गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी.

प्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण

यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी.


प्रयत्न आणि चिकाटी

मित्रांनो यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी. आज आपण याच दोन गुणांबद्दल माहिती घेणार आहोत.

प्रयत्न

एखाद्या गोष्टीत अपयश आले. तर किती वेळा प्रयत्न करावा असे तुम्हाला वाटते? हा लेख वाचून याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. आज आपण अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांचा बद्दल खूपच थोडक्यात माहिती घेणार आहोत.
अब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.

अब्राहम लिंकन यांची अपयशे

लिंकन यांची अपयशे
  • 31 व्या वर्षी ते Business मध्ये fail झाले.
  • 32 व्या वर्षी ते state legislator चे निवडणुक हरले.
  • 33 व्या वर्षी त्यांनी नवे business try केलं, आणि परत त्यात fail झाले.
  • 35 व्या वर्षी त्यांचा प्रयसीचे निधन झाले.
  • 36 व्या वर्षी त्यांचं nervous break-down झालं.
  • 43 व्या वर्षी त्यांनी अमेरिकन कांग्रेस साठी निवडणूक लढवल पण त्यातही त्यांचा पराभव झाला.
  • 48 व्या वर्षी  त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून पुनप्रयत्न केला त्या वेळीही त्यांना पराभवच आला.
  • 55 व्या वर्षी त्यांनी Senate साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव.
  • 56 वर्षी त्यांनी अमेरिकेच्या Vice President पदासाठी निवडणूक लढवली आणि तेही हरले. या नंतर परत senate साठी झालेल्या निवडणूकीत देखील त्यांचा प्रभाव झाला.
मित्रांनो एवढे अपयश सहन करून सामान्य मानूस निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. पण अब्राहम लिंकन या असामान्य माणसाने परत एकदा प्रयत्न करायचे ठरवले. 1860 मध्ये झालेल्या अमेरिकन president पदा साठी त्यांनी पुन निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं. जवळपास 30 वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाचा 59 व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. आणि पुढे काय झालं याची साक्ष इतिहास देतो.
म्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रानो
मानले तर हार आहे आणि ठरवलं तर जित आहे.

चिकाटी

सोडू नका. कधीच सोडू नका.
कधीच कधीच कधीच सोडू नका.
-विन्स्टन चर्चिल
कधीच कधीच कधीच कधीच सोडायचं नाही. ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. यशाचा मार्गावर इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारा एक गुण म्हणजे बाकी लोक सोडून देत असताना – आपण जात राहण्याची योग्यता, आपण सुरु ठेवण्याची योग्यता, म्हणजे एका शब्दात सांगायचे तर चिकाटी. या चिकाटीची सुंदर उदाहरण आपण वर बघितलच आहे.
चिकटीची तुलना त्या सतत पडणाऱ्या पाण्याशी करता येईल जे अखेर अतिकठीण दगडालाही झिजवून टाकतं.
म्हणून मित्रानो एक ध्येय ठेवा आणि शेवट परियंत चिकटून राहा. तुम्ही यशस्वी नक्की होणार त्याला जगतील कोणतीही गोष्ट किंवा शक्ती रोखू शकणार नाही.
यशस्वी होणारा माणूस सोडत नाही.सोडणारा माणूस यशस्वी होत नाही











by - internet 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल