मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

यशस्वी लोकांत आढळणा-या 25 सवयींविषयी.

यशस्वी असणे ही कल्पना शेवटी व्यक्त‍िवर अवलंबून असते. मात्र व्यक्तिमत्त्व, उद्योग याबाबत कोणती गोष्‍टी यशात महत्त्वाची भूमिका बजावते हे सांगता येत नाही. यशस्वी उद्योगजक अँड्र्यू कॉर्नेज हे 20 व्या शतकात जगातील सर्वात श्रीमंत होते. 1908 मध्‍ये पत्रकार नॅपोलिओन हिल यांना कार्नेज भेटले. त्यांनी ठरवले की येथून पुढे त्यांची व्यूहनीती जगाला हिल हेच सांगतील.
त्यांचा संवाद आणि हिल यांचे यशस्वी लखपतींवरील संशोधन केल्यानंतर 1937 मध्‍ये 'थिंक अँड ग्रो रीच' नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक प्रत्येक वेळी जास्त खपाचे ठरले आहे. 1954 मध्‍ये हिल यांनी शिकागो येथे अनेक व्याख्‍याने दिली. या व्याख्‍यानांचे संकलन असलेले पुस्तक 'युअर राईट टू बी रीच' या नावाने प्रकाशित झाले आहे. खाली आम्ही नॅपोलिओन हिलने यशस्वी लोकांविषयी नोंदवलेल्या निरीक्षण सांगणार आहोत.
हिलने यशस्वी लोकांमध्‍ये बहुतेक वेळेस आढळणा-या सवयी सांगितल्या आहेत... ती त्यांच्यात सहज सापडतात. .
1. त्यांच्याकडे निश्चित असा हेतू असतो -बहुतेक लोक खूप यशस्वी ठरतात. ते ठरवतात कि त्यांना  किती यश हवे आणि किती प्रमाणात. यशस्वी लोक यशाचे मूल्यमापनही करण्‍यास तयार असतात, असे हिल लिहितो




2. त्यांना आपल्या प्रेरणा माहीत असतात :

एखाद्या मोठ्या कंपनीत कन्सल्टंट झाल्यानंतर दोन वर्षांत महत्त्वाच्या बिझनेस स्कूलमध्‍ये असावे असे काहींचे मोठ ध्‍येय असू शकते. परंतु त्यामागे प्रेरणा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. बहुतेक यशस्वी लोक नेहमी त्यांच्या ध्‍येयांसाठी प्रयत्न करित असतात.
 

3.त्यांच्या सभोवती त्यांच्यापेक्षा स्मार्ट लोक असतात :
सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्योगांमध्‍ये उच्च पदांवर असलेल्या लोकांमध्‍ये मोठ्याप्रमाणावर अहं भावना असते. परंतु त्यांचा स्वत:ची क्षमता वाढवण्‍यावर भर असतो. तसेच आपली प्रशंसा करणा-या लोकांच्या शोधात ती असतात.

4. स्वत: ठरवतात :
हुशार लोकांचे जाळे आणि पाठिंबा देणा-या गटाची गरज असते. पण यशस्वी लोक मोठ्याप्रमाणावर स्वत:वर विश्‍वास  ठेवतात.
 
5. स्वत:वर  नियंत्रण :अपवादात्मक,  यशस्वी लोकांना माहीत असते की कशा पध्‍दतीने त्यांच्या भावना, निराशावर मात करता येईल. कोणतीही गोष्‍ट ती ठरवूनच करित असतात.

6. कठीण प्रसंगीही ते काम करतात:
हिल म्हणतो, की कठीण प्रसंगी यशस्वी लोक डळमळत नाही उलट ती त्यातून प्रेरणा घेऊन आणखी प्रयत्न करतात.

7. सर्जनशीलतेचा कसा वापर करायचा हे त्यांना माहीत असते :
आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर ती मार्ग शोधत असतात. त्यातून रचनात्मक उत्पादन बाहेर पडते, असे हिल म्हणतो.

8. ते ठाम असतात :
जर तुम्ही निश्चित असे निर्णय घेऊ शकत नसाल तर नोकरीमध्‍ये तुमच्यासाठी बरे दिवस नाही.

9. निरीक्षणापूर्वी ते माहिती जमा करतात:
हिल म्हणतो, की कोणताही निर्णय किंवा मत एखाद्या व्यक्ती किंवा विषया संदर्भात बनवण्‍यापूर्वी यशस्वी लोक उपलब्ध माहिती वापरतात.

10. त्यांच्या भावनांवर त्यांचे नियंत्रण असते:
सर्व यशस्वी लोक हे सेल्समन असतात, असे हिल म्हणतो. त्यांच्याकडे मुळातच काहीतरी करण्‍याचे तीव्र इच्छा शक्ती असते.

11. मोकळ्या मनाचे असतात :
जो पर्यंत तुम्ही स्वत:चे मन सर्व विषयांबाबत खुले  ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीच मोठे विचारवंत, चांगला माणूस किंवा सगळ्यांना हवे असे व्यक्ती होणार नाही, असे हिल म्हणतो.  

12. ते अपेक्षेपेक्षा नेहमी अधिक काम करतात :
जर तुम्हाला मुळापासून चांगल काम करायचे आहे, तुम्ही ते कैकपटीने चांगले करता.

13.ते डिप्लोमॅटिक असतात :

हिल म्हणतो, अँड्र्यू कार्नेज एखाद्याशी बोलताना विनयशीलता आणि नरम वातावरण ठेवतात.

14. ते बोलण्‍यापेक्षा जास्त ऐकतात:

यशस्वी लोक आपली ऊर्जा संवादात घालवत नाही. ती इतरांकडून जास्त शिकत असतात.

15. ते तपशीलावर जास्त लक्षकेंद्रीत करतात:
हिल म्हणतो, त्यांना हवी असलेल्या गोष्‍टींबरोबरच ती तपशील पाहत असतात.

16. ते टीकांकढे दुर्लक्ष करतात :
यशस्वी लोकांना अनेक अप्रिय ट‍ीका टीप्पणीला समोरे जावे लागते. मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गुणवत्ता आणि बोध होईल अशा गोष्‍टींवर लक्ष केंद्रीत करतात.

17. ते निष्‍ठावान असतात:
जर तुमच्याकडे लोकांप्रति निष्‍ठा नसेल ती तुमच्या निष्‍ठेवरी प्रश्‍न चिन्ह उभे राहते. ती नसेल तर तुमच्याकडे काहीच नाही, असे हिल लिहितो. त्यासाठी तुम्ही किती हुशार, चतुर आणि सुशिक्षित आहात ही गोष्‍ट क्षुल्लक ठरते.
 
18. त्यांच्याकडे प्रचंड वलय असते:
हिल म्हणतो तुम्ही जन्मत:चा किती आकर्षक व्यक्तिमत्त्व आह‍े किंवा नाही याचा विचार करणे चुकीचे आहे. हे शेवटी तुमच्यावर अवलंबून असते, की तुम्ही किती साध्‍या पध्‍दतीने ऐकता आणि कोणाशीही सहानुभूतीने संवाद करता.
19. एकाच मुद्द्यावर लक्ष देतात:

चांगले नेतृत्व हे आपले लक्ष आणि ऊर्जा ही फक्त एकावेळी एकाच प्रोजेक्टवर खर्च करत असते.

20. स्वत:च्या चुकांपासून ते शिकतात:
महत्त्वाचा फरक म्हणजे जे लक्ष्‍य संपादित करतात आणि जे पडतात यांच्या विचार क्षमतेत फरक असतो. यशस्वी लोक हे चुकांपासून नेहमी शिकत असतात.

21. ते अपयशाची जबाबदारी खुल्या मनाने स्वीकारतात:
कार्नेज हिलला शिकवायचा की खरे नेते खासगी रित्या दुय्यम चुकांवर  व्यक्तिश:  काम करतात. जेव्हा तुम्ही लोकांच्या गटाचे नेतृत्व करता त्या तुमचे स्वत:चे प्रतिबिंब बनते.

22. ते इतरांच्या यशाची प्रशंसा करतात:
यशस्वी लोक हे इतरांच्या यशाची प्रशंसा करतात. इतरांच्या कामाची दखल घेऊन ते संबंधित व्यक्तिशी नाते घट्ट बनवतात.

23.इतरांना त्यांच्या आवडीनुसार ते वागवतात:
हिल यांनी  कार्नेजचे एक वाक्य सांगतो, की व्यवसाय हे गोल्डन नियमांनुसार चालते.

24. ते सकारात्मक दृष्‍टीकोन बाळगतात:
 बहुतेकजणांना वाटते चांगले असे काही घडू शकते. परंतु यशस्वी लोक हे नेहमी सकारात्मक दृष्‍टीकोन बाळगून असतात. काहीतरी चांगल घडेल असे त्यांना नेहमी वाटत असते.

25. ती कारणे देत नाही:

यशाचे स्पष्‍टीकरण नसते, परंतु अपयश हे चुकांना परवानगी देत नाही, असे हिल म्हणतो.

26. यशस्वी लोक हे जे हवे त्यावर ते लक्ष्य केंद्रीत  करतात











सौजन्य:weforum.org - by - divyamarathi 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल