बोधकथा
मराठी बोध कथा : घोडा आणि नदी
एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."
उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....
**********************
लांडगा आणि ससा
एक लांडगा जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका
झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला खुप आनंद झाला. लांडगा आपल्याच
दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला. लांडगाही त्याच्या मागे
धावू लागला. पण शेवटी ससा जोरजोरात पळत खुप पुढे निघून गेला. लांडगा आधीच भुकेलेला आणि आता
पळून पळून थकला होता तो एका झाडाखाली विश्रांती साठी बसला. इतकावेळ ससा आणि लांडग्याची पळापळ
झाडावर बसलेला एक कावळा पाहत होता. त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, " काय हे , एवढासा ससा
तुझ्या हातात सापडला नाही ? असं झाल तर तुझा धाक कसा राहील ?" त्यावर स्वःताची बाजू सावरत लबाड
लांडगा म्हणाला," त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर
मी त्याला सोडून दिलं. दुसऱ्याच चांगल होण्यासाठी स्वतःचा थोडा तोटा झाला तरी तो सोसायला हवा. "
तात्पर्य :- साधला तर स्वार्थ नाहीतर परमार्थ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा