शुक्रवार, १६ जून, २०१७

नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "

नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "

 " नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "
रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेतीची अपरिमित हानी झाली. ती भरून काढणे अशक्यअसले, तरी भावी काळात होणाऱ्या दुष्परिणामा पासून वाचण्यासाठी, आजहीनैसर्गिक शेतीकडे वळणे शक्य आहे. अनेक रोगांना आमंत्रण देणाऱ्या पद्धतीलाटाळून, " प्राचीन भारतीय नैसर्गिक शेतीची" कास धरणे आवश्यक आहे.नैसर्गिक शेती करताना ती दुसऱ्यावर दुसर्यांवर अवलंबून राहता कामा नये.शेतीचे टानिक म्हणजे खत ते स्वतः तयार करून वापरणे केव्हाही किफायतशीरच होय.हे खत स्वस्तात आणि प्रभावशाली शेतकऱ्याला बनविणे सहज शक्य आहे.खत बनविण्याचे सूत्र खालीलप्रमाणे :
अ) नैसर्गिकरित्या खत बनविण्याचे तंत्र
१) शेण (गाय, बैल, म्हैस) - १५ किलो
२) जनावरांचे मूत्र (गाय, बैल, म्हैस) - १५ लिटर
३) गुळ - १ किलो
४) डाळीचे पीठ (उडीद,मुग,तुल,चना,अन्य) - १ किलो
५) पिंपळ,वड,आंबा,निंब अशा झाडाखालील माती - १ किलो
वरील सर्व घटक एकत्र मिसळून एका प्लास्टिकच्या पिंपात १५ दिवसपर्यंत ठेवावे, दररोज काठीने ढवळत राहावे.
पंधरा दिवसानंतर या द्रावणात १५० ते २०० लिटर पाणी मिसळावे, त्यानंतर ते द्रावण शेत मोकळे असल्यास सडा शिंपल्यासारखे शिंपडावे.जर शेतात पिक असेल तर पाणी देताना पाण्याच्या धारेवर डब्याने सोडावे.ह्या प्रयोगाची पुनर्रावृत्ती पिक निघेपर्यंत दर २१ दिवसांनी करत राहावी.यामुळे पिकांना पाणी कमी लागेल, शिवाय रोग कमी येतील. सतत तीन वेर्षेपर्यंत प्रयोग केल्यास शेतातील विषयुक्त तत्व नष्ट होतील.शेतात भरघोस उत्पन्न येईल. रासायनिक खताचा वापर करू नये,विश्वास नसल्यास पहिल्या वर्षी एकाच
एकरात प्रयोग करावा.
पर्यायाने शरीरात विषतत्व जाणार नाहीत.असाध्य रोगांपासून मुक्ती मिळेल.शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल.
ब) नैसर्गिक किटकनाशक निर्मिती तंत्र
१) जनावरांचे मूत्र (गाय,बैल,म्हैस,शेळी) - २० लिटर
२) कडूनिंबाच्या पानांची/ निम्बोळीची चटणी (पेस्ट) - अडीच किलो
३) धोतरा/ धतुरा च्या पानांची चटणी - अडीच किलो
४) रुई/ आक च्या पानांची चटणी - अडीच किलो
५) बेला च्या पानांची चटणी - अडीच किलो
६) सीताफळाच्या पानांची चटणी - अडीच किलो
७) अळू / कोचई च्या पानांची चटणी - अडीच किलो
८) गराडी च्या पानांची चटणी - अडीच किलो
९) बेशरम च्या पानांची चटणी - अडीच किलो
१०) तंबाखू च्या पानांची भुकटी - एक किलो
वरील सर्व दहाही घटक एकत्र करून पाण्यामध्ये दीड ते दोन तास उकळावे. थंड झाल्यावर बनलेले किटकनाशक गळून ठेवावे.
शेतात फवारणी करताना जेवढे किटकनाशक घेतले, त्याच्या २० पट (एका लिटरला वीस लिटर पाणी हे प्रमाण सर्वोत्तम) पाणी मिसळून फवारणी करावी. सर्वात प्रभावकारी स्वस्त किटकनाशक आपण स्वतः बनवू शकतो. ह्याचा कोणत्याही पिकावर वापर करण्यास हरकत नाही रोगाचे स्वरूप लक्षात घेऊन किटकनाशकाचे प्रमाण कमी अधिक करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आहे
अशाप्रकारे स्वतः खत आणि किटकनाशक बनवून शेतकरी आपिली शेती विषमुक्त करून संपन्नता मिळवू शकते,तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुलामगीरीतून मुक्तता मिळवू शकते

http://nlohabare.blogspot.in/2011/03/blog-post_16.html


---------------------


परसबाग
परसबाग म्हणजे घराभोवतालच्या जमिनीवर आवश्यक भाजीपाला, फळझाडं, औषधी वनस्पती आणि फुलझाडं लावणे. शहरात जागेची कमतरता लक्षात घेता गच्ची/गॅलरीत कुड्यांमध्ये परसबाग विकसित करता येते.

परसबागेमध्ये उपलब्ध जागेनुसार भेंडी, गवार, वांगी, मिरची यासारख्या फळभाज्या, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारली, दोडकी, पडवळ, तोंडली, घेवडा या वेलवर्गीय भाज्या, तर मेथी, पालक, शेपू, पालक, कोथिंबीर अशा पालेभाज्या लावता येतात. दररोजच्या वापरातला कढीपत्ता, लिंबू, तसेच पपई, केळी, सिताफळ, चिकू, आंबा, फणस, पेरू, नारळ अशी फळझाडंही आपण लावू शकतो. याशिवाय तुळस, गवती चहा, पुदिना, अडुळसा, ब्राह्मी, शतावरी, माका यासारख्या औषधी वनस्पती आणि गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, पारिजातक यासारखी फुलझाडंही वाढवता येतात. यांच्या वाढीसाठी आपल्या घरातील दररोजच्या जैविक कचर्या चे कंपोस्ट किंवा गांडूळ खत केल्यास बाहेरून कोणतेही जैविक किंवा रासायनिक खत वापरण्याची आवश्यकता नाही.

भेंडी, गवार, वांगी यांची ५-१० तर वांग्याची ४-५ रोपे आठवड्यातून एक दोन भाज्या पुरवू शकतात. दूधी भोपळा, कारली, दोडका यांच्या एक-दोन वेली पुरेशा असतात. यांच्या लागवडीसाठी देशी किंवा सरळ वाण असलेल्या बियाणांचा उपयोग केल्यास आणि त्यांच्या सिझनप्रमाणे लावल्यास त्यांच्यावर विशेष कीड पडण्याचा धोका नसतो. शिवाय कीड प्रतिबंधक उपाय म्हणून निंबार्क किंवा दशपर्णी अर्क फवारता येतो. आणि तो आपण स्वतः बनवू शकतो. दूधी भोपळा, लाल भोपळा यासारख्या वेलांमध्ये नर आणि मादी फुले असतात. त्यामुळे मधमाशी किंवा अन्य कीटकांमार्फत परागीभवन न झाल्यास फलधारणा होत नाही. अशा कीटकांच्या अभावी आपण नर फुलातील परागकण ब्रशच्या सहाय्याने किंवा नर फूल तोडून त्यातील परागकण मादी फुलावर शिंपडून फलधारणा वाढवू शकतो.

मेथी, पालक, शेपू यासारख्या पालेभाज्या १५-२० दिवसांनी खाण्यायोग्य होतात. अशा वेळी त्या मुळासकट न उपटता त्यांची खुडणी करावी. खुडणी केल्यामुळे आपल्याला किमान तीनवेळा भाजी मिळू शकते. गवती चहा, पुदिना, तुळस यांचा उपयोग दररोजचा चहा आरोग्यदायी बनवण्यासाठी करता येतो. तर यांच्या जोडीला अडुळसा, पारिजातक यांच्या पानाचा काढा केल्यास तो सर्दी, खोकला आणि ताप आल्यावर प्रभावी ठरतो. देशी गुलाब लावला असेल तर घरच्या घरी गुलकंद तयार करता येईल. जास्वंदीचं तेल केसांसाठी गुणकारी ठरेल आणि त्याचं सरबत उन्हाळ्यात थंडावा देईल.

सध्या बाजारात मिळणार्या् भाजीपाल्यांवर प्रचंड प्रमाणात कीटकनाशकं फवारलेली असतात. तसंच हायब्रिड बियाणं आणि रासायनिक खतं यामुळे त्यांच्यातली पोषणमूल्यं कमी असतात. त्यामुळे परसबागेतला विषमुक्त आणि ताजा भाजीपाला आपले आणि आपल्या कुटुंबियांचे चांगलेच पोषण करू शकतो.



- शुभदा पांढरे












http://pune.thebeehive.org/content/1621/4854

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल