बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

हजार रुपये ते चाळीस कोटींचा प्रेरणादायी प्रवास .

हजार रुपये ते चाळीस कोटींचा प्रेरणादायी प्रवास, औरंगाबादच्या तरुण उद्याेजकाचा थक्क करणारा प्रवास
-------------------------------------------
सामान्य कुटुंबात जन्माला येऊन मोठी स्वप्न पाहणे अन‌् ती पूर्ण करून त्यावर स्वार होऊन आनंदाची रपेट मारणे हा प्रकार तसा अवघडच पण औरंगाबादेतील एक तरुण उद्योजकाने सर्वासमोर हा आदर्शच उभा केलाय. वयाच्या २३ व्या वर्षी स्वत:चा उद्योग सुरू केला. वयाच्या ३२ व्या वर्षी केंद्रशासनाचे दोन पुरस्कार मिळाले. अवघा चार हजार रुपये पगार कमावणाऱ्या एका तरुणाने आज या उद्याेगाची उलाढाल ४० कोटींपर्यंत नेली आहे. मराठवाड्याच्या मातीत घडलेल्या सुनील कीर्दक या तरुणाने प्रचंड मेहनतीने हा चमत्कार घडवून दाखवलाय.
{ केद्र शासनाचा उत्कृष्ट उद्याेजक पुरस्कार व त्याच वर्षी पहिल्या पिढीतील उद्योजक पुरस्कारही
सुनील कीर्दक ( https://www.facebook.com/sunil.kirdak.5 ) हे नाव सन २००८ पर्यंत कोणालाही माहीत नव्हते, याच वर्षी केद्र शासनाचा उत्कृष्ट उद्याेजक पुरस्कार त्याला मिळाला त्याच वर्षी पहिल्या पिढीतील उद्योजक हा पुरस्कारही त्याला मिळाला अन‌् औरंगाबादच्या उद्याेग जगतात सुनील कीर्दक या तरुणाचे नाव सन्मानाने घेतले जाऊ लागले कोण हा तरुण अचान कसा काय एव्हढा मोठा पुरस्कार त्याला मिळाला अशाच प्रतिक्रिया त्या वेळी उमटल्या कारण हा पुरस्कार या आधी शहरातील श्रीकांत बडवे व उमेष दाशरथी यांना मिळालेला आहे. शहरात सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळवण्याचा मान सुनीलने मिळवला हे विशेष .
{ स. भु चा विद्यार्थी ते एक लेथ मशीन, एक ड्रील मशीन, एका कामगाराने सुरुवात
सुनील हा सरस्वती भुवनचा विद्यार्थी. दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिक्षण झालेले. वडील डॉ.व्ही.एम कीर्दक प्राध्यापक असल्याने चांगले शिकून मोठे व्हायचे एव्हढेच स्वप्न होते. बारावीला चांगले गुण मिळाल्याने त्याने जेएनईसी अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल ला प्रवेश घेतला . शिक्षण पूर्ण होताच पहिली नोकरी लागली ती बडवे इंजिनिअरिंगमध्ये तेथे साडेतीन हजार रुपये महिना पगारावर. ही नोकरी करीत असतानाच आपणही बडवे सारखे उद्योजक होऊ शकतो असा विचार त्याच्या मनात सतत येवू लागला . त्याने नाकरी सोडून एका मित्रा सोबत वाळूज येथे छोटेशे शेड भाड्याने घेतले काही महिने काम केल्यावर पार्टनरशिप सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले तेव्हा एक लेथ मशीन, एक ड्रील मशीन, एक कामगार घेऊन काम सुरू केले .
{ उत्पन्नाचा चढता आलेख
घरातून फारसे पैसे न मागता ऑर्डर मिळवायच्या त्याच्या अॅडव्हान्समधूनच ते काम करायचे असे ठरवल्याने सुनीलचा व्यवसाय मी पैशात सुरु झाला खरा पण सुरुवातीला फक्त वेल्डिंगच्या ऑर्डर मिळाल्या मित्राने पहिली आॅर्डर दिली दवाख्यानाला लागणारे पलंग तयार करून दिले पहिल्या वर्षी फक्त 10 हजारांची उलाढाल झाली. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना अचानक व्हेरॉक कंपनीचे मोठे काम मिळाले त्यांनीच सुनिलची जिद्द अन‌् चिकाटी पाहून आर्थिक आणि तांत्रिक मदत केली .त्यानंतर 2004 मध्ये वाळूज येथे त्याने टुल रूम सुरू केले तेथेच आणखी एक विशेेष उत्पादन सुरू केले ते म्हणजे एसपीएम मशीन (स्पेशल पर्पज मशीन) उद्याेजकांना त्यांच्या मागणीनुसार मशीन तयार करून देणे हे काम त्याने सुरू केले हे काम करणारे मोजकेच उद्याेग शहरात आहेत. त्याचा फायदा सुनीलला झाला. बघता बघता आज छोट्याशा रोपट्याचे रूपांतर मोठया उद्योगात होत आहे. ही उलाढाल आज ४० कोटींपर्यंत पोहाेचली आहे.
{ दिग्गज उद्योगांची कामे मिळाली
बडवे इंजिनिअरिंग, व्हेरॉकने सुरुवातीला चांगली कामे दिल्याने सुनीलला इतर उद्याेगांची कामे मिळाली हीराेहोंडा, स्कोडा, फाॅक्सवॅगन, महिंद्रा अँड महिंद्रा ची कामे मिळाली त्याच्या या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर २००८ मध्ये घेण्यात आली केंद्र सरकारचा उत्कृष्ट उद्याेजकता पुरस्कार संशोधन कार्याबद्दल सुनीलला मिळाला. घरात या पूर्वी कोणीही उद्योजक नव्हते त्यामुळे पहिल्या पिढीचा उद्याेजक हा पुरस्कारही याच वर्षी त्याला मिळाला .सुनिल ने पहिली कंपनी सुरु केली तीचे नावे आहे टुल टेक इंजिनिअरिंग त्याचे रुपांतर पुढे किर्दक आॅटोकॉम मध्ये झाले.


















आशिष देशमुख, औरंगाबाद.
(https://www.facebook.com/ashishdeshmukh.deshmukh.5)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल