गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

यश....



यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
यशाच्या मार्गातील अडथळे
अहंकार, यशाची भिती, निश्चित योजना नसणे, निश्चित ध्येयाच्या अभाव, दिरंगाई टाळाटाळ, कौटुंबिक जबाबदारी, दिशाहिनता, प्रशिक्षणाचा अभाव, चिकाटीचा अभाव, क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी स्वीकारणे.
स्पर्धेत विजयी व्हायचे असेल तर इतरांपेक्षा काकणभर सरस असायला हवं. शर्यत जिंकणारा घोडा - किंवा १०- असा जिंकतो. यशस्वी माणसं अयशस्वी माणसापेक्षा काही दहापट हूशार नसतात. इतरांपेक्षा काकणभर सरस असतात. परंतु या काकणभर जादा सरसपणामुळे मिळणारा फायदा मात्र दहापट अधिक असतो. एखाद्या क्षेत्रात आपण १००० टक्के सुधारणा करण्याची गरज नसते. तर हजार भिन्न क्षेत्रातील प्रत्येकात फक्त एकेक टक्का सुधारणा करायला हवी. अस करणं हे अधिक सोप असतं यातूनच तुम्ही इतरांपेक्षा काकणभर सरस ठरता आणि यश प्राप्त करता. परिश्रमाशिवाय विजय मिळत नाही. अडथळे पार करा. अडथळ्यांचा सामना करणाऱ्या माणसापेक्षा अडथळे पार करून जाणारी माणसे अधिक सुरक्षीत असतात.
यश हे आयुष्यातील आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्थानावरून मोजत नाहीत तर ते स्थान किंवा दर्जा मिळविण्यासाठी जे अडथळे पार करावे लागतात त्यावरून ठरतं.
यशस्वी माणसांची स्पर्धा स्वतःशीच चालू असते. आयुष्यात आपण किती उंची गाठली यावर यशाच मोजमाप होत नाही तर खाली पडल्यावर आपण पुन्हा किती वेळा परत उसळी मारून उभे राहतो यावरून ते मोजता येत. अपयश हा यशाचा महामार्ग आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा ते असफल ठरत असले तरीही वेग दुप्पट करा. इतिहासाचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसून येईल, की सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशाच्या कहाण्या आहेत. पण लोक यशामागच अपयश लक्षात घेत नाहीत. ते चित्राची एकच बाजू पाहतात. आणि म्हणतात तो माणूस नशिबवान होता. त्याला नेमक्या संधी वेळेवर मिळत गेल्या.
यशस्वी लोक हे काही अवाढव्य अचाट गोष्टी करीत नाहीत, तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्टपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात. तसे पाहिले तर शारिरीक दृष्ट्या मनुष्यप्राणी हा सर्वात दुबळा प्राणी आहे. तो पक्षासारखा उडू शकत नाही. तो पळण्यात चित्त्याला मागे टाकू शकत नाही. माकडाप्रमाणे झाडावर सरसर चढू शकत नाही. वाघासारखी नखे नाहीत. परंतू निसर्गाने माणसाला सर्वात मोठी देणगी दिलेली आहे ती म्हणजे विचार करण्याची दुर्दैव एवढेच की फार थोडे लोक ह्या महान देणगीच्या विचारशक्तीचा पुरेपूर उपयोग करतात.
यशस्वी होण्याकरीता आवश्यक गुण
इच्छा – ध्येय साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छा हीच आपल्याला यशाकडे नेणारी सर्वट प्रबळ असते. माणसाच्या मनामध्ये जे रूजत किंवा माणूस जे मनात आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट साध्य करू शकतो.
बांधीलकी – ध्येयाशी एकनिष्ठता असेल तरच जिंकण्याची जिद्द निर्माण होते. जेव्हा आपण जिंकण्यासाठी खेळतो तेव्हा आपण उत्साहाने, जिंकण्याचं ध्येय समोर ठेवून खेळतो. परंतू आपण जेव्हा हरू नये यासाठी खेळतो तेव्हा आपण मुळातच कचखाऊ भूमिका पत्करलेली असते. आवडनिवड आणि निष्ठ याता फरक आहे. आवडी निवडीत तडजोडा होऊ शकते निष्ठेत नाही. आपल्या निष्ठा आपल्या मुल्यांशी सुसंगत असतात. म्हणूनच मूल्यप्रणाली उचित असण हे फार महत्त्वाचं असते योग्य उद्देशाची बांधील असणाऱ्या निष्ठाच आपल्याला उचित ध्येयासाठी बांधील करतात.
जबाबदारी – यशस्वी माणसं जबाबदाऱ्या स्विकारतात. जबाबदारी स्वीकारण्यामध्ये धोका तर असतोच पण त्याचबरोबर संपूर्ण कार्याचे उत्तरदायित्त्व तुमच्यावर असतं. बहुतांश लोक आपापल्या सुरक्षीत कवचात राहतात आणि कुठलीही जबाबदारी स्विकारत नाहीत. त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत. जबाबदार माणसं आपल्या चूका लक्षात घेतात आणि त्यापासून शिकतात.
कठोर परिश्रम – कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हेन्री फोर्ड म्हणतो, जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशीबवान व्हाल. सामान्य माणूस शक्तीच्या आणि क्षमतेच्या एक चतुर्थांश काम करतो. जी माण्सं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करत आणि मोजकीच माणसं आपल्या पूर्ण क्षमतेने म्हणजे १००० टक्के काय करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.
चारित्र्य – जीवनमुल्य, श्रद्धा-निष्ठा आणि व्यक्तिमत्त्व यांची बेरीज म्हणजेच माणसाचं चारित्र्य जगातील कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा आपलं चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते. यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते उत्तम चारित्य व्यक्तिंची वैशिष्ट्ये असणारे असे लोक कुठेही उठून दिसतात. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो. हे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहतात. हे लोक जबाबदाऱ्या स्विकारतात. हे लोक कणखर असतात. हे लोक विजयात ही नम्र असतात. असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात.
सकारात्मक विश्वास – नकारात्मक विचार करण्यापेक्षा विचारसरणीस मदत होते. सकारत्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असे निश्चितपणे वाटण म्हणजे सकारात्मक विश्वास.
जितक मिळत त्यापेक्षा अधिक द्या – बहूतेक लोकांना मोबदल्या एवढंही काम करायची गरज त्याशिवाय आणखी दुसऱ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना कमीत कमी काम करायच असतं. नोकरीचालू रहावी म्हणून ते पाट्या टाकत असतात. फार थोडे लोक मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्यास तयार असतात. ते लोक अधिक काम का करतात? तुम्ही जर या शेवटच्या गटातील असाल तर मग तुम्हाला स्पर्धा कोठे आहे हे समजते.
मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याचे काही फायदे.
अशा कार्यक्षम इमानदार माणसांना सगळीकडे नेहमीच मागणी असते. यशाचं रहस्य अगदी दोनच शब्दांत सांगायच म्हणजे अधिक काहीतरी करणे.

  • तुमची किंमत वाढते.
  • आत्मविश्वास वाढतो.
  • लोक तुमच्याकडे नेता म्हणून पाहतात.
  • वरिष्ठ तुमचा आदर करू लागतात.
चिकाटीमधील शक्ती – चिकाटीची जागा दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकणार नाही. बुद्धीमत्ताही घेऊ शकणार नाही. बुद्धीमान पण अपयशी माणसं आपल्याला अवतीभवती सर्वत्र दिसतात. अलौकिक प्रतिभाही चिकाटीची जागा घेऊ शकणार नाही. जग हे शिकल्यासवरलेल्या पण कामचुकार, हलगर्जी लोकांनी भरलेले आहे. चिकाटी आणि निर्धार या दोन्हीतच खरं सामर्थ्य आहे. त्यांचाच सर्वात जास्त प्रभाव पडतो.
आपल्या कामगिरीचा अभिमान – आपल्या कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. कार्यपूर्तीतून निखळ आनंद मिळतो. कामाची गुणवत्ता आणि काम करण्याची गुणवत्ता यात फरक करता येत नाही. एखादे काम तुम्ही किती वेगाने केलतं हे त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही अगदी रस्ता झाडण्यासारखं साधं काम करत असतात तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहीजे, “ इतका छान झाडलेला रस्ता दुसरा पाहण्यास आला नाहीकाम असं करावं की त्यातुन आपल्या कौशल्याचा, कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे. आणि केलेले काम चांगल झाल्याचे समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे. एखादे काम चांगले केल्यामुळे वाटणार समाधान हेच खरं बक्षिस असते.
विद्यार्थी असण्याची तयारी ठेवा – योग्य गुरूचा शोध घ्या. देव आणि गुरू जर एके ठिकाणी उभे असतील तर शिष्य प्रथम कोणाला नमस्कार करेल? भारतीय संस्कृतीनुसार याचे उत्तर गुरू असे आहे. कारण गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय शिष्याला देव भेटू शकला नसता. गुरू किंवा शिक्षक ही अशी व्यक्ती असते की जी तुमच्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी ठरते. शिष्य किंवा विद्यार्थी म्हणून तुम्हाला स्विकारेल अशा माणसाच्या शोधात रहा. मात्र गुरू निवडताना काळजी घ्या. चांगला गुरू तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि दिशा देईल. गुरूविषयी आदर व्यक्त करा चौकस, जिज्ञासू विद्यार्थी व्हा असे विद्यार्थी शिक्षकांना आवडतात. उत्तम शिक्षक तुमची ज्ञानलालसा अधिक तीव्र करतील. आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्यालाच शोधता येतील अशा मार्गावर तुम्हाला ते आणून सोडतील.
खरं म्हणजे आपल्या सर्वांजवळ यशासाठी लागणारे गुण असतात. हे गुण आपल्यात आहेत. हेच अनेकदा आपल्याला माहित नसतं. परंतु जेव्हा ते लक्षात येत तेव्हा आपल्या कामगिरीत निश्चितच सुधारणा होते.
माणसं जोडण्याची मंत्राक्षरी
  • सहा शब्दांचा मंत्र माझी चूक झाली , हे मान्य आहे.
  • पाच शब्दाचा मंत्र हे तू फारच छान केलस!
  • चार शब्दांचा मंत्र तुझ मत काय आहे?
  • तीन शब्दांचा मंत्र एवढ प्लीज करशील ?
  • दोन शब्दांचा मंत्र आभारी आहे.
  • एका शब्दांचा मंत्र आपण
तुम्ही कसं बोलता?
  • जेव्हा तुम्ही कुणाला दोष देता तेव्हा त्याचे वाईट कर्म घेता. जेव्हा तुम्ही एखाद्याची स्तुती करता तेव्हा त्याचे सत्कर्म घेता.
  • कौतुक करण्याची कला आत्मसात करा.
  • नेहमी कृतज्ञ राहा.
  • श्रेयाचा मोह टाळा
  • इतरांचे ऐकून घ्या. वादविवाद टाळा.
  • टीका शक्यतो टाळा.
  • तक्रार करताना जपून
माणसाची किंमत
  • जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.
  • जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाड लावतो.
  • जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणसं जोडतो.
तुम्ही कसे आहात?
  • नातं हे एक असं खातं असतं, ज्यात सतत काही ना काही जमा कराव लागत!
  • स्वभाव मोकळा हवा.
  • अंतरी जिव्हाळा हवा.
  • सौजन्य तर हवच.
  • सर्वजण सारखेच.
  • मदतीची संधी घ्या.
  • शक्य तितकं भलं करावं.
  • कुणाचं नुकसान नको.
  • समोरचा अधिक महत्त्वाचा.
तुम्ही कसे वागता?
  • तुम्ही इतरांशी कसं वागावं याचं अगदी सोप उत्तर आहे. इतरांनी तुमच्याशी जसं वागावं अस तुम्हाला वाटतं तसं!
  • इतरांना नाऊमेद करू नका.
  • नकार देताना नम्रपणेच द्या.
  • प्रतिक्रिया नको. प्रतिसाद द्या.
  • इतरांवर रागावू नका.
  • माफ करा. मन साफ करा.
  • स्वतःलाही माफ करा.
  • अपमानाचा बदला मानानं घ्या.
  • टीकाकारांची दाद मिळवा.
  • मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे.
तुम्ही कसं जगता?

  • प्रत्येक माणूस हा महान होऊ शकतो. कारण प्रत्येक माणूस हा माणूस होऊ शकतो.
  • पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा.
  • मैत्रीला जागलच पाहिजे.
  • समजंस धोरण फायद्याचे.
  • स्पर्धा करू नका, सहकार्य करा.
  • कामाचे संबंध सुरळीतच हवेत.
  • आवश्यक तिथं ठाम राहा.
  • प्रेरित करा, नेते व्हा.







by - marathi mati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल