बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

यशस्वी व्यक्ती यशासाठी अमलात आणतात या 4 खास गोष्टी...


( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती यश मिळवण्यासाठी धडपड करत असते. यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना हार. पण नेमके असे कोणते गुण त्या व्यकींमध्ये असतात ज्यांना हे यश संपादित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे उत्तर एकच देता येईल ते म्हणजे यश मिळवण्यासाठी असणारी या व्यक्तींची प्रतिबद्धता. याच कारणामुळे आयुष्यात मोठे-मोठे शिखर गाठण्याची या व्यक्तींना सवय होवून जाते. तुम्हालाही जर अशाच पद्धतीचे यश संपादित करायचे असेल तर अमलात आणा या खास टिप्स....


मिशन आत्मविश्वास
मिशन आत्मविश्वास जागृत करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचा व्यायाम करण्यात येतो. याला 'सेल्फ टॉक' असे देखील म्हंटले जाते. यामध्ये व्यक्ती स्वत:च स्वत:शी मनातल्या मनात बोलून स्वत:मधला आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करतात. हा व्यायाम करताना केलेल्या चुकांवर लक्ष केंद्रित न करता तुमच्यातील कमकुवत असणा-या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


पावला-पावलावर पुढे जाणे
प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असण्याची वेगवेगळी करणे असू शकतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात. यामध्ये एखादे काम करत असताना धैर्य सोडू नये हे सांगण्यात येते. उदा. एखादी व्यक्ती बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात-डोळे घालून बोलणे टाळत असते. याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये भिती अथवा आत्मविश्वास कमी आहे हे समजते. अशा व्यक्तींनी आरशासमोर उभे राहून सर्वात पहिले स्वत:मधील आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आरशा समोर उभे राहून मनामध्ये असलेल्या सर्व गोष्टी बिनधास्त बोला एकदा तुम्ही स्वत:च्या डोळ्यांशी डोळे मिळवले की आपोआप तुम्ही बाहेरच्यांशी देखील न घाबरता आय कॉन्टॅंक्ट करू शकाल.


कामाची चेकलिस्ट तयार करणे
आत्मविश्वास कमी असणा-या व्यक्तींना नेहमी एखाद्या विषयावर खोलवर जावून विचार करण्याची सवय असते. अशा व्यक्ती स्वत:ला खुप हुशार अथवा एकदम खराब समजत असतात. विशेष म्हणजे या त्यांच्या सवयीप्रमाणे त्या इतरांना बघण्याचा प्रयत्न करत असतात. तुमची ही सवय एक तर तुम्हाला पुढे जाण्याऐवजी मागे ढकलण्याचे काम करत असते. यश संपादित करणा-या व्यक्ती नेहमी या सवयींपासून स्वत:ला वाचवण्यासाठी एक चेकलिस्ट बनवत असतात. यामध्ये एका बाजूला स्वत:चे चांगले गुण आणि दुस-या बाजूला वाईट गुण नोंदवतात. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या सुधारण्यासाठी मग या व्यक्ती मनापासून प्रयत्न करतात. कारण आत्मविश्वास असणा-या व्यक्तींना हे माहित असते की, आत्मविश्वासामुळे असंभव वाटणारे काम संभव होऊ शकते.   
 

सामाजिक स्किल वाढवा
समाजात काम करत असताना नेहमी संकोच वाटणे हे देखील आत्मविश्वास कमी असल्याचे एक उदाहरण आहे. आजच्या काळात उच्च यश संपादित करायचे असेल तर सामाजिक व्यवहारात निपुण असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडील ज्ञान कामात येते. त्यामुळे सोशल स्किल डेवलपमेंटमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
 













by - Divya Marathi 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल