गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

जगदीशचंद्र बोस-ज्यांना कळाले झाडांचे वेदना...


आज सर जगदीश चंद्र बोस यांची १५८ जयंती होय. जगदीश चंद्र हे एक मल्टी-टॅलेंटेड अशे व्यक्तिमत्व होते. ते हे एक जीवशास्त्रज्ञ (biologist), भौतिकशास्त्रज्ञ (physicist), वनस्पतीशास्त्रज्ञ (botanist), तसेच पुरातत्त्वज्ञ (archaeologist) होते. त्यांनी झाडांमध्ये मानव आणि इतर जिवां सारखी संवेदना असते, झाडे पण आनंदी, दुखी होतात आणि त्यांना देखील वेदना होतात हे सिद्ध केलं.
जगदीश चंद्र यानी प्रथम बिनतारी (wireless) संदेश पाठवणारा यंत्र विकसित केला होता पण या यंत्राचे श्रेय त्याना मिळाले नाही. आजची मॉडर्न वायरलेस टेकनॉलॉजी त्या अविष्कारावर आधारलेली आहेत. त्यांनी नेमेलाइट रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.

जन्म व बालपण

पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सबडिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.
जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

शिक्षण

डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.
बोस यांनी १८९७ मध्ये बनविलेले मायक्रोवेव्ह निर्मितीचे उपकरण

विद्युतशक्तीवरील संशोधन

इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.

वनस्पती शास्त्रातील संशोधन

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे वनवून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.
वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून हि प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.
Bose invented the Crescograph an electrical instrument that could measure the growth of a plant.
Bose invented the Crescograph an electrical instrument that could measure the growth of a plant.

संस्थास्थापना आणि लेखन

जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

लिहिलेली पुस्तके

इरिटेबिलिटी ऑफ प्लँट्स
इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लँट्स
ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स
दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
प्लँट रिस्पॉन्स (१९०६)
दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)
लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लँट्स (भाग १ ते ४)

मृत्यू

जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले. पण आज देखील ते त्यांच्या उलेखनीय शोधां च्या रुपात अजरामर आहेत.















संदर्भ

www.wikipedia.com

यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी.

प्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण

यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी.


प्रयत्न आणि चिकाटी

मित्रांनो यशस्वी होण्यसाठी दोन खूप महत्वाचे गुण लागतात ते म्हणजे प्रयत्न आणि चिकाटी. आज आपण याच दोन गुणांबद्दल माहिती घेणार आहोत.

प्रयत्न

एखाद्या गोष्टीत अपयश आले. तर किती वेळा प्रयत्न करावा असे तुम्हाला वाटते? हा लेख वाचून याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. आज आपण अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांचा बद्दल खूपच थोडक्यात माहिती घेणार आहोत.
अब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.

अब्राहम लिंकन यांची अपयशे

लिंकन यांची अपयशे
  • 31 व्या वर्षी ते Business मध्ये fail झाले.
  • 32 व्या वर्षी ते state legislator चे निवडणुक हरले.
  • 33 व्या वर्षी त्यांनी नवे business try केलं, आणि परत त्यात fail झाले.
  • 35 व्या वर्षी त्यांचा प्रयसीचे निधन झाले.
  • 36 व्या वर्षी त्यांचं nervous break-down झालं.
  • 43 व्या वर्षी त्यांनी अमेरिकन कांग्रेस साठी निवडणूक लढवल पण त्यातही त्यांचा पराभव झाला.
  • 48 व्या वर्षी  त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून पुनप्रयत्न केला त्या वेळीही त्यांना पराभवच आला.
  • 55 व्या वर्षी त्यांनी Senate साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव.
  • 56 वर्षी त्यांनी अमेरिकेच्या Vice President पदासाठी निवडणूक लढवली आणि तेही हरले. या नंतर परत senate साठी झालेल्या निवडणूकीत देखील त्यांचा प्रभाव झाला.
मित्रांनो एवढे अपयश सहन करून सामान्य मानूस निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. पण अब्राहम लिंकन या असामान्य माणसाने परत एकदा प्रयत्न करायचे ठरवले. 1860 मध्ये झालेल्या अमेरिकन president पदा साठी त्यांनी पुन निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं. जवळपास 30 वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाचा 59 व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. आणि पुढे काय झालं याची साक्ष इतिहास देतो.
म्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रानो
मानले तर हार आहे आणि ठरवलं तर जित आहे.

चिकाटी

सोडू नका. कधीच सोडू नका.
कधीच कधीच कधीच सोडू नका.
-विन्स्टन चर्चिल
कधीच कधीच कधीच कधीच सोडायचं नाही. ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. यशाचा मार्गावर इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारा एक गुण म्हणजे बाकी लोक सोडून देत असताना – आपण जात राहण्याची योग्यता, आपण सुरु ठेवण्याची योग्यता, म्हणजे एका शब्दात सांगायचे तर चिकाटी. या चिकाटीची सुंदर उदाहरण आपण वर बघितलच आहे.
चिकटीची तुलना त्या सतत पडणाऱ्या पाण्याशी करता येईल जे अखेर अतिकठीण दगडालाही झिजवून टाकतं.
म्हणून मित्रानो एक ध्येय ठेवा आणि शेवट परियंत चिकटून राहा. तुम्ही यशस्वी नक्की होणार त्याला जगतील कोणतीही गोष्ट किंवा शक्ती रोखू शकणार नाही.
यशस्वी होणारा माणूस सोडत नाही.सोडणारा माणूस यशस्वी होत नाही











by - internet 

नेतृत्वगुण जोपासण्यासाठी

कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण बाणवणे आवश्यक आहे. 

नेतृत्त्व गुण जोपासणे


कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण बाणवणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुण जोपासणे म्हणजे नेमके काय, ते जाणून घेऊयात.
नेतृत्वगुणांची गरज 
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही लहान किंवा मोठय़ा सांघिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नेतृत्वगुणांची आवश्यकता भासते. मग ती जबाबदारी कोणतीही असो, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमधील प्रोग्रािमग प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणे असो, अकाउंटन्टने कंपनीचे ऑडिट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असो, किंवा एखाद्या इव्हेन्ट मनेजमेंट कंपनीतील इव्हेंटचे सोपस्कार पूर्ण करणे असो.. आजच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीत, कंपनीच्या व्यवस्थापनासमोर किंवा वरिष्ठांसमोर, अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत स्वतचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर, नेतृत्वगुण बाणवणे अत्यावश्यक आहे. नेतृत्वगुण हा कोणता एक गुण नसून गुणांचा समूह आहे .
सकारात्मक विचारसरणी 
सर्व काळजी घेऊनही, अनेकदा कामात त्रुटी राहू शकते. त्यामुळे काही वेळा अचानक तणावाची परिस्थिती कामाच्या ठिकाणी निर्माण होते, अशा काळात गटप्रमुखाने धीर न सोडता, खंबीरपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे असते. झालेल्या घटनांचे योग्य विश्लेषण करून वेळेचे, श्रमांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि ध्येयापर्यंतचा पुढील मार्ग कसा निर्धोक होईल, याबद्दल गटप्रमुखाने सकारात्मक पावले उचलायला हवीत.
स्वयंमूल्यांकन 
समूहाचे मार्गदर्शक होण्याआधी, स्वतला ओळखणे, स्वतच्या मर्यादा, क्षमता, माहितीच्या कक्षा, मेहनत घेण्याची तयारी अजमावून पाहायला हवी.
जोखीम स्वीकारण्याची तयारी 
लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याची तसेच आíथक संकटांची जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता नेत्याच्या अंगी असायला हवी.
जलद, प्रभावी निर्णयक्षमता 
ईप्सित ध्येय साध्य करण्यासाठी, नेत्याने 
आवश्यक ती निर्णयप्रक्रिया जलद आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी नेत्याने स्वीकारायला हवी.
संयत वर्तणूक
समूहातील सहकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन, त्यांच्या कामातील दोष, त्या त्या वेळेस मात्र संयत पद्धतीने दाखवून दिल्यास कामातील अडथळेही दूर होतात आणि सहकाऱ्यांचा गटप्रमुखाबाबतचा आदर दुणावतो.
आरंभशीलता 
कोणतीही नवीन जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी लागेल ती मेहनत करण्याची आरंभशील वृत्ती नेत्याच्या अंगी असणे फार महत्त्वाचे आहे.
हस्तांतरणकौशल्य 
अपेक्षित काम योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पूर्ण होण्यासाठी, सर्व समूहसदस्यांचा एकत्रित सहभाग गरजेचा असतो. यासाठी नेत्याने कामाचे योग्य प्रकारे विभाजन करून सदस्यांच्या क्षमता आणि अनुभव लक्षात घेऊन, कामाचे हस्तांतरण करणे आवश्यक असते. यामुळे कामाचा वेग वाढतो, सर्व सदस्यांना कोणती ना कोणती जवाबदारी पेलल्याचे समाधान मिळते. दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिकाराचे स्वातंत्र्यही हस्तांतरित करणेही महत्त्वाचे आहे.
प्रोत्साहन 
कामाचा वेग आणि दर्जा उत्तम राखण्याकरता कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची गटप्रमुखाने वेळोवेळी दखल घेत त्यांची प्रशंसा करणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी, मर्यादा लक्षात घेऊन प्रमुखाने केलेली मदत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते. आणि कामाचा उत्साह टिकवून ठेवते.
संवादकौशल्य 
कामाच्या ठिकाणचे वातावरण निकोप राहावे, याकरता समूहातील सदस्यांचा आपापसांत आणि नेत्याचा समूहसदस्यांशी सुसंवाद राहणे गरजेचे आहे. यामुळे समूह आणि नेता यांचे परस्परांशी सहकार्याचे आणि सामंजस्याचे संबंध राहून, लक्ष्य गाठणे सोपे होते. यासाठी आधी नेत्याने समूहातील सर्वाशी नेमाने संवाद साधायला हवा; काही वेळा कार्यालयातील औपचारिक संकेत बाजूला सारून नेत्याने समूहसदस्यांशी जाणीवपूर्वक अनौपचारिक संवादही साधायला हवा. यामुळे नेता आणि समूहसदस्यांमध्ये आपुलकी 
निर्माण होण्यास मदत होते 
आणि अर्थातच याचा सकारात्मक परिणाम समूहाच्या कामगिरीवरही दिसून येतो.
उत्तम श्रोता 
समूहातील प्रत्येकाशी स्वतंत्र किंवा एकत्रित संवाद साधताना शांतता आणि संयम राखून सदस्यांचे बोलणे गटप्रमुखाने ऐकून घ्यायला हवे. यामुळे समूहात सुसंवाद साधणे शक्य होते. त्याचप्रमाणे नवीन संकल्पनांची माहिती नेत्याला मिळू शकते. आपले म्हणणेही ऐकून घेतले जाते, असा विश्वास कर्मचाऱ्यांना वाटून त्यांचा काम करण्याचा उत्साह दुणावतो.
समूहाचे मूल्यांकन 
गटप्रमुखाला ज्या समूहाबरोबर काम करायचे आहे त्या समूहातील सदस्यांबाबत काही मूलभूत गोष्टी माहिती असणे आवश्यक ठरते. समूहसदस्यांच्या क्षमता, मर्यादा, अडचणी, कोणता सदस्य कोणती गोष्ट चांगली पार पाडू शकेल, त्यांपकी कितीजणांनी, याआधी कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत, प्रत्येकाची शैक्षणिक क्षमता, अनुभव, कार्यपद्धती, शारीरिक आणि मानसिक क्षमता चाचपून पाहणे, प्रत्येक सदस्याशी मित्रत्वाचे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे. या गोष्टी नेतृत्त्वाची परिणामकारकता वाढवतात.
प्रामाणिकपणा 
नेत्याच्या वर्तणुकीतील आणि विचारांतील प्रामाणिकपणा समूहसदस्यांना जाणवल्याने संघनेतृत्व अधिक परिणामकारक बनते. स्वत:चे अज्ञान, चुका जिथल्या तिथे दिलदारपणे मान्य करण्याने, तसेच समूहसदस्यांनी दिलेल्या विशेष सहकार्याला सर्वासमक्ष उत्स्फूर्त दाद दिल्याने, समूहसदस्यांच्या मनात नेत्याची प्रतिमा उंचावते.
उत्तम वक्तृत्व 
आपल्या मनातील भावना, इच्छा, विचार कर्मचाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, नेत्याच्या अंगी उत्तम वक्तृत्वगुण असायला हवेत. बोलणे सुसूत्र, मुद्देसूद, मनातली इच्छा व्यक्त करणारे असायला हवे. भाषा सर्वाना समजेल, रुचेल अशी हवी. मुख्य म्हणजे प्रभावी आणि स्पष्ट वक्तव्यातून, इच्छित ध्येय गाठण्याची आवश्यकता नेत्याने समूहाच्या मनावर ठसवणे गरजेचे असते. यामुळे नेत्याच्या मनातील ध्येय फक्त नेत्याचे न राहता, ते पूर्ण समूहाचे ध्येय बनते, आणि सांघिकशक्ती बळकट होते.
विनोदबुद्धी 
तणावाच्या, अडचणीच्या क्षणी निराश न होता कामाच्या ठिकाणचे वातावरण हलकेफुलके ठेवले तर समूहातील सदस्यांच्या मनावरील ताण हलका होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. कोणाचेही मन न दुखावता, उद्भवलेल्या कठीण समस्येला सामंजस्याने सामोरं जाण्याची सवय नेत्याने जोपासायला हवी.
विश्वासार्हता 
समूहातील सदस्यांचा, नेत्यावर विश्वास असणे गरजेचे असते. हा विश्वास संपादन करण्यासाठी नेत्याने स्वतच्या वागण्या-बोलण्यातून, समूहाने केलेल्या कामाची जवाबदारी पेलण्यास तो पूर्णपणे समर्थ आहे असा विश्वास सतत देत राहायला हवा. नेत्याने स्वत कामातील अचूकता, वक्तशीरपणा, आणि उत्तम वर्तनकौशल्य या गोष्टींतून समूहापुढे आदर्श घालून देणे गरजेचे ठरते.










- by Loksatta 

शट डाऊन ऍण्ड रिस्टार्ट....


चांगले-वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काहीवेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते. अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूतीशिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशावेळी रडता, घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कसे ते सांगते. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही. अशावेळी तुम्ही काय करता?
फोन आणि संगणक जसेहँगहोतात तसेच आपल्या मेंदूचेही होते. विचार पांघरूण डोक्यावर ओढून झोपून जातात आणि मेंदू हँग होतो. तेव्हा सारखी बटणं दाबत बसू नका. ‘डोकं का चालत नाही?’ या मुद्यावर स्वत:चा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर मारून परत मोबाईलमध्ये घालून चालू करण्याचा अनुभव सर्वांनाच असेल. तसेच करा. काही वेळापुरता सर्व विचार बाजूला सारा. काय होत नाही किंवा का होत नाही यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. स्वत:ची बॅटरी काढा. थोडे मोकळे व्हा. जे आवडते ते करा. मित्रमैत्रिणींना भेटा. छंद पूर्ण करा. जमेल त्यानुसार एक किंवा दोन दिवस मनाची बॅटरी चांगल्या रितीने चार्ज करा. मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष घाला. एकटेच दूरपर्यंत चाला. स्वत:शी चांगल्या गप्पा मारा. काम आणि जबाबदार्यांमध्ये अडकल्यामुळे इतर वेळी जे करणे राहून जाते ते करा. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन. हे सगळे करून बॅटरी नक्कीच चार्ज होईल. मग पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. जुने वाद, प्रसंग, दु:, त्रास यांच्याकडे नव्याने पहा. विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल.आपले मन म्हणजे एखाद्या मोबाईलसारखे असते. दिवस-रात्र वापर करीत असताना अनेकदा त्याची बॅटरी लो होते. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. त्याचबरोबरमनहँग झाले की पूर्णपणे शटडाऊन करून रिस्टार्टही करावे लागतेच.
मनाची काळजी घ्या. बॅटरी चार्ज करीत राहा आणि गरज भासली तरशटडाऊन ऍण्ड रिस्टार्ट.’





by - Marathi Mati



माझ्याबद्दल