शुक्रवार, १६ जून, २०१७

बीजामृत

बीजामृत
जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणासाठी व बी द्वारे येणाऱ्या रोगांसाठी बियांवर पेरणीपूर्वी संस्कार करणे आवश्यक आहे .

साहित्य


१. पाणी - २० लिटर
२. देशी गाईचं शेण - १ किलो
३. देशी गाईचं गोमुत्र - १ लिटर
४. देशी गाईचं दुध - १०० मिली
५. जीवाणू माती मुठभर
६. कळीचा चुना - ५० ग्रॅम



•आम्ल - विम्लता संतुलित करण्यासाठी [Ph] कळीचा चुना वापरतात .
•जीवाणू संवर्धनासाठी आवश्यक वाढ संवर्धके दुधातून मिळतात .
•जीवाणू माती ज्याचे बीज आहे त्या रोपा जवळील घ्यावी
•शेण हे सर्वोत्कृष्ठ बुरशी नाशक, जंतू रोधक असून संजीवकांची खाण आहे
•गोमुत्र हे उत्तम जन्तुरोधक व नत्राचे भांडार आहे


सगळे साहित्य मिसळून रात्रभर भिजत ठेवावे . सकाळी एकदा ढवळून घ्यावे.

बियांवर रासायनिक प्रक्रिया केली असल्यास बिया पाण्यात एकदा बुडवून घ्याव्या व सुकवाव्या

बिया जमिनीवर पसरवून त्यावर बिजामृत शिंपडावे व वर खाली करावे म्हणजे बियांवर एक थर जमा होईल.

या नंतर सावलीत बी सुकवावे व नंतर पेरावे

हीच प्रक्रिया रोपे करून पुन्हा लागवड करतात तेव्हा रोपाच्या मुळयावर करावी .































http://zbnfnotes.blogspot.in/2014/03/blog-post_4345.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल