शुक्रवार, १६ जून, २०१७

सेंद्रिय खतांचे प्रकार ...



सेंद्रिय खत :-

वनस्पती व प्राणी यांच्या .अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात .
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत ,कंपोस्ट ,हिरवळीची खते ,गांडूळ खते ,माश्यांचे खत ,खाटिक खाण्याचे खत ,हाडांछे खत ,तेलबियांची पेंड इत्यादी.
१) शेणखत :- शेण ,मुत्र ,गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात .त्यामध्ये नत्र ०.५ टक्के ,स्फूरद ० .२ टक्के व पालाश ०.५ टक्के असते .शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो .आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणुन वापरले जाते.

२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत , पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष ,भुसा ,उसाचे पाचट ,कापसाची धसकटे इ .सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात .यामध्ये नत्राचे प्रमाण ०.५ % स्फुरद ०.१५ % आणि पालाश ०.५ % अशी असते.

३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून ,त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळतो .जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते .अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात .

नत्राचे प्रमाण – ०.०३ % ते २ . ४ %
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.


हिरवळीच्या खतांसाठी वापरण्यत येंणारी पीके -

सेंद्रिय खतांचे प्रकार


१) ताग , २) धैच्या , ३) मूग , ४) चवळी , ५) गवार , ६) शेवरी , ७) बरसीम ,८) ग्लीरीसिडीया तागापासून हेक्टरी ४० ते ५० किलो नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो .
मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात ४० % वाढ होते.

४) गाडूळ खत - ह्या खतात गांडूळाची विष्ठा ,नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ , गांडूळाची अंडीपूंज ,बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

५) माशाचे खत - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला माशाचे खत म्हणतात.
नत्राचे प्रमाण ५ . ९५ %
स्फुरद प्रमाण ५ . २० %
पालाश प्रमाण ९ . ३६ %

६) खाटीकखान्याचे खत - खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात .

नत्र : १० ते १२ %
स्फुरद : १ ते १.५ %

सेंद्रिय खतांचे प्रकार

पालाश : ०.६ ते ०.८ %


हाडांचे खत -हाडे दळून बारीक करतात किंवा हाडांवर पाण्याची वाफ दाबाने सोडतात, वाफेतील उष्णतेमुळॆ स्निगध पदार्थ वेगळे होऊन हाडे मऊ ,ठिसूळ बनतात ,दळून बारीक करतात .अशा खतांना हाडाचे खत म्हणतात.
नत्र ३ .८८ %
स्फुरद : २१ .५६ %


८) तेलबियांची पेंड तेल काढल्यानंतर जी पेंड राहते तिचा खत म्हणून वापर करता येतो .उदा .एरंडी ,निंब,करंज.

९) द्रव खते (Liquid fertilizer) - ही खते गोमुत्र ,वनस्पतीचा अर्क ,ताक,गुळ ह्यापासून तयार करतात .जरी ह्या खतांच्या द्वारे जमीनीला अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नसला तरी ,ह्या खतामुळे मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंचा संचय व त्याची कार्यक्षमता वाढते .

१०) घन स्वरुपातील सेंद्रिय खते- ही खते तयार करताना तादंळाचे पाणी ,तेलबियांचे पेंड व माशाचे खत १०:१:१ प्रमाणात घेवून त्याला चांगले सडवावे .सडविण्याची क्रिया नियंत्रित असायला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वापरतात .




http://www.sendriyashethi.net/jeevant%20jameen/sendriya-khat-prakar.php?page=3

----------------------



सेंद्रीय खतांचे प्रकार
भर खते -

भर खतांमध्ये पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने ती मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात.भरखते पिकांना सावकाशपणे लागू पडतात.भरखतामुळे जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होऊन जमिनीचा पोत सुधारण्यात मदत होते. पर्यायाने उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येते.भरखतामुळे कंपोस्ट खत, शेणखत, कोंबडी खत इ. खतांचा समावेश होतो.

जोर खते -

जोर खतांमध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांचा वापर हा कमी प्रमाणात करावा लागतो. भरखतांमध्ये सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इ. खतांचा समावेश होतो.सेंद्रीय खतामध्ये काम्पोस्त, लेंडीखत, कोंबडी खत, शेणखत, सोनखत, भुईमुग पेंड, सरकी पेंडी, रार्म्डी पेंड, लीबोली पेंड, करंज पेंड, करजाई पेंड, हाडचुरा, मासळी खत इ खतांचा समावेश होतो.सेंद्रीय खतांपैकी सर्वाधिक नात्र भुईमूग पेंड मध्ये सर्वाधिक स्फुरद हाडचू-यामध्ये, तर सर्वाधिक पालाश सरकी पेंड मध्ये असते.
























http://pune.thebeehive.org/content/1409/4450

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल