अlशिष (बाबा आमटेंचा नातू) जपानच्या एका ट्रेन मधे चढला.
ट्रेन तशी मोकळी होती. तो ज्या डब्या मधे होता त्यात जेमतेम २-३ माणसे होती. सिट मोकळे असल्यामुळे तो सरळ जाऊन समोरच्या एका सिट वर बसला. थोडा वेळ झाला तसा एक मध्यम वर्ग जपानी व्यक्ति त्याच्या शेजारीच पण एक सिट सोडुन बसला. दोन-तीन मिनटाने सहज त्याचे लक्ष त्या व्यक्तिकडे गेले तर तो त्याच्या सिटमधे काहितरी छोटी वस्तु घुसवत होता. अशिष ला जरा विचित्र वाटले म्हणुन त्याने त्याची नजर वळवुन दुसरीकडे
पाहायला लागला. बराच वेळ झाला तरी ती त्या व्यक्तिचं ते काम चालुच होतं. न राहुन अशिष ने निरखुन पाहिलं तर त्याच्या हातात एक सुई
दोरा होता आणि तो त्याच्या खाली फ़ाटलेली सिट शिवत होता. अlशिष ला थोडं आश्चर्य वाटलं. जेंव्हा त्याची सिट शिवुन झाली तेंव्हा अशिष ने न राहुन
त्या व्यक्तिला जपानी भाषेत विचारलं. (भाषांतरीत)
अlशिष : माफ़ करा पण मला प्रश्न होता ?
व्यक्ति : हो विचारा कि.
अशिष : तुम्ही ट्रेन चे कर्मचारी आहात का? तुम्ही सिट शिवताय म्हणुन म्हटलं.
व्यक्ति : नाही. मी कुणी कर्मचारी नाही. साधा शिक्षक आहे. लहान मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच ट्रेन ने प्रवास करतो. दररोज ही सिट फ़ाटलेली पाहत असतो. आज आठवनीने सुई-दोरा आनुन शिवुन टाकली. कशी जमलीये छान ना ? (हसत हसत )
अlशिष : हो. पण तुम्ही का शिवताय ?
व्यक्ति : कारण हि फ़ाटलेली सिट खुप विचित्र दिसत होती. जर उद्या कुणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिने हे पाहिलं असतं तर
आमच्या देशाचं नाव त्याच्या साठी खराब झालं असतं.
माझा देशाचं नाव कुठे मलिन झालेलं मला आवडनार नाही शेवटी हि आमचीच संपत्ती आहे आणि आम्हालाच संभाळायची आहे.
"आमच्या देशाची काळजी आम्ही नाहि घेणार तर कोण घेणार?"
ट्रेन थांबली आणि "अच्छा! जातो." म्हणुन ती व्यक्ति गेली देखील.
अlशिष त्या वेळी फ़क्त ’निशब्द’ होता. स्वत:च्या देशावर
भरभरुन प्रेम करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातुन एक कडक सलाम ठोकला. माणुसकिचे, राष्ट्रप्रेमाचे, संस्कृतीचे धडे जगाला देणाऱ्या त्या जपानचं मुळ कशात आहे ह्याचं उत्तर अषिश ला मिळालं होतं.
"संस्कार आणि संस्कृती".
फुटबॉल च्या सामन्यात पराभव झाल्यानंतर, सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर थांबून त्यांच्या भागातील कचरा प्लास्टिक च्या पिशव्यांत भरून साफसफाई केली. या पिशव्या बरोबर नेऊन शहरातील कचरा टाकण्या साठी केलेल्या जागांवर नेऊन टाकल्या.
देश मोठे होतात ते अशा नागरिकान मुळे... ट्रक च्या मागे 'मेरा देश महान' असे लिहून नाही ....
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा