व इतरांचेही नमकीन खाणे या सर्व गोष्टींना मिठाचा संदर्भ आहे.  

आयुर्वेद या भारतीय शास्त्राने आहार शास्त्राचा एकूण विचार मांडतांना खारट चवीच्या शरीरावरील परिणामाविषयी विस्ताराने वर्णन केलेले आहे. खारट चवीचे पदार्थ प्रामुख्याने उष्ण गुणाचे असतात. त्याचप्रमाणे ते आपली पचन शक्तीही वाढवतात. या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे अन्नाला आणि तोंडालाही चव (रूची) आणणे. आपल्या एकूणच अन्नातून खारट पदार्थ काढून टाकले तर अन्न बेचव होते. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. खारट चवीचे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरात भेदन (फोडण्याची क्रिया) करतात, व्रण वाढतात. हे पदार्थ गुणाने तीक्ष्ण असतात. त्यामुळे रक्त आणि पित्त या दोहोंना ते फारसे हिताचे नसतात. खारट पदार्थ स्वेद जनक म्हणजेच शरीरात घाम निर्माण करणारे असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच घाम जास्त येण्याचा जास्त त्रास येणार्‍या व्यक्तींनी खारट पदार्थ जपूनच घायला हवे.खारट चवीचे पदार्थ पचनशक्ती वाढवणारे आणि रूची वाढवणारे असले तरी त्याचे आहारातले प्रमाण अत्यंत र्मयादित ठेवावे लागते. र्मयादेपेक्षा जास्त प्रमाणात खारट पदार्थ पोटात गेले तर त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. रक्तदुष्टी आणि त्यामुळे होणारे त्वचेचे विविध आजार हे खारट पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रामुख्याने निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे हे लक्षणदेखील निर्माण होते. हल्ली अनेक जणांना वयाच्या चाळिशीपूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यावर उगाचच जाहिरातीच्या पगड्यामुळे सौंदर्यप्रसाधनाचा मारा केला जातो. पण अशा मंडळींनी आपल्या आहारामध्ये मीठ, लोणचे अशा खारट पदार्थांचे प्रमाण जास्त आहे का हे तपासून बघणे आवश्यक असते. अनेकजणांच्या त्वचेवर त्वचेखालील छोट्या रक्तवाहिन्या फुटून लाल, हिरवे, निळे असे डाग आलेले दिसतात. हेदेखील खारट पदार्थांच्या अतिसेवनानेच घडते

 वातरक्त नावाचा सांध्यांचा एक विकारही याच्या अतिसेवनाने वाढतो. यामध्ये पायाची बोटे तसेच पायाचा घोटा सुजतो. अनेकदा त्यामध्ये आग होते आणि त्याठिकाणी खूप वेदनाही होतात. याला आयुर्वेदाने वातरक्त असे म्हटले आहे रक्ताची तपासणी केल्यास या त्रासामध्ये बर्‍याचदा युरीक अँसिड वाढलेले दिसते. खारट पदार्थ जास्त खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. केस लवकर पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे खारट पदार्थांचे अतिसेवन होय. डोक्यावरचे केस अकाली गळणे, लवकर टक्कल पडणे, केसांची मुळे सैल होणेया तक्रारीही खारट पदार्थांच्या अतिखाण्यामुळे घडतात.  

हल्ली तरुण मंडळींमध्ये असे खारट जास्त खाणे वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब मानली पाहिजे. उच्च रक्त दाबाच्या रुग्णांमध्ये अपथ्य म्हणून मिठाचा संदर्भ दिला जातो. त्याचबरोबर मूत्रपिंडाच्या विकारातही मीठ कमी खाण्याचा किंवा अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो. तो मिठामध्ये असलेल्या काही दुगरुणांमुळेच अशाप्रकारे शरीरावर परिणाम करणारा खारट रस आयुर्वेदाने औषधात योग्य प्रकारे उपयोगात आणला आहे. या शास्त्रात मिठाचे पाच प्रकार वर्णन केले आहे. त्यामधील सैंधव मिठ हे सर्वांत औषधी आहे. याला बोली भाषेत सैंधेलोण असे म्हणतात. हिंगावाष्टक चूर्ण या पाचक औषधामध्ये सैंधवाचा उपयोग केला जातो. सैंधव योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते केसांना आणि डोळ्यांनाही हिताचे ठरते. काळे मीठदेखील खारट चवीचे आणखी एक औषधी उदाहरण आहे. आपल्याला अपचन झाल्यास ओवा आणि काळे मीठ आपण खातो ते यामुळेच. भारतीय शास्त्राने सांगितलेल्या सैंधवासारख्या पदार्थाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात वाढवला तर ते आपल्या आरोग्याला नक्कीच हिताचे ठरेल यात शंका नाही



परप्रकाशित ...

खडे बोल

-- धीरूभाई अंबानी
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *

-- विश्‍वनाथन आनंद
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे

-- जे. आर. डी. टाटा
फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.

- नारायण मूर्ती
यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

-- रघू राय
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*

- बिल गेट्‌स
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *

- कल्पना चावला
कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*

-- आयझॅक न्यूटन
मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

-- बराक ओबामा
माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
 

निसर्गोपचार - ‘आरोग्यम धनसंपदा’

 ‘आरोग्यम धनसंपदा’ असे म्हटले जाते आणि आरोग्य एकदा बिघडले की बेसुार धनसंपदा वाया जाते. इतर अनेक दुय्यम कारणांबरोबरच चुकीची आहार-विहार पद्धती हे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण असते. बदलत्या काळात विषाणू- जिवाणूुंळे पसरणार्‍या व्याधीही असतात हे मान्य केले तरी मुळात तुमची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असेल तर बाहेरचे हल्ले यशस्वीपणे परतून लावता येतात.

रोगप्रतिकारक शक्ती सबल, सक्षम असण्यालाही आहार महत्त्वाचा ठरतो. व्याधी जडल्यानंतर कोणत्याही पॅथीचा उपचार घ्यायचे ठरवले तरी शेवटी आपण कोणते तरी घटकद्रव्यच पोटात घेणार. निसर्गोपचार ही एक अशी उपचारपद्धती आहे ज्यामध्ये आहारावर अधिकाधिक नियंत्रण ठेवून शरीरातील व्याधी किंवा विषद्रव्ये बाहेर टाकण्यावर भर दिला जातो. नैसर्गिक अन्नघटक नैसर्गिक अवस्थेत सेवन करण्यावर भर दिला जातो.

हल्लीच्या जीवनपद्धतीत किंवा आहार पद्धतीतील महत्त्वाचा दोष म्हणजे चमचमीत, चवदार पदार्थांवर ताव मारणे. निसर्गोपचारातील आहार पद्धतीत अधिकतर कच्चे अन्नघटक खाण्यावर भर दिला जातो. काकडी, कोबी, मोडाचे मुग असे अन्नघटक कच्चे आणि चावून चावून खावेत. मध, लिंबू-पाणी, फळांचे रस किंवा फळे खाण्यावर भर दिला जातो. आहारात वरुन मीठ घेण्यास मनाई असते. जे अन्न पदार्थ या उपचारपद्धतीत सेवन करायला सांगितले जातात त्यात निसर्गत:च शरीराला आवश्यक तेवढ्या क्षारांचे प्रमाण असते. त्यामुळे मीठ वेगळे खाण्याची गरज पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे एखादा आजार किंवा व्याधी उघडकीस आल्यास औषधांचा भडीमार न करता पचनसंस्थेत झालेल्या बिघाडांचा तो संकेत आहे, असे मानून लंघन करण्यावर भर दिला जातो. याखेरीज शरीरास वाफ  देणे (बाष्पस्नान), सूर्यस्नान, संपूर्ण शरिरास किंवा दुखर्‍या भागास मातीचा लेप देणे असे पूर्णत: नैसर्गिक उपचार केले जातात. त्याच्या उपायाने माणूस अधिक सुदृढ, सशक्त बनतो. हे उपचार शिशुपासून वृद्धांपर्यंत कोणालाही घेता येतात.




नवशक्ती यांच्या सौजन्याने ...

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

माहितीचा अधिकार - शेतकरी बांधवांसाठी अधिकृत अहिंसक मार्ग

माहितीचा अधिकार

लोककल्याणकारी राज् संकल्पनेत लोककेंद्रीत प्रशासन महत्त्वाचे असते. माहितीचा अधिकार कायद्यामुळे पारदर्शकता, जबदारी आणि लोकसहभाग या तीन बाबींना महत्त् प्राप् झा...
ले असून लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हा कायदा निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

'
माहितीचा अधिकार' हा अष्टाक्षरी मंत्र 12 आक्टोबर, 2005 रोजी भारतीय जनतेला मिळाला. या मंत्राचा वापर करुन प्रशासनातील दोष, उणिवा, गैरप्रकार उघड करण्यात आले. देशातील अनेक कायदे हे जनतेने पाळायचे आणि प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवायचे असे आहेत, माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा असा आहे की, लोकप्रशासनाने तो पाळावयाचा असून जनतेची त्यावर नजर असणार आहे. या कायद्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे संपणार नसला तरी त्याचे प्रमाण निश्चितच कमी होणार आहे.
लोकप्रशासन केवळ वस्तुनिष् असून उपयोगाचे नाही तर ते आदर्शवादी असायला हवे. प्रशासनाचा जनतेशी संबंध येतो. जनकल्याणाची कामे करतांना प्रशासकीय यंत्रणा समाजाभिमुख असली तरच जनतेला हे प्रशासन आपले वाटेल. गेल्या काही वर्षात विविध नागरी संघटना, नागरिकांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सुप्रशासन निर्मितीचा प्रयत् केला.

शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी, अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या संदर्भात वेळोवेळी दिलेला लढाही माहितीच्या अधिकारासाठी महत्वाचा ठरला आहे. आज विविध प्रसार माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार झाला असला तरी ही माहिती नेमकी कोणाकडून आणि कशी मिळवावी, त्याबाबत सर्वसामान्य लोकांना अद्यापही नेमकी माहिती नाही.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणाकडून,कोणती आणि कशी माहिती मिळवायची, त्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा तसेच राज्यातील मुख्य माहिती आयुक्तांसह सर्व विभागीय माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचे पत्ते दूरध्वनीही येथे आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
न्यायालये, संसद, विधिमंडळ, महामंडळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, आर्थिक लाभ घेणार्या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था, मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ लागू करण्यात आला आहे. विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती, कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून, अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे. माहिती मिळविण्याची इच्छा असणार्या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे.

माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक त्या निकालाची प्रत घेता येते. विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते. शासकीय कार्यालयाकडून अहवाल, नमुने, प्रसिद्धी पत्रके आदी कागदपत्रांची झेरॉक्स घेता येते. सहकारी संस्थांकडून इतिवृत्त, निर्णयाच्या प्रती, आर्थिक व्यवहाराची माहिती घेता येते.

कोणाकडून घेऊ शकतो माहिती
माहिती देणारी कार्यालये, संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वत:हून प्रसिद्ध करुन सूचना फलकावर लिहायची आहे. अथवा अशा माहितीची संचिका प्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे. त्यात कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्यांची नावे इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने त्याची किंमत, कर्मचार्यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी. ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.

1)
न्यायालये (सर्व)2) संसद (लोकसभा राज्यसभा)3) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे
4)
आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये,5) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये),
6)
पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग), ग्रामपंचायती 7) महानगरपालिका, नगरपालिका
8)
गृह विभाग (पोलीस यंत्रणा)9) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये
10)
शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका.

अशी मिळवा माहिती
माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.

असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी
1)
कार्यालयाचे नाव 2) कार्यालयाचा पत्ता 3) अर्जदाराचे संपूर्ण नाव 4) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 5) माहितीचा विषय
6)
कोणत्या कालावधीची माहिती हवी? 7) कोणत्या प्रकारची माहिती हवी? 8) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी?
9)
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी)10) अर्ज केल्याची तारीख 11) अर्ज केल्याचे ठिकाण 12) अर्जदाराची सही वा अंगठा
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

माहिती मिळण्याचा अपिलाचा कालावधी
जनमहिती अधिकार्याकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळते. जनमाहिती अधिकार्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान झाल्यास अपील करण्याचा कालावधी ३० दिवसांचा आहे.

अपिलीय अधिकार्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान झाल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील करता येते.

माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च
दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु.
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.

अपील का, कसे करावे?
)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्याविरुद्ध अपिलीय अधिकार्यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो.

) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे. शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. अर्जाची पोच घ्यावी.

) अपिलीय अधिकार्याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

दुसरे अपील का, कसे करावे?
) अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्याकडूनही मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो.

) दुसरे अपील करताना पुन्हा पहिल्या अपिलाच्या अर्जाप्रमाणे कृती करावी. अर्जावर २० रुपयांचा मुद्रांक चिकटवून नांव, पत्ता अपिलीय अधिकार्याचा तपशील, प्रारंभीच्या जनमाहिती अधिकारी अपिलीय अधिकार्याकडून मिळालेली माहिती अर्जदाराला अपेक्षित असलेल्या माहितीचा तपशील स्पष्टपणे लिहावा.

) राज्य माहिती आयुक्त अशा अर्जाची तपासणी करतात. गरज वाटल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांना समक्ष बोलावतात किंवा गरज वाटल्यास अर्जदारालाही बोलावतात. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त निर्णय देतात. त्यांनी दिलेला निर्णय मात्र संबंधितांवर बंधनकारक असतो.

माहिती नाकारल्यास दंड
) जनमाहिती अधिकार्याने वेळेत माहिती दिली नाही. जाणीवपूर्वक नाकारली, किंवा चुकीची, अपूर्ण, दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर, असे आयोगाचे मत झाल्यास, गुन्हा करणार्या माहिती अधिकार्यास २५० रु. दंड प्रत्येक दिवसाला केला जातो. मात्र एकूण दंडाची रक्कम २५ हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही.

) राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जन माहिती अधिकार्याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते. अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

माहिती आयुक्तांचे पत्ते

महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त -
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (मुंबई मुंबई उपनगर विभाग)
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (कोकण विभाग)
ला मजला, कोकणभवन, नवी मुंबई-४००६१४
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७५७१३२४

राज्य माहिती आयुक्त (पुणे विभाग)
था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे-
दुरध्वनी क्रमांक- ०२०-२६०५०६३३/२६०५०५८०

राज्य माहिती आयुक्त (औरंगाबाद/नाशिक विभाग)
सुभेदारी गेस्ट हाऊस, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,
औरंगाबाद-४३१ ००१
दूरध्वनी क्रमांक- ०२४०-२३५२५४४ फॉक्स क्र. २३५२१३३

राज्य माहिती आयुक्त (नागपूर/अमरावती विभाग)
रवीभवन, दालन क्र.१७, नागपूर.
दूरध्वनी क्रमांक-०७१२-२५६६८१६


(महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने दिनांक 16 -1-2012 ला ह्या कायद्यामध्ये खालील अटीँचा समावेश केला. ह्या कायद्याखालील माहीती मागवण्यासाठीचा अर्ज 150 शब्दांमधेच मांडावा.याचा अर्थ हा की फक्त जाणकार किँवा वकिलांच्या माध्यमातूनच अर्ज करता यावा. सामान्य अल्पशिक्षीत माणसांची याहून कुचंबणा व्हावी यासाठीच.एका वेळी एका अर्जात एकाच विषया संबंधीत किँवा एकाच खात्याविषयक माहीती मागवता येईल.याचा अर्थ असा की ही प्रक्रीया अधीक किचकट बनवून अर्जदारास हे सव्यापसव्य त्रासदायक ठरावे. माहीतीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावर पेन्सिलीशीवाय काहीही लिहू नये.)
माहितीचा अधिकार अर्ज नमुना माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा झेरॉक्स दुकानात मिळेल.

सौजन्य - माहिती अधिकार कार्यकर्ते…

माझ्याबद्दल