शुक्रवार, १६ जून, २०१७

शहाजीराजांचा दूरदृष्टीकोण आणि उच्चकोटीचे राजकारण....


शहाजी राजे हे मुळातच स्वतंत्र आणि विजगिशु वृत्तीचे अत्यंत महत्वकांक्षी ,सत्ताकांक्षी ,युद्धकुशल ,मुत्सद्दी ,बुद्धीमान आणि धाड़शी होते .तसेच ते अत्यंत संयमी असून स्वातंत्र्यासाठी वाटेल ते कष्ट उपसन्याची जिद्द शहाजी राजांमधे होती ..
मुळात स्वराज्यसंकल्पनेची ही कल्पना शहाजी राजांची होती परंतु तीन वेळा प्रयत्न करुण त्यांना त्या कार्यात यश आले नाही .. अपयशातुन त्यांनी नाउमेद न होता आपल्या वीरपत्नीच्या संगनमताने आणि एक विचाराने दोन आघाड्याँचे राजकारण पुढे करुण स्वराज्य स्थापनेचा मार्ग शोधून काढला .पुण्याच्या आघाडीचे नेतृत्व त्यांनि जिजाऊ माँसाहेब बहाल करुण शिवरायांच्या माध्यमातुन स्वराज्य संकल्पेनाचा निर्धार केला .
शहाजी राजांनी स्वता आदिलशाहाचे फर्जंद म्हणून काम पाहिले .आणि स्वनेत्रुत्वात
बंगळुर येथे आदिलशाहिच्या अंतर्गत मांडलिकी स्वरुपाचे स्वतंत्र्य राज्य स्थापन केले. ही एक त्यांची तारेवरची कसरत म्हणावी लागेल.एकाच वेळी आदिलशाही ची नोकरी आणि स्वराज्यनिर्मीती करण ही सोप्पी गोष्ट नव्हती. यावरून शहाजीराजांचे राजकारण दूरदृष्टीचे आणि उच्चकोटीचे होते असे स्पष्ट होते ..
एकाच वेळी दोन आघाद्यांचे राजकारण करन्यासाठी शहाजी राजांनी सफल केलेले प्रयत्न
शिवाजी राजांना बालपणापासून यवनांच्या चाकरी पासून दूर ठेवले होते .इतकेच नव्हे तर 7 वर्षाच्या शिवबाला पुणे परगण्यातिल जहगिरित 40 गावांचा पोटमोकासदार नेमुन माँसाहेब जिजाऊं त्यांचे कुलमुखय्तीयार बनविले .मुसलमानी सत्तेत पाचार मरायला मावळाचा प्रदेश हां फार सोईचा आहे हे रणधुरंदर शहाजी राजांनी ओळखले होते म्हनुनच स्वराज्यनिर्मितीच्या उद्देशाने सर्वतयारीनिशी जिजाऊ आणि शिवरायांची नियुक्ती पुण्याच्या जहागिरीवर केली होती .. शहाजी राजांना पुण्याच्या जहागिरित जाण्याची बंदी होती कारण मुलात स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची इच्छा आणि महत्वकांक्षा तसेच त्याला लागणारे लष्करीआणि आर्थिक
सामर्थ्य आणि धाडस शहाजी राजांजवळ होते . ह्याची भीती घेवुन आदिलशाहाने शहाजी राजाना शिवाजी महाराजांना दिलेल्या सक्रिय पाठिंब्यामुळ
त्यांची जहागिरी जप्त करण्याचा व त्यांना शाही नोकरीतुन काढून टाकण्याचा आदेश आदिलशहाने इ.स 1643 मधे दिला होता .परंतु त्याला शहाजी राजांनी भिक घातली नाही. उलट आदिलशाह विरूद्ध बंडपुकारून त्याच्या लढण्याचे आव्हान दिले . त्यामुळ आदिलशहाने दिलेला आदेश त्याने मागे घेतला स्वराज्य स्थापनेत शहाजी राजांचा सक्रिय पाठिंबा होता .याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे जेव्हा अफजलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा शहाजी राजांनी उघड उघड आदिलशाहांवर आपली 17000 ची फ़ौज घेवुन विजापुरवर चालून गेले होते .पण वाटेत त्यांना समजल की अफजलखानाचा कोथळा शिवरायांनि काढला म्हणून ते माघारी फिरले .. शहाजी राजाना एकदा जहागिरीवरुण पदच्युत केले आणि दोन वेळा कैद झाली . त्यातूनही त्यांची त्यांच्या पुत्रानी सहीसलामत सुटका केली . शिवरायांना शहाजी राजांनी केवळ मार्गदर्शन नव्हे तर स्वतंत्र्य शिक्का ,सैन्याची मदत पैशाचा पुरवठा आणि स्वातंत्र्य भगवाध्वज ,आणि स्वराज्यनिर्मितीची संधी प्राप्त करुण दिली .. या शहाजीराजांच्या कार्यामागील सर्वात मोठी प्रेरणा होती ती सौदामिनी माँसाहेब जिजाऊ .
जिजाऊंनेच पुण्याच्या आघाडीचे अर्थात स्वतंत्र्य राज्य निर्मितीचे नेतृत्व केले . मार्गदर्शन ,युद्धकारण , राजकारण ,प्रशासन यात जातीने भाग घेतला . जिजाऊने आयुष्यभर सतत कष्ट उपसले स्वराज्याचा संसार केला . शहाजीराजांच्या निधनानंतर सती न जाता स्वराज्य निर्मितिच्या कार्यला वाहुन घेतले . स्वताच्या पुत्राचा राजाभिषेक सोहळा स्वताच्या डोळ्यानी पाहणारया जिजाऊ यांनी आपल्या पतीची सर्वात मोठी महत्वकांक्षी इच्छा पूर्ण केलि होती ..





http://itihasbynikhilaghade.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल