सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय?
अनेकांना सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे अजून माहित नाही. बारामती मध्ये राहणाऱ्या श्री पोतेकर ह्यांनी सेंद्रिय शेती काय हे सांगितले आहे.
सेंद्रिय शेती ही संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी शेतीची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माती, पाणी, वनस्पती, मातीतील असंख्य जिवाणू व त्यांचे त्याज्य पदार्थ, पर्यावरण, प्राणी, माणूस, जंगले या सर्वांच्या जीवनचक्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून एकमेकांशी कसा संबंध आहे, याचा अभ्यास करून शेती केली जाते.
सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये -
1. सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादनखर्चात कपात.
2. प्रति हेक्टरी निव्वळ नफा वाढविणे, विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला, फळे तयार करणे.
3. विविध प्रकारच्या प्रदूषणास आळा घालणे.
4. जनावरे व यंत्राच्या शक्तीत बचत व शेती नापिकतेच्या जबाबदारीतून मुक्तता.
100 टक्के सेंद्रिययुक्त जमीन निर्माण झाल्यानंतर त्या भागातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत निश्चित वाढ होते.
जागतिक स्तरावर, तसेच स्थानिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनाला होणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर, उत्पादित होणारे विषमुक्त अन्न या बाबींचा विचार करता राज्यातील सेंद्रिय शेती कार्यपद्धतीस प्रोत्साहन देणे व एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे.
निर्यातीस सध्या वाव असणारी सेंद्रिय उत्पादनेः कापूस, गहू, तांदूळ, वनौषधी, पापड, लोणची, तीळ, कारळे, मिरची इत्यादी.
सेंद्रिय शेतीमधील अडचणी-
1. आवश्यक त्या संशोधनाचा अभाव.
2. पुरेशा प्रमाणात स्थानिक विक्रीयोग्य दुकाने उभी करणे.
3. स्थानिकरीत्या प्रमाणके तयार करून सेंद्रिय शेतीचे स्थानिक स्तरावर प्रमाणके करण्याची मुभा देणे.
4. प्रमाणीकरणाची फी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी भरावी लागते, ही एक मोठी समस्या आहे; त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे.
5. प्रक्रिया उद्योगाची कमतरता काढणीपूर्व व काढणीपश्चात सुविधा, अद्ययावत प्रशिक्षणाची गरज.
महाराष्ट्र राज्यातील सेंद्रिय शेतीची आजची स्थिती-
सेंद्रिय शेतीखाली नोंद झालेले क्षेत्र - 6.50 लाख हेक्टर.
सेंद्रिय शेती सेवा पुरविणाऱ्या संस्था - 54.
राज्यात प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था -
नौका - पुणे, इकोसर्ट - औरंगाबाद,
एसकेएएएल - मुंबई, आयएमओ - बंगळूर, वन्सरर्ट - जयपूर.
प्रमाणीकरणासाठी नोंद झालेले क्षेत्र - 0.58 लाख हेक्टर.
सेंद्रीय शेती पध्दतीत रासाय़नीक खते, किटक-बुरशी नाशके, संजीवके, पशुखाद्यातील घटक यांचा पुर्णतः किंवा मोठ्या प्रमाणावर वापर टाळला जातो.
- या पध्दतीत शक्यतो योग्य पिक पालट, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, द्विदल धान्ये, हिरवळीचे खते, शेती शिवाय इतर होणारा काडीकचरा, जैविक किडरोग तणनाशके यांच्या वापर करून जमिनीची उत्पादकता व पोद टिकवून पिक घ्यायचे या पध्दतीत हे गृहीत धरले आहे की जमिन हे एक जिवंत माध्यम असून त्यामध्ये शेतीस उपकारकक्षम अशा अनंत जीव-जंतूचे वास्तव्य असते. योग्य वातावरण असल्यास त्यात सतत वाढ होत राहते.
- सेंद्रीय शेतीमध्ये जमिनीतील जीव-जंतूना पुरेसे खाद्य मिळाल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून काही संप्रेरके सारखी समिश्रे निर्माण होतात जी वनस्पती वाढीस पोषक असतात. व त्यांची रोग-कीड प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. यामुळे रासायनिक कीड-रोग नाशकांच्या वापर कमी होऊ शकतो.
- सेंद्रीय शेतीतील उत्पादने पौष्टीकता, चव, याबाबतीत सरस असून ती साठवणीत जास्त दिवस चांगली राहतात. तसेच अशा त-हेन उत्पदीत केलेल्या भाजीपाला व फळात नायट्रेट, नायट्रोजनचे व कँडमियम धातूचे प्रमाण कमी असते. रासायनिक खतांच्या अती वापराने सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी झाल्याने अन्नधान्य भाजीपाला इत्यादींची पौष्टीकता कमी होते व त्याचा मानवी शरीरावर परीणाम होतो.
सेंद्रिय शेतीमध्ये पीकसंरक्षण-
मित्रकिडीच्या संगोपनासाठी वापर -
पीक मित्रकीड
मका - क्रायसोपा
कोथिंबीर - ट्रायकोग्रामा, मधुमक्षिका
चवळी - लेडी बर्ड बिटल
मुख्य पिकाचे शत्रूकिडीपासून संरक्षण होण्यासाठी सापळा पिके
चवळी - मावा
तीळ - तुडतुडे
अंबाडी - बोंडअळी
तुळशी - रसशोषण करणाऱ्या किडी
झेंडू - पांढरीमाशी, सुत्रकृमी.
बीजसंस्कार -
संवर्धकाचा वापर - ऍझोटोबॅक्टर आणि अझोस्पायरिलम ही जिवाणू खते हवेतील नत्र स्थिरीकरण करण्यास आणि नत्र पिकास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
दहा किलो बियाण्यांस 250 ग्रॅम जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
कापूस -
रस शोषण करणाऱ्या किडी - मावा, तुडतुडे, पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा चार टक्के गोमूत्राची फवारणी करावी. चवळी, मका, अंबाडी यांसारख्या सापळा पिकांचा वापर करावा.
दोन ग्रॅम व्हर्टिसिलियम जैविक बुरशी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीपूर्वी प्रत्येक पंपात 50 मि.लि. गाईचे दूध मिसळणे आवश्यक आहे. पांढरी माशी नियंत्रणासाठी बांधाच्या कडेला तुळस लागवड करावी.
शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, तसेच ट्रायकोकार्डचा वापर करावा. पीक लागवडीनंतर 40व्या, 60व्या, 75व्या दिवशी हे कार्ड शेतात लावावेत. दशपर्णी अर्काची फवारणी करावी. फेरोमेन (इरीस) सापळ्यांचा वापर करावा. मका, ज्वारी, अंबाडी ही सापळा पिके कापसाच्या शेतात लावावीत.
हिरव्या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. ट्रायकोकार्डचा वापर लागवडीनंतर 40, 60, 75 दिवशी शेतात लावावेत. दशपर्णी अर्काची फवारणी करावी. फेरोमन (हेलीओ ल्यूर) सापळ्याचा वापर करावा. एच. एन. पी. व्ही. ची फवारणी करावी. हेक्टरी 15-20 पक्षी थांबे लावावेत. बियूव्हेरिया बासियाना या बुरशीची फवारणी करावी.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय खताबरोबर ट्रायकोकार्डचा वापर करावा.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बाभळीचा कोवळा पाला 100 ग्रॅम अधिक दोन लिटर पाणी उकळावे. ते निम्मे आटवावे. हे मिश्रण 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 200 ग्रॅम आले वाटून दोन लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. त्यानंतर गाळून 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Shri.S.V.Potekar
K.V.K.Baramati.
Source{ Internet }

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा