मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

जाणून घ्या, यशस्वी व्यक्तींमधील गुण..


व्हाईस प्रेसिडंटच्या लेवलवर काम करणाऱ्या ८५ स्त्रियांवर कॅपिलर मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनने एक संशोधन केले. या अभ्यासानुसार, ज्या स्त्रीया खूप ताण तणाव सहन करू शकतात, त्याच भविष्यात यशस्वी होतात. ज्या स्त्रीया खूप तणावातसुद्धा न बावरता सगळे निर्णय शांतपणे घेतात, त्याच यशस्वी होतात. निर्णय घेत असताना या स्त्रीया कोणत्याही प्रकारच्या मेंटल आणि इमोशनल फिलींग्सना थारा देत नाहीत आणि दूरचा विचार करूनच स्थिरपणे आणि निर्धाराने निर्णय घेतात.

राग
राग हा यशस्वी करतो किंवा त्यांच्यामध्ये असतो का? असा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविक असते. पण, राग सुद्धा यशाची एक क्वालिटीच असते. टिमचा विचार करताना एक लिडर म्हणून राग व्यक्त करणे, हा एक यशाचा गुण आहे. पण, जे नेहमीच राग व्यक्त करतात, ते कधीच यशस्वी  होऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींना टिम मेंबर्सकडून कोणत्याही प्रकारचा मान मिळत नाही. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे आणि राग आला तरीसुद्धा वागण्यामध्ये विनयशिलता असली पाहिजे.
सहानुभूती ठेवा

माझा रस्ता मी स्वत: ठरवेन आणि यश मिळवताना मी इतरांवर कुठल्याहीप्रकारे वेळ वाया घालवणार नाही, असा विचार करणाऱ्या व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. इतरांच्या मार्गात आलेले अडथळे आणि त्यांचे उपदेश हे प्रत्येकाच्या सक्सेससाठी खूप फायदेशीर आहे.

इगो

खूप नाही पण थोडीतरी इगो असावा. स्वत:मधील स्पेशल क्वालिटीजबद्दल यशस्वीताने कॉन्शिअस असले पाहिजे आणि त्यासाठी मर्यादेचे उल्लंघन न करता इगो दाखवला पाहिजे.

खूप कष्ट करणाऱ्यांसाठी यश फार दूर नसते. पण, आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे यशस्वीपैकी बहुतांशी व्यक्ती चांगला आहार आणि व्यायाम यांना महत्त्व देतातच. त्यांना अशक्त असणे किंवा राहणे आवडत नाही. या व्यक्तींना स्वत:ची स्ट्रेंथ दाखवायला आवडते आणि त्यामुळे ते नेहमी एनर्जी देणारे अन्नच खातात. पण, नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी ताण तणावामध्ये असणे नॅचरल असते. त्यासाठी त्यांनी योगा करावा, शांत आणि पुरेशी झोप घ्यावी आणि जास्तीत जास्त तणावमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. 
 



by - Internet 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल