सेंद्रिय शेतीचा सिक्कीम पॅटर्न
ऋतुजा सावंत
सिक्कीम आकाराने लहानसं राज्य. पर्वरांगांवर वसलेलं असल्याने काही ट्रेकर्सना खुणावणारं. पण आता अनेक पर्यटकही सिक्कीमला भेट देत आहेत. यामागील मुख्य आकर्षण आहे , ते येथील सेंद्रिय शेतीचं. २०१५पर्यंत हे संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं मिशन सरकारने हाती घेतलं आहे. त्यामुळे असा प्रयोग राबवणारं ते जगातलं पहिलं राज्य ठरण्याची शक्यता आहे.
हरितक्रांतीनंतर अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले. परिणामी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा मोठा प्रश्न समोर आला. यासाठी पंजाबचं उदाहरण सर्वपरिचित आहेच. हा धोका लक्षात घेऊन १९३०च्या दरम्यान सेंद्रिय खतांची चळवळ सुरू झाली. भारतात खरंतर त्याआधीच सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाल्याचे दाखले आहेत. परंतु त्याचा हवा तसा प्रचार झाला नाही. म्हणूनच रासायनिक खतांचा वापर सुरूच राहिला. याला सिक्कीम मात्र अपवाद ठरलं. याबाबतीत ते एक आदर्श राज्य म्हणून समोर येतंय. २०१५पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं ' मिशन ' सिक्कीम सरकारने हाती घेतलं आहे. आता ५८ हजार १६८पैकी ८ हजार हेक्टर शेती सेंद्रिय म्हणून प्रमाणित आहे. उर्वरित क्षेत्रावरही हा प्रयोग करण्यासाठी धोरण आखण्यात आलं आहे. भात , आलं , मका , गहू , कांदा , मोहरी , बटाटा , मिरची , टोमॅटो , मोसंबी या पिकांबरोबरच फुलांवरही प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे. ' सिक्कीम ' हाच सेंद्रिय ब्रॅण्ड म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच सिक्कीम केवळ भारतातीलच नव्हे , तर जगातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य ठरेल.
सिक्कीममध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना खरंतर २००३मध्ये पुढे आली. तज्ज्ञांकडून हे ' मिशन ' पूर्ण करण्यासाठी लागलीच आराखडे बांधण्यात आले. याबाबत संशोधन , प्रशिक्षणाच्या पाठबळासाठी स्वित्झर्लंडच्या एफआयबीएल इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक रिसर्चशी सामंजस्य करण्यात आला. राज्यात ' सिक्कीम ऑरगॅनिक बोर्ड ' ही स्थापन करण्यात आलं. २००६-०७पासून राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मिळणारा रासायनिक खतांचा कोटा घेणं बंद केलं. तसंच रासायनिक खतांची विक्रीकेंद्रेही बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्यासाठी २००९पर्यंत २४ हजार ५३६ कंपोस्ट खत आणि १४ हजार ४८७गांडुळ खतांचे युनिट शेतात तयार करण्यात आले.
मार्केटही सज्ज
अशा प्रकारे एक एक पायरी चढत असतानाच या पिकांच्या उत्पन्न आणि उत्पादनाची समस्या होतीच. सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असले तर उत्पादन , मार्केटिंग , किंमत अशा सगळ्याच अंगाने प्रश्न उभे राहतात. परंतु सिक्कीमने या प्रश्नांवरही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ ग्राहकच नाही तर शेतकरीही समाधानी राहील , हे या ' मिशन ' च्या अनेक उद्दीष्टांपैकी एक मुख्य उद्दिष्ट. उत्पादनाची किंमत कमी राहावी , यासाठी शेतकरी थेट माल ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकेल , अशी सोय करण्यात आली आहे. यासाठी राज्यात १० ' किसान मंडी ' तयार करण्यात आल्या आहेत. या व्यवहारात दलालांची साखळी नसते. तसेच दिल्लीमध्ये सेंद्रिय उत्पादनांसाठी खास रिटेल शॉप सुरू करण्यात आलं. या उत्पादनांची विक्री करण्यासाठी १५० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले असून यामध्ये जवळपास १७५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या उत्पादनांचं ब्रॅण्डिंग करण्यासाठीही योजना हाती घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक गांडुळ खत युनिटच्या उभारणीसाठी सरकार १५ हजार , तर कंपोस्ट खताच्या युनिटसाठी २० हजार रुपयांचं अनुदान देतं. तसंच शेतीची गुणवत्ता राखण्यासाठी तज्ज्ञगट नेमण्यात आले आहेत. या गटातील सदस्य प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतात. शालेय वयापासून सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळावं , याकरिता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात सेंद्रिय शेतीविषयक अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. कोणत्याही शेती उत्पादनांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहू नये , हे राज्याचं आणखी एक ध्येय. म्हणजे आयात केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत शंका तर असतेच , शिवाय अधिक पैसेही मोजावे लागतात. म्हणून आमच्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात सगळी उत्पादनं घेण्याइतकं सक्षम व्हावं , असं या मिशनसंबंधी मंत्र्यांचं म्हणणं आहे.
या ' मिशन ' ची व्यापकता मोठी आहे. ते केवळ शेतकऱ्यांच्या फायद्यापुरतं मर्यादित नाही. तर या माध्यमातून टुरिझम व्यवसायाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेती पाहण्यासाठी पर्यटक पसंती देत आहेत. ते उत्सुकतेने अन्नधान्य विकतही घेतात. हे लक्षात घेऊन गावांना टुरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यासाठी काही कुटुंबांना अतिथ्य आणि विविध पदार्थ बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याआधी १४ हजार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या पर्यावरणस्नेही प्रयोगांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जागृती करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीमुळे डेअरी व्यवसायालाही फायदा होतो. चांगल्या दर्जाच्या दुधाचे प्रमाण वाढत आहे. एकूणच हा प्रयोग अनेक अंगाने राज्याची आर्थिक बाजू भक्कम करणारा ठरतोय.
सिक्कीमचा हा प्रयोग आता इतर राज्यांनाही खुणावतो आहे. केरळमधील कसारगड जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प राबवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. याबाबत सिक्कीमचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सिक्कीमच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असल्याने केरळमध्ये अनेक आव्हानं आहेत. पण पुढील दुष्परिणाम लक्षात घेतले तर आता मेहनत करायलाच हवी , असं केरळच्या शेती संचालकांचे म्हणणं आहे.
लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने सिक्कीम हे लहान राज्य असल्याने तेथे हा प्रयोग यशस्वी होत आहे , असा एक सूर आळवला जातो. पण सिक्कीम पॅटर्नवर अजून थोडं काम केलं तर मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांनाही तो राबवणं कठीण नाही. त्यासाठी प्रबळ इच्छा आणि सांघिक प्रयत्नांचं भांडवल मात्र हवं.
सेंद्रिय शेती काळाची नव्हे तर आरोग्याची गरज
राजकुमार चौगुले
by - agrowon
अनेक मठांमध्ये केवळ धार्मिक संस्कार केले जातात. पण कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील "सिद्धगिरी" मठ मात्र याला अपवाद आहे. येथे केवळ धर्म प्रभावना न करता त्याला सेंद्रिय शेतीच्या प्रसाराची जोड दिली जाते. मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. त्याला सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे प्रयत्न सर्वत्र व्हावेत, अशी भावना मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर यांची आहे
सध्या रासायनिक घटकांचा अतिरेक होतोय, याबाबत आपले मत काय?
सध्याचे युग हे रासायनिक घटकांच्या अतिवापर करणारे बनत आहे. रासायनिक खते, कीडनाशके यांचा अतिवापर, जनुकीय बदल केलेली अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, फास्टफूड याचा अमर्याद वापर, याबरोबरच कारखाने व उद्योगांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे नद्या, झरे, विहिरी, तळी, समुद्र यांतील जलचरांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचीही अपरिमित हानी झाली आहे. जमिनी नापिक होत आहेत. अन्नधान्य, दुग्धोत्पादन, मांस उत्पादनातही विषारी अंश आढळत आहेत. याचा विपरीत परिणाम शरीरातील महत्त्वाच्या संस्थांवर होत आहे. पुढील पिढीच्या जनुकावरही त्याचा विपरीत परिणाम होतोय. एकूणच परिस्थिती चिंताजनकच आहे.
हे संकट टाळायचे असेल तर याला काय उपाय आहे?
सध्या शेती नापिक होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आपले गोधन, पशुधन, निरोगी कसे राहील, याबाबत गंभीर राहावे लागेल. सेंद्रिय शेती ही आता काळाची नाही, आरोग्याचीच गरज आहे. गोवंश आधारित शेतीमुळे परिस्थिती बदलणे शक्य आहे. हजारो वर्षांपूर्वीचा आपला शेतीचा इतिहास पाहिला तर गोपालन व शेती याचा अतूट संबंध आहे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या करून आपण निरोगी व सुखी होऊ शकत नाही. गुरुमाऊली, जलमाता, भूमाता, गोमाता यांचे सहजीवनातूनच आपली संस्कृती फुलली आहे. मात्र पाश्चात्त्यांच्या नादाने आपण आपली संस्कृती विसरलो आहोत. आपल्याच हाताने आपल्या आरोग्यरूपी पायावर दगड पाडून घेत आहोत. रासायनिक खते व औषधे वापरल्याशिवाय शेतीत उत्पादनच देत नाही, अशी ठाम समजूत झाल्यानेच सगळा घोटाळा व गोंधळ झाला आहे. पाश्चात्त्य देश भारतीय ज्ञान, विज्ञान, तत्त्वनीती, देशी बी-बियाणे यांच्या मूळ जातीचे संवर्धन करून त्यापासून विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधत आहेत. आम्ही मात्र पाश्चात्त्यांनी टाकाऊ ठरवून फेकून दिलेला चोथा आवडीने स्वीकारत आहोत, याला शहाणपणा म्हणता येईल का? सध्या तरी सेंद्रिय शेती करणे व त्या उत्पादनांचा वापर आहारात करणे याशिवाय कोणताही उपाय नाही.
सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त कसे करता येईल?
अलीकडच्या काळात रासायनिक घटकांच्या प्रभावामुळे सध्या याच प्रकारची शेती करणे शेतकऱ्यांना आवश्यक वाटते. अनेकदा शेतकरी जमीन व आरोग्य वाचविण्यासाठी सेंद्रिय शेती करतो. पण त्याला अपेक्षित यश मिळत नाही. ते केवळ या मालाचे मार्केटिंग नसल्यामुळे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्न हे उपकारक आहे. या अन्नाची एक वेगळी "व्हॅल्यू' आहे. हे ग्राहकांपर्यंत पोचायलाच हवे. यासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी यापेक्षा सेंद्रिय पदार्थ कसे विकावेत, त्याला वेगळे मार्केट तयार कसे होईल, हे पाहणे गरजेचे आहे. माझ्या मते सेंद्रिय उत्पादनाला सातत्यपूर्ण मागणी करणारा ग्राहक तयार करणे आवश्यक वाटते. मठ, विविध धार्मिक ठिकाणे, जिथे सर्व थरातील लोक जमतात तिथे सेंद्रिय उत्पादनाची जागृती करण्याबाबत प्रयत्न व्हायला हवेत. आपले उत्पादन जर चांगल्या दामाने विकू लागले, तर शेतकऱ्यांत उत्साह निर्माण होईल. असे झाले तर शेतीसाठी लाखो, करोडो रुपयांची रासायनिक खते, तणनाशके, जंतुनाशके यावरील खर्चाची बचत होईल. आरोग्यासाठी होणारा खर्च वाचेल, जमिनीचे नापिकतेचे प्रमाण कमी होऊन उपजाऊ जमिनी वाढतील. निरोगी, बलवान, बुद्धिमान पिढ्या तयार होतील.
सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी आपल्या मठाने आतापर्यंत काय प्रयत्न केले आहेत?
"सिद्धगिरी" मठाने केवळ धार्मिक कार्यच न करता या कार्याला सेंद्रिय शेतीची किनार दिली आहे. मठाच्या मालकीच्या शेतात गेल्या कित्येक वर्षांपासून सेंद्रिय शेती सुरू आहे. सुमारे शंभर एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जात आहे. यामध्ये उसासह भुईमूग, हळद, आंबा, आवळा, सागवान आदी प्रकारची शेती केली जाते. आता पॉलिहाऊसमधूनही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे. यातून येणाऱ्या उत्पादनाची सिद्धगिरी मठातच विक्री केली जाते. मठाला हजारो लोक भेट देतात. त्यांच्यामध्ये ही उत्पादने आता सवयीची झाली आहेत. याशिवाय मठाच्या वतीने सेंद्रिय शेती वाढविण्याबाबत विविध संस्थांच्या, शासनाच्या साहाय्याने शिबिरांचेही आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय प्रवाहात यावा यासाठी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. त्याला आता चांगले यश येऊ लागले आहे. देशभरातील भक्तगणांच्या माध्यमातून विविध मार्गांनी आम्ही ही चळवळ पुढे नेत आहोत. उदाहरण जर द्यायचे झाले तर मठातील प्रवचन झाल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून संकरितपेक्षाही जादा उत्पन्न देणारे देशी बी आम्ही देतो. कोणत्याही मार्गाने हे बी संबंधितांच्या शेतात जावे व देशी वाण वृद्धिंगत व्हावे हा आमचा उद्देश आहे. याशिवाय सुमारे दोनशे गाईंचा समावेश असलेली गोशाळा आम्ही उभारली आहे. येथे केवळ दुर्मिळ देशी गायींचा संग्रह आहे. यातून मिळणारे शेणखताचा वापर आम्ही सेंद्रिय शेतीसाठी करतो. यामुळे आमची जमीनही सुपीक राहते आणि आरोग्यही. याशिवाय गोमूत्र, दूध, तूप आदींची विक्री आम्ही मठातच करतो. आमचा सेंद्रिय गूळ तर सत्तर रुपये किलो या दराने जातो. तुपाची पंधराशे रुपये किलोने विक्री होते. असे अनेक पदार्थ मठातून विकले जातात.
"सेंद्रिय शेती"ला बळकटी देण्यासाठी भविष्यात आपले काय प्रयत्न असणार आहेत?
शेतकऱ्याला पहिल्यांदा सेंद्रिय शेतीकडे वळवायला लागेल. तत्पूर्वी त्याच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हे महत्त्वाचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी सेंद्रिय शेतकऱ्यांची चळवळ मठाच्या वतीने आम्ही उभी करणार आहोत. गाववार शेतकऱ्यांचे गट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गावातील सुमारे शंभर शेतकरी यात सहभागी व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येकाने भाजीपाला, धान्य, देशी गाईंच्या दुधाचे निरंतर उत्पादन करावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील. शहरातील लोकांना ते हमीभावाने कसे देण्यात येईल याचाही विचार सुरू आहे. मठाचे भक्तगण देशभरात आहे. त्यांच्याकडून याबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सुरवातीला मागणी किती येते, हे पाहून उत्पादनाचे गणित मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शहरी ग्राहकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादने वापरावीत यासाठी प्रामुख्याने कोणते प्रयत्न करता येतील, हे सध्या आमच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहकांना देशी गाईचे दूध व दररोजचा भाजीपाला दररोज मागणीप्रमाणे देणे महत्त्वाचे आहे. शहरी लोकांनीही या चळवळीत सहभागी व्हावे, असे आमचे आवाहन आहे. कारण खरा फायदा त्यांचाच आहे. विषमुक्त अन्न खाऊन आरोग्य जपणे, पुढच्या पिढीला सुदृढ बनविण्यासाठी सेंद्रिय पदार्थाशिवाय आता पर्यायच उरला नाही. देशी गाईंचे महत्त्व कळावे यासाठी येत्या काही दिवसांत गाववार गोपरिक्रमा, देशी गाईंच्या स्पर्धा व प्रदर्शनही घेत आहोत.
काडसिद्धेश्वर यांच्याविषयी...
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आदी राज्यांतील आध्यात्मिक परंपरेत काडसिद्धेश्वर हे दीपस्तंभ आहेत. साधी राहणी, अभ्यासपूर्ण मांडणी, चौकस व कुशाग्रबुद्धी आणि प्रेमळ बोलणे यातून त्यांनी समाजाशी असलेले नाते कायमपणे दृढ ठेवले आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या नैसर्गिक ओळखीचे संवर्धन करत त्यांनी साकारलेले सिद्धगिरी म्युझियम, सिद्धगिरी प्राचीन प्रतिभावंत प्रकल्प त्यांच्या भारतीय संस्कृती विषयीच्या आस्थेची उदाहरणे आहेत. केवळ धार्मिक मठ म्हणून कार्यरत न राहता मठाला येणाऱ्या भक्तांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातही धार्मिक कार्यक्रमांबरोबर सेंद्रिय शेती वाढविण्याबाबतचे कामही त्यांच्या मठामार्फत होणार आहे.
------------------------------
---------------------------
"देशभरातील भक्तगणांच्या माध्यमातून अनेक मार्गांनी सेंद्रिय शेती चळवळ पुढे नेत आहोत. उदाहरण जर द्यायचे झाले तर मठातील प्रवचन झाल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून संकरितपेक्षाही जादा उत्पन्न देणारे देशी बी आम्ही देतो. कोणत्याही मार्गाने हे बी संबंधितांच्या शेतात जावे व देशी वाण वृद्धिंगत व्हावे हा आमचा उद्देश आहे.''
- मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर
------------------------------ ---------------------------
*********************************
सेंद्रिय शेतीला राजाश्रय मिळावा
-
- by - agrowon
जगभर सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढत आहे. भारतातही सेंद्रिय चळवळ जोर धरत आहे; मात्र योग्य तंत्रज्ञान, बाजारपेठेअभावी शेतकरी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करण्यास धजावत नाहीत. कमी खर्चात विषमुक्त, आरोग्यदायी अन्न उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या शेतीला राजाश्रयाची गरज आहे.
भारतीय शेतीस प्राचीन संस्कृती आहे. पूर्वी ऋषी- मुनी जंगलात राहून नैसर्गिक शेतीच करीत असत. समाजप्रिय मानव पुढे समूहाने राहू लागला. त्यातून गाव, वाड्या-वस्त्या निर्माण झाल्या. लोकसंख्या वाढत असल्याने मर्यादित शेतीक्षेत्रातून अधिक उत्पादन घेणे गरजेचे बनले. पिकांच्या नवनवीन जाती आणि त्यास रासायनिक खते, कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर होऊ लागलाय. याद्वारे उत्पादनात मोठी वाढ झाली, मात्र किंमतही मोठीच मोजावी लागली. माती, पाणी आणि अन्न प्रदूषित झाले. एवढेच नव्हे, मातेच्या दुधातही कीडनाशकांचे अंश आढळले आहेत. अनेक ठिकाणी जमिनी नापिक होत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशकांच्या किमती भरमसाट वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला. शेतीतील खर्च कमी करत विषमुक्त अन्न तयार करण्याच्या हेतूने "सेंद्रिय शेती' संकल्पना विकसित झाली, ती शेतकऱ्यांमध्ये रुजली; मात्र अजूनही या शेतीला राज्यात राजाश्रय मिळाला नाही.
आज राज्यात अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत; मात्र त्यात अप्रमाणित सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रमाणित शेतकरी "लेबल' लावून, तर अप्रमाणित शेतकरी केवळ नावावर सेंद्रिय माल अधिक दराने विकत आहेत. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आल्याने सेंद्रिय मालाकरिता ते चार पैसे अधिक मोजू लागले आहेत. अप्रमाणित शेतीमाल खरेदीत ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. सेंद्रिय खते, वनस्पतिजन्य- जैविक कीडनाशके, संजीवके यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक ठिकाणी बोगस उत्पादने देऊन काही नफेखोर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार उघड झाले आहेत. यावर राज्यात शासनस्तरावर काहीही नियंत्रण नसावे, ही दुर्दैवी बाब आहे. कर्नाटक राज्यात "आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती स्पर्धाक्षम केंद्रा'च्या पुढाकाराने सेंद्रिय साखळी उभी राहत आहे. ईशान्येकडील सिक्कीम, मिझोराम ही राज्ये विशिष्ट मिशनद्वारे संपूर्ण सेंद्रिय राज्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. बिहार सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील एक- एक गाव सेंद्रिय करण्याचा आराखडा बनविला आहे. पाश्चात्त्य देशांतही सेंद्रिय शेतीमालाची बाजारपेठ विस्तारत आहे. महाराष्ट्रातही अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळू लागला असतानाही शासनस्तरावर फारसे प्रयत्न झालेले नाहीत. तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळात "सेंद्रिय शेतीचा मसुदा' तयार करण्यात आला, त्यास अजूनही अंतिम स्वरूप मिळालेले नाही. कर्नाटक, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्राने विशिष्ट "मिशन'द्वारे सेंद्रिय चळवळीच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. शासनस्तरावर विशिष्ट यंत्रणेद्वारे सेंद्रिय शेतीस मान्यता मिळाली नाही, तर शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल; तसेच शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही, हेही ध्यानात ठेवावे.
s-----
हिरवळीचे खते
हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.
हिरवळीच्या खताचे फायदे :-
• ही ळते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
• फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
• मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
• मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
• मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
• सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .
या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
हिरवळीच्या खतांचे प्रकार -
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .
१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.
हिरवळीचे खते
२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
५) कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल .
हिरवळीच्या खतांची पिके :-
१) ताग / बोरु - ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते .
२) धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .
या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .
३) घेवडा :- हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे .
४) सेंजी :- रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०त े ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे .
५) द्विदल कडधान्याची पिके :- पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.
६) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) - झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .दुस-या
पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो .या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते .
गिरीपुष्पाची पाने धैचा .मेंड व वनझाडाचा पालापाचोला यापेक्षा जलद कुजतात .गिरीपुष्पाच्या पानांम्ध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते .सेंद्रिय कर्ब ३६ टक्के ,नत्र २. ७० टक्के ,स्फूरद ०. ५ टक्के व पालाश १ .१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे .
सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याच्या शेतक-यांचे हिरवळीच्या खतांचे प्रयोग :-
काही सेंद्रिय शेतक-यानी हिरवळीच्या खतांचे अनेक प्रयोग पीक उत्पादनातील वाढ अनुभवली आहे . जागेवरच हिरवळीच्या खतांची लगवड करण्याच्या प्रयोगात तीन फुट अंतरावर कापूस किंवा तुराची पेरणी करून पिकात मूग , उडीद ,अशी अल्प मुदतीची पिके घेऊन त्यामुळे निर्माण होणा-या हिरवळीचा फायदा मुख्य पिकाला होतो . पाँण्डेचरीमधील आँरव्हिले या गावी मिश्न बियाणे पेरुन २५ ते ३० दिवासांनी जागेवरच गाडून त्यापासून खत व आच्छादन म्हणून वापर केला जातो .काही शेतकरी पिकांच्या दोन ओळींमध्ये एकदल ,द्विद्ल तेलबिय ताग ,धने इत्यादी सर्व प्रकारचे बी एकत्र मिसळून एकरी १० कि .ग्रँ .या प्रमाणात फेकून मातीने झाकतात पेरणीनंतर ३० दिवसांनी मुख्य पीक स्वच्छ ठेवून नंतर अॅरोग्रीन पेरावे व ते मूळ पिकापेक्षा उंच होऊ लागले की जागेवरच पाडावे .अशाप्रकारे १० किलो बियाण्यांपासून ४ ते ५ टन हिरवळीचे खत मिळते .या हिरवळीच्या खताचे पूथ:करण केले असता त्यापासून एकरी ४० किलो नत्र उपलब्ध होतो शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी असून आपल्या शेतात अधिकधिक जैविक विविधता निर्माण करून पिकांना आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते.
गांडूळ खत
अँरिस्टाँटल या ग्रीक शास्तज्ञाने प्रथम गांडूळाचे जमिनीतील कार्य ऒळखले ,त्यानी गांडूळांना पुथ्वीची आतडीअ से म्हटले आहे .
डार्विनच्या मताप्रमाणे गाडूळ जमिनीतील मेलेल्या प्राण्यांचे ,वनस्पतीचे ,काडी कच-याचे विघटन करून जमिनीची संरचना सु्धारून जमीन सुपिक करतात .गांडूळामुळे जमिनीत हवा खेळत
गांडूळाचे फायदे :-
१) सेंद्रिय पदार्थाचे विघटन
२) सेंद्रिय पदार्थाचे जमिनीतील वितरण.
३) गवत व झाडांच्या पानांचा थर साठून झालेली घटट चटई गांडुळ फोडून काढ्तात.
४) जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढते .
५) सेंद्रिय पदा्र्थापासून पीकांचे अन्नद्रव्य पीकांना उपलब्ध करतात .
६) जमिनीच्या कणांची कणीदार संरचना करण्यास गांडुळ मदत करतात .
७) जमिनीची जलधारण क्षमता वाढते .
८) गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळ्या खोल वाढतात ,पाणी लवकर मुरते व हवा खेळती राहते.
९) पाण्यचा निचरा चागंला होतो.
१०) पिकांचे व गवताचे उत्पादन वाढते .
११) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते .
१२) गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे करून खातात व जमिनीत मिसळतात त्यामुळे जीवाणूंची चागंली वाढ होते .
सेंद्रिय पदार्थाचे विघटन
सेंद्रिय पदार्थ (वनस्पतीचे व मेलेल्या प्राण्याचे अवशेष ) जमिनीत असतात.त्यावर सुक्ष्म जीवाणूं ,गाडूळ व इतर सुक्ष्म जीवजंतु व प्राणी उपजीविका करुन त्या पदार्थाचे विघटन करतात .व वाढीसाठी हे विघटन पदार्थ पिकांचे अन्नद्रव्य म्हणून पिकांच्या वाढीसाठी वापरले जातात .
गांडूळ जमिनीतील पाला-पाचोळा,मुळ्या इ . विघटन करतात हे पदार्थ त्यांच्या (गांडूळांच्या) पचन संस्थेत प्रवेश केल्यानतंर विविध विकरांचा परिणाम होऊन त्यांचे विघटन होते .
सेंद्रिय पदार्थ हे गांडूळांचे अन्न आहे म्हणून ते मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ खातात .गांडूळाच्या काही जाती सेंद्रिय पदार्थासोबत मातीपण खातात .
गांडूळाच्या विष्ठेत कँलशियम ,मँग्रेशीयम ,पलाश ,स्फुरद व मालीबडेनम ही अन्नद्रव्ये असतात.
गांडूळे व जमिनीची सुपिकता
गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व खनिज नत्राचे प्रमाण वाढते .
गांडूळ खत (व्हमी कंपोस्ट )
ज्या खतात गांडूळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ ,गाडूळाची अंडीपुंज ,त्यांच्या बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो त्या खतास गांडूळ खत म्हणतात .
जाती :आयसेनिया फिटीडी ,युड्रीलस ,लँम्पेटो मारूटी
संरक्षण :-उन्हाळ्यात ताट्याचे छप्पर, पावसाळ्यात प्लास्टिकचे छप्पर
१) गादी वाफे पध्दत
गादी वाफ्याची रुदी २ .५ फुट ते ३ फुट
लांबी आवश्यकतेनुसार
उंची ३-४ इंच ,एक किवा अनेक वाफे तयार करावयाचे असल्यास दोन वाफ्यातील अंतर १ फुट असावे. वाफ्यात ऊसाची वाळलेली पाने,गवत ,पालापाचोळा ,शेतातील काडीकचरा इ . पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून वापरावे.
२) गांडूळाच्या खाद्य पदार्थाचे मिश्नण तयार करणे
असे मिश्नण मोकळ्या जागेत तयार करावे .
३ ते ५ दिवसापूर्वी गोळा केलेले शेण व घरातील ,शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचे मिश्नण समप्रमाणात फावड्याने एकत्र करावे आणि हे मिश्नण पाणी टाकून मऊ होईपर्यत एकत्र करावे.
३) खाद्यपदार्थाचे मिश्नण तयार केलेल्या गादी वाफ्यावर घमेल्याच्या साहाय्याने टाकावे .दोन घमेल्यांच्या मध्ये तिसरे घमेले या पध्दतीने सर्व वाफभर टाकावे .
४) खाद्य मिश्नणावर गांडूळ किवा ताजे गांडूळ खत टाकणे
५ घमेले खाद्य मिश्नणावर १०० गांडूळे किंवा १ किलो अंडी (मातीसहित ) सोडावी .
५) खाद्यमिश्नणावर गवत किवा जुनाट पोती (बारदान ) अच्छादन
गांडूळाचे पाली,बेडूक ,साप ,उंदीर ,कोंबडी इतर पक्षी यांच्यापासून रक्षण करण्यासाठी जुनाट पोत्यांचे आच्छादन करावे
६) खाद्यमिश्नणाच्या आच्छादनावर नियमित पाणी टाकावे .
उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळेसे ( सकाळ / संध्याकाळ ) पाणी टाकावे .
७) गाडूळखत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळ वेगळॆ करणॆ :-
४० ते ४५ दिवस खत तयार होण्यासाठी लागतात ,पुढे कमी कालावधी लागतो . शेवटच्या ४ ते ५ दिवसात खाद्यमिश्नणावरील आच्छादन बाजुला काढून पाणी टाकणॆ बंद करावे .जसे जसे खत कोरडे होईल तसे गांडूळ आत खाली शिरतील ,कोरडे खत चाळणीच्या ( २ .५ मि.मि ) साहाय्याने चाळून घ्यावे .जे गांडूळ चाळणीत येतील त्यांचा वापर परत करावा .
गांडूळ खत तयार करण्याच्या दोन पध्दती
१) खाद्य पदार्थाचे मिश्नण तयार करणे व गांडूळ सोडणे .
२) थर पध्दती :- ही पध्दत कमी प्रमाणात गांडूळ खत तयार करावयाचे असेल तर वापरतात .
पाला-पाचोळा,वाळलेली पाने ,नारळाच्या काथ्या असा पहिल थर २ इंचाचा थर द्यावा .
दुस-या थरात वाळलेल्या शेणाच्या भुकटीचा एक इंचाचा थर द्यावा व नंतर १० इंचाचा गांडूळाच्या खाद्याचा थर द्यावा व त्यावर ताजे खत टाकावे .या नंतर तयार केलेल्या वाफ्याला भिजवावे व ५०० गांडूळ /घनफूट जागेसाठी सोडावीत व नंतर पोत्याने आच्छादन द्यावे .
गांडूळ खत तयार करण्याच्या प्रक्रिया
गांडूळ पाणी (स्त्राव ) (वर्मी वाँश )
गांडूळाच्या शरीरातून पाझरणा-या सिलोमिक फ्युइडला व मुत्राला "गांडूळपाणी " अथवा वर्मी असे म्हणतात .
गांडूळखत करतांना सुध्दा आपण गांडूळ पाणी काढू शकतो .
गांडूळपाणी तयार करण्याच्या पध्दती :-
१) एकात एक जाणारी दोन भांडी घ्यावी .आतील भांड्याच्या तळाजवळ एका बाजूने तोटीची सोय केलेली असावी .आतील १२ ते १६ लिटरच्या भांड्यात शेण मिश्नीत अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ भरावे .त्यामध्ये १ ते २ कि .ग्रँ .गांडूळे सोडावी .सेंद्रिय पदार्थ जलद कुजण्यासाठी पुरेसे पाणी या पदार्थावर फवारावे .गांडूळे जसजशी सेंद्रिय पदार्थाचे सेवन करतात तसतसे त्याचे गांडूळ खतात रुपांतर होते .या गांडूळखतावर थोडे अधिक पाणी काही कालांतराने फवारावे ,त्यामुळे आतील भांड्यामधुन बाहेरच्या भांड्यात जाडसर रंगीत द्रव तोटीद्वारे बाहेर पडून बाहेराच्या भांड्यात साचतो .हा द्रव रबरी तोटीने ओढून बाटलीत गोळा केला जाती यालाच "गांडूळ पाणी " असे म्हणतात .
गांडूळ खत
२) गांडूळ पाणी तयार करण्यासाठी चांगली पूर्ण वाढलेली १ कि.ग्रँ वजनाची गांडूळ गोळा करावीत .त्याची कात बाजूला वेगळी करावी .नंतर १५ ते २० मिनीट त्यांना एका प्लास्टिकच्या पसरट भांड्यात ठेवून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे टाकाऊ सेंद्रिय पदार्थ वेगळे करून गांडूळे स्वच्छ करुन घ्यावीत .नंतर प्लास्टिकच्या भांड्यात ५०० मिली .कोमट पाणी घेऊन ही गांडूळे ३ मिनीट या पाण्यात सोडून ती चांगली ढवळून घ्यावीत ,नंतर दुस-या भांड्यात ५०० मि .ली . थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोन मिनीट ढवळून घ्यावीत .ही गांडूळे पुन्हा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरता येतात .आता दोन्ही भांड्यातील द्रावण एकत्र मिसळून पिकांवर फवारण्यासाठी वापरावे
************************************************
सेंद्रिय शेतीतील जिवंत घटक
प्राचीन काळापासुन जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण या जमिनीला भूमाता असे संबोधतो .ज्याप्रमाणॆ पशुपक्षी मनुष्य ,प्राणि आणि वनस्पती जिवंत आहे .त्यावप्रमाणे माती सुध्दा जिवंत आहे .त्यात असंख्य जीवजंतु वास्तव्य करुन राहतात .त्यामुळे आपण या भू-मातेला सजीव आहे असे समजतो.
मनुष्य दिवसेदिवस स्वार्थी होत आहे .तो स्वत:च्या फायद्यासाठी जमिनीकडे दुर्लक्ष करत आहे ज्याप्रमाणे मनुष्य श्वासोच्छवास करतो .त्याप्रमाणे माती सुध्दा श्वास घेते .मनुष्याला ज्याप्रमाणॆ ऊन,वारा ,पाऊस रोग यापासुन संरक्षण करण्याची गरज आहे .त्याचप्रमाणे मातीचे सुध्दा यांपासुन संरक्षण करण्याची गरज आहे ,कारण सुध्दा निसर्गाचा एक जिवंत घटक आहे .आपल्याला पुर्वजांनी ही संपत्ती जशी जीवंत सोपवली आहे ,त्याप्रमाणे आपणसुध्दा तिचा सांभाळ करून येणा-या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवली पाहिजे त्यामुळे अमुल्य अशा मातच्या थरांचे जतन करणे, शेतीचे अस्तित्व टिकवून ठेवणॆ हे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण मूदेचे संरक्षण करणॆ आधुनिक जीवनाचा अविभाज्य घटक ठरतो .
पुर्वी, जमिअनीवर झाडे -झुडपे व गवत यांचे आच्छादन होते, त्यामुळे वारा ,पाऊस इ पासून जमिनीचे संरक्षण व संवर्धन नैसर्गिकरित्या होते असे .पंरतू कालांतराने जमिनीवरील झाडे गवत इत्यादीचा नाश होऊ लागला, परिणामत:जमिनीच्या धुपेचे प्रमाण वाढत गेले .जमिनीच्या धुपेमुळे झाडांच्या मुळांचा आधार निघून जातो आणि त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होतो व जमिनीची सुपीकता कमी होते .पीक उत्पादन घटण्यास जमिअनीची धुप व त्याबरोबर होणारा पाण्याचा -हास ही दोन प्रमुख कारणे आहेत .एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला साधारण ३०० ते १००० वर्ष लागतात . परंतु मानवाच्या निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होऊ शकतो .धुपेचे भयानक रुप विचारात घेतले तर मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणॆ अत्यंत आवश्य्क आहे.
मुख्यत्त्वे करुन सहा प्रकारच्या जमिनी आढळून येतात .
१) अतीउथळ जमीन - या जमिनीचा रंग करडा, खोली ७ .५ से .मी . पर्यत ,पोत मध्यम ते जाड निचरा जास्त व उपलब्ध पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आढळते .या जमिनीचा सामु ७ ते ८ च्या दरम्यान असून ह्या जमिनीची धुप कमी करण्यासाठी वेगाने वाढणारी वनपिके जसे कडुलिंब ,बाभूळ ,सीरस ,निलगीरी,बांबु वनकर्णी आणि कोरडवाहू ,फळझाडे जसे - बोर ,सिताफळ इ लावणे फायदेशीर ठरते .धुप कमी करण्यासाठी तसेच ओलावा टिकविण्यासाठी सलग कंटुरचर पध्दतीचा वापर करणे योग्य ठरते .
२) उथळ काळी जमिन - या जमिनीचा रंग करडा ते सौम्य काळा ,खोली ७ .५ ते २५ से .मी .च्या दरम्यान पोत मध्यम ,निचरा जास्त आणि उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी आढळून येते ,या जमिनीचा सामु ७ .५ ते ८ .५ च्या दरम्यान असुन या जमिनीत कडधान्ये तेलबियांची पिके, कूषी ,वनशेती कूषी, फळबागा घेणॆ फायद्याचे ठरते ओलावा टिकविण्यासाठी समतल चर वरील वनस्पती ,बांधाला समांतर मशागत तसेच झाडे लावतांना समतल चर पध्दतीचा वापर करणे फायदेशीर ठरते .
३) मध्यम खोल काळी जमिन - या जमिचा रंग करडा ते काळा, खोला २५ ते ५० से .मी .सामू ७ .५ ते ८ .५ च्या दरम्यान आढळतो .या जमिनीचा पोत मध्यम ,तर उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी आढळून येते .या जमिनीमधे चुनखडी भरपूर प्रमाणात आढ्ळून येते . अशा जमिनीचा कपाशी (देशी ) ,तुर ( लवकर येणारी) कडधान्य व तेलबियांची पिके घ्यावीत .ओलावा टिकविण्यासाठी कंटूरवरील वनस्पती ,बाधाला समंतर मशागत ,तसेच रुद वरबा-सरी पध्दतीचा वापर करणॆ फायदेशीर ठरते .
४) खोल काळी जमिन - या जमिनीचा रंग करडा ते अती काळा ,खोली ५० ते १०० से .मी .सामु७.५ ते ८ .५ व चुनखडीयुक्त आढळून येते .या जमिनीत संकरीत कपाशी ,तुर ( उशीरा येणारी ) आंतरपिके तसेच दुबार तसेच रुद वरंबा सरी पध्दतीचा वापर करणे फायदेशीर ठरते .
५) तपकीरी रंगाची जमिन - या जमिनी मध्यम ते खोल ,धुप झालेल्या ,आम्ल ते निष्क्रीय, सामू ६ .५ ते ७ .५ आढळून येतात .अशा जमिनीत उपलब्ध पाण्याचे प्रमाण व पाणी मुरविण्याची क्षमता मध्यम आणि उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण कमी आढळून येते .या जमिनी भात विकास तसेच साग ,बांबू ,निलगीरी या वनविकासास योग्य आढळून येतात .ओलावा टिकविण्यासाठी वनपीकांची समतल लागवड करणॆ योग्य ठरते .
६) खारवट व चोपण जमिनीची सुधारणा-
प्रकार गुणधर्म
१) खारवट जमिन विद्राव्यक्षाराचे प्रमाण जमिनीत अधिक असते .विद्युत वाह
कता ४ डेसीसायमन / मिटरपेक्षा जास्त ,विनिमयात्माक सोडीयम१५ टक्के पेक्षा कमी व जमिनीचा आम्लविम्ल निर्देशाक ८ .५ पेक्षा कमी
२) चोपण जमिन आम्लविम्ल निर्देशांक ८ .५ पेक्षा जास्त विद्युत वाहकता ४ डेसीसायमन / मिटरपेक्षा कमी व जमिनीत विनिमयात्मक सोडियम १५ टक्केपेक्षा जास्त.
खारवट जमिनीची सुधारणा -
१) शेतात चर खोदावेत .
२) शेतात पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करून ते द्वारे शेताबाहेर काढावे .
३) पीकांच्या फेरपालटित हिरवळीची पीके घ्यावीत .
४) भात ,गहू ,कपाशी ऊस या सारखी क्षार सहनशील पीके घ्यावीत व मध्यम सहनशिल असणारी धान,ज्वारी,गहू, सुर्यफुल ,सोयाबिन ,बाजरी ,पे्रु ,चिकू ,डाळिंब ,बोर ही पीके घ्यावीत ,धैचा पीक घेऊन त्याचे हिरवळीचे खत करावे .
५) ओलीताखालील शेत पडीक ठेवू नये ,जमिन नेहमी पिकाखाली ठेवावी अन्यथा शेत जमिन क्षारयुक्त होऊ शकते .
चोपण जमिनीची सुधारणा -
१) जमिन सपाट करुन योग्य अंतरावर चर काढावेत .
२) क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनत भात ,गहू ,ऊस ,कापूस यासारखी क्षारसहनशील पिके घ्यावीत .
जमिनीची धुप म्हणजे काय ?
भुपूष्ठावर पडणारे पावसाचे थेंब ,वाहते पाणी आणि गतीमान वारा यांच्यामुळे अलग होऊन एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी मातीच्या कणांच्या स्थालतर होण्याच्या क्रियेला जमिनीची धुप म्हणतात .
मातीच्या या कणांची धुप पुढील दोन प्रकारे होते .
१) विधायक धुप :- भुपूष्ठावर गवताचे आच्छादन असते ,दाट झाडी असते .या जमिनीची धुप इथे फार मंद असते . २ते ३ से .मी .थरापर्यत जमिनीचीधुप होण्यास ५ ते ७ हजार वर्ष लागतात .उलट पालापाचोला ,सेंद्रिय पदार्थ यापासून माती बनण्याची क्रिया माती वाहून जाण्याच्या क्रियेपेक्षा पुष्कळ जलद असते .त्यावेळी जमिनीची झीज ,वहन व भरण या क्रिया एक दुस-याची उणीव भरुण काढून जमिनीत समतोल कायम ठेवतात .उंचवट्यावरील मातीचे कण सखल प्रदेशात साठविले जातात .या कणांमध्ये सेंद्रिय पदार्थाचे कण असल्यामुळे सुपीक जमीन तयार होते .या प्रकारच्या धुपेस नैसर्गिक धुप असे म्हणतात .ही धुप विध्वंसक नसुन विधायक समजली जाते .
२) विध्वंसक धुप :- दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मानवाने जमिनीवरील झाडॆ,गवत ,अरण्ये इ नायनाट करुन जमिनीला नांगरले ,कुळवले व जमिनीवरील आच्छादन नाहिसे केले .त्यामुळे धुपोत्पदक शक्तीची गती वाढली .कालांतराने माती तयार होण्याची क्रिया व धुपून / धुवून जाण्याची क्रिया यामधील समतोल नष्ट झाला .
ज्या भारी संपन्न जमिनी तयार करण्यास निसर्गास सहस्त्रावधी वर्ष लागली त्याजमिनी काही वर्षात नष्ट झाल्या ,अशा धुपेला "विध्वंसक धुप " म्हणतात .
जमिनीच्या धुपेस पुढील बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत :-
१) पावसाचे आदळणारे थेंब २) वाहते पाणी ३) गतीमान वारा ४) सुर्याची प्रखर उष्णता ५) भुभागावरील क्रियाशील घडामोडी :-
जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब जोराने व वेगाने आघात करतात त्यामुळे जमिनीच्या वरचा भाग ठीसुळ होऊन पूष्ठभागापासून हा अलग होतो . त्याचप्रमाणे नेहमी ही क्रिया घडत असल्यास जमिनीची पोत बिघडतो जमिनीवरुन वाहणारे पाणी जमिनीला खरवडून माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्य़ाचे काम करते .त्याचप्रमाणे वाहते पाणी नद्यांमधून किंवा नाल्यांमधून वाहत असतांना किना-याची व तळाची बारीक झीज या वाहत्या पाण्यामुळे होत असते .
वाळ्वंटीय भागावरुन जोराने वाहणारा वारा किंवा धुळ वा-याबरोबर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहुन जाते .भूपुष्ठावर व भूगर्भात बरेच जीव-जीवाणू असतात, त्यांच्या हालचालीमुळे जमिनीचा टणकपणा नष्ट होतो व ती वा-याने किंवा पाण्याने सहज दुस-या ठिकाणी वाहून जाते . मनुष्यप्राणी जमिनीचा अधिक पण चुकीचा वापर करतो, त्यामुळे जमीन धुपेला बळी पडते .सुर्याच्या प्रखर किरणांनी व अत्यंत थंडीमुळे सुध्दा जमिनीच्या पूष्ठभागाचे आकुंचन व प्रसरण हिऊन जमिनीची धुप होण्यास मदत होते.
शेतक-यांनी करावयाचीमूद संधारणाची कामे :-
समपातळीतील वरंबे :- समपातळीत वाहणा-या पाण्याला अडवून जमिनीत मुरण्यासाठी असे वरंबे कमी पावसाच्या भागात ३ % पर्यत उताराच्या जमिनीवर ठरतात .जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जास्त व पाऊस कमी असेल तर समपातळीतील वरंबे टाकावेत .३० से .मी. उंचिचे वरंबे समपातळीतील तयार करावेत ,दोन वरंब्यातील अंतर सर्वसाधारणपणे ५ मीटर ठेवावे .
ठाळीचे वरंबे :- अती पावसाच्या प्रदेशात ५ ते १० टक्के उताराच्या जमिनीत तसेच पाणी मुरण्याचा वेग कमी असणा-या ठिकाणी ,मूद व जल संधारणासाठी त्रिकोणी आकाराचे ३० से .मी . उंच व ० .६ टक्के ठाळ असलेले आणि एकमेकांपासून ३ मी .अंतरावर असलेले ठाळीचे वरंबे घालावेत .अशा प्रकारच्या वरंब्यामुळे जमिनीची धुप कमी होते .पाणी सर्व शेतात व्यवस्थितरित्या मुरल्यामुळॆ ५- १५ टक्के पर्यत उत्पादनात वाढ होते .
उताराला आडवे वाफे :- अवर्षणप्रवण क्षेत्र जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे व अजमिनीला फारसा उतार नाही अशा ठिकाणी उताराला आडावे वाफे तयार करुन मूद व जल संधारण करता येते .यात मुख्य वरंबे व टाय वरंबे तयार करतात .दोन मुख्य वरंब्यात ३ मीटर अंतर ठेवावे तर टाय वरंब्यात ६ मीटर अंतर ठेवावे .दोन मुख्य वरंबे उताराला आडवे ठेवावेत ,तर टाय वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत .अशा रितीने उताराला आडवे वाफे तयार करावेत मुख्य वरंब्याची उंची ३० से .मी .पर्यत ठेवावी ,तर उपवरंब्याची उंची २० से .मी . ठेवावी जास्त पाऊस झाला तरी उप वरंबे फुटून संथ गतीने शेतीतून पाणी बाहेर जाईल व मुख्य वरंब्याना काहीही हानी होणार नाही व शेतातील माती व पीक दोन्हीचे संरक्षण होईल .या पध्दतीत पडणारा पाऊस जागीच मुरविल जातो,माती व पीक दोन्हीचे संरक्षण होईल .पीक उत्पादनात साधारणपणॆ ५-१५ टक्के वाढ होते .
आच्छादन :- पीक लागवडित आच्छादनाचा उप्योग केला तर पावसामुळे होणा-या धुपेपासून जमिनीचे संरक्षण होते .तसेच जमिनीतील ओलावा दिर्घकाळ टिकून पीक वाढीवरत्याचा चांगला परिणाम होतो .खरीप,र्ब्बी व उन्हाळी तीनही हंगामात आच्छादनाचा उपयोग करावा. आच्छादनासाठी शेतातील टाकावू पदार्थ उदा. उसाचे पाचट भूसा, पाला पाचोळा इ वापर करावा.
अती उतारावरच्या जमिनीची धुप थांबविण्यास गवत स्वरुपाची झाडे वापरता येतील .उदा .लेमन ग्रास,सिट्रोनोला ,खस इअत्यादी .फळबागांभोवती विशेष:पश्चिम दिशेला हवेच्या अवरोधा करीता झाडांचा समुह एका रांगेत लावल्यास फळझाडांचे व जमिनीचे नुकसान टाळता येईल ,या करिता सू-बाबूळ ,निलगीरी ,गिरीपुष्प, इत्यादीचा वापर करता येईल .
बायोडायनामिक कूषी पध्दती
बायो ( जीव ) डायनामीक ( शक्ती / चैतन्य ) :-
तत्वज्ञानी डाँ .रुडाल्फ स्टेइनर ( जर्मनी ) याने १९२२ साली हिंदूधर्म ,बौध्द धर्म व्वैदिक सिध्दांत याचा सखोल अभ्यास

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा