शुक्रवार, १६ जून, २०१७

जीवामृत

जीवामृत
शेतीमध्ये जीवामृतचा वापर केला जातो. जीवामृत तयार करण्यासाठी ५०-२०० लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक/स्टेनलेस स्टिलचा बॅरल वापरावा. त्यात पुर्ण पाणी भरावे व दहा किलो ताजे शेण, दहा लिटर जुने गोमूत्र, एक किलो काळा गूळ, एक किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ, एक किलो ताजे-चांगले लागलेले दही मिश्रण मिसळावे. २० मिनिटे ढवळावे. हे मिश्रण सात दिवस आंबवावे. अधुन मधुन ढवळावे. चौथ्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत फवारावे. सात दिवसांत पिकांना देण्यासाठी वापरावे. एक एकरला 200 लिटर पुरेसे होते. वापरण्याची पद्धत - जमिनीत ओलावा असताना कडुनिंबाच्या डहाळीने पिकावर ओळीने शिंपडावे. टोकण केलेल्या पिकांना (उदा. कापूस, मिरची, केळी, पपई इ.) खोडाजवळ (बुंध्याजवळ) डब्याने अथवा मगाने 250 ते 500 मि.लि. प्रति झाड द्यावे. पाणी भरत असताना मुख्य चारी (दांडा) मध्ये पाणी भरणाऱ्याने मगाने अथवा टिनच्या डब्याने बारीक धार लावून पाण्यासोबत सरीत दिल्यास पिकांना मिळते.




http://shetakari.blogspot.in/2009/06/blog-post_09.html

------

जीवामृत – झाडांचे टॉनिक


जीवामृत

१० लीटर गोमुत्र

१ किलो गुळ

१ किलो बेसन

१ घमेले जागेवरची माती

३ – ४ घमेले शेण

१०० लीटर पाणी

सर्व एकत्र करुन एक आठवडा ठेवावे. रोज एकदा हलवावे. नंतर, तयार झालेले द्रावण झाडांच्या बुंध्यात-मुळांत खताप्रमाणे घालावे. झाडांवर उडवु नये.

गुळ व बेसन या अन्नामुळे मातीतले जीवाणु वाढतात. हे जीवाणु मातीतील खानिजे व अन्नद्रव्ये झाडाला खाण्याजोगी करतात.







































http://mrudgandh.wordpress.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल