शुक्रवार, १६ जून, २०१७

गोमुत्र व कडुलिंबापासून कीटकनाशक तयार करण्याची कृती...

गोमुत्र व कडुलिंबापासून कीटकनाशक तयार करण्याची कृती
घटक द्रव्य -
१. देशी गायीचे गोमुत्र - १० लिटर.
२. कडूलिंबाची ताजी पाने १० लिटर देशी गायीच्या गोमुत्रात मातीच्या मडक्यात पुरत घालावे. हा मडका जमिनीत खड्ड्यात २१ दिवस झाकून ठेवावा. २१ दिवसानंतर हे बाहेर काढावे नंतर त्यातील कडूनिंबाची पाने बाजूला काढावीत हे कडुलिंब युक्त गोमुत्र तांब्याच्या भांड्यात १/४ होई पर्यंत उकळावे. थंड करावे, थंड झाल्यावर गाळून घेवून योग्य प्रकारच्या बाटलीत भरून ठेवावे.

प्रमाण -
१ लिटर वरील किटक नियंत्रक १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे प्रमाण कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आलेला असल्यास जास्तीत जास्त ५ लिटर कीटकनाशक १०० लिटर पाण्यात मिसळावे त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही.

गुणधर्म -
पिक संरक्षक, बुरशीनाशक, रोग प्रतिबंधक, शक्तिवर्धक, विषाणू नाशक, वनस्पती पोषक मनुष्य व प्राणी मात्रास हानिकारक नाही.

उपयोग -
हे किट नियंत्रक सर्व पिकांना द्राक्ष बागांना उपयोगी आहे. फळबाग, फुलशेती, भाजीपाला यांना सुध्दा उपयोगी आहे. हे पिकांच्या मुळांना दिल्यास पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते

नॅडेप कंपोस्ट पद्धत

नॅडेप कंपोस्ट -
शेतातील काडीकचऱ्यापासून शेणाच्या (शक्यतो गाईच्या) विरजना सारख्या उपयोग करून उत्कुष्ट पद्धतीने कंपोस्ट खात तयार करण्याचा पद्धतीला नॅडेप कंपोस्ट पद्धत असे म्हणतात.

नॅडेप कंपोस्ट तयार करण्याची पद्धत -
१) या पद्धतीत कंपोष्ट जमिनीखाली खड्ड्यात न करता जमिनीच्या वर तयार करतात. त्यामुळे कंपोष्ट मध्ये नत्र जास्त प्रमाणात उपलब्ध होते.
२) यासाठी ६ फुट रुंद व १० फुट लांब व ३ फुट उंच (मापे आपल्या सोयीनुसार कमी जास्त होऊ शकते) परंतु जास्त मोठा किंवा लहान आकार असू नये असा जाळीदार विटांचा चौक बांधून घ्यावा. याला आतून शेणाच्या पातळ थर सारवून अथवा शिपून घ्यावे.
३) जमिनीच्या तळावरती शेणाचे पाणी शिंपून द्यावे. त्यावरती काडी कचऱ्याचा, पालापाचोळ्याचा किंवा शेतातील वनस्पती जन्य अवशेषांचा थर द्यावा. पुन्हा त्यावर शेणाच्या पातळ द्रावणाचे शिंपण करावे व कडी कचऱ्याचा थर द्यावा. शक्य असल्यास थोडीसी शेतातील माती त्यावर टाकावी.
४) असे थरावर देत जाळीदार विटांच्या चौकोनात वर एक फुट ते दीड फुट उंच येईल अश्या पद्धतीने खड्डा भरावा.
५) खड्डा पूर्णपणे शेणाने सारवून घ्यावा। दोन तीन दिवसानंतर हा खड्डा निम्मा खाली बसतो. पुन्हा त्यावर याच पद्धतीने खड्डा भरावा. अश्या प्रकारे जास्तीत जास्त दोन इंच खड्डा भरावा. खड्यावर उगवणारे गवत हाताने उपटून काढावे. हवामानानुसार गरजेप्रमाणे पाणी शिंपडावे अश्या प्रकारच्या खड्यातून तीन महिन्यानंतर उत्कृष्ट प्रकारचे कंपोष्ट मिळते. ( ग्लीरीलीडीया (गिरीपुष्य), चवळी, सुबाभुळ अशा प्रकारच्या द्विदल धान्यांचा अवशेषांना उपयोग केल्यास त्यातून तयार होणाऱ्या कंपोस्ट गुणवत्ता आणखी वाढते.)

नॅडेप कंपोस्ट खताचे फायदे -
१) या नॅडेप कंपोस्ट खतामध्ये नत्र, स्फुरद, व ह्युमस शेणखता पेक्षा जास्त असते. त्यामुळे हे शेणखताहून सरस असते.
२) बरेचसे शेतकरी शेतातील केरकचरा अनावश्यक म्हणून जाळून टाकतात परंतु अशा पदार्थापासून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार करता येतो.
३) कंपोस्ट खतामध्ये केरकचरा उदा. उसाची पाचट, ज्वारी व बाजरीचे खुंट, प्राण्याचे मलमूत्र, निरुपयोगी भाजीपाला या वाया जाणारे घटकाचा वापर करता येतो.
४) या पद्धतीत वाया जाणारे घटक गोळा केल्याने घाणीचे निर्मुलन करून आपला परिसर स्वच्छ ठेवता येतो.
५) उत्कृष्ट खत असे तयार करता येते.
६) या खताची विक्री सुध्दा केल्यास आर्थिक फयदा होतो.
७) या पद्धती मध्ये कमीत - कमी दिवसात खत तयार करता येते.












http://agriktnc.com/project-09.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल