शुक्रवार, १६ जून, २०१७

सेंद्रिय उत्पादनासाठी आवश्यक माहिती....

सेंद्रिय शेती



धान्य,भाजीपाला,फळे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत.रासायनिक खतांचा अमर्यादित वापर, सोबतीला किटकनाशक, बुरशीनाशकांचे फवारे आज धान्य, भाजीपाला फळे यांच्या अधिक उत्पादनासाठी दिल्या जातात. या किटकनाशकांचा /बुरशीनाशकांचा विषारी अंश अन्नाद्वारे आपल्या शरीरात येत आहे त्यामूळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. शेत...करी या विषारी औषधाचा वापर करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा सरळ परिणाम होतो. निसर्गिचे संतुलन ही रसायने बिघडवत आहेत.म्हणजे कीड किंवा रोग नष्ट करणारे किडे,जीवाणू मारले जात आहेत.शिवाय या रसायनांच्या सरळ वापराने कीड व रोग पसरविणारे जीवाणू अधिक शक्तीशाली होत आहेत.
शेतीतील लहान जमीनीच्या तुकड्यावर भाजीपाला तयार केला जातो व तो विकून सतत पैसे कमावले जातात बहुधा शेतीतील जास्त काम महिला शेतक-याचे असते.
आज सेंद्रिय उत्पादनाची मागणी आपल्या देशात आणि विदेशात वाढत आहे.कारण रासायनिक खते आणि कीटकनाशके व बुरशीनाशकांमुळे होणारे वाईट पारिणाम ग्राहकांला माहिती झाले आहेत.सेंद्रिय उत्पादनाची किमंत आज त्याची मागणी व पुरवठ बघून ठरवावी लागले.सेंद्रिय पध्दतीने धान्य,फळॆ,भाजीपाला तयार करायला पाहिजे.
सेंद्रिय उत्पादन करुन शेतकरी शहरातील ग्राहकांच्या संघाला पाठवायाला तयार व्हायला पाहिजे.मिश्न पीक पध्दती वापरुन सेंद्रिय उत्पादने तयार केल्यास आपण सेंद्रिय उत्पादनावर येणारे किड व रोग ह्याचे नियंत्रण करु शकतो. मिश्न पिक घेतल्यामुळे विविध उत्पादने येणार म्हण्जे आपली उत्पादन विषयीची जोखीम कमी होईल.
वरील माहिती देण्याचा मूळ उद्देश एवढाच की आज सेंद्रिय उत्पादने विक्रि संबंधी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रयत्न करावे लागतील सेंद्रिय उत्पादन विकत घेणारे शहरातील ग्राहक व सेंद्रिय माल तयार करणा-या शेतक-यांनी सेंद्रिय उत्पादनाचा सतत पुरवठा कसा केला जाईल ह्या बद्द्ल नियोजन करणे आवश्यक आहे.सेंद्रिय उत्पादने विक्रि करिता मंडळ स्थापन स्थापन करणे गरजेचे आह.े




सेंद्रिय उत्पादनाची तत्वे


जमीनीची उत्पादन क्षमता




जमीन सेंद्रिय उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचे अंग आह, जमीनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण झाडांना लागंणा-या अन्न क्षारांचे प्रमाण आणि जमिनीचा पोत व रचना ह्या सर्वाचा उत्पादनावर परिणाम होतो, जमिनीतील असंख्य जिवाणू व नमुद केलेले जमिनीचे घटक मिळून सेंद्रिय उत्पादन वाढीस लावण्यास कारण असतात.
सेंद्रिय उत्पादन तयार करायला नक्की कुठल्या प्रकारची जमिन लागेल हे सांगणे अवघड आहे कारण प्रत्येक जमिन ही वेगवेगळ्या प्रकारची असते.ज्या जमिनीत पोयटा चे प्रमाण मर्यादेपर्यत असते व सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असून पाण्याचा निचारा करण्याचा गुण असतो अशी जमीन उत्पादनाला योग्य असते.
सेंद्रिय खतांचा ,नैसर्गिक मिनरल फर्टिलायझर व जमीन संवर्धनाचे उपाय योजून जमीन उत्पादनासाठी योग्य करता येते.ज्या जमीनीत वाळूचे प्रमाण जास्त आहे,त्या अधिक प्रमाणात सेंद्रिय खते टाकावी लागतील व पाणी जास्त द्यावे लागेल.


सेंद्रिय खताचा पुरवठा,सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा ,वेगवेगळ्या मार्गाने जमिनित करता येतो. उदा. शेणखत कंपोस्ट खत ,हिरवळीचे खत वगैरे




सेंद्रिय पदार्थामुळे खालील फायदे होतात.


१) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते


०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.
[एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात ]
जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढत.


2) नत्र पुरवठा
जमिनीत सेंद्रिय टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
3) स्फुरद व पालाश
सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.
4) जमिनीचा सामू
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.


5) कँशन अँक्शचेंज कँपोसिटी (CEC)


कँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.सेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.
6) कर्बाचा पुरवठा


कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो.नंतर हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.
7) सेंद्रिय खतांचा परिणाम


सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
जमिनीतील अन्नद्रव्य नियमन

रासायनिक खतांतून अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास जमिनीला काही महत्त्वाचे घटक पुरविले जातात. वेगवेगळ्या झाडांची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते.त्याप्रमाणात शेणखत,कंपोस्ट,गांडूळ खत,कोंबड्याची विष्ठा, रेशीम उत्पादनातील टाकाऊ घटक, डुकरांच्या विष्ठेपासून केलेले खत,जीवाणू पासून केलेले खत आच्छादन देण्यासाठी वापरली जाणारी झाडे ,हिरवळीचे खत आणि स्फुरद व कँल्शीयम नैसर्गिकरित्या पुरविणारे दगड ह्याचा उपयोग करावा.


कीड व रोग नियमन
कीड व रोग नियंत्रण हा एक महत्त्वाचा विषय आहे व अत्यंत काळजीपूर्वक त्याचे नियमन सेंद्रिय कूषी पध्दतीत करावे लागते भाजीपाल्यात कीड व रोगाचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात बरीच घट येऊ शकते.कीड व रोगाचे नियंत्रण खालील तत्वे लक्षात घेऊन करावे.
१) कीड व रोग प्रतिकारक वाणांचा उपयोग
संकरित वाणापेक्षा गावठी वाण जास्त प्रमाणात कीड /रोग प्रतिकारक असतात .त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी गावठी वाणांचा प्राधान्याने उपयोग करावा .सेंद्रिय शेतीसाठी सुधारित जाताही वापरता येतात मात्र संकरित जाती वापरतांना त्यांची कीड / रोग प्रतिकार शक्ती लक्षात घ्यावी.
२) सशक्त बियाणे वापरावे
सशक्त बियाणे वापरल्याने एक सारखी व सशक्त रोपे मिळतात.तथापि वापरापूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासून पहावी.
३) उंच नर्सरी वाफे ४० मेश जाळीने झाकावी
पाढ-या माशीचा बंदोबस्त ४० मेश जाळीने होतो पाढरीमाशी अनेक विषाणूंना पीकावर घेऊन येते.एक जरी माशी आली तरी पिकांवर कीड / रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.टोमँटो नर्सरीतील झाडे जाळीने झाकणे महत्त्वाचे आहे;त्यामुळे पानाचा चुरडा मुरडा (कोकडा) रोग येत नाही.


४) नर्सरीतील जमिनीला सूर्यप्रकाश दाखविणॆ
सुर्यप्रकाशाच्या उष्णतेने बुरशीजन्य रोग नाहीसे.तेव्हा नर्सरीतील जमीन पेरणीपूर्वी कडक उन्हात काही दिवस तापू द्यावी .त्यानंतर काळ्या रंगाचे पाँलीथीन पसरवून त्यावर २ ते २.५ से.मी. उंचीचा मातीचा थर द्यावा त्यावर दुसरे पारदर्शक पाँलीथीन पसरवावे व जमीन उन्हात २ ते ३ दिवस तापवावी नंतर ही माती नर्सरीत बियाणॆ पेरण्यास वापरावी.
५) ट्रायकोडरमा
ट्रायकोडरमा व्हीरीडे नावाची बुरशी बियाण्यास लावल्यास रोगजन्य जीवाणू बियाण्यावर येत नाहीत.
ट्रायकोडरमा रोगजन्य बुरशीला नष्ट करते.
ट्रायकोडरमा खालील प्रमाणात वापरवे.
बियाण्यांसाठी ५ ग्रँम/ किलो बियाणे
जमीनीत – १ किलो /२५ किलो शेणखतासोबत.
ट्रायकोडरमाचे प्रमाण वाढविता येईल. ट्रायकोडरमामुळे डँपीगं आँफ व काँलर राँट हे रोग नियंत्रणात येतात.
६) सापळा पिके
कीटकांचे नियंत्रण करण्यास सापळा पिकांचा उपयोग होतो .सापळा पिकांवर काही प्रकारचे कीटक आकर्षित होतात .ज्याचे नियंत्रण काही झाडांच्या अर्काचा फवारा मारून करता येते .उदा,आँफ्रिकन उंच झेडू हे सापळा पीक टोमँटो मधे लावल्यास कीटक टोमँटो पेक्षा झेंडुवर आपली अंडी देतात व अशा प्रकारे टोमँटो पिकांचे संरक्षण होते.
मोठ्या बियांचे मोहरी झाड (याची पाने ही मोठी असतात ) सापळीपीक म्हणून कोबीत लावल्यास डायमंड ब्लँक माँथ कीटकांचे नियंत्रण होते या कीडीची मोहरीवर अंडी टाकली जातात. ही अंडी ४ % निंबोळी बियाणॆ अर्क फवारून नष्ट करता येतात.
७) नियमीत (कीड /रोग इतर शत्रूंपासून ) सावध राहणे.
नियमीत लक्ष ठेवल्यास्रोग व कीटकापासून होणारे मॊटे नुकसान टाळता येते कारण जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर उपाय योजना सुरु होऊ शकते.अंडी व अळ्या हाताने उचलून नष्ट करता येतात.झाडांचे रोगट भाग नाहीसे करणॆ ,ट्रायकोडरमा मिश्नीत पाणी जमीनीवरून सोड्णॆ ,ब्लिचींग पावडर मिसळून जमीनीवर सोडणॆ हे उपाय बुरशीजन्य व अन्य रोग नियंत्रणासाठी करता येतात.
८) जाळणॆ
रोग व कीड लागलेली झाडे मुळासकट काढून जाळून टाकावीत.
९)पाण्याचे नियमन
जमिनीतील पाण्याचे प्रमाण रोग निर्माण करायला कारणीभूत असते.अती पाण्याच्य वापराने जास्त रोग होतात .या शिवाय जमीन कोरडी असली तरीही काही रोग होऊ शकतात.उदा.पावडरी मिल्ड्यु (काकडीवर ) यासाठी पाण्याचा योग्य प्रमाणात उपयोग करावा.
१०) वनस्पतीजन्य अर्क
निबॊंणीच्या बियांचा अर्क,पानांचा अर्क,कँलोट्राँपीस पानांचाअर्क,बोगनव्हेल पानांचा अर्क,याचे फवारे देउन कीटकांच्या अळ्यांचा बंदोबस्त होऊ शकतो.
११) वेगवेगळी पिके एकाच जागी लावणे
ह्या पध्दतीमुळे कीड व रोग नियंत्रण कीटक वाढीस लागून रोगाचा बंदोबस्त होऊ शकतो काही झाडांच्या वासाने कीड /रोग नियंत्रण हॊऊ शकते.
१२) पिकांची फेरपालट
यामुळे रोग निर्माण करण्या-या जीवाणूंचे नियंत्रण होते .ज्या झाडावर एखादा रोग येत नाही ती झाडे शेतात असल्याने त्या रोगाचे उच्चाटन होण्यास मदत होते उदा.सोल्यानेसीज प्रकारचा भाजीपाला सारखा एकाच जागी लावल्यास रोग निर्माण करणा-या जीवाणूंना वाढ होण्यास मदत होते म्हणू न हा भाजीपाला एकाच जागी वारंवार लावू नये.
१३) पिकाच्या फेरपालटीचे नियम
एकाच पीक पुन्हा त्याच जागी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लावु नये.
२५ % शेताचा भाग द्विदल पिकासाठी असावा.
तोच तो भाजीपाला एकाच जागी सतत लावू नये
कोबी व त्याच प्रकारची इतर झाडे लावली असल्यास (३ वर्षातून एक वेळेस ) त्या जमिनीत कोबी लावू नये.
काकडी व तत्सम पीके ४ वर्षातून एकदाच त्या जमीनीत लावावी .काकडी व तत्सम पिकानंतर सोल्यानेसी किवा कुकुरबीटेसीई पिके लावु नये.
सोलँनेसीई झाडे (टोमँटो,वांगी,मिरची,बटाटा) ४ वर्षातून एकदाच एका जागी लावाव्यात धान्य पिके वर्षातुन एकदा तरी फेरपालट करु लावावी.मनुष्याच्या विष्टेचा उपयोग करू नये.
नैसर्गिकरित्या आढळणारे पिकांचे अन्नद्रव्य असलेले दगड वापरावे.
रासायनिक खतांचा वापर अजिबात करु नये.
१४) कीड /रोग नियंत्रके
१ . पारंपारिक पध्दतीचा कीड / रोग नियंत्रणासाठी उपयोग करावा जसे वनस्पतीचे अर्क,भौतिक कीडनियंत्रके,जैविक कीड नियंत्रके


१५) वाढ नियंत्रके
१ . जी वाढ नियंत्रके वनस्पतीपासून केलेली आहेत ती वापरावी.


१६) प्रदुषण नियंत्रण


१ . प्रदुषण करणारे पादार्थ वापरु नये.(प्लास्टिक )
जमिन आणि पाण्याचे संवर्धन,जंगलातून मिळणारे उपयोगी पदार्थ,जमीनीची नैसर्गिकता याला महत्त्व द्यावे.









http://kinaragramrajya.blogspot.in/2011/06/blog-post.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल