मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

जाणून घ्या यशस्वी नेत्याचे व्यक्तिमत्व

जर तुम्हाला यशस्वी नेत्यासारखे दिसायची इच्छा असेल तर सर्वप्रथम जिमला जाणे सुरू करा. एका नवीन संशोधनात ही बाब समोर आली आहे की कोणत्याही व्यक्तीच्या नेतृत्वगुणांची ओळख तिच्या बलवान शरीरावरून केली जाते.

जर तुम्हाला यशस्वी नेत्यासारखे दिसायची इच्छा असेल तर सर्वप्रथम जिमला जाणे सुरू करा. एका नवीन संशोधनात ही बाब समोर आली आहे की कोणत्याही व्यक्तीच्या नेतृत्वगुणांची ओळख तिच्या बलवान शरीरावरून केली जाते.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात काही नेत्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की, लोक शारीरिक रुपाने बलवान असलेल्या व्यक्तीला नेता म्हणून अधिक पसंत करतात.

अध्ययनादरम्यान काही शारीरिक रुपाने धष्टपुष्ट व काही अशक्त लोकांचे फोटो सहभागींना दाखवण्यात आले. त्यापैकी आपला आवडता नेता निवडण्यास सांगण्यात आले. बहुतांश लोकांनी धष्टपुष्ट व्यक्तीची निवड केली. परंतु जेव्हा फोटोशॉपच्या मदतीने कमकुवत लोकांच्या चेहऱ्याला मजबूत अंगकाठी जोडून दाखवण्यात आले तेव्हा परिणाम उलटे बघायला मिळाले. या अध्ययनात असेही पहायला मिळाले की, लोक आवडता नेता निवडताना उंचीवरूनही निवडतात. 

ही मनोवृत्ती पुरुषांच्याच बाबतीत बघायला मिळते. शारीरिक रुपाने दुबळ्या व सशक्त महिलांची तुलना केली असता या मानसिकतेचा प्रभाव फार कमी दिसून आला




by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल